मी आत्मनिर्भर (भाग-४)

Importance of self sufficiency.

मी आत्मनिर्भर (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर 

          दुसऱ्या दिवशी यश, योगिताच्या आधीच उठतो...... तिला आज बाहेर जायचं म्हणजे किती वेळ लागेल हे माहित नसतं, म्हणून तो योगिता साठी पाण्याची मोठी बाटली आणि सोबत काहीतरी खायला सुद्धा असावं म्हणून घरात चुरमुरे असतात त्याची भडंग बनवतो आणि डब्यात भरून ठेवतो..... एव्हाना ७.३० वाजलेले असतात..... योगिता उठते आणि किचन मध्ये येते.... 
यश:- अरे! उठलीस पण.... अजून आहे वेळ तसा हवंतर झोप थोडावेळ मी उठवतो तुला एक पंधरा वीस मिनिटात.... 
योगिता:- नको आता परत झोपायला..... नाहीतर दिवसभर नुसता आळस भरून राहतो काही काम नाही होत मग..... चल तू बस मी चहा टाकते..... चिनू उठालाय का? 
यश:- चिनू तर झोपलाय अजून..... आणि तू नको करुस चहा मी करतो... तू बस आणि तुला काही तयारी करायची असेल तर करून घे..... अरे हो! हि भडंग खाऊन बघ जरा जमली आहे का? 
योगिता:- सकाळ सकाळ भडंग केलीस तू? 
यश:- आत्ता खायला नाही काही..... तुला डब्यात भरून दिली आहे...... काहीतरी सुका नाश्ता असावा सोबत म्हणून..... आणि ती बघ पाण्याची पण बाटली भरून ठेवली आहे ती आठवणीने तुझ्या पर्स मध्ये ठेव..... उगाच बाहेरच काही खाऊ नकोस! 
           एवढ्यात चिनू उठून बाहेर येतो..... त्याचा चेहरा जरा पडलेलाच दिसत असतो..... नेहमी सारखं हसत हसत तो गुड मॉर्निंग सुद्धा म्हणत नाही..... योगिताच्या लक्षात येतं, याचं काहीतरी बिनसलं आहे! म्हणून ती त्याला म्हणते; "काय रे चिनू काय झालं? असा गप्प गप्प का आहेस?" 
चिन्मय:- तू तर काही नको विचारू नाही बोलायचं मला कोणाशी...... 
योगिता:- अरे पण...... 
तो काहीही ऐकून न घेता सरळ खोलीत जाऊन बसतो..... 
यश:- हे बघ योगिता तू तुझी तयारी करायला घे..... मी बघतो त्याच्याकडे.... थोडावेळ जाऊदे जरा शांत झाला की बोलेन त्याच्याशी तू कसलीही काळजी न करता जा..... मी आहे ना.... आपला चिनू बऱ्याच वेळा मित्र काही बोलले कि वागतो असा आणि थोड्यावेळाने होतो परत नॉर्मल माहितेय ना आपल्याला मग झालं तर..... तू नको टेन्शन घेऊस.... घड्याळ बघ ८.३० वाजलेत तुला ९.३० ला पोहोचायचं आहे ना स्टेशन ला.... पहिल्याच दिवशी उशीर नको....... 
योगिताला यश च म्हणणं पटत! ती पटापट तिचं आवरते आणि जाताना चिनू ला बाय करायला जाते तरी हा फक्त 'हम्म' करतो.... एरवी सारखं आई काळजी घे, लवकर घरी ये असं काहीही बोलत नाही.... योगिता ला सुद्धा उशीर होत असतो म्हणून ती पण बाहेर पडते खरी पण हा चिनू चा विषय तिच्या डोक्यातून जातच नसतो....... योगिता विचारा - विचारा मधेच स्टेशन ला पोहोचते....... टीम लीडर निधी तिथे आधीच आलेली असते...... 
************************************
        इथे घरात यश बाकी तयारी करत असतो! आज काही चिन्मय चा मूड नीट दिसत नाही म्हणून तो त्याला मदतीला बोलवत नाही...... थोड्यावेळात चिन्मय स्वतःच बाहेर येतो..... यश काहीही न बोलता त्याला चहा आणि गरमा गरम पोहे खायला देतो.... तो सुद्धा काही न बोलता खाऊन झाल्यावर पुन्हा तडक रूम मध्ये जातो.... कालचा चिनू आणि आजचा चिनू यात जमीन आस्मानाचा फरक असतो..... यश ला विश्वासच बसत नसतो काल याच मुलाने आपल्याला एवढी मदत केली आणि आज साधा स्वतःचा कप आणि पोह्याची डिश सुद्धा उचलली नाही! आता चिनू शी बोललंच पाहिजे म्हणून यश चिनू च्या खोलीत जातो..... 
यश:- चिनू! काय झालंय आज असा का वागतोयस? 
चिन्मय (नाराजीच्या स्वरात):- असा म्हणजे? बाबा मी नीटच वागतोय..... काय झालं? 
यश:- बघ बघ आत्ता पण कसं तुटक आणि नाराजीने बोलतोयस ते...... आणि हे काय सगळा पसारा करून ठेवला आहेस? काय होतंय तुला चिनू? सकाळी आई शी पण नीट नाही बोललास..... एरवी करतोस ना सगळं शेअर.... मग आज पण बोल ना..... 
************************************
          दुसरीकडे योगिता स्टेशन ला पोहोचल्यावर काही टीम मेंबर्स पण येतात पण, अजूनही एक जण बाकी असतं म्हणून सगळे थांबलेले असतात...... साधारण ९.४५ च्या सुमारास ती राहिलेली व्यक्ती येते.... योगिताच्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या मयुरी वहिनी असतात..... आधीच उशीर झालेला असतो म्हणून निधी सगळ्यांची टीम मध्ये विभागणी करते..... प्रत्येकाला सोशल डिस्टनसिंग च पालन करूनच किट्स च डिस्ट्रीब्युशन करायचं आहे हे सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचं; कोणीही किट्स distribute करताना फोटो काढायचे नाहीत! त्या लोकांवर हि गंभीर परिस्थिती आलीये त्याचा असा फोटो काढून त्यांचं मन दुखवायचं नाही.... अश्याच अजून काही सूचना देऊन झाल्यावर त्यांचं काम सुरु होतं! निधी, योगिता आणि मयुरी तिघी एकाच टीम मध्ये असतात...... 
निधी:- मयुरी मॅडम आज पहिलाच दिवस आणि तुम्ही उशिरा आलात! आपल्याला असं उशीर करून चालणार नाही...... जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता! आम्हाला जे जे शक्य आहे ते आम्ही करू.... 
मयुरी:- प्रॉब्लेम असं नाही पण, घरातली कामं आवरता आवरता उशीर झाला..... 
निधी:- मी समजू शकते पण, मग तुम्ही घरच्यांची मदत घ्या ना कामात! आता आपल्याला अजून किती वेळ लागेल घरी जायला हे सुद्धा माहित नाही..... एवढं दमून गेल्यावर तुम्ही किती काम करणार? 
मयुरी:- अहो मॅडम आमच्या घरात आमचे हे (रमेश) आणि माझा मुलगा सूरज आणि मी असे तिघेच राहतो! मग तुम्हीच सांगा कोण करणार घरातली कामं? 
          एवढावेळ गप्प असलेली योगिता आता बोलू लागली...... 
योगिता:- वहिनी मी एक सांगू का? आमच्यात पण आम्ही तिघं च राहतो! मी गेले तीन - चार दिवस त्यांना घरकाम शिकवलं! म्हणजे पहिल्या दिवशी जरा त्यांच्या कडून काम करून घ्यायला त्रास झाला पण काल दोघांनी तर स्वतःहून स्वयंपाक केला! तुम्ही पण भावजी आणि सुरज ला शिकवा ना तुम्हाला पण बरं पडेल! कसलीच काळजी न करता स्वतःला समाजसेवेच्या कामत झोकून देता येईल...... 
निधी:- हो! योगिता मॅडम बरोबर बोलतायत! एकदा घरी बोलून बघा यावर..... 
मयुरी काहीही बोलत नाही..... एवढ्यात त्यांना ज्या वस्तीत रेशन किट्स वाटायचे असतात ती वस्ती येते..... आता सगळे कामात व्यस्त होतात..... मयुरी योगिताच्या बोलण्याच्या विचारात आणि योगिता सकाळच्या चिनू च्या विचारात असते...... पण, तरीही दोघी मन लावून काम करत असतात..... 
************************************
          इथे घरी यश चिनू शी बोलायचा प्रयत्न करत असतो...... 
चिन्मय:- नाही ओ बाबा काही नाही! मला थोडावेळ एकटं राहूदे.... प्लिझ! 
यश:- अरे! असं कसं? जर आमचा हा ज्युनिअर असिस्टंट आमच्या मदतीला नाही आला तर काम कसं होईल? 
चिन्मय काहीही बोलत नाही...... म्हणून मग यश विचार करतो; कामाचा विषय काढला कि हा गप्प बसतो! नक्कीच काल याने व्हाट्सअप स्टोरी टाकली होती त्यावरूनच मित्रा - मित्रांचं काहीतरी झालं असणार..... जाऊदे, याला आपण थोडा वेळ देऊया.... दुपारी सगळं याच्या आवडीचं जेवण बनवतो म्हणजे पठ्ठा खुश होईल आणि होईल नॉर्मल! 
यश:- ठीक आहे... तू घे तुला हवा तेवढा वेळ! तू काहीही बोलला नसलास तरी मी बाप आहे तुझा! काल जी काही कामं तू केलीस त्यावरून तुझं काहीतरी बिनसलं आहे..... मला माहितेय माझा ब्रेव्ह मुलगा नीट विचार करून जे योग्य आहे तेच करेल! 
  असं म्हणून यश बाकी कामं करायला जातो.... एव्हाना ११ वाजलेले असतात! यश ची आज खरी कसोटी असते! योगिता नसताना त्याला चिन्मय च्या आवडीचा मेनू; खीर पुरी आणि मसाले भात करायचा असतो! तो युट्युब वरून व्हिडिओ बघून सगळं करायचा निर्णय घेतो! 
क्रमशः.....
************************************
यश च्या समजावण्याने आणि चिन्मयच्या आवडीच्या पदार्थांमुळे तो पुन्हा नॉर्मल होईल? मयुरी योगिता चा सल्ला ऐकेल? आणि मयुरीच्या घरच्यांची यावर काय reaction असेल पाहूया पुढच्या भागात...... 

🎭 Series Post

View all