" मॅडम , तुम्ही खूप छान लिहितात. मी तुमच्या सर्वच कथा-कविता वाचल्या आहेत. " प्रेमा म्हणाली.
" थँक्स. " पल्लवी म्हणाली.
" तुम्ही कुठे राहतात ?" प्रेमा म्हणाली.
" पुणे. " पल्लवी म्हणाली.
" पुण्यात कुठे ?" प्रेमा म्हणाली.
" अकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ. " पल्लवी म्हणाली.
" ओह ग्रेट. मी हडपसरला राहते. आपण भेटू शकतो का ?" प्रेमा म्हणाली.
" माफ करा. मी अनोळखी लोकांना भेटत नाही. " पल्लवी म्हणाली.
" मॅडम , जरी आपण एकमेकांना ओळखत नसलो तरी आपली एकमेकांशी एक सुंदर ओळख आहे. लेखक-वाचकाची ओळख. तुम्ही इथे मनमोकळेपणाने व्यक्त होतात आणि आम्ही वाचक खुलेपणाने तुमच्या लेखणीला दाद देतो. प्लिज मला एकदा भेटायचं आहे तुम्हाला. " प्रेमा म्हणाली.
पल्लवीने तात्काळ विषय टाळला. पण नंतर प्रेमा आणि पल्लवीमध्ये रोजच संभाषण घडू लागले. प्रेमाच्या रूपात पल्लवीला एक मैत्रीणच गवसली होती. शेवटी पल्लवी भेटायला तयार झाली. अकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील " कॅफे हँगआऊट " हे ठिकाण निश्चित झाले.
***
पल्लवी निळी साडी नेसून कॅफेत पोहोचली. एका दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नवीन कॅफे उघडला गेला होता. आजूबाजूला कॉलेज असल्यामुळे तरुणांची तिथे गर्दी असायची. कॉफी , मॅगी , नूडल्स , बर्गर अशी अनेक पाश्चात्य पदार्थ तिथे भेटत.
" वेलकम टू कॅफे हँगआऊट. हाऊ कॅन आय हेल्प यु मॅडम ?" वेटरने पल्लवीला विचारले.
" आय एम वेटिंग फॉर समवन. आय विल लेट यु नो." पल्लवी म्हणाली.
तो वेटर निघून गेला. थोड्या वेळाने एक तरुण हातात पुष्पगुच्छ घेऊन उभा राहिला. त्याने पांढरा रंगाचा शर्ट आणि निळी जीन्स पँट घातली होती. तो दिसायला खूप सुंदर होता. त्याला राजबिंडे रूप लाभले होते. रेखीव चेहरा , कोरीव दाढीमिश्या , गालावर सुंदर खळी आणि प्रसन्न मुखचंद्रमा. त्याने सुंदर स्मितहास्य केले.
" पालवी , राईट ? मी प्रेम दीक्षित. " प्रेम पुष्पगुच्छ समोर करत म्हणाला.
हे पाहून पल्लवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने तो पुष्पगुच्छ हातात घेऊन जमिनीवर फेकला.
" तुम्हाला लाज नाही वाटत असा खोटारडेपणा करून भेटायला ?" पल्लवी म्हणाली.
" मॅडम , मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही पुरुषांच्या मेसेजला रिप्लाय देत नाही म्हणून मी प्रेमचे " प्रेमा " केले. मला घरीही लाडाने प्रेमाच म्हणतात. " प्रेम म्हणाला.
" तुम्हाला काहीच नाही वाटत ना स्त्रियांना अस फसवून भेटायला. बाय. इथे एक क्षणही थांबण्याची माझी इच्छा नाही. " इतके बोलून पल्लवी वळली आणि जाऊ लागली.
" मला ब्लड कॅन्सर आहे. मरण्यापूर्वी शेवटच्या इच्छा पूर्ण करत आहे. त्यातली एक इच्छा आवडत्या लेखिकेला भेटण्याची होती. " प्रेम म्हणाला.
हे ऐकून पल्लवी थांबली आणि परत वळली.
" सॉरी. मला ठाऊक नव्हते. " पल्लवी म्हणाली.
" कोई नि. " प्रेम म्हणाला.
" सर , मॅडम , कॉफी ?" वेटरने विचारले.
" दोन कोल्ड कॉफी. " दोघेही एकसुरात म्हणाले.
दोघेही हसले.
" मॅडम , मी तुमच्या सर्व कथा-कविता वाचल्या आहेत. कांदेपोहे , झेंडा , एक होता राजकुमार , गुंतता हृदय हे. खूप उत्कृष्ट लेखन करतात तुम्ही. " प्रेम म्हणाला.
" थँक्स. तुम्ही काय करतात ?" पल्लवी म्हणाली.
" मी सिव्हिल इंजिनिअर आहे. " प्रेम म्हणाला.
" ब्लड कॅन्सरचा कितवा स्टेज चालू आहे ?" पल्लवी म्हणाली.
प्रेमला खोकला आला.
" काय झाले ?" पल्लवी म्हणाली.
" आधी कॉफी घेऊ. मग बोलू. " प्रेम म्हणाला.
दोघांनी कॉफी घेतली.
" मी एक कविता लिहिली आहे. तुम्हाला ऐकवू शकतो का ?" प्रेम म्हणाला.
" हो. " पल्लवी म्हणाली.
" पहिल्यांदा जेव्हा तुज पाहिले
खरच माझे भान मला न उरले
तुझे रूप गोजिरे नेत्रात साठवले
वेडावते मन जरी ते क्षण आठवले
खरच माझे भान मला न उरले
तुझे रूप गोजिरे नेत्रात साठवले
वेडावते मन जरी ते क्षण आठवले
तुझा सुंदर मुखचंद्रमा
जणू माधवाची तू रमा
हृदय क्षणभरात जिंकले
प्रेमात तुझिया मज पाडले
जणू माधवाची तू रमा
हृदय क्षणभरात जिंकले
प्रेमात तुझिया मज पाडले
जग किती सुंदर तुज पाहुनी पटले
ईश्वर सर्वोच्च मूर्तिकार हेच उमगले
पाहुनी तुझे सौंदर्य , मन झाले बावरे
विश्वास न बसे हे स्वप्न असे की खरे
ईश्वर सर्वोच्च मूर्तिकार हेच उमगले
पाहुनी तुझे सौंदर्य , मन झाले बावरे
विश्वास न बसे हे स्वप्न असे की खरे
हास्य तुझे पाहुनी कायमच मी सुखावतो
कळलेच नाही मनाला कधी तुझा झालो
दे तुझ्या हृदयात स्थान म्हणून इथवर आलो
तुलाच माझे हृदय जोडीदार म्हणून पाहतो ! " प्रेम म्हणाला.
कळलेच नाही मनाला कधी तुझा झालो
दे तुझ्या हृदयात स्थान म्हणून इथवर आलो
तुलाच माझे हृदय जोडीदार म्हणून पाहतो ! " प्रेम म्हणाला.
" खूप छान कविता आहे. " पल्लवी म्हणाली.
" थँक्स. तुम्ही सिंगल की मॅरिएड ?" प्रेम म्हणाला.
" ऍक्चुअली , माझ्या पतीचे निधन झाले आहे. " पल्लवी म्हणाली.
" ओह सॉरी. " प्रेम म्हणाला.
" कोई नि. मला अरेतुरे केलं तरी चालेल. " पल्लवी म्हणाली.
दोघांनी छानपैकी गप्पा मारल्या.
" पल्लवी , मला एक गोष्ट सांगायची आहे. " प्रेम म्हणाला.
" काय ?" पल्लवी म्हणाली.
" ते कॅन्सर वगैरे मला नाहीये. तुझा राग शांत व्हावा म्हणून मी म्हणालो तस. " प्रेम म्हणाला.
पल्लवी रागात बघू लागली.
" थोबाडीत मारायची असेल तर एकांतात मारा प्लिज. " प्रेम म्हणाला.
हे ऐकून पल्लवी हसली. प्रेमने अजून काही जोक्स ऐकवून तिला हसवले. कितीतरी दिवसांनी पल्लवी खळखळून हसत होती. दोघांनी नंबरही एक्सचेंज केला. घरी आल्यावर रात्री झोपताना पल्लवी उगाचच हसत होती. डोळ्यासमोर सतत प्रेमचाच चेहरा येत होता.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा