(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात डेरे गावाकडे येताना वाटेत एक अनपेक्षित संकट चालून आले.त्यातून सुटत असताना दोन गरीब जिवाभावाचे सहकारी मात्र भेटले.चिमणी आणि सुभाण्या. आता नाईकांची योजना काय असेल?पुढे काय होईल?
मसणवट्याच्या बाजूने सगळे झपाझप पाय टाकत गावाच्या दिशेने निघाले.रात्री अनेकदा प्रवास केला असल्याने रूपा,मोहना आणि सुंदराला त्याचे काही वाटले नाही.इतक्यात चिमणी ओरडली,"आयोव भूत!"
तितक्यात धोंडीबाने तिच्या तोंडावर हात ठेवला,"वरडू नगस,हित आपल्याला कुणी बगल."
सुभाण्याने घाबरत बोट दाखवले,"तिकडं बग,खविस दिसतोय.आता त्यो आपल्याला खाणार."
तेवढ्यात झाडावरून चारपाच जण उतरले.आता मात्र घाबरून सखाराम आणि अब्दूलसुद्धा घाबरले.सखाराम तोंडात,"राम राम."
असा जप करू लागला.मोहना मात्र शांत होती.तिने लगेच तलवार काढली,"भुत कसली,चोर आस्त्याल एकेकाला चांगली अद्दल घडवू."
सुभाण्याने घाबरत बोट दाखवले,"तिकडं बग,खविस दिसतोय.आता त्यो आपल्याला खाणार."
तेवढ्यात झाडावरून चारपाच जण उतरले.आता मात्र घाबरून सखाराम आणि अब्दूलसुद्धा घाबरले.सखाराम तोंडात,"राम राम."
असा जप करू लागला.मोहना मात्र शांत होती.तिने लगेच तलवार काढली,"भुत कसली,चोर आस्त्याल एकेकाला चांगली अद्दल घडवू."
तेवढ्यात त्यातील एक भूत हसले,"उठसुठ तलवार उपसायची नसती.कधी कळणार ह्या पोरीला."
त्याबरोबर सगळे हसत सुटले.त्यांना हसताना पाहून चिमणी म्हणाली,"सुभाण्या पळ,भुतांनी ह्यांना धरलं."
तितक्यात मुखवटा उतरवून नाईक म्हणाले,"थांब,कुठे पळतीस?"
नाईकांनी सगळ्यांना मागे यायला खुणावले.सगळेजण झपाझप बाहेर पडले.
तितक्यात मुखवटा उतरवून नाईक म्हणाले,"थांब,कुठे पळतीस?"
नाईकांनी सगळ्यांना मागे यायला खुणावले.सगळेजण झपाझप बाहेर पडले.
दूरवर मोकळ्या जागेवर गेल्यावर नाईक थांबले.त्यांनी ईशारा करताच सगळे थांबले.नाईक बोलू लागले,"सुंदराबाई,तुम्ही हिंमत ठेवून हितवर आलात.स्वराज्यावर श्रद्धा ठेवून.आता पुढची कामगिरी कठीण आहे."
मोहना म्हणाली,"नाईक,तसही गावकुसाबाहेर आश्रित जिणे जगणारी माणसं आम्ही.स्वराज्याची सेवा केली तर ह्या आयुष्यच सोन होईल."
तसे नाईक बोलले,"अशी माणसं असली तर कोणतीही कामगिरी कठीण नाही."
सुंदरा म्हणाली,"नाईक तुम्ही बिनघोर रहा.आम्ही कामगिरी पूर्ण करूच."
नाईक पुढे बोलू लागले,"आता तुम्ही कुटुंब म्हणून जावळीत जायच.जावळीच्या वाड्याच्या आसपास रहायचे.तिथे वाड्यात काम मिळवता आले तर पहा. त्यानंतर वाड्यातील चोर वाटा बघून ठेवा.पुढे आम्ही निरोप पोहोचवू तशी काम करा."
धोंडिबा म्हणाला,"नाईक,आमी कामगिरी फत्ते करू."
नाईक म्हणाले,"करावीच लागलं,राज स्वतः मोहिमेवर यायचं हायेत.चूक होऊन चालणार नाही.आता पुन्हा भेट मोहिमेनंतर.बोला हरहर....महादेव."
नाईकांनी सगळी कामगिरी उलगडून सांगितली आणि त्या अंधाराबरोबर नाईक निघून गेले.आता धोंडिबा आणि पांडूने सूत्रे हातात घ्यायची वेळ आली होती.धोंडिबा म्हणाला,"आता हितुन पूड सावध रहायलं होव.आपुन जावळीच्या जवळ जातूय.आपल्यावर नजर असणार."
तेवढ्यात अब्दुल म्हणाला,"ओ सब ठीक हाये,पर भूक लगी है."
तशी सुंदरा म्हणाली,"रूपा चल दगड मांड, चूल बनव.आता भाकऱ्या थापू."
सुंदरा,रूपा आणि मोहनाने स्वयंपाक बनवला.खाऊन सगळे जरा पडले.सकाळी उन्हे वर आली तशी सुंदरा जागी झाली.तिने सगळ्यांना उठवले.सुंदरा मोहनाला म्हणाली,"उठा लवकर.आता घाई करा.आज सूर्य मावळेपर्यंत जावळी गाठायला पाहिजे."
धोंडिबा म्हणाला,"व्हय,आता लवकर निघालो म्हणजे पोहोचू."डेरे गावाच्या बाहेरूनच सगळेजण निघाले.जावळीच्या किर्रर्र जंगलातून चालताना भीती वाटत होती.जनावरे आणि काळोख यांचे भय अंगावर आणणारे होते.तरीही हे सर्वजण झपाटले होते स्वराज्याच्या स्वप्नाने. डोंगर वरखाली करताना चांगली दमछाक होत होती.थकवा जाणवत होता.
तेवढ्यात पांडू म्हणाला,"आता ही टेकडी पार केली की जावळी समोर दिसलं."तसे सगळे अनामिक ओढीने चालू लागले.
समोर जावळी दिसू लागले.आजवर झालेला प्रवास सुंदराच्या डोळ्यासमोर येत होता.लहानगी हौसा तमाशात सुंदराबाई झाली.तरीही दौलत पाटलांनी तिचा स्वीकार केला.आयुष्यात प्रेमाचे सारे रंग आले.त्यानंतर खविसखान नावाच्या सैतानांच्या कृत्यांनी हौसा परत सुंदरा बनली.अनेक मुलींना जपलं वाढवलं.मोहनाची तर ती आईच होती.महादेवच्या वाट्याच दूध तिने मोहनाला पाजले होते.आज मात्र ही कामगिरी तिला परत हौसाकडे घेऊन आली होती.जावळीकडे जाताना मन विचारांच्या फेऱ्यात अडकले होते.
इतक्यात धोंडिबा म्हणाला,"आता सगळ्यांनी लक्षात ठिवा,आपली नवी नाव.आपुन लव्हार आहोत."
मोहना हसली,"व्हय,आन आता एकदम सावध रहायचं."
पांडू म्हणाला,"चिमणे तू आन मोहना वाड्यात काम मिळवा.रूपा आन मी वाड्यासमोर मोक्याच्या जागी हत्यार ईकायला बसू."
सुंदरा म्हणाली,"व्हय,चला बिगिबिगी."
सगळे वेशीजवळ पोहोचताच तिथला कोतवाल ओरडला,"अय थांबा र,कुठून आलाईस?हिकडं कुणीकड?"
तशी सुंदरा पुढे झाली,"सरकार,लव्हार हाये आमी.गावोगाव फिरून हत्यार इकतोय. आता हिकडं पोट भरायला आलोय."थोडी जुजबी चौकशी करून कोतवालाने त्यांना आत सोडले.
धोंडीबाने गावात फिरस्ते उतरत तिकडे एक मोकळी जागा बघितली.आता तिथे रहायची व्यवस्था करायला पाहिजे होती.मांडामांड आणि पाल बांधायला सुरुवात करताना आजूबाजूला निरीक्षण चालू होतेच.एवढ्यात एक वाटसरू चालताना म्हणाला,"गावात तमाशा आलाय.नवी बाय लई झ्याक नाचती.तुळसा म्हणून नाव हाये बघ."ते ऐकून मोहना हसली.बकुळामावशी फड घेऊन जावळीला पोहोचली होती.
तितक्यात रूपाने शेजारच्या पालवरच्या बाईला विचारले,"आव ताई,हिकडं पाणी आणायला कूट जायच?"
ती बाई म्हणाली,"त्या अंगाला हाये बघा हिर."
आता धोंडिबा आणि मोहनाने वाड्यावर काम मिळवायचे ठरवले.सगळी मांडामांड झाली.सगळे जेवायला बसले.सुंदरा बोलू लागली,"धोंडिबा आन मोहना तुमी वाड्यात काम मिळत का बगा."
धोंडिबा म्हणाला,"व्हय,त्या शेजारच्या पालातला सदू पागेत काम करतोय.घोड्याला खरारा करायच.त्याला पकडतो उद्या."
पांडू बोलू लागला,"ईळ, खुरपी टुरपी घिऊन आमी बसतो दोघ."
सुभाण्या आन अब्दुल तुमी एखाद्या सरदारकड काम बघा."असे सगळे ठरवत जेवत होते.उद्यापासून खऱ्या अर्थाने कामगिरी सुरू होणार होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडीबाने शेजारच्या सदुला गाठलं,"रामराम पावन.कस काय हाये."सदू म्हणाला,"बरच म्हणायच.पोट भरल त्ये गाव बरं."
धोंडिबा म्हणाला," व्हय ना.आता आमचं खटलं एवढं मोठं.सर्वांचं न्हाय भागत लव्हार कामात."
तस सदू म्हणाला,"एक काम हाये करणार का?"
धोंडिबा बोलला,"आवो कोणतंबी असू द्या.करणार काम."
सदू म्हणाला,"मंग न्याहारी करून घ्या.चला माझ्यासंग."
चिमणी आणि मोहना सकाळीच आवरून बाहेर पडल्या.वाड्यात काम मिळवायची काहीतरी युक्ती शोधायला पाहिजे होती.असा विचार करत असताना मोहनाने पाहिले एक छोटं बाळ घोड्याच्या पायाखाली येत आहे.मोहनाने झटकन बाळाला वाचवले.बाळाची आई पळत आली.
मोहना म्हणाली,"आवो आक्का बाळ आता घोड्याच्या पायाखाली आलं असत म्हंजी."
ती बाई म्हणाली,"खुप उपकार झाले.पण तू कोण गावात नवीन आहेस का?"
मोहना म्हणाली,"व्हय,म्या तारी आन ही चिमणी.पोट भराय आलोय जी.बघू काय काम घावत का?"
तेवढ्यात ती बाई म्हणाली,"तारे,तू असे कर त्या तिकडं सरदार वाड्यावर आम्ही पुजारी आहोत.माझ्या हाताखाली मला माणसे लागतात. तू दुपारी ये.तोवर ह्यांना विचारते.वाड्यावर येताना गोदावरीबाई कुळकर्णी असे नाव सांग."
हिकडे रूपा आणि पांडूने एक वेशीसमोरची जागा हेरली.तिकडे पहारेकऱ्याला पटवून दुकान मांडायला जागा मिळवली.आता येणाऱ्या -जाणाऱ्यावर नजर ठेवणे शक्य होते.सगळ्या हालचाली कळू शकत होत्या. अब्दुल आणि सखारामसुद्धा बाहेर पडले होते.काहीही करून इथे काम मिळायला हवेच.इकडे सुंदरा सगळे आवरून गुपचुप बाहेर पडली.बकुळामावशी आणि बजाकाका दोघांना भेटायला हवे.फडाजवळ आल्यावर ती लांबूनच पहात होती.इतक्यात तिला आजूबाजूला काही नजर ठेवणारी माणसे दिसली.सुंदरा गुपचूप परत फिरली.
इकडे अब्दुल आणि सखाराम सगळीकडे फिरत होते.तेवढ्यात सखारामला एक वाडा दिसला.तिथे चौकशी केल्यावर तो एका मतब्बर सावकाराचा वाडा असल्याचे समजले.सखारामने तिथल्या एका शिपायाला विश्वासात घेतले,"पावन,इकडं हाताला काय काम मिळलं का?तिकडं दुष्काळातन आलूया."
तो शिपाई बोलला,"ह्ये बघ म्या बोलून बघतो.आसल काही काम तर मिळलं.सांजच्या पारी ये.मंग सांगतो."
सगळेजण संध्याकाळी वस्तीवर परत आले.आपापल्या कामाबद्दल बोलू लागले.वाड्यात शिरायचे प्रयत्न यशस्वी होत होते.इतक्यात नाईकांच्या माणसाने निरोप दिला.काही हत्यारे पोहचवायची होती.
हत्यारे घेऊन उद्या माणूस येईल असा निरोप होता.सुंदरा म्हणाली,"उद्या मी म्हातारीच सोंग घेऊन जाते.म्हणजे हत्यारे देताना कोणाला संशय येणार नाही."
सर्वांनी उद्या आपापली कामगिरी सुरू करायचे आडाखे बांधले.आता मोहिमेचा खरा थरार सुरू होणार होता.
काय होईल पुढे?मोहीम फत्ते होईल का?सर्वांना कामे मिळतील का?
वाचत रहा.मी मानिनी.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा