Login

आठवणीची महती

आठवणी जीवनाच्या
याद ही एक अशी किमया आहे
कितीही आठवायच नाही म्हणल तरी
मनात अलगद डोकावून जाते
जिच्यावर ही दुनिया
नेहमी झुलत राहते.......

मनात काही साठवायचे नाही म्हणले
तरी सतत काय साठवायचे नाही
याची आठवण मात्र
सतत चालू असते......

आठवणींना आठवण्याची
गरज नसते
ती तर कधीही कुठेही
येऊन जाते.....

क्षणात हसवते क्षणात रडवते
अशी ही आठवण
आपल्या जीवनाचा
अविभाज्य भाग असते.....

आठवणी शिवाय जीवन नाही
आठवणीने जगणे सोपे होई
आठवणी राहतात मनात साठून
कधीही पाहता येते त्यास उघडून....

आठवण म्हणजे आहे आधार
दुखामध्ये कमी करते मनाचा भार
निराधार आहे जीवन ज्यांचे
त्याच्या आयुष्यातला असते सार......

आठवणीतच आहे जीवन आपले
म्हणून आठवणींना
मनाच्या गाभाऱ्यात जपले.....