Jul 16, 2020
सामाजिक

मासिक पाळी (भाग 1) व माझे बदललेले आयुष्य

Read Later
मासिक पाळी (भाग 1) व माझे बदललेले आयुष्य

मासिक पाळी (भाग 1)
(आणि माझे बदललेले आयुष्य) 


आज सकाळपासून अंग खुप कणकण करत होत.
कशातच मन लागत नव्हते,
 ओटी पोटात हलक्या वेदनाही जाणवत होत्या.
अंग गरम लागत होते,
हातपाय जड पडले होते, 
माझी ही अवस्था प्रत्येक महिन्याला च असायची.
 पण या वेळी जरा जास्त जाणवत होतं. 
नेहमी सगळे दुखणे अंगावर काढणारी मी आज मात्र मोडून पडले होते. 
कुणाच्या तरी आधाराची गरज वाटत होती.
 पण कुणाला सांगणार घरात काम करणारी मी एकटी,
म्हणजे सासूबाई नाहीत मला माझ्या लग्नापूर्वी त्या देवाघरी गेल्यात. 
आजार झाला होता त्यांना असे दीपक सांगतात.
दीपक, माझे पती जे एका मोठ्या आय टी कंपनी मध्ये मॅनेजर आहेत,
 सासरे सेवानिवृत्त सरकारी नोकर व  आठ वर्षाचा विशाल माझा मुलगा, 
सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. 
कुणाकडे कुणासाठी क्षणभर देखील वेळ नसतो.
 त्यात माझी विचारपूस कोण करणार.
थकलेल्या शरीराने मी कामाला लागले.
काम करवत नव्हते पण माझ्या समोर दुसरा पर्याय देखील नव्हता. 
बाबा गावाकडे शेती बघण्यासाठी गेले होते मग घरी मी, दीपक व विशाल तिघेच होतो. 
कसाबसा मी संध्याकाळचा स्वयंपाक केला. 
बाकीची सगळी कामे तशीच टाकून हॉल मध्येच सोप्यावर पडले.
झोप काही लागली नाही पण थोडे बरे वाटले. 
संध्याकाळ झाली व दीपक ने वाजवलेल्या
हॉर्न ने मी भानावर आले, 
सर्व प्राण एकवटून पुन्हां कामाला लागले.
हातपाय चालत नव्हते तरी वेदनांना न जुमानता मी माझे काम करत होते.
तितक्यात दीपक आला 
 मेघना आवरले का तुझे काम?

मी फक्त मान हलवली,
खर तर माझा चेहरा बघून त्याने ओळखावं व विचारावं काय झालंय ग तुला बर नाही वाटत का ?
डॉक्टर कडे जाऊयात का? 
त्याच्या साध्या विचारण्याने माझे अर्धे दुखणे
पळून जाते 
पण हे त्याला कोण सांगेल 
तो व्यस्त असतो,
त्याचे  काम,ऑफिस, मित्र ,मोबाईल व मिळालाच वेळ तर टी व्ही 

माझे काय मी आपली दिवसभर घरात असते,
मी कुठे काय करते 

मी शांत आहे काही बोलत नाही हे त्याच्या लक्षात देखील आले नाही.
लवकर तयार हो आपल्याला पार्टी ला जायचे आहे. 
माझ्या बॉस ची पार्टी आहे 
दीपक उत्स्फूर्तपणे म्हणाला.

एकटा गेलास तर नाही जमणार का ? 

मी थोडे घाबरतच विचारले 
कारण दीपक ऑफिस वरून आला की थोडा वेळ आमच्या घरात कर्प्फु लागतो मग त्याच्या मूड वर घराचा मूड ठरतो. 

तो खुश असेल तर सगळे खुश 
आणि कुणाशी काही वाजले असेल तर सगळ्यावर चिडचिड करणार अगदी बाबा व विशाल वर सुद्धा.

नाही जावेच लागेल व बॉस च्या पत्नीला तुला बघायचे आहे त्यांनी आवर्जून बोलावले आहे तुला 
दीपक फ्रेश होण्यासाठी जात बोलला 

आता मात्र माझी परीक्षा होती एक तर बरे वाटत नाही 
त्यात पुन्हा आवरून जायचे 
व पहिल्यानंदा जाणार म्हणजे चांगले जावे लागेल 
त्यात दीपक च्या हजार सूचना असे बोल तसे बोलू नको 
याला बोल त्याला बोलू नको 
हे घाल ते घालू नको 
काय करावं काही कळेना 
 

क्रमशः...........

ईच्छा नसतानाही जाईल का मेघना दीपक सोबत 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा माझ्या व मला फॉलो करा

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,