मी काट्यांतुन चालून थकले... भाग 18
आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं .... 
©️®️शिल्पा सुतार
...........
...........
सकाळी सविता आवरत होती, रमेश दादाचा फोन आला, "काय चालल आहे तिकडे? मनु गेली का शाळेत? काल आले होते का ते रुपा मॅडम सचिन सर",.. 
"हो आले होते",.. सविता 
"कुठे पर्यंत आलं आहे बुटीकच काम ?",.. रमेश दादा 
"आम्ही सध्या पुरता भाड्याने गाळा घेणार आहोत, त्यात बुटीक सुरू करणार आहोत, एकदा जम बसला की पुढचं काहीतरी करता येईल",... सविता 
" छान आयडिया आहे, किती खर्च आहे ते सांग, रूपा मॅडम ला सांगितलं ना की आम्ही अर्धे पैसे देऊ",.. रमेश 
" हो सांगितला आहे, मी ना आता दादा डिझाईन तयार करायला घेणार आहे ",... सविता 
" मला सांगा किती पैसे द्यायचे, हे काम काही झाल तरी थांबवू नको, खर्चा कडे बघु नको मी देतो लगेच पैसे",.. रमेश 
" दादा तू कशाला सारखे मला पैसे देतो, आधीच ते शेतीच्या उत्पन्नाचे माझ्या हिस्साचे पैसे माझ्याकडे आहेत, भरपूर आहेत ते पैसे, होईल काम त्यात",.. सविता 
" असू दे ग, ते पैसे मनु साठी बाजूला ठेव आणि जेव्हा तुझा बुटीक मध्ये खूप फायदा होईल तेव्हा मला वापस कर",.. रमेश 
" कधी होईल ते, अजून सुरुवात ही नाही झाली आमची कामाची ",.. सविता 
" चालेल तुझ बुटीक तू आहेच तेवढी हुशार",.. रमेश 
" तू घेतो आहेस का माझ्याकडून पैसे? नेहमी मला सगळी मदत करतोस, आई बाबा कसे आहेत? ",.. सविता 
"चांगली आहे आईची तब्येत, बाबा ही ठीक आहेत, उद्या चेक अप साठी जायचा आहे, तर आम्ही येतो तुझ्याकडे",.. रमेश 
" सगळ्यांनी या मस्त जेवणाचा बेत करू",.. सविता 
"हो चालेल",.. रमेश 
" अजून बरेच खर्च आहेत दादा, सागर ने सांगितलं का तुला केस ची फी किती आहे ती?",... सविता 
"नाही मला काही बोलला नाही तो",.. रमेश 
" मी त्याला विचारलं किती आहे फी सागर? तर मला बोलला मी फी रमेश दादा ला सांगितली आहे",.. सविता 
" तुझं काही बोलणं झालं का सागर शी? ",.. रमेश 
" हो आज आला होता फोन, केस लवकर सुरू होणार आहे, आम्ही उद्या भेटणार आहोत",.. सविता 
" काय बोलला सागर",.. रमेश 
" काहीच नाही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता",.. सविता 
" अच्छा ",.. रमेश 
" काही झालं आहे का दादा? ",.. सविता 
" काहीच नाही ",.. रमेश 
"मग तू मला एवढे प्रश्न खोदून खोदून का विचारतो आहे की सागर काय म्हटला? नक्कीच काहीतरी झालं आहे? ",.. सविता 
"नाही ग सविता काही झालं नाही",.. रमेश 
" तुला नसेल सांगायचं तर नको सांगू दादा",.. सविता 
" अगं असं काही नाही आहे सविता, मला सागरचा आला  होता फोन तो बोलेल उद्या तुझ्याशी त्याला काय बोलायचं आहे ते",.. रमेश 
 म्हणजे... 
" अग तूच मला सांगितलं ना  केस संदर्भात तुम्ही भेटणार आहात म्हणून म्हटलो मी ",.. रमेश 
" ठीक आहे दादा मला बुटीक ला जायला उशीर होत आहे मी फोन ठेवते",.. सविता 
सविता विचार करत होती की नक्की काय बोलायचं सागरला माझ्याशी? नक्कीच रमेश दादा काहीतरी लपवतो आहे? सागर ने माझे केस लढायला नकार तर  दिला नसेल ना? , त्याला तेच सांगायचं असेल आज भेटुन की मी तुझी केस लढू शकत नाही, मग काय करायचं? दुसरा वकील बघावा लागेल का? कारण रमेश दादाच्या बोलण्यात काहीतरी टेन्शन होतं, काहीतरी नक्की सागरला मला सांगायचं आहे, विचार करता करता सविता बुटीक ला पोहोचली, तिकडे खूप काम होतं, सविता विसरून गेली सागर बद्दल 
लंच टाइम मध्ये सागरचा फोन आला,.. "डब्बा खाल्ला का?",. 
"नाही मी आज डबा नाही आणला, भरपूर नाश्ता करून आली आहे",.. सविता 
" लंच ला  जाऊया का? येऊ का मी तुला घ्यायला? ",.. सागर 
"होईल का अर्ध्यातासात आपला लंच? मला अर्ध्या तासाची सुट्टी आहे" ,.. सविता 
" ठीक आहे मग किती वाजता सुट्टी होणार आहे तुझी ",.. सागर 
"तीन वाजेपर्यंत सुट्टी होईल",.. सविता 
" थोड अर्धा तास आधी निघता येईल का? म्हणजे निवांत बसून बोलता येईल,.. सागर 
" ठीक आहे",... सविताने अर्धा तास आधी सुट्टी घेतली तिचं काम झालेलं होतं बाहेर आली तर सागर आलेला होता 
"घरी चलतोस का सागर जेवायला",.. सविता 
" नको सविता आज बाहेरच जेऊ, म्हणजे निवांत बोलता येईल",.. सागर 
"रोज तर तू खूप ओरडत असतो की मला जेवायला बोलवत नाहीस, आज मी म्हणते आहे चल जेवू घरी जावून तर येत नाहीस, नक्की काय प्रकार आहे हा ",.. सविता 
" येईन मी एकदा रमेश  सोबत",.. सागर 
दोघं एका छान हॉटेल मध्ये गेले, अतिशय सुंदर स्वच्छ अस पंच तारांकित हॉटेल होत ते 
" सागर मला इथे अवघडल्यासारखं होत आहे, खूपच छान हॉटेल आहे हे, आपण थोड्या साध्या हॉटेलमध्ये जाऊ या का?",.. सविता 
" काय झालं सविता? ",.. सागर 
"मला सवय नाही एवढ्या महाग हॉटेलमध्ये यायची, इथल्या उठण्या बसवण्याच्या पद्धती मला माहिती नाहीत",..सविता 
 " मला तरी कुठे माहिती आहे सविता, आपल्याला जसं मनाला वाटेल तसं जेवायचं आरामात राहायचं",.. सागर 
सविता आता बरीच रिलॅक्स झाली होती... 
" आज काय विशेष आहे का सागर? तुझा वाढदिवस वगैरे? सॉरी मी विसरले आहे का",... सविता 
" नाही का ग",.. सागर 
" एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण आलो आहोत, आणि तू ही छान तयार झाला आहेस,".. सविता हसत होती 
" म्हणजे मी आज हंड्सम दिसतो आहे असं म्हणायचं आहे का तुला सविता, बोल ना तस स्पष्ट, ठीक आहे एखाद्या दिवशी स्पेशल लोकांसाठी स्पेशल हॉटेल ,.. सागर 
सविता खूप हसत होती, ती खुश होती म्हणून सागर ही खुश होता , जेवणाची ऑर्डर दिली. 
"बोल ना तुला मला काही सांगायचं होतं ना",.. सविता 
"हो मला सांगायचं आहे पण तुला कसं माहिती",.. सागर 
"मी आज रमेश दादाला फोन केला होता, तोच मला बोलला की सागरला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी, काय झाल आहे",.. सविता 
"मग त्याने नाही सांगितलं का मला काय बोलायचं आहे ते ",.. सागर 
" तो कशाला सांगेल, अरे काय चाललं आहे स्पष्ट बोला ना, तुला वेळ नाही आहे का तुझ्या बिझी शेड्युलमधून माझ्या केससाठी, हेच सांगायच आहे ना की मी तुझी केस नाही लढू शकत",... सविता 
" हे काय नवीन आता सविता, केस चा  काय इथे संबंध? मी तुझी केस लढणार आहे सविता, तुला न्याय मिळवून देईल",... सागर 
" मला असं वाटलं की तू असं बोलणार असशील की तुला आता या केस साठी वेळ नाही ",... सविता 
" असं काही नाही ग, तू मनातच काहीतरी ठरवत बसते की काय?",... सागर 
" अरे मग काय बोलायचं आहे",.. सविता 
" सविता तू मला आधीपासून तू खूप आवडते, कॉलेज झाल्यावर मी तुला लग्नासाठी विचारणार होतो, पण त्या आधी तुझ लग्न झाल, आता खरं चान्स आहे आपण दोघ एकटे आहोत तर तू माझ्याशी लग्न करशील का? आता आपल्याला एकत्र रहायला काय हरकत आहे",.. सागर 
 सविताला धक्का बसला तिला माहिती होतं हे आधीपासून की सागर ला ती आवडायची, पण सागर हे इतक्या लवकर बोलेल असं तिला वाटलं नव्हतं, ती खाली बघत होती, तिचे हात पाय कापत होते 
" सविता तुला आवडल नाही का मी जे बोललो ते? , तू असा तर नाही ना विचार करत आहेस की आता सतीश नाही  तर सागर लगेच चान्स घेतो आहे, प्लीज गैरसमज करून घेऊ नको, तू हो बोल किंवा नाही, तरी तुझी केस मी लढणार आहे, आणि तुला काही लागल तर मी असेन कायम, प्लीज बोल काहीतरी  सविता",.. सागर 
" सागर मला राग आलेला नाही, मी भारावून गेले आहे, तू अस  मला लग्नाच विचारशील मला वाटल नव्हत, किती चांगलं वाटत आहे मला, माझ्यासाठी कोणी आहे, कोणाला तरी मी हवी आहे हे खूप छान आहे, या आधी कधी मी हा अनुभव  घेतला नाही , बळजबरी चा संसार आमचा, कसातरी टिकला इतके वर्ष, पण आता मी माझे निर्णय स्वतः घेणार आहे, मलाही तू आवडतो", 
" खरं बोलते आहेस का तु सविता? तुला माझा राग नाही ना आला? कोणत्या दडपणाखाली तर तू हा निर्णय नाही ना  घेत? ",.. सागर 
" सागर तू असं लग्नासाठी मला विचारलं याची वाट मी शाळेत कॉलेजमध्ये असल्या पासून बघत होती, मलाही तू खूप आवडतोस, माहिती आहे तू किती चांगला आहेस, मला तुझ्यासोबत राहायला आवडेल, पण सध्या मला थोडा वेळ हवा आहे, अजून माझी आणि सतीश ची केस सुरू आहे",.. सविता 
" हो मला माहिती आहे ते सविता, आपण तुझे घटस्फोट झाल्यानंतरच सांगू सगळ्यांना ",.. सागर 
" रमेश दादा ला माहिती आहे का ही गोष्ट ",.. सविता 
" हो मी सांगितला आहे त्याला, रमेशला  खूप आनंद झाला",... सागर 
सविता अजूनही  गप्प होती... 
" काय झाला हे सविता?  जर तुझ्या मनात नसेल माझ्यासोबत लग्न करायचं स्पष्ट सांग मला राग येणार नाही",.. सागर 
"माझ्यावर मनू आणि सासुबाईंची जबाबदारी आहे, मी एकटी नाही, जरी आपल लग्न झालं तरी मी एकटी त्या दोघींना सोडून तुझ्या सोबत येवू शकत नाही",.. सविता 
"मला माहिती आहे ते, तुला एकटीचा नाही तर सुलभा काकू  मनुजा मी विचार करतो आहे, मनु ला चांगल कॉलेज मध्ये घेवू आपण अॅडमिशन , सगळ आहे ग माझ्या कडे ते सांभाळणार कोणी नाही, मला आधार दे सविता ",.. सागर 
सविता भारावून गेली होती, काय करू समजत नव्हत, एकी कडे सागर जो तिला पूर्वी पासून आवडत होता तो आणि एकी कडे जनरीत,...." हे खूप लवकर नाही होत आहे का सागर? लोक काय म्हणतील? की अजून नवऱ्याला सोडून एक महिना झाला नाही, लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू झाली" , 
"काहीही बोलू दे लोकांना आपल्याला काय फरक पडतो? हे लोक आले होते का तुला मदतीला जेव्हा तू बेघर  होतीस, मदतीला तर तुला तुझा भाऊ आला होता आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्या नात्याबद्दल उलट रमेश तर आनंदी आहे की त्याची बहीण तिच्या आयुष्याची एक चांगली सुरुवात करते आहे, मला पण तुझ्या सोबतीची गरज आहे सविता, मी खरं सांगतो मी तुझ्याशिवाय इतर कोणावर ही प्रेम केलं नाही ",.. सागर 
सविता विचार करत होती,..." तसं काही नाही आहे सागर, मला आयुष्याचा अशा आदर प्रेम कधी मिळाला नाही, मला नेहमी गृहितच धरलं गेलं, मी भारावून गेले आहे, मी नक्कीच विचार करेल तुझा, मला ही तुझ्या सोबत राहायचं आहे, फक्त थोडा वेळ हवा आहे मला", 
" ठीक आहे तू घे तुझा वेळ ",.. सागर 
"मला बोलावं लागेल घरच्यांशी आई बाबा रमेश दादा वहिनी सासुबाई  मनु काय म्हणत आहे ते बघेल मी ",.. सविता 
" सगळ्यांसोबत माझा पण विचार कर थोडा, मी पण आहे रांगेत आता घरच्यांच्या",.. सागर 
 सविता छान हसत होती,.." तू असं बोलतो ना सागर अगदी मन जिंकून घेतो", 
 सागर ने एक गिफ्ट सविताला दिलं,.. 
" काय आहे हे सागर मी नाही येऊ  घेऊ शकत गिफ्ट",... सविता 
" आजच्या आपल्या भेटीची आठवण म्हणून तरी राहू दे हे गिफ्ट तुझ्याकडे, जेव्हा तू हे गिफ्ट बघशील तेव्हा तुला आठवेल आपल्याला सागर बाबतीत निर्णय घ्यायचा आहे म्हणजे तू मला विसरणार नाही",.... सागर 
" पण मी घरच्यांना काय सांगू या गिफ्ट बाबत ",.. सविता 
"तू कशाला कुणाला काय सांगायला पाहिजे सविता? तु एक स्वतंत्र व्यक्ती आहेस आनंदी राहण्याचा, स्वतःचे निर्णय घेण्याचा स्वतः ला आनंद मिळवण्याचा अधिकार तुला आहे आणि तसं बघता मनू आणि सुलभा काकूंना मी आवडतो रमेश ला ही  काही प्रॉब्लेम नाही आणि तु का गिल्टी होते आहेस? जरा स्वतःचा विचार कर ",... सागर 
जेवणाची ऑर्डर आली, सविताला जेवणच जात नव्हत, समोर सागर होता, तिला लाजल्या सारखं झालं होतं, हात थरथरत होते, सागरच्या ते लक्षात येत होतं, तोही छान हसत होता 
" सविता रिलॅक्स हो टेन्शन घेऊ नको",.. सागर 
जेवण झाल, दोघ निघाले सागर ने तिला घरापर्यंत सोडल, गिफ्ट तिच्या बॅग मध्ये टाकल, सविता गप्प होती 
"सविता निघतो मी, तू घे तुला घ्यायचा तेवढा वेळ, पण हो म्हण मला, आपण राहू ग एकत्र, परत ताटातुट नको, आपले आधीच बरेच वर्ष गेले, आता नको वेळ वाया घालवू, जे बोलायचं आहे ते बोलू दे लोकांना, आपण अडचणीत असताना लोक नाही येत आपल्याला सावरायला, स्वतःचा विचार कर",.... सागर 
सविता कारमधून उतरली,..." येतोस का घरी",.. 
" नाही नंतर येईन मी, मला थोडं काम आहे",... सागर 
" ठीक आहे",...  सविता आत गेली 
सागर  निघाला.... 
.......... 
सविता काय निर्णय घेईल? , तिच्या मनाच ऐकेल की जनरीत सांभाळेल? , घरी सगळ्यांना सविता सुखी असलेली बघायच आहे, तुम्हाला काय वाटतय??, सागर योग्य व्यक्ति आहे का?? 
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा