अजित हा एका चांगल्या इंटरनॅशनल कंपनीत मॅनेजर होता आणि हुशार असल्यामुळे चांगला पगार आणि कंपनी मध्ये लवकरच सिनियर मॅनेजर च्या पोस्ट वर शिफ्ट होणार होता.
कॉलेजात असतांना त्याची एक गर्लफ्रेण्ड होती, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण अजितच्या घरचे त्या मुलीशी लग्न करायला मान्य झाले नाही आणि शेवटी अजितला आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार " अक्षरा " शी लग्न करावं लागलं .
"अक्षरा " एका लहान शहरात लहानाची मोठी झालेली, घरची परिस्थिती सुद्धा साधारण. कधी शहराच्या बाहेर न गेलेली मुलगी आता लग्न झाल्यावर मुंबई ला जाणार होती.
दोघांचं लग्न झालं आणि अजित अक्षराला घेऊन मुंबईला आला.
आकाशाला भिडण्याऱ्या बिल्डींग तिने कधीच बघितल्या नव्हत्या ,अगदी वेगाने चालणारी ट्रेन, आजू-बाजूला गर्दी, वेग-वेगख्या प्रकारचे लोक बघून ती घाबरलीच होती.
एवढ्या मोठ्या शहरात मी कशी राहणार? ना कोणी ओळखीचं आहे... ना मला काही माहित आहे ...
अजित आणि अक्षरा त्यांच्या मुंबई च्या घरी पोहचले.
ते घर अगदी लहान पण नीट-नेटका होतं. भिंतीवर पेन्टिंग्स , घर सजवण्यासाठी २-३ शोपिस आणि सोफा तर अगदी आलिशान होता. "अक्षरा" ला तिचा नवीन घर बघून खूप आनंद झाला. ती हळू हळू सगळं न्याहाळत होती.
" अक्षरा , आवडलं का घर तुला?
"हो, अगदी छान आहे हं "
"हो ना, सगळं इंटिरियर " नेहा" ने केलाय "
" नेहा? कोण नेहा"?
" अगं माझी आसिस्टंट, तिने च मला घर शोधण्या पासून तर इंटिरियर सिलेक्ट करण्या पर्यंत मदत केली"
"अच्छा, आपण बोलवूया ना नेहा ला एकदा आपल्या घरी जेवायला "
" हा हा .... अगं नेहा ती अगदी फूड कॉन्शिअस आहे , तिला साधा जेवण नाही चालत, ती फक्त डाएट फूड खाते
अजित हसत हसत म्हणाला.
दोघे जण प्रवास करून थकलेले असल्यामुळे लवकर च झोपून गेले.
पुढच्या दिवशी अक्षरा ला नेहमी ची सवय असल्यामुळे लवकर उठली, आणि तिने अजित साठी छान नाश्ता करायचं ठरवलं.
तिने मस्त कांदा पोहे त्यावर छान लिंबू अशी डिश अजित साठी रेडी ठेवली .
अजित मात्र ऑफिसचा कॉल आल्या मुळे जागा झाला. तो घाई-घाईत उठला आणि तयार होऊन ऑफिस ला जायला निघाला.
"अहो. ,..............पोहे केलेत गरम गरम, खाऊन जा "
"अगं आज खूप उशीर झालाय,. येतो मी"
"अजित तसाच ऑफिस ला निघून गेला "
अक्षराला थोडं वाईट वाटलं पण तिच्या घरासमोर एक छान बाल्कनी होती आणि त्या बाल्कनीतून समोरच्या मोठ्या मोठ्या बिल्डींग्स , अगदी नीट-नेटके पणाने केलेलं माळीकाम , वेग-वेगळ्या प्रकारची झाडं. बाल्कनी मधून रस्ते इतके लहान दिसत की असा वाटायचं काळ्या मुंग्या आपल्या घराकडे जात आहेत.
ह्या सगळ्या दृश्याने तिचा अजित वरचा राग निघून गेला. नंतर तिने घर साफ करायला घेतलं तिथे तिला एक इन्व्हिटेशन कार्ड दिसलं. त्यावर लिहिलेलं होतं
मि. & मिसेस. - अजित & अक्षरा ह्यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
लंच पार्टी _ ३० मे २०२१. दुपारी १२ (ऑफीस)
अक्षरा ला वाटलं, अजित आपल्याला सांगायचं विसरला असेल आपण जाऊया आणि बघुयात, अजित ला सुद्धा छान वाटेल मी आलीये.
ती छान लग्नात घेतलेली सुंदर काठपदराची साडी घालते.. लांसडक केसांचा अंबाडा त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, तिचे ते भले मोठे डोळे आणि त्यात काजळ तर उठून दिसत होतं. त्या गोऱ्या आणि नाजूक हातात लाल बांगड्या आणि कपाळावर छान चंद्रकोराची टिकली... अगदी नुकतच लग्न झालेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचं तेज असतं तेच तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
ती तयार मात्र झाली, पण ऑफिस पर्यंत जायचं कसं हेच तिला माहित नव्हतं. अजितने खर्चा साठी तिच्याकडे काही पैसे दिले होते ते तिने घेतले आणि निघाली.
ती सरळ रस्त्याच्या दिशेने जाते. तिथे लगेच तिला एक टॅक्सी दिसते ती टॅक्सी ला हात देते आणि टॅक्सी वाला म्हणतो
" मॅडम. लाईन मी खडे रहो "
मागे वळून बघते तर भली मोठी रांग टॅक्सी साठी. ती ज्या शहरात वाढली होती तिथे टॅक्सी वाले कस्टमर साठी लाईन मध्ये थांबायचे इथे तर काहीतरी भलतंच आहे"
ती सगळ्यात मागे लाईन मध्ये जाऊन उभी राहते. मागून एक रिक्षा वाला येतो'
" मॅडम बोला कुठे जायचं "
अक्षरा ऑफिस चा पत्ता दाखवते,
"बसा मॅडम, मुंबई मध्ये नवीन वाटतं "
" हो, तुम्ह्लाला कसा समजलं "
"मॅडम आमचा हा रोजचा धंदा"
"मॅडम तुम्ही कोकणातून आहेत का "?
"हो, "
" बघा, आपल्याला लगेच समजतं "
अक्षर ऑफिस पर्यंत पोहोचली, अगदी उंच इमारत. ती आत गेल्यावर तिला मात्र लिफ्ट कशी वापरायची हे ठाऊक नव्हतं. ती लिफ्ट समोर अगदी गोंधळाला सारखी दिसत होती.
" हॅलो , मी काही मदत करू का"?
मागून एका सुरेख मुलीचा आवाज आला..अक्षरा ने मागे वळून बघितलं तर एकदम सडपातळ ,सुंदर केस,
केशरचना तर अगदी एक केस एकाचा तिकडे नाही अशी.. चेहऱ्यावर अगदी पुरेसाच मेक अप आणि छान गुलाबी रंगाची लिपस्टिक. ड्रेस तर अगदी फॉर्मल .. म्हणजे जणू काही ती एखाद्या कंपनी ची मालकीणच असावी..
" कोणत्या फ्लोर वर जायचं आहे तुम्हाला"?
अक्षरा ऑफिस च नाव सांगते.. आणि त्या दोघी वर पोहोचतात..
समोर बघतो तर काय, "अजित" लिफ्ट वर येण्यासाठी वाट बघत होता.
"हाय नेहा ..!"
"हे अजित"
तेवढ्यात अजित अक्षरा कडे बघतो..
"अक्षरा , इथे काय करतेयस तू"?
अहो , मी ते... इन्व्हिटेशन ....
अच्छा, मी तुला सर्प्राईस देणार होतो पण तू तर मला च SUPRISE दिलं !!
दोघे जण ऑफिस लंच करून घरी जातात.
"अहो, ती नेहा, दिसायला किती सुंदर आहे, खूप शिकलेली आणि हुशार पण आहे
तिला पगार पण छान च असेल ना !
"अजित हसायला लागतो, अगं हो आहे तशी ती छान "
"मग तुम्ही तिला सोडून माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या, कमी शिकलेल्या, मॉडर्न नसलेल्या आणि तिच्या सारखा मेकअप सुद्धा मला येणार नाही; " मग तुम्ही माझ्या सारख्या मुलीशी का केलं लग्न ?
अजित हसत हसत अक्षरा जवळ येतो, तिचा हात हातात पकडतो आणि तिला बाल्कनी मध्ये घेऊन जातो .
अगं अक्षरा , पहिली गोष्ट म्हणजे तुझी आणि तिची तुलना च होऊ नाही शकत, कारण प्रत्येक स्त्री ही जगातली सगळ्यात सुंदर स्त्री असते.
मुळात स्त्री म्ह्णून जन्माला येणं हे सोपं नाही, बघ ना... तूच लहानपणापासूनच किती त्याग केलाय बऱ्याच गोष्टींचा.
मला तर वाटतं देवाने सगळ्या स्त्रियांना बनवतांना अगदी मुहूर्त बघून बनवला असणार.
माझ्या आयुष्यात स्त्रिया आहेत. तू , माझी आई , माझी बहीण, नेहा आणि माझ्या मैत्रिणी. त्या सगळ्या कडे बघून मला वाटतं की तुम्ही माझ्या आयुष्यात नसत्या तर माझा अस्तित्व च राहिलं नसतं.
स्त्री म्हणजे मायाळूपणाचा कळस. लहानपणी माझ्या कडे २ लाडू असले की मी ते पटकन खाऊन घ्यायचो , पण माझी बहीण ती मात्र एक लाडू वडिलांसाठी काढून ठेवायची,. भगवंताने स्त्रियांना सहनशिलता , त्याग , प्रेम आणि सागराएवढी माया दिली आणि इतका देऊन नवीन जीव जन्माला देण्याची देणगी सुद्धा देवाने स्त्रीयांना दिली. म्हणून प्रत्येक स्री ही SPECIAL आहे. आणि जे तू म्हणत्येस की ती छान दिसते , ती हुशार आहे. अगं पण तुझ्याकडे बघ. तू छान तर पुरणपोळी बनवते पण विणकाम, आणि तुझं पेन्टिंग पण किती छान आहे, आणि बाह्यसौंदर्य क्षणिक आहे. ४० वर्षानंतर तू काय आणि मी काय , सुरकुत्या असेलेले आजी-आजोबा च दिसणार आहोत.
अजित चे हे शब्द ऐकून अक्षराच्या मनात अजित बद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. नेहमी पुरुषांच्या जातीला वाईट ऐकलेलं पण सगळे पुरुष सारखेच नसतात. अजित सारखे पुरुष सगळ्याच स्त्रीयांना मिळाले तर कदाचित सगळ्यांच कौटुंबिक आयुष्य अगदी खुलून जाईल.
बरेच पुरुष आपल्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांची इतर स्त्रियांशी तुलना करतात. मुळात एका स्त्री ची दुसऱ्या स्त्री सोबत तुलना च होऊ शकत नाही. प्रत्येक स्त्री म्हणजे देवाने पुरुष्यांच्या आयुष्यात दिलेली एक अप्रतिम देणगी .
प्रत्येक स्त्री ही २४ कॅरट सोनं असते . काही पुरुष ते घालून मिरवतात पण काही पुरुष मात्र त्याला दगड समजून पितळ व्हायला सांगतात. शेवटी प्रत्येकाची आवड आणि प्रत्येकाचं मत.
पुरुषांची जात नाव ऐकलं की, बायको ला छळणारा पुरुष डोळ्यासमोर येतो. पण सर्व पुरुष सारखेच नसतात. काही पुरुष अजित सारखे असतात. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक तरी अजित असतोच तो आपला मित्र, नवरा किंवा भाऊ काहीही असो. खरंच , अजित सारख्या सर्व पुरूषांना हॅट्स ऑफ.