Jul 16, 2020
सामाजिक

मासिक पाळी (भाग 4) व माझे बदललेले आयुष्य

Read Later
मासिक पाळी (भाग 4) व माझे बदललेले आयुष्य

मासिक पाळी (भाग 4) 

(माघील भागात आपण पाहिले दीपक व मेघना घरी पोहोचले) 

आता पुढे .......

मी  डोळे पुसत घरात आले खुप उशीर झाला होता.

रानेकाकुकडे (आमच्या  शेजारी,
 त्या माझी व विशाल ची खुप काळजी घेतात ) ठेवलेला विशाल जेवण करून झोपी देखील गेला होता.
गाडी दिसताच काकू नि मला कॉल करून ही माहिती दिली व अजून हे देखील सांगितले की तू निवांत झोप काळजी करू नको.

मी फ्रेश होण्यासाठी निघून गेले
कारण माझी  अवस्था च तशी झाली होती.

मी  फ्रेश होऊन आले व सरळ रूम कडे निघाले.
पण नकळत लक्ष हॉल च्या दरवाजाकडे गेले.

दीपक शेवटी आला होता पण त्याने दरवाजा लावला नाही.
स्वतः वरच ओरडत मी  दरवाजा लावला.
नेहमी अपेक्षा भंग होतो 
पण माझी अपेक्षा ठेवायची सवय काही जात नाही. 

माहीत असत दीपक दरवाजा लावणार नाही, 
प्रिझ मधील रिकामी झालेली पाण्याची बाटली पुन्हा तशीच प्रिझ मध्ये ठेवणार,
किचन मधून येईल व मला रूम  मध्ये येऊन पाणी माघेल, 
स्वतः टिव्ही बघायचा रिमोट मात्र मी शोधून द्यायचा, 
गाडी जवळ जायचं व मग मोबाईल, चावी, रुमाल यासाठी आवाज द्यायचा,
हे त्याचे नेहमीच होत.
व मला ते अंगवळणी पडले होते.

 तरीही मी आपली रोज स्वतः वर चीड चीड करायची व माझे भाऊजी कसे ताई ला मदत करतात हे कामवाली ला सांगायचं 

निरर्थक होत सगळं.

दरवाजा बंद करून रूम मध्ये गेले  तोपर्यंत दीपक झोपी गेला होता.
मला काही गेल्या झोप येत नव्हती.
आज दिवसभराचे चक्र डोक्यात चालू झाले.
सतत काही तरी चुकले 
म्हणून स्वतः ला दोष देत होते. 
या सगळ्या विचारचक्रात वेदना आणखी जाणवत होत्या झोप येत नव्हती म्हणून गॅलरीत आले व स्वतःत हरवून गेले.

कसे होते ना माझे आयुष्य,
आम्ही तीन बहिणी,
वडील सरकारी नोकर,
घरी अमाप पैसा,नोकर चाकर, सर्व सुख पायदळी लोळण घेत होते,
व इथे सासरी मला सोडा 
साध्या शब्दाला पण किंमत नव्हती माझ्या. 

सकाळपासून उपाशी असल्यामुळे व सतत च्या वाहणाऱ्या अश्रूमुळे अचानक डोळ्यावर अंधारी आली. 

आपल्याला काहीतरी होतंय हे कळताच मी रूम जवळ केली व दीपक ला उठवण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागले. 
गाढ झोपेत असलेला दीपक काही उठत नव्हता. 
मी तशीच पोट घट्ट पकडून फरशीवर बसले कॉट चा आधार घेत. 

खुप वेळ तशीच राहिले जेव्हा थोडे बरे वाटले तेंव्हा कॉट वर येऊन झोपले. 

मोबाईल हातात घेऊन बघितला तर सकाळचे 5:30 वाजले होते 
एरव्ही ही माझी उठण्याची वेळ पण आज ती झोपण्याची झाली होती.

माझा दिवस असाच लवकरच उजाडतो आणि उशिरा मावळतो. 

कारण मी घरातच असते ना

मी कुठे काय करते ?

पण आज जाणवले ज्यांना मी परंपरावादी, खेडूत म्हणायचे. 
ज्या बायकांना गावाकडे 4 दिवस वेगळं बसवतात त्या बायकाबद्दल  म्हणायचे की हा एक स्त्री वर अन्याय आहे
तिला असे वेगळे करणे.

अरे पाळी येणं म्हणजे आपले स्त्रीत्व सिद्ध करणे आहे 
मग त्यात त्यांना वेगळं का बसवाव.
त्यांच्या हाताने केलेला स्वयंपाक कुणी खाऊ नये म्हणून 
 आज जग चंद्रावर गेलं असताना हे लोक काय विटाळ वैगरे पाळतात.
 कितीच मूर्ख आहेत,
कसे? व कधी? सुधारतील हे 
अवघड आहे यांचे.

वरील सर्व माझे विचार होते. 
पण आज मला गरज भासतेय त्या 4 दिवस आरामाची 
माझी काळजी करण्याची, 
मला कुणीतरी आपुलकी ने विचारण्याची,

खरच आपली संस्कृती खुप महान आहे त्यांनी जे नियम घालून दिलेत 
ते पाळायला च पाहिजे.
यात आपलाच फायदा आहे 
या विचार चक्रात झोपेने मला केव्हा कवेत घेतले कळालेच नाही. 


जेव्हा मला जाग आली तेव्हा तर खुप काही झाले होते दीपक त्याचे त्याचे आवरून निघून गेला होता. 

त्याला साधे उठवावे देखील वाटले नाही मला. 
त्याला कॉल केला तर म्हणे मीटिंग मध्ये आहे पुन्हा कॉल करू नको आज उशीर होईल घरी यायला मी फक्त हो म्हणाले पुढे बोलणार तर कॉल कट केला होता त्याने.

राणे काकूंना कॉल केला विशाल साठी तर त्या म्हणे त्याचे सगळे आवरून आम्ही मंदिरात जातोय 

मला थोडं बर वाटल म्हणल चला लेकरू तरी मजेत आहे 

मी तशीच पडले लोळत या अंगावरून त्या अंगावर 

एरव्ही काहीही झालं 
कितीही आजारी असले तरी 
विशाल,दीपक व बाबा साठी मी स्वयंपाक करायचेच.
पण आज स्वतः साठी काहीच नाही करू शकले, ईच्छा च नाही झाली माझी.
शेवटी मी पण एक स्त्री च आहे ना, 
स्त्री चा जन्मच फक्त दुसऱ्यासाठी झिजण्यात जातो,

ती स्वतः च्या पोटाला चटके देईल पण लेकराची भूक भागावेल घरातील माणसांनी पोटभर जेवण केलं की त्यातच ती समाधानी होते 
तिचं जगच खुप वेगळं असत 
घरातील माणसे सुखी तर ती सुखी 

तेवढ्यात दारावरील बेल वाजली 
दरवाजा उघडण्याची  ईच्छा नव्हती पण दरवाजा तर उघडावा च लागेल ना ? 

मी उठण्याचा प्रयत्न करत होते पण उठता येत नव्हते,
 ओटीपोट खुप जड झाले होते.
डोळ्यावर अंधारी आली 
मला काही झाले तर कुणी नाही जवळ म्हणून मी दीपक ला कॉल केला तर त्याने कॉल कट केला व मेसेज केला 

Busy
 I'll call you back.

मला तो मेसेज ही नीट दिसत नव्हता 

मी हळूहळू तशीच दरवाजाकडे आले 
दरवाजा उघडला 
समोर कोण आहे हे कळण्याच्या आत जमिनीवर कोसळले 

क्रमशः 

दरवाजामध्ये कोण असेल?
मासिक पाळी व माझे बदललेले आयुष्य म्हणजे मेघनाच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार 
जाणून घेण्यासाठी 
सोबत राहा माझ्या 
व मला फॉलो करा 
धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,