मी आत्मनिर्भर (भाग-६)

Importance of self sufficiency.

मी आत्मनिर्भर (भाग-६)

© प्रतिक्षा माजगावकर 

          चिनू जेव्हा खोलीत येऊन व्हाट्सअप ओपन करतो तेव्हा अजूनही सूरज त्याची खिल्ली उडवत असतो! चिनू सुरज ला फोन लावतो....... आधी बराच वेळ रिंग वाजते आणि सुरज फोन उचलतो..... 
चिन्मय:- हॅलो.... 
सुरज:- हॅलो, चिन्मय.... कामं झाली वाटतं तुझी..... म्हणून फोन केलास का?...... 
चिन्मय:- हो! पण तू का सारखा कामावरून बोलतोयस मला? तू सुद्धा कर कि तुझ्या आई ला मदत.... त्यांना पण बरं वाटेल..... 
सुरज:- छे! छे! हि पोरींची कामं मला नाही जमणार..... 
चिन्मय:- एक मिनीट! कोणी सांगितलं हि घरची कामं फक्त मुलींनी करायची??? सगळे मिळून घरात राहतात ना मग कामं वाटून घेतली तर काय झालं त्यात? 
सुरज:- चल चल.... आता तुला काम करावं लागतंय म्हणून डोकं खातोयस.... चल बाय बाय...... 
चिन्मय:- अरे ऐकून.... 
*****************************
      एवढ्यात सुरज फोन कट करतो! चिन्मय बाहेर येऊन यश आणि योगिताला सगळा घडलेला प्रकार सांगतो! 
योगिता:- नाही! मला नाही वाटत असं समजावून त्यांच्यात काही फरक पडेल..... लेट्स सी आता मयुरी काही करू शकते का ते..... 
यश:- हो! ऐकलं तर बरंच आहे.... अरे हा! तुला उद्या पण जायचं आहे ना? काही मेसेज आला का ग्रुप वर? 
योगिता:- हो...... उद्या औषधं पॅकिंग करायचे आहेत त्यामुळे किती वेळ लागेल सांगता येत नाही....... घरून डबा घेऊन यायला सांगितलं आहे! 
चिन्मय:- ओके! मग मी आणि बाबा मिळून तुझा डबा तयार करू...... तू घाई घाई नको करू उठायची..... 
यश:- हो! योगिता तू जा थोडावेळ खोलीत पड.... आराम कर जरा...... आणि चिनू तू चल मला मदत कर.... 
           योगिता थोडावेळ वामकुक्षी घ्यायला जाते...... यश आणि चिनू मागची कामं आवरत असतात...... साधारण ३.३० वाजलेले असतात.... बाहेर ढगाळ वातावरण निर्माण होतं आणि छान थंड वाऱ्यासह पावसाला सुरुवात होते...... 
चिन्मय:- वाव बाबा! किती मस्त पाऊस येतोय बाहेर....... आई उठे पर्यंत आपण छान पैकी कांदा भजी चा बेत करूया का? म्हणजे बघा ना बाहेर मस्त थंडगार पाऊस, गरमा गरम कांदा भजी आणि स्ट्रॉंग आलं घालून चहा.... अहाहा काय मज्जा येईल.... आई चा सुद्धा थकवा पळून जाईल..... 
यश:- भारी! चल तूच मदत कर आता मला..... तू कांदा चीर तोवर मी व्हिडिओ बघतो भजी कशी बनवायची तो.... 
चिन्मय:- ओके कॅप्टन! 
यश व्हिडिओ सर्च करून तो बघत असतो.... तोवर चिनू कांदा चिरून ठेवतो..... व्हिडिओ मध्ये बघितल्या प्रमाणे यश सगळं करायला घेतो...... आता भजी तळल्याचा मस्त घमघमाट पसरलेला असतो..... पावसाचा सुद्धा जोर वाढलेला असतो! एव्हाना ४.३० वाजलेले असतात...... भजी च्या सुगंधाने योगिताला जाग येते..... योगिता किचन मध्ये येते.... यश एकीकडे भजी तळत असतो तर दुसरीकडे चिनू ने चहा ठेवलेला असतो! 
योगिता:- अरे काय हे? काय करताय दोघं? 
चिन्मय:- ये ये आई बस! मी आत्ता तुला उठवायला च येणार होतो..... बाहेर बघ किती मस्त पैकी पाऊस पडतोय म्हणून आम्ही दोघांनी तुला हा सरप्राईज द्यायला बेत केला.... 
            एवढ्यात यश चहा चा कप आणि गरमा गरम कांदा भजी ची प्लेट घेऊन येतो...... 
चिन्मय:- बाबा तुम्ही पण बसा मी करतो आता बाकी..... आणि येतोच पटकन..... 
असं म्हणून तो आत जातो...... योगिता आणि यश मस्त आल्हाददायक वातावरणात कुरकुरीत कांदा भजी आणि कडक चहा चा आस्वाद घेत असतात...... 
योगिता:- थँक्यू यश! खूप खूप खूप थँक्यू! 
यश:- मधेच काय आता हे? आणि थँक्यू का?
योगिता:- बघ ना म्हणजे जर तुम्ही दोघांनी मला सपोर्ट केला नसता तर आज माझी किती धावपळ झाली असती! प्लस त्यात तुमचं टेन्शन पण डोक्यावर राहिलं असतं! तुम्ही दोघांनी काही खाल्लय का?, घराची काय अवस्था झाली असेल? या विचारातच अडकले असते मी! कदाचित मला समाजसेवेसाठी जाता सुद्धा नसतं आलं! 
यश:- बास बास! श्वास तरी घे..... आणि तू थँक्यू बोलायची गरजच नाहीये..... इतकी वर्ष तू हे एकटी सांभाळत होतीस..... आत्ता जर तू हा आत्मनिर्भरतेचा पवित्रा घेतला नसतास ना तर कदाचित आम्हाला या सगळ्याची जाणीवच नसती झाली..... 
         चिन्मय बाकी भज्या तळून बाहेर आणतो..... 
चिन्मय:- हे काय चाललं आहे तुमचं? बाहेर किती मस्त वातावरण आहे आणि दोघं एकदम सिरिअस चेहरे करून बसलायत ते! चला आता सगळ्या टेन्शन ला गोळी मारा.... से चीज...... 
असं म्हणून सेल्फी काढतो.... फीलिंग हॅपी, रेनी सिजन, एन्जॉयिंग विथ फॅमिली.... असे कॅपशन टाकून फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो..... 
योगिता:- चला आता तुम्ही दोघं टीव्ही बघत बसा.... मी बाकीचं आवरते आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागते....
यश:- अगं पण...
योगिता (त्याला तोडत):- पण नाही आणि बिण नाही.... किती कराल दोघं..... एकतर तुम्हाला सवय नाहीये..... म्हणून आता माझं ऐकायचं.... घर सगळ्यांचं.....
चिन्मय (तिला थांबवत):- हो आई माहितेय! मग काम पण सगळे करणार.... 
योगिता:- चला मग जावा आता..... उद्या पुन्हा तुम्हालाच करायचं आहे! 
 यश आणि चिन्मय बाहेर येऊन टीव्ही लावून बसतात..... योगिता सगळं आवरत असते! तेव्हा तिच्या डोक्यात विचार सुरू होतात; "खरंच मी खूप नशीबवान आहे मला खूप  कॉर्पोरेटिव्ह नवरा आणि मुलगा मिळालेत! पण, बिचारी मयुरी.... तिचं काय झालं असेल? ऐकलं असेल का दोघांनी? एक काम करते फोन करते तिला.... नाही पण नको.... उगाच सगळे घरात च असणार आणि असं फोन करून विचारणं बरं नाही वाटणार.... उद्या च बोलते तिच्याशी....." विचारा - विचारत तिची कामं सुद्धा होतात..... ती येऊन घड्याळ बघते तर सहा च वाजलेले असतात..... 
चिन्मय:- आई ये ना आपण सगळे मिळून आता टीव्ही बघू..... अजून वेळ आहे ना तुला आता रात्रीच्या तयारी साठी.... 
           सगळे मिळून टीव्ही बघत बसतात..... संध्याकाळी सात वाजता ती बाकी कामाला लागते..... तिच्या म्हणण्या नुसार दोघं बाप लेक किचन मध्ये जात नाहीत.... दोघं बुद्धिबळ खेळत बसतात..... योगिताचं सगळं आवरतं जेवणं होतात..... मागची सगळी कामं सुद्धा होतात..... तिघं आता झोपायला जातात..... चिन्मय ने आजही जे फोटो सोशल मीडियावर टाकलेले असतात त्यावरून सूरज पुन्हा त्याला बोलत असतो..... चिन्मय पुन्हा त्याला समजवायचा प्रयत्न करतो पण, काहीही फरक पडत नाही..... म्हणून मग तो तिथेच विषय सोडून देतो आणि सरळ झोपून जातो..... 
दुसऱ्या दिवशी यश आणि चिन्मय लवकर उठून सगळी तयारी करतात.... योगिताने काल सांगितल्या प्रमाणे तिला आज किती वाजतील घरी यायला हे सुद्धा माहित नसतं! बेसिक तयारी करून ठेवतात.... योगिता उठल्यावर चहा नाश्ता करून यश तिच्या डब्याची तयारी करू लागतो..... तोवर योगिता बाकी आवरते... आजही तिचं सगळं वेळेत आवरतं आणि ती जायला निघते..... 
योगिता:- चला मी येते.... दोघं नीट सांभाळा सगळं! 
चिन्मय:- हो आई डोन्ट वरी! आज पासून बाबांना दुपारी काम असेल तर दुपारचं मी बघीन रात्री ते करतील.... तू सुद्धा काळजी घे आणि लवकर ये..... जेवायच्या आधी हाताला सॅनिटायझर लावायला विसरू नकोस.... बाय बाय.... 
योगिता हो म्हणत निघते..... खाली उतरता उतरता ती मयुरी ला फोन लावते.... मयुरी सुद्धा खालीच उतरत असते..... दोघी एकत्र पुढे जातात..... 
क्रमशः......

तुम्हाला काय वाटतंय, मयुरी ला रमेश आणि सूरज नी मदत केली असेल का? म्हणून ती वेळेत येऊ शकली? कि तिनेच सगळं मॅनेज केलं असेल? जर मयुरीच्या घरच्यांना अजूनही कामाचं महत्व पटलेलं नसेल तर योगिता मयुरी ला काही मदत करू शकेल का? पाहूया पुढच्या भागात...... तोपर्यंत तुम्हाला आत्ता पर्यंत कथा कशी वाटली हे नक्की सांगा.... आणि खूप खूप शेअर करा.... 

🎭 Series Post

View all