मासिक पाळी (भाग 5)
(माघील भागात आपण पाहिले
की मेघना दरवाजा उघडते व समोर कोण आहे कळण्याच्या आत ती जमिनीवर कोसळते )
आता पुढे............
मी दरवाजा उघडला खरा
पण समोर कोण आहे हे कळण्याच्या आत बेशुद्ध पडले.
जेव्हा जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते.
डोळे उघडून बघितले तर पायाजवळ बाबा (माझे सासरे) आणि उशाशी राणे काकू होत्या
बाबा दिसताच मनाला एक आधार वाटला.
मी घाईत उठण्याचा प्रयत्न करू लागले.
पण बाबा चे लाल झालेले डोळे व कडक आवाज कानावर पडला
खबरदार उठण्याचा प्रयत्न करशील तर,
हजार वेळा सांगितले मी घरात नसताना घराची व घरातील माणसाची नीट काळजी घेत जा,
पण जी मुलगी स्वतः ची काळजी घेऊ शकत नाही ती घराची काय घेणार
शिकलेली सून केली
घराला सांभाळेल म्हणून
पण इथे तर तिलाच मला सांभाळावे लागते.
मी पुन्हा डोळ्यातून गंगा जमून सुरू केल्या.
वाटलं बाबा तरी समजून घेतील मला.
पण आता देखील चुकले मी.
आता गोळ्या घे व आराम कर
बाकीच्यांची काळजी करू नको सगळे मजेत आहेत.
आणि जर आता माझे ऐकले नाही तर पुन्हा सांगितले नाही म्हणशील.
बाबा कडाडून गेले.
मी होकारार्थी मान हलवली
बाबा राने काकू ला माझी काळजी घेण्यास सांगून घरी निघून गेले.
माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.
बाबा यापूर्वी कधीच मला असे बोलले नव्हते व आज मी इतकी आजारी असताना बाबा नि असे बोलावे का ?
माझ्या मनाची तगमग काकू नि ओळखली.
व त्या म्हणाल्या मेघना मला कळतंय तुला काय वाटते
पण तुझ्या सासऱ्यांना इतके हतबल झालेले मी पहिल्यांदा पाहिले.
तू दरवाजा उघडला व समोर कोसळली त्यांना काहीच कळेना ते खुप घाबरले त्यांनी दीपक ला कॉल केला तर तो काही कॉल घेईना मग ते मला जोरजोराने आवाज देऊ लागले.
मग मी, तुझ्या काका नि व त्यांनी तुला ऍडमिट केलं.
तुला माहीत असावं म्हणून सांगते ते कसला तरी खुप पश्चात्ताप करत होते सारखे म्हणत होते
देवा एक गमावली आता दुसरी नको.
माझे डोळे उघडले मी माझ्या मुलाचे देखील उघडेल फक्त माझ्या सुनेला नीट कर.
तू पूर्ण 48 तास बेशुद्ध होतीस व तुझे बाबा देवा चा धावा करत होते.
काकू शेवटी म्हणाल्या
ते म्हणत होते देवा माझे आयुष्य पोरीला दे पण तिला नीट कर.
बस काकू असे म्हणून मी काकू ला थांबवले
आता माझ्या डोळ्यातील पाण्याचा वेग जास्त वाढला होता
पण ते अश्रू समाधानाचे होते कधी एकदा घरी जाते असे झाले मला.
हॉस्पिटलमधील सगळ्या फॉर्मलीटीज पूर्ण करून काकू व मी सगळं आवरून बसलो.
सकाळपासून गेलेले बाबा अजून आले नव्हते की दीपक चा साधा कॉल देखील आला नव्हता
पण मी मुद्दाम काकू ला विचारने टाळले की दीपक आला होता का ?
कारण जर काकू नाही म्हणाल्या असत्या तर आणखी वाईट वाटले असते मला.
आणि मी आता मनाशी ठरवले होते छोट्या छोट्या गोष्टी मध्ये समाधानी राहायचं
बाबा आणि विशाल साठी जगायचं
स्वतः ची काळजी घ्यायची.
आपल्या लेकरासाठी आपल्याला अगोदर फिट राहावे लागेल.
तेवढ्यात दीपक रूम मध्ये आला
प्रसन्न चेहऱ्याने म्हणाला
मग मॅडम बरे वाटते का ?
किती घाबरलो होतो आम्ही
चल घरी जाऊयात.
व त्याने काकू च्या हातातील बॅग स्वतः च्या हातात घेतली आणि एका हाताने माझा हात हातात घेत बारीक झाली माझी बायको दोन दिवसात
हो ना काकू?
असे म्हणून हसू लागला
माझ्या साठी हे सगळं अनाकलनीय होत
दीपक च वागणं तर स्वप्न च वाटत होतं.
त्याने मला धरून गाडीपर्यंत नेले व स्वतः दरवाजा उघडून आतमध्ये बसवले
काकू माझ्या शेजारी बसल्या
थोडं विचित्र वाटत होतं
पण म्हणलं करतोय लाड तर घ्या करून.
आम्ही तिघे घरी पोहोचलो.
अजूनही बॅग दीपक कडे च होती ती त्याने व्यवस्थित घरात आणून ठेवली व मला घेण्यासाठी पायऱ्या जवळ आला.
पुन्हा मला हातात धरून घरात घेऊन गेला.
मी देखील खुप अशक्त भासत होते मला चालणे तसेही शक्य नव्हते.
घरात बघते तर काय
सगळ्या वस्तू आपापल्या जागेवर व्यवस्थित होत्या.
कुठे कचरा नाही काही नाही
एरव्ही मी एक तास जरी घर यांच्या भरवशावर सोडून गेले की येईपर्यंत हे घराचा उकिरडा करून ठेवता व आज असे काय झाले असेल.
मला देखील प्रश्न पडला ?
पण मी ठरवले होते आता अपेक्षा ठेवायची नाही व लगेच हुरळून जायचे नाही समोर काय वाढवून ठेवले ते बघू.
दोन दिवसांपासून माझ्या सोबत असलेल्या काकू मी घरी जाऊन येते तू काळजी घे म्हणून निघून गेल्या.
चल मेघना संपले तुझे लाड
आता कामाला लागा
यांनी सगळ्यांनी काय खाल्ले असेल दोन दिवस माहीत नाही
मनाशीच ठरवून मी उठले
मला उठलेले बघून दीपक म्हणाला,
तू कशाला उठतेस आता
आराम कर,
मी म्हणाले अरे खुप कामे पडली असतील.
तो म्हणाला काहीच काम नाही आम्ही कामे वाटून घेतली व केली सुद्धा.
काय .........मी जोरात म्हणाले
तू काम केलंस,
हो व तुझ्या लाडक्या लेकाने देखील मदत केली.
आम्ही वरची सगळी कामे केली आणि बाबा नि स्वयंपाक केला
बाबा नि .......
आता मात्र
माझा बांध फुटला
मी रडू लागले
बाबा नि का काम केलं
हॉटेल मधून माघवायचे ना ?
तितक्यात बाबा किचन मधून हातात दोन ताट घेऊन आले व म्हणाले मी
माझे व माझ्या लेकीचं ताट आणले आहे
बाकीच्याना जर जेवायचे असेल तर त्यांनी स्वतः घेऊन यावे आणि सूचना ताट परत ठेवताना ते धुवून ठेवावे
माझे अश्रू थांबत नव्हते आज मला बाबा मध्ये माझे वडील दिसले
बाबा माझ्या जवळ येऊन बोलू लागले आग मेघना दीपक तीच चूक करत होता जी मी केली
जर तेव्हा मी मालती ची (माझ्या सासूबाई)
काळजी घेतली असती तर मालती आज आपल्यात असती
ती सतत म्हणायची माझे पोट दुखते ,माझे पोट दुखते व या दिवसात तर ती अक्षरशः खुप रडायची पण मी तिला कधीच समजून घेतलं नाही स्त्री ला हे सगळं सहन करावच लागत असे म्हणून नेहमी टाळायचो
पण जेव्हा तिची किंमत कळली तेव्हा खुप उशीर झाला होता तिचा तो आजार तोपर्यंत शेवटच्या टप्प्यात गेला होता खुप ईलाज केले पण तिला वाचवू शकलो नाही
तेव्हाच ठरवले होते की माझ्या मुलाला तरी मी असे वागू देणार नाही
पण या काळाच्या ओघात मला विसर पडला आणि त्या दिवशी तुला त्या अवस्थेत बघितले व डोळे चा उघडले
मग ठरवल आता नाही
हे कुठे तरी थांबायला हवे
आणि यापुढे तुला त्या प्रत्येक महिन्याच्या 4 दिवसात असाच आराम मिळेल व तुलाच नाही तर आपल्या कामवाली ला देखील व तिचा पगारही कापला जाणार नाही
बाबा चे बोलून ऐकून
माझे सगळे दुखणे पळून गेले
मी मनोमनी च देवा चे आभार मानत होते असे सासरे मला दिले म्हणून
दीपक देखील आज आयुष्यात पहिल्यांदाच मला सॉरी म्हणाला
त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रत्येक शब्द पाळला
तो आजपर्यंत
खरच एका मासिक पाळी ने माझे आयुष्यच बदलून टाकले
आम्हा स्त्रीयांना काहीच नको असत ओ
फक्त हवे असते तुमचा वेळ तुमचे प्रेम
तुमच्या घरात स्वाभिमानाने जगण
व तुमच्याच कुशीत शेवटचा स्वास
स्त्री मोठा सारखी असते तिचे अस्तित्व
जाणवत नाही पण अनुपस्थित जगण्याची मजा च काढून घेते
ती सतत झिजते तिच्या घरासाठी, लेकरासाठी,माणसासाठी
कधीच कुठली अपेक्षा न ठेवता
पण मनात कुठेतरी तिलाही वाटते
तिचे कुणीतरी कौतुक करावे,
दिवसभर थकल्यावर फक्त
खुप थकलीस का ग
हे शब्द तिला दहा हत्तीचे बळ देतात
तिला जपावं
तिची काळजी करावी
नाही तिच्या इतके पण किमान
तिच्या अर्धे तरी तिच्यावर प्रेम करावे
खुप सुंदर होते माझे बदलेले आयुष्य
समाप्त
कथा कशी वाटली नक्की कळवा
आपल्या प्रतिक्रिया लेखकांला लेखनासाठी प्रोत्साहन देतात
आणखी अशा नवनवीन कथासाठी मला फॉलो करा
कथेला दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा