****************************
संध्याकाळपर्यंत सरलाचं काम चाललं. शंकर जेव्हा घरी आला, ती पाणी घेऊन त्यांच्यासमोर उभी राहिली त्याने तिच्या हातातला ग्लास घेतला पण तिच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही.
" अहो, उद्या जरा बाहेर जाऊ या का?"
" नाही मला वेळ नाही...आईसोबत जा तू ."
" अरे वा!!!माझ्यासाठी बरा वेळ नाही तुम्हाला आणि एक शब्दाने मला विचारलं नाही की काय काम आहे."
" मला नाही वाटली गरज म्हणून नाही विचारलं. लवकर जेवण बनव मला खूप भूक लागली आहे. आई बाबांना पण लागली असेल. जरा लवकर आवरून सकाळी लवकर उठत जा."
" मी काय मग फक्त तुमच्या घरची धूनी भांडी करण्यासाठी आहे का?"
" हो.. मग... त्यासाठी लग्न करून आणलं तुला आणि दोन वेळच गिळायला मिळत ना तुला अजून काय अपेक्षा आहेत तुझ्या?"
" अपेक्षा म्हणजे मला पण वाटतं तुमच्याबरोबर फिरावं , गप्पा माराव्या, विचारांची देवाण घेवाण करावी."
तो मिश्कीलपणे हसला
" विचारांची देवाण घेवाण ...डोकं तरी आहे का तुला?"
" मला नाही, पण तुम्ही मला पसंद करून इथे आणली मग तुम्हाला किती डोक आहे हे कळलं मला."
हे ऐकल्यावर त्याला खूप राग आला तो उठला आणि तिच्या थोबाडीत जोरात मारली. तिलाही प्रचंड राग आला. तिने त्याला ढकललं तेवढ्यात सासूबाई आल्या.
"अरे काय झालं? बाहेर पर्यंत आवाज येत आहे, जरा शेजाऱ्यांचा विचार करा, घरात आजारी माणूस झोपलं आहे."
"मी करायचं फक्त आणि त्यांनी?"
"आवाज खाली सरला माझ्या घरात राहायचं असेल तर अजिबात आवाज काढायचा नाही."
"का नाही काढू? लग्न केलंय मी तुमच्याशी अशी वागणूक तर घरातल्या जनावरांना पण नाही देत कुणी मी तर माणूस आहे. लग्नाला दोन तीन वर्ष होत आली. पण अजून मला काहीच सांगत नाही घरातलं. घरी कोण येत जात माहीत नाही? घरचा व्यवहार माहीत नाही, काय तर तुला कळत नाही तुम्ही कधीतरी सांगितलं मला, मग मला कसं कळणार? आणि हो तुम्हाला वाटत असेल मला माहित नाही पण मला माहित आहे की तुमचे संबंध बाहेर आहेत. मला वाद करायचं नाही आणि कुणाची बदनामी करायची नाही. माझ्या माहेरची लोक गरीब आहे मला सपोर्ट नसला तरीही मी तुमच्या विरोधात जाऊ शकते हे लक्षात ठेवा."
आज मात्र सरलाच्या जे मनात असेल ते सगळं बोलून गेली. कारण तिच्या मैत्रीने सागितलं होत तिला की जर तुला संसार टिकवायचं असेल तर खंबीर व्हावं लागेल आणि घरातचं लढाई करावी लागेल म्हणजेच आपल्या माणसांशी.
त्या दिवसापासून घरात जरा का होईल ना बदल झाले. पण शंकरच बाहेरख्याली स्वभाव काही सुटेना. काही दिवस असेच गेले आणि एक रात्री अचानक सासूबाईंना हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला त्याला महिना होत नाही तोच सासरे घसरून पडले आणि ते बेशुद्ध झाले. हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत त्यांचाही जीव गेला.
आता घरात दोघेच उरले शंकर आणि सरला. त्यांचं फारसं काही पटत नव्हतं. मात्र सरलाला इथे थांबल्या शिवाय पर्याय नव्हता कारण तिला वडील नव्हते आणि भाऊ फारसा काही कमवत नव्हता. आई आणि त्याचं कसतरी भागत होतं म्हणून तिने आता घरी बसून जेवनाचे डबे करायला सुरुवात केली आणि तिला बरेच इन्कम यायला सुरुवात झाली. ती तिच्या कामात आता खुप मग्न झाली होती. तिला कुठलाही विचार करायला वेळ नव्हता. रात्री नऊच्या सुमारास तिच्या फोन वर फोन आला ...
" हॅलो!! शंकर इथेच राहतात का?"
"हो, का ?"
"अहो त्यांना सिटी हॉस्पिटल मध्ये नेलं आहे,त्यांना खूप लागलं आहे, तुम्ही लवकर या."
हे एकून तिला घाम फुटला तिने पटकन घराचं लॉक लावलं आणि निघून गेली.
शंकर वाचेल का या अपघातातून की नाही बघू पुढच्या भागात. धन्यवाद!
क्रमशः.....
©®कल्पना सावळे
क्रमशः.....
©®कल्पना सावळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा