मासिक पाळी (भाग 2) व माझे बदललेले आयुष्य

Menstruation and my changed life a story experienced by every women

मासीक पाळी (भाग 2)

माघील भागात आपण पाहिले 
दीपक पार्टी ला जाण्यासाठी मेघणाकडे हट्ट करत होता 

व आता पुढे 

मेघना ची जाण्याची बिल्कुल ईच्छा नसते, 
आज तिचे शरीर व मन दोनी थकले होते.
 पण सांगणार 
कुणाला?
 कोण?
 समजून घेईल ?
दीपक ला सांगावं तर तो अगोदरच शिकमोर्तब करून गेलाय की तुला काही झालं तरी यावेच लागेल. 
काय करावं काही कळेना 
मी प्रिझ ला पकडून पाच मिनिटे उभा राहीले.
नकळत का होत नाही पण मनाने भूतकाळाचा वेध घेतला व मी त्यात हरवून गेले.
माझा तो पहिला अनुभव 
काय असते,
काय होते, 
काय काळजी घ्यायची हे ताई ने अगोदरच समजावले होते. 
पण स्वतः अनुभवणे खुप वेगळं होते.
किती सोहळे झाले होते माझे. त्यानंतरही 5 दिवस आई कुठलेच काम सांगत नसे फक्त मज्जा असायची.
खाणे व टीव्ही बघणे. 
कुणी ओरडत नव्हते. 
कुणी जर साधे काम सांगितले तर आई त्यांच्यावर ओरडायची. 

आई पोट खुप दुखतंय असा एक शब्द पुरेसा होता गरम पाण्याची पिशवी मिळायला. 
त्या दिवसात आई इतके जपायची की कधी कधी वाटायचं ते दिवस संपूच नयेत.

खरच माहेर ते माहेरचं असते.

मनात भावनांचा झालेला गोधळ बघून डोळ्यांनी केव्हाच गंगा,यमुना सुरू केल्या होत्या 
आणि या सगळ्यात दीपक ने आवरायला सांगितले याचे भान देखील राहिले नाही. 

दीपक आवरून खाली आला व मला असे उभा बघून जोरात ओरडला. 

मेघना तू अशी कितीवेळ उभी राहणार आहेत. 

तुझ्याकडे पर्याय नाही व माझ्याकडे वेळ,
त्यामुळे लवकर आवर.

मी त्याच्या नकळत डोळे पुसले 
आणि तयार होण्यासाठी रूम मध्ये गेले.
हळुवारपणे पायऱ्या चढत असताना मनात आले 
किती बिकट आयुष्य असते ना स्त्री चे 
कुणाला काही सांगू ही शकत नाही व बोलू ही शकत नाही.
फक्त एकांतात रडू शकते. 
या विचारताच मी रूम मध्ये प्रवेश केला.
लवकर तयार झालं पाहिजे 
म्हणून घाईत कपाट उघडण्यासाठी कपाटकडे निघाले तर कॉट चा कोपरा जोरात लागला पायाला. 

असंख्य वेदनांनी जीव कासावीस झाला मी पटकन खाली बसले पाय पकडून,
डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या व डोळ्यातील पाण्याने तर मला आधारासाठी ही काही दिसेना 
थोडा वेळ तसेच बसून 
उठून उभा राहील आणि खिन्नपने
कपाटाकडे निघाले. 
कपाट उघडले आणि काय घालावे हा विचार करू लागले 
इतरवेळी काहीही चालते पण या दिवसात कपडे सुद्धा विचारपूर्वक निवडावे लागतात.
सगळ्या साड्या खाली काढून झाल्यावर शेवटी मी जांभळ्या रंगाची साडी निवडली.
अर्थात मूड नव्हता च माझा आज निवड करण्याचा देखील पण ईच्छा नसतानाही
 स्त्री ला 
कधी समाजासाठी,
कधी मुलांसाठी, 
कधी नवऱ्यासाठी,
तर कधी नातेवाईकांसाठी, मनाविरुद्ध वागावे लागते 
याचा अनुभव मी पुन्हा पुन्हा घेते 
इतकाच फरक आहे फक्त.

मी आवरून खाली आले. 
दीपक ला कदाचित माझे तयार झालेले आवडलेले नसावे त्याने 
चल लवकर उशीर झाला म्हणून 
गाडी काढण्यासाठी निघून गेला.
विचार करत करत मी गाडी जवळ आले , 
त्याने दरवाजा उघडून नजरेनेच बसण्यास सांगितले, 
मी गाडीत बसले  व तो ड्रायव्हिंग करू लागला, 
त्याने गाणे लावले होते.
 माझे जास्त लक्ष नसते गाण्याकडे पण मनातील वेदना व शरीरावरील वेदना यांची सांगड जुळू नये म्हणून मीच स्वतः ला गाण्यात रमून घ्यायचं ठरवलं 

मी डोळे बंद करून सीट वरच डोके टेकवून गाणे ऐकत होते 

आशिकी 2 मधील गाणे होते ते 
त्यातील एक ओळ पुन्हा पुन्हा आठवत होती 
चाहे सुख हो 
चाहे दुःख हो 
दिल ने तुजको 
ही पुकारा 
 .........रब का है 
हमे तेरा है सहारा 
.........
किती आयुष्य बदलते ना लग्नापूर्वी हेच गाणे खुप आवडायचे पण लग्नानंतर वास्तव जग अनुभवल्यावर हेच खोटे वाटू लागते 
व्यक्ती तीच पण काळानुसार बदलते 

विचार चक्रात पोहण्याचे ठिकाण कधी आले कळलेच नाही 

क्रमशः ..........


काय असेल मेघणापुढे पार्टी मध्ये वाढवून ठेवलेले, जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा करा व मला फॉलो करा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all