जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
विषय- क्षणिक सौंदर्य
विषय- क्षणिक सौंदर्य
मी कशाला आरशात पाहू गं
भाग- 2
भाग- 2
आईचे बोलणे ऐकून रुपक तडक निघाला.
श्री श्री करतच रुपक खोलीत शिरला.तो रुपश्रीला नेहमी श्रीच म्हणायचा.
रुपश्री नट्टापट्टा करण्यातच गुंतलेली होती. तिला रूपकच्या येण्याची दखलही घ्यावीशी वाटली नाही.
शेवटी रूपकनेच आवाज दिला, "श्री मला काही बोलायचेय तुझ्यासोबत."

"मला आज वेळ नाही माझी भीशी आहे. मलाच लागलेली असल्यामुळे मी ती पंचतारांकित हॉटेलमध्ये अरेंज केली आहे आज रात्री उशीर होईल मला यायला."
"उद्या तरी वेळ राहील का तुझ्याकडे मला महत्त्वाचं बोलायचं आहे श्री."
"उद्याचं उद्या बघू"
आता रूपक संतापला होता पण... काय फायदा.
आता रूपक संतापला होता पण... काय फायदा.
शेवटी त्याने तिला अजीजीनेच सांगितले मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तो बोलु लागला.
"श्री मला आज कळलं तुझ्या
आतताईपणामुळे कृष्णाचा चेहरा भाजला. अगं ते गरिबाचं लेकरू..."
रूपकचा आवाज कापत होता.
आतताईपणामुळे कृष्णाचा चेहरा भाजला. अगं ते गरिबाचं लेकरू..."
रूपकचा आवाज कापत होता.
पण श्री निर्विकारपणे उत्तरली,
" मग काय झालं?"
" मग काय झालं?"
"अग श्री स्वतःच्या रूपाचा एवढा अभिमान बाळगणारी तू आणि दुसऱ्याचा चेहरा आपल्यामुळे विद्रूप झाला तरी तुला काहीच वाटत नाही बोलताना?
श्री तू तिला पाण्याची बॉटल भरून आणायला सांगितली. ती आणायला तिला पाच मिनिट वेळ लागला कारण त्याच वेळात बाबांनी पाणी मागितले. तर रागाच्या भरात तीच पाण्याची बॉटल तू तिला फेकून मारली ती गॅस जवळ उभी होती गॅसवरच्या उकळत्या तेलात ती बाटली पडली आणि ते गरम तेल कृष्णाच्या चेहऱ्यावर उडाले.
अगं त्या निष्पाप पोरीचा चेहरा तर बघ?"

"रूपक, काही नको एवढा पुळका तिच्यासाठी नाहीतर कोणती मोठी अप्सरा लागून राहिली होती."
श्री फणकार्याने बोलून निघून गेली.
श्री फणकार्याने बोलून निघून गेली.
रूपक खूप उद्विग्न झाला. हिला फक्त हिच्याच रूपाचा अहंकार, गर्व. हीच फक्त सौंदर्याची पुतळी आणि बाकी सगळे म्हणजे...
रूपक कृष्णाला प्लास्टिक सर्जरी साठी घेऊन गेला.त्यावेळी रुपश्री तोंड वेंगाडत म्हणाली,"लाख छुपाओ छुप ना सकेगा..."
रूपकला क्रोध अनावर झाला. त्याने तिला चार गोष्टी ऐकवूनच दिल्या त्या दिवशी.
"श्री, अगं या गोऱ्या कातडीचा किती अभिमान करशील? पुर्व पुण्याने मिळालेलं शरीर हे. कुणी गोरा कुणी सावळा. अगं आमच्या या का***** रुपाचा एक थेंब जरी तुझ्या शरीरावर लागला तर तो तीळ बनून तुझ्या रूपाला आणखी देखणं बनवेल. पण... तुझ्या गोऱ्या रूपाचा एवढासा डाग जरी आमच्या शरीराला लागला तर लोक कोडी म्हणून हिनवतील.
आणि ह्या बाह्य रूपाचं काय घेऊन बसलीस गं... क्षणिक सौंदर्य आहे ते. आज आहे... कधी नष्ट होईल तर कळणारही नाही.
या बाह्य रूपाला साजेसं अंतरंग निर्मल ,धवल असू दे तेच कामी येईल. चार माणसं जोड तेच कामी
येतील हे बाह्यरूप नाही .
येतील हे बाह्यरूप नाही .
पण श्री गर्वाने फुगून गेलेली. तिला कुठला ह्या गोष्टींनी फरक पडणार होता.
आता तर ती कृष्णाचा जास्तच तिरस्कार करत होती.
आता तर ती कृष्णाचा जास्तच तिरस्कार करत होती.
कृष्णाला वडील नव्हते.आई ह्याच घराच्या भरोशावर जगत होती.
कृष्णाचे शिक्षणही याच घराच्या भरोशावर चालू होते. ती ग्रॅज्युएट झाली होती आता पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत बँकेच्या परीक्षाही देत होती.
कृष्णाला सगळेजण आपल्या मुली प्रमाणे वागवत होते फक्त रुपश्री सोडून.
कृष्णाचे शिक्षणही याच घराच्या भरोशावर चालू होते. ती ग्रॅज्युएट झाली होती आता पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत बँकेच्या परीक्षाही देत होती.
कृष्णाला सगळेजण आपल्या मुली प्रमाणे वागवत होते फक्त रुपश्री सोडून.
पुढे रुपश्रीच्या जीवनात काय घटना घडते? ती बदलते का? कृष्णाचा समंजसपणा...ते बघूयात पुढील भागात.
क्रमशः
भाग -३मधे
©®शरयू महाजन
क्रमशः
भाग -३मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा