मी आत्मनिर्भर (भाग-३)

Importance of self sufficiency.

मी आत्मनिर्भर (भाग-३)

© प्रतिक्षा माजगावकर

          दुसऱ्यादिवशी योगिता उठायच्या आधीच चिनू आणि यश उठलेले असतात.... यश सगळ्यात आधी हॉल ची झाडलोट करून किचन मध्ये जातो... तोवर चिनू सकाळच्या ब्रेकफास्ट साठी सँडविच ची तयारी करत असतो.... यश मस्त आलं घालून चहा करायला ठेवतो आणि दोघं जाऊन योगिताला उठवतात.... योगिता ब्रश करून येई पर्यंत दोघांचा चहा नाश्ता तयार झालेला असतो.... योगिताला हे सरप्राईस फार आवडतं!
योगिता:- थँक्यू सो मच! कधीतरी सकाळचा असा आयता चहा मिळाला तरी फार बरं वाटतं!
यश:- हि तर सुरुवात आहे.... आगे आगे देखो होता है क्या....
चिन्मय:- हो... आज तू काही करायचं नाही... आम्हाला सांग स्वयंपाक कसा करायचा आम्ही दोघं मिळून करणार...
योगिता:- काय? मी स्वप्न तर बघत नाहीये ना... कि आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे....
यश:- नाही... हे वास्तवच आहे... आणि सूर्य पण बरोबर पूर्वेला च आहे... मला आता दोन दिवस ऑफिस च काही काम नाहीये.... म्हणून मग म्हणलं तुझा आम्हाला आत्मनिर्भर करायचा निर्णय आपण पण जरा मनावर घेऊ.... परत उद्या पासून तुला पण त्या NGO सोबत गरजूंना मदत करायला जायचं आहे ना.... मग तुझी अजून ओढाताण होईल.... त्यापेक्षा आम्ही शिकून घेतो मग तुला पण जरा आराम मिळेल...
योगिता:- हुश्श... बरं झालं तूच बोललास... माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं!
          सगळ्यांचा चहा नाश्ता होतो.... योगिता म्हणते; "उद्या पासून तुम्हाला दोघांनाच घर सांभाळायचं आहे... आता तुम्हा दोघांना बऱ्यापैकी धुणं, भांडी, साफसफाई जमतेय....  बेसिक स्वयंपाक आज शिकालच! आत्ता तुम्ही दोघं जावा खोलीत स्वयंपाकाच्या तयारीला वेळ आहे.... हि आत्ताची मागची कामं मी आवरते... घर सगळ्यांचं आहे तर काम पण सगळ्यांनी करायचं!" असं म्हणून त्या दोघांना ती आत पाठवते आणि बाकी तयारीला लागणार इतक्यात तिचा फोन वाजतो.... समोरून NGO च्या टीम लीडर चा; निधी चा फोन असतो.... योगिता कनफॉर्म उद्या त्यांच्या सोबत जाणार आहे का हे विचारण्यासाठी आणि काही सूचना देण्यासाठी तिने फोन केलेला असतो! फोन वर बोलणं झाल्यावर ती यश आणि चिनू ला बोलावते....
चिन्मय:- काय आई? आत्ता पासून तयारी करावी लागेल का स्वयंपाकाची?
योगिता:- अरे नाही रे! ऐकून तर घे.... आत्ता NGO च्या टीम लीडर निधी मॅडम चा फोन आला होता... उद्या सकाळी बरोबर ९.३० वाजता मला स्टेशन जवळ पोहोचायचं आहे.... मग तिथून पुढे आम्ही एरिया नुसार रेशन किट्स वाटायला जाणार आहोत! घरी यायला किती वाजतील माहित नाही.... तेव्हा तुम्ही नीट काळजी घ्या....
यश:- हो! नको टेन्शन घेऊस.... आणि तुला उद्या जायचं आहे ना... मग आत्ता पासून का एवढा विचार करतेस? आज तू फक्त छान पैकी आराम कर उद्या पासून तुझी खरी कसरत होईल.... एवढं उन्हा तान्हातून फिरावं लागेल...  त्यासाठी एनर्जी ठेव जरा.....
           आता उद्या पासून योगिता कनफॉर्म जाणारच हे समजल्यावर यश तिला हॉल मधेच टीव्ही बघत बस असं म्हणून स्वतः राहिलेली कामं करायला जातो आणि चिन्मय ला म्हणतो; "चिनू तू आत्ता तुला जे करायचं ते कर.... काय गेम खेळायचा असेल, मित्रांशी बोलून घ्यायचं असेल तर ते आत्ताच करून घे.... नंतर मला तुझी मदत लागणार आहे तेव्हा काहीही कारणं नकोयत मला..." चिनू पण ओके बाबा... चिल... मी करेन मदत तुम्हाला असं म्हणून खोलीत जातो.... यश कामं करता करता फक्त योगीताचाच विचार करत असतो.... "खरंच! योगिताने इतकी वर्ष ऑफिस च काम सांभाळून घरचं सगळं केलं! कधीही तक्रार केली नाही कोणत्या गोष्टीची.... आजारी असली तरी बिचारी सगळं करायची.... आम्हाला दोघांना हे फार सोपं वाटायचं पण आज कळतंय तिला किती करावं लागायचं ते.... शिवाय हिला इतरांना त्रासात बघवत नाही आणि म्हणूनच आता चालली आहे समाजसेवा करायला.... किती विचार करते ना हि! अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद पण मानून घेते.... दूरदृष्टी पण कमालीची आहे प्रत्येक बाबतीत! आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर तिला माहित होतं, आम्ही दोघं कोणतंही काम करणार नाही आणि शिकून तर त्याहून घेणार नाही म्हणूनच तिने स्वतःला दुसरीकडे गुंतवून घ्यायचं ठरवलं आणि आम्हाला आत्मनिर्भर करायचा निश्चय केला!" त्याचं विचारचक्र सुरु असताना अचानक त्याच्याच हातून पाण्याचा पेला खाली पडतो आणि तो विचारांच्या तंद्रीतून बाहेर येतो... योगिता पटकन किचन मध्ये धावत येते...
योगिता:- काय रे यश काय झालं? तुला काही लागलं नाही ना?
यश:- नाही गं! पाण्याचा पेला घासता घासता हातातून निसटला बाकी काही नाही.... बरं हे बघ झालंच आहे काम.... थांब आता चिनू ला बोलावतो मग स्वयंपाकाच्या तयारीला लागतो.... तू आम्हाला सांग काय करायचं ते... तसही आता १०.३० वाजून गेलेत तयारी ला लागलेलं बरं! पहिलाच दिवस आहे सगळं करण्याचा किती वेळ लागेल माहित नाही....
           असं म्हणून यश चिनूला बोलावून घेतो...
चिन्मय:- हा बाबा! चला करूया तयारी.... 
योगिता तिथेच उभी होती....
यश:- बोलो मास्टर शेफ पेहेले क्या करे?
योगिता:- आधी तुरीची डाळ आणि मसूर डाळ धुवून घे आणि भिजत ठेव....
चिन्मय:- मी करतो हे....
योगिता:- यश तू तोवर आता पोळ्यांसाठी पीठ भिजवायला घे.... तो बघ तिथे पिठाचा डबा ठेवलाय त्यात चमचा आहे.... त्यातले दोन चमचे पीठ घे आधी, त्यात आता मीठ टाक आणि थोडं तेल घाल....
यश:- येस बॉस! हे बघ झालं!
चिन्मय:- आई.... ठेवली डाळ भिजत आता?
योगिता:- आता... हा... हे बघ हि भेंडी धुवून पूस आणि चीर....
यश:- चिनू झालं तुझं? आता जा.... मला पीठ मळू दे नाहीतर काय नुसती भाजी खाणार आहेस का?
योगिता:- गप रे! तू आता हळूहळू पाणी घालत पीठ मळ मस्त मऊ झालं पाहिजे हा....
           यश योगिताने सांगितल्या प्रमाणे पीठ मळतो.... अजूनही चिन्मय ची भाजी चिरून झालेली नसते.... म्हणून योगिता यश ला म्हणते; "आता पीठ थोडावेळ बाजूला ठेव... आणि कुकर लाव.... तांदूळ धुवून घे आणि त्यात पाणी घाल... आणि हो त्या भिजवलेल्या डाळीत हळद आणि हिंग घालून ठेव कुकर मध्ये...." यश कुकर लावतो....
योगिता:- हा आता घे पोळ्या लाटायला....
इतक्यात चिन्मय येतो.... "आई हे बघ झाली भाजी चिरून...." थोडी ओबड - ढोबड चिरलेली असते पण पहिलाच प्रयत्न छान असतो!
चिन्मय:- आई.... आता मला पण एखादी तरी पोळी लाटायची आहे....
योगिता:- हो! हो! जरा थांब... आधी बाबांना करू दे....
चिन्मय:- आई आता तू बाहेर बसलीस तरी चालेल... मला भाजीत काय काय घालू ते सांग... बाबा बाकी पोळ्या करे पर्यंत मी भाजी करतो....
योगिता बाहेर बसून चिन्मय ला भाजी करायला काय काय करायचं ते सांगते.... चिनू भाजी करायला घेतो आणि यश पोळ्या लाटायला घेतो.... पोळी चा नकाशा झालेला असतो.... कुठून जाडी तर कुठून पातळ अशी लाटेलेली असते! चिनू ची भाजी करून तयार होते.... शेवटच्या दोन पोळ्या लाटायच्या बाकी असतात... यश पोळ्या भाजायला घेतो तोवर चिनू राहिलेल्या पोळ्या लाटतो.... थोडी पोळी फाटते पण एक मेमरी असावी म्हणून यश ती पोळी सुद्धा भाजतो....
           सगळा स्वयंपाक १२.३० पर्यंत होतो.... डायनिंग टेबल वर दोघं मिळून सगळं आणतात.... चिनू एक सेल्फी आणि सगळ्या डिश चे फोटो काढतो... आठवणींच्या अल्बम मध्ये त्याचे पहिले प्रयत्न सेव्ह होतात... व्हाट्सअप च्या स्टोरी ला सेंड करून तिघं मस्त गरम गरम जेवून घेतात.... अगदी परफेक्ट नाही पण बऱ्यापैकी छान झालेला असतो सगळा स्वयंपाक.... योगिता सुद्धा दोघं बाप - लेकाचं तोंड भरून कौतुक करते..... तिच्या चेहऱ्यावर आज प्रसन्न भाव उमटलेले असतात.... एक सगळ्यात मोठं टेन्शन कमी झालेलं असतं! कारण उद्या पासून तिला कसलीही काळजी न करता फक्त आणि फक्त समाजासाठी स्वतःला झोकून देऊन काम करता येणार असतं! घराची कसलीही काळजी न करता.....
क्रमशः......

आता पुढच्या भागात पाहूया योगिता च एक वेगळं रूप.... एका समाजसेविकेचा रुपात.... आणि सोबत च यश आणि चिन्मय योगिता घरात नसताना सगळं कसे सांभाळतील? त्यांना जमेल कि नाही पाहू पुढच्या भागात.....

कमेंट करून नक्की सांगा कशी वाटतेय हि नवी संकल्पना......

🎭 Series Post

View all