मी काट्यांतुन चालून थकले... भाग 20
आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं .... 
©️®️शिल्पा सुतार
...........
...........
सविता बुटीक मधुन निघाली, घरी आली, तिला माहिती होत आई बाबा आलेले आहेत घरी , येता येता तिने भाजी आणली, सगळ्यांसाठी नाश्त्याला समोसे  घेतले, घरी जाऊन मस्त आलं घालून चहा करू, चहा समोसे खाऊ आणि नंतर लागू स्वयंपाकाला, सविताची आई आणि सुलभाताई रूम मध्ये छान गप्पा मारत होत्या, मनु क्लास हुन आली होती, ती प्रथम शी खेळत होती, बाबा पुढच्या खोलीत झोपले होते, रमेश दादा वहिनी टीव्ही बघत होते, वहिनीने पुढे होऊन सविताच्या हातातुन बॅग घेतली 
"छान आहे ना घर? आवडलं ना?",.. सविता 
"हा एरिया हो खूपच मस्त आहे ",.. रमेश दादा 
"सगळं तूच बघून दिला आहेस दादा मग काय प्रश्न आहे चहा ठेवते मी",.. सविता 
"काय आणला आहे खायला, छान वास येतो आहे ",.. रमेश दादा 
"समोसे आणले आहेत",.. सविताने चहा ठेवला, वहिनी ही आली किचन मध्ये 
"काय म्हणताय मग ताई? ",.. वहिनी छान हसत होती 
"काय वहिनी आज तुझा वेगळाच सूर आहे",.. सविता 
" भेटला का मग सागर? ",... वहिनी 
"वहिनी तुला माहिती आहे का सगळं? ",... सविता 
" सहाजिकच, तुमच्या दादाने मला सगळं सांगितलं आहे",... वहिनी 
" तुला काय वाटत आहे वहिनी, मी होकार द्यायला हवा का एवढ्या लवकर",.. सविता 
" तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे ताई, तुम्ही सागर ला पूर्वी पासून ओळखतात ना, मग कश्याला काळजी करतात ",... वहिनी 
"हो ग पण वाटत उगीच घाई नको व्हायला ",.. सविता 
"तुम्ही तुमचं घर सोडलं तेव्हापासून सगळंच चांगल होत आहे, सागर खूप चांगला आहे, मी आमचं लग्न झाल्यापासून बघते आहे, नेहमी येतो आपल्याकडे, स्वभाव चांगला आहे त्याचा व्यवसाय चांगला आहे आणि सागरला पहिल्यापासून तुम्ही आवडतात, मग एवढ नीट असून कसला विचार करताय ",.. वहिनी 
"हो ना ",... सविता लाजत होती 
" आता उशीर करू नका, मस्त आनंदी जिवनाची सुरुवात करा ",... वहिनी 
" लोक नाव ठेवतील ग वहिनी म्हणतील या साठी घटस्फोट घेतला की काय? ",... सविता 
" ज्याला जे बोलायचं ते बोलू दे आपण दुर्लक्ष करायच",...वहिनी 
चहा घेवून सविता आणि वहिनी पुढे आल्या, सगळ्यांचा चहा झाला, सविता ची आई खुश दिसत होती, 
" काय म्हटले डॉक्टर आई?",... सविता 
" तब्येत ठीक आहे, आता एका महिन्याने बोलवलं तपासायला ",.. आई 
 सविता लगेच स्वयंपाकाला लागली 
" सविता अग इकडे ये जरा वेळ बस माझ्या जवळ, किती धावपळ करताय तुम्ही दोघी ",.. आई
" हो आई झाला आहे स्वयंपाक आणि आता मी तुला जाऊ देणार नाही, रहा येथे थोडे दिवस, आपल्याला छान गप्पा मारता येतील",.. सविता 
"राहील मी इथे मला नाही तरी सुलभाताईं सोबत गप्पा मारायला खूप आवडत आहे",... आई 
"बाबा राहू द्या थोडे दिवस आईला इथे, तुम्ही पण राहा ",.. सविता 
"ठीक आहे, रहातो आम्ही दोन-तीन दिवस ",..बाबा 
जेवण झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले 
" आम्ही निघतो आता",... रमेश दादा वहिनी घरी जायला निघाले सविता खालीपर्यंत आली 
"भेटला होता का तुला सागरा आज ?",..रमेश दादा 
"हो दादा भेटला होता आणि त्याने मला लग्नाचं विचारलं आहे, दादा वहिनी तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे ",... सविता 
"मी तर आधी सांगितला आहे ताई तुम्हाला की होकार द्या",... वहिनी 
" पण आई बाबांना आवडेल का? ",... सविता 
" का नाही आवडणार, तुमच्या सासुबाई काय म्हणत आहेत?",.. वहिनी 
"त्यांचा होकार आहे ",.. सविता 
" काय बोलतेस? झालं का बोलणं तुमच ? ",.. रमेश दादा 
" हो मी कालच सांगितलं त्यांना सागर बद्दल त्यांना काही प्रॉब्लेम नाही, खूप चांगल्या आहेत त्या ",... सविता 
" हो, मला असं वाटतं की पुढे जायला काही हरकत नाही",... रमेश दादा 
"आई बाबा मनु ला सांगाव लागेल",.. सविता 
" हो आता ते आहेत इथे तर बघ चान्स मिळाला तर बोलून घे त्यांच्याशी ",.. रमेश दादा 
हो... 
 सविता घरात आली
 रूपाचा फोन आला,... "आपल्याला उद्या शॉप बघायला जायचं आहे, आपल्या सोबत एक ब्रोकर आहे तो येईल", 
" चालेल चार वाजेनंतर जाऊया का आपण?, म्हणजे माझ बुटिक च काम संपेल ",... सविता 
" हो चालेल, मी पण ऑफिस हुन डायरेक्ट येईन ",.. रूपा 
" म्हणजे मी तस घरी सांगते की उशीर होईल ",.. सविता 
" तुझे डिझाइन्स कुठपर्यंत आले, सुचल्या का काही आयडिया ",.. रूपा 
" मी खूप डिझाईन तयार केलेल्या आहेत, अगदी लेटेस्ट, इकडे बुटीक मध्ये बर्याच मुली छान छान आयडिया देतात, मस्त होईल आपल कलेक्शन, मला असं वाटतं हे कधीच बुटिक सुरू होईल",.. सविता 
" तुझे डिझाईन छान असतात, अरे वाह, खूप मेहनत घेते आहेस तू ",... रूपा 
" या आधी पण घरी मी जे ब्लाऊज आणि ड्रेस शिवले होते ते पण आपण डिस्प्लेला  ठेवू शकतो आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी क्लायंट आहेत त्या करतील ॲडवटाईज",.. सविता 
" तुझी बरीच तयारी झालेली दिसते आहे सविता",... रूपा 
" हो रूपा मी पूर्ण तयार आहे, हे माझ ड्रीम प्रोजेक्ट आहे, काहीतरी करून दाखवायच आहे ",.. सविता 
" असेच लोक आवडतात मला, ज्याना काहीतरी करायची आवड आहे, नक्की मजा येईल काम करायला, उद्या भेटूया मग",.. रूपा 
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बुटीक संपल्यानंतर सविता  रूपा नवीन शॉप बघायला गेले, बरेच शॉप बघितले, एक खूप आवडलं, 
" हा शॉप फिक्स करूया का?",... सविता 
"हो चालेल छान आहे मेन रोडवर",... रुपाने सविताने पसंती दाखवली 
" किती आहे भाडं? सगळी माहिती नीट सांगा",... रूपा 
"हो ते आम्ही सगळ सचिन साहेबांशी बोलतो" ,.... ते लोक गेले, 
"रूपा मी नाराज आहे, तुम्ही लोक असे काय करता आहात? मला किती पैसे लागतात ते कधी सांगणार आहात? ",.. सविता 
" सविता किती घाबरले मी, तू पैशाचे टेंशन घेऊ नको",.. रूपा 
" ठिक आधी आम्ही पैसे वापरतो आणि नंतर जसा जसा फायदा होत जाईल त्यातून आम्ही तुझे जेवढे झाले ते पैसे काढुन घेऊ, आधी काम सुरू होण महत्वाच",.. रूपा 
" मला माहिती आहे तुम्ही लोकं घेणार नाहीत माझ्या कडून पैसे, पण अस नका करू , जर मला कळालं किती पैसे द्यायचे तर मी माझा शेअर देऊन टाकीन",.. सविता 
" ठीक आहे मी सांगते तुला किती पैसे लागतात ते, पैशाची काळजी करू नको, तू किती हुशार आहेस तुझी हुशारीवर बुटीक काढतोय, नाहीतर मला काय येत ",.. रूपा 
" रुपा प्लीज अस बोलू नकोस, मला खूप सपोर्ट आहे तुझा",... सविता 
दोघी खूप आनंदात होत्या, रुपा गेली घरी, सविता ही निघाली, 
चला एका छान कामाला सुरुवात होते आहे, आई बाबा, रमेश दादा, सचिन सर, रुपा सगळे किती मदत करतात मला, नेहमी प्रोत्साहन देतात , मी पण बुटिक च काम अगदी मनापासून करेन, एक हाती सांभाळून दाखवू आपण त्यांना बुटीक 
सविता घरी आली तिने आई-बाबांना शॉप बघून आल्याचं सांगितलं
" किती पैसे लागत आहे ते सांग सविता, आपण आपला वाटा देवून टाकू ",.. बाबा 
" हो बाबा पण त्या रूपा मॅडम सांगत नाहीये किती पैसे लागतात ते, आपण तयारी ठेवू",.. सविता 
हो.. 
"तुला घर घ्यायचं होत त्याच काय करू या? ",.. बाबा 
"घर कशाला आता मला, हे घर भाड्याने घेतलं आहे ना " ,.... सविता 
" तेव्हाच रमेश दादा आणि मी म्हणत होतो की डायरेक्ट स्वतःचं घर घेऊन टाकु, पण त्या गोष्टीला वेळ लागला असता, म्हणून थांबलो, आता घर बघायला काही हरकत नाही, म्हणजे सहा महिन्यानंतर घर मिळून जाईल",.. बाबा 
" बाबा पण मी म्हणते घर घ्यायची घाई करायला कशाला हवी आहे",... सविता 
" असू दे ग इकडे तिकडे राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहिलेला बरं ",... बाबा 
" बरोबर बोलता आहेत बाबा, स्वतः च घर हव",... आई 
"बघू आपण नंतर",.. सविता 
सविता च्या मनात होत जर सागर शी लग्न झाल तर कुठे लागणार आहे मला स्वतः च घर
मनू आजी बाबां बरोबर खूप छान रमली होती, सुलभाताई आनंदी वाटत होत्या
दुसऱ्या दिवशी सविता वरून बुटीक ला गेली आहे
सागर चा फोन आला,..." सविता सतीश चे वकील भेटायला बोलवत आहेत ते बोलता आहेत आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायची का? काय करूया? मी येतो भेटायला, आपण भेटू मग ठरवु तो पर्यंत तू  विचार करून ठेव, म्हणजे मग लवकर घटस्फोटाचा डिसिजन होईल",.. 
"हो चालेल आपण ठरवू तस",... सविता 
दुपारी नंतर सागर भेटायला आला, बुटीक बाहेर सतीश उभा होता सविताशी बोलायला आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून घेऊ म्हणून सांगणार होता तो 
सविता बाहेर आली, तीच सतीश कडे लक्ष नव्हत, सागर ला बघून ती छान हसत होती, सागर ही खुश होता, चालता चालता सविता चा पाय अडखळला, सागर ने पुढे होवुन तिला आधार दिला, सविता सागर बरोबर निघून गेली, 
सतीश ला त्या दोघांना अस एकत्र बघून खूप राग आला, अगदी काय करु काय नको अस झाल त्याला, नक्की काय आहे या दोघांमध्ये, केवढ ते कौतुक सुरू आहे 
सतीश ही त्या दोघांच्या मागे गुपचूप येत होता 
दोघे कॉफीशॉप मध्ये गेले
सागर ने खुर्ची ओढून सविता ला व्यवस्थित खुर्चीवर बसवल, सविता खुश होती, 
 सागर सविता कडे बघत होता,... "अजूनही तू बांगड्या वापरायला काढलेल्या नाहीत वाटत, म्हणजे माझी काही तशी बळजबरी नाही, पण तू खूप घाबरते सगळ्या जगाला, स्वतःचा विचार कर, तुला जे हव आहे ते कर, निर्णय घे आता तरी",.. 
"हो मी करते आहे प्रयत्न, घरी आई बाबा आलेले आहेत माझ्याकडे सासूबाईंना माहिती आहे पण आई बाबांना अजून काहीच सांगितलं नाही मनु शी ही बोलणं झालं नाही हळूहळू बोलते आहे मी सगळ्यांशी, मग वापरीत बांगड्या",.. सविता 
" म्हणजे तुझा होकार आहे का सविता",... सागर 
 सविता काही बोलली नाही ती खाली बघत होती 
" सविता एकदा तरी सांग, मला बर वाटेल तू नीट सांगितल सगळ तर ",... सागर 
" मला ही तुझ्या सोबत राहायचं आहे सागर, पण माझी हिम्मत होत नाही",.. सविता 
" तुला डेरिंग  करावच लागेल",.. सागर 
दोघ बोलत असतांना सतीश आत आला,  आधीच तो चिडलेला होता, मुद्दाम त्यांच्या टेबल वर येवुन बसला, तशी सविता दचकली 
"Excuse me हा काय प्रकार आहे?, ही काय पध्दत आहे वागण्याची? काही मॅनर्स आहेत की नाही? उठा बर आधी तुम्ही इथून",... सागर 
मी सतीश सविता चा नवरा
"हो मग? ओळखल मी तुम्हाला? पण विचारून वैगरे बसायची काही पद्धत? आम्हाला नाही आवडल तुम्ही इथे बसलेल",... सागर 
" आम्हाला म्हणजे काय? इथे मी आणि सविता नवरा बायको आहोत ",.. सतीश 
" किती दिवस अजून? आणि कसा नवरा आहात तुम्ही? बायको ला नीट वागवलं नाही आणि इथे बर हॉटेल मध्ये तुम्हाला नात आठवल",.. सागर 
" मला तुमच्याशी बोलायच नाही सागर, सविता काय करते आहेस तू इथे?, यांना अस येवून का भेटते आहेस, ",.. सतीश 
" याचा तुमच्याशी काय संबध सतीश तुम्ही जा बर इथून ",.. सागर 
" माझी बायको आहे ती, मी बोलतो आहे ना तिच्याशी, तुम्ही मध्ये पडू नका ",.. सतीश 
"मी बोलवलं आहे सविता ला इथे, मला भेटायला आली आहे ती",... सागर 
" मला तुमच्याशी बोलायच नाही सागर, मी  आधी सांगितल आहे तुम्हाला, मी सविता शी बोलतो आहे",... सतीश 
" सविता काय आहे हे",.. सतीश 
" तुम्ही आधी हळू आवाजात बोला, नाही तर निघा इथून, तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही, आपला काहीही संबंध नाही" ,.. सविता 
" इथे काय करता आहात तुम्ही? , हा कोण आहे ",... सतीश 
" हा सागर आहे माझा वकील आणि माझा बालमित्र, मी आणि सागर आम्ही खूप पूर्वी पासून ओळखतो एकमेकांना ",... सविता 
" ते माहिती आहे, पण मला अस बोलणारा हा कोण आहे एवढा? ",.. सतीश 
"म्हणजे आम्ही कॉफी प्यायला आलो आहोत, मी कुठे ही जाईन आता तुमचा काय संबंध सतीश",.. सविता 
"आपण अजून नवरा बायको आहोत",... सतीश 
"मग तुम्हाला विचारून यायला हव होत का मी इथे, असे नवर्याचे कोणते कर्तव्य केले तुम्ही, किती दिवस नवरा म्हणून मला दबावात ठेवाल",... सविता 
"अजून डिवोर्स झाला नाही आपला",.. सतीश 
"होईल मग लवकर तुम्हाला आउट ऑफ़ कोर्ट सेटलमेंट हवी आहे ना",... सविता
"मी विचार करेन, आता मी तुला सहजासहजी घटस्फोट देणार नाही",.... सतीश 
"ठीक आहे काही हरकत नाही माझी",... सविता 
"भेटू मग कोर्टात",.. सतीश 
"तुमच झाल असेल बोलण तर निघा आता",....सागर 
"हे मला सांगणारे तुम्ही कोण, सविता हे महागात पडेल सगळ",... सतीश 
सतीश गेला सविता सागर कडे बघत होती 
"हे अस होणार थोड फार एवढा पझेसीव व्हायची गरज नाही त्या सतीश ला तो अजून तुझ्यावर कसा काय हक्क दाखवतो ",.. सागर 
"मला फार भीती वाटते भांडणाची",.. सविता 
"तू कश्याला घाबरते मी आहे ना, अशी जिरवीन त्या सतीश ची फक्त तू घाबरू नकोस, याचा फायदा घेतो तो सतीश, अस तर नाही ना तुला त्याच्या कडे वापस जायच आहे मी बळजबरी तुझ्या मागे आहे ",.. सागर 
"नाही सागर मला आता काहीही झाल तरी सतीश शी कोणतेही संबध नको आहेत, तू भांडू शकतो त्याच्याशी, मला काहीही वाटत नाही त्याच्या बदल, खूप चान्स दिले मी त्याला आता बास, मला तुझ्या सोबत रहायच आहे आता ",... 
नकळत सविता ने सागर ला हो बोलाल होत, सागर खूप खुश होता, तो छान हसत होता, सविता ला ते समजल ती लाजली होती 
"मला नाही वाटत आता सतीश आउट ऑफ़ कोर्ट सेटलमेंट ला तयार होईल",.. सविता 
" होवू दे आता जे व्हायचं आहे ते, मी नाही घाबरत, पोकळ आहे त्या सतीश च्या धमक्या ",.. सागर 
" मग आता पुढे काय ",.. सविता 
" बघु आता त्यांचा वकील काय म्हणतो ते, जर ते रेडी असतिल सेटलमेंट साठी तर ",.. सागर 
" करून टाकू मग सही मला अजिबात इच्छा नाही सतीश ला सारख भेटायची ",.. सविता 
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा