मी तुमच्यासाठी परकी भाग 4
©️®️शिल्पा सुतार
सकाळी प्रकाश दादा आला. सगळे हॉल मधे बसले होते. श्रुती अपराधी असल्या प्रमाणे खाली मान घालून उभी होती. माझ काय चुकलं ती अजूनही विचार करत होती.
" हिला घेवून जा. आणि जमलं तर चार गोष्टी शिकवा. " रमाताई म्हणाल्या.
" श्रुती हुशार चांगली मुलगी आहे. काय झालं आहे?" प्रकाशने विचारल.
"तिला विचारा हिला घरी कोणी आलेलं नको असत. तोंड पाडुन आत बसुन असते." सचिन म्हणाला.
श्रुती नाही मधे मान हलवत होती.
" तुम्ही एकीला दोष देताय हे कितपत योग्य आहे. " प्रकाश दादा म्हणाला.
" तुम्हाला काय म्हणायचं आहे माझी आई बहिणी दोषी आहेत." सचिन ओरडला.
"दादा नको ना." श्रुती म्हणाली. ती सामान घेऊन बाहेर आली. सचिनकडे बघत होती. प्रिया, प्राची मुद्दाम सचिनला समजावत होत्या.
"छान केल ताई यांचे कान भरले. माझा संसार मोडला. आता यांना समजावायचं नाटकं तरी करू नका. मी कस वागले तुम्हाला ही माहिती आहे. जमलं तर यापुढे कोणाचं अस नुकसान करू नका. चांगल्या लोकांना त्रास देवू नका. सचिन तुम्ही असे निघाल अस वाटल नव्हतं." श्रुती म्हणाली. ती माहेरी निघून गेली.
ती घरी आली. सगळे काळजीत होते." काय झालं श्रुती? "
ती सगळं सांगत होती. आई बहिणीला माहिती होत अशी परिस्थिती. लोक कसे वागतात.
" त्या दोघी दोन दिवस आल्या माझा संसार मोडला. सचिन ही कसे वागतात. त्यांच खर मानतात. ते मला समजून घेत नाही. मी काही केल नाही. "श्रुती म्हणाली.
" आमच्या लग्नाला इतके वर्ष झाले तरी ते सुरू आहे. तुझं आत्ताच लग्न झालं आहे असंच असतं." नीता म्हणाली.
"हे कधी नीट होईल? मला त्या घरात कोणी आपलं समजत नाही. सासूबाई, नणंद सचिन समोर वेगळं वागतात. इतर वेळी वेगळे यांना सुद्धा घरचेच प्रिय वाटतात मग मी काय तिथे फक्त कामापुरती आहे का? यांच्या कुठल्याच गोष्टीवर माझा अधिकार नाही. ते ही माझ्यावर प्रेम करत नाही." श्रुती रडत होती.
" समजेल त्यांना हळूहळू. "
" कधी? आई मला तर वाटत नाही ते आता मला घ्यायला येतील. "
"त्यांची आई आणि बहीण म्हणाले तर येतील. " नीता म्हणाली.
" मग मला कायमच त्या सगळ्यांसमोर दबून राहावे लागेल का? " श्रुती म्हणाली.
" त्यासाठी त्यांनी अस केल. तुला एकदा धाक दाखवून दिला. आम्ही काय करू शकतो समजल ना. अस करतात या मुली. " नीता म्हणाली.
आई आत कामात होती. नीता, श्रुती रूम मधे बसल्या होत्या.
" श्रुती तुला आयडिया करावी लागेल तुलाही सचिन समोर ते सगळ्यांशी नीट राहावं लागेल आणि इतर वेळी आपला काम करायचं. "नीता म्हणाली.
" असं चांगलं आहे का ताई? "
"असंच असतं बाई. तरच संसार टीकतो. एवढ भोळी नको राहू." नीता म्हणाली.
श्रुतीला माहेरी पाठवल्या मुळे बहिणींना काम पडत होतं. दुसऱ्या दिवशी बाहेरून जेवण घेतलं. घर अतिशय घाण होतं. कोणी काही करत नव्हतं.
सचिन ऑफिसहून आला. मुलांचे खेळणे बाहेर पडले होते. स्वयंपाक तयार नव्हता.
रमाताई, प्रीती, प्रिया किचन मध्ये होत्या.
" ही श्रुती कशाला माहेरी गेली समजत नाही. चांगली काम करत होती. चार पदार्थ खायला मिळत होते. तशी तिच्या हाताला चव आहे. वागायला ही गरीब होती." प्रीती म्हणाली.
" तुम्ही कशाला त्या सचिनला एवढं सांगायला गेल्या." रमाताई ओरडल्या.
"आम्हाला वाटलं तो तिला फक्त ओरडेल. ती थोडी घाबरेल. हा तिला तिला माहेरी पाठवून देईल असं वाटलं नव्हतं. आई तुझ्याकडून नंतर काम होईल का?" प्रिया म्हणाली.
"नाही ना . तुम्ही जाताना सचिनला सांगा की तिला घेऊन ये समजावून वगैरे."
सचिनने सगळं ऐकलं होतं. तो पटकन त्याच्या रूममध्ये गेला आवरून आला. काही म्हणाला नाही. बापरे आई, ताई अस वागतात. श्रुती साधी आहे. सगळे जेवायला बसले.
"आम्ही निघतो आता. सुट्टी संपली. दोन दिवस आलो तर हे अस. श्रुती काही नीट वागली नाही. तिला आमचं काम होत नाही. एक काम कर सचिन तिला घरी बोलवून घे. उगीच आम्ही आलो अस झाल हे नको." प्रीती म्हणाली.
" हो सचिन." प्रिया ही म्हणाली.
" ती तुमच्याशी नीट वागत नाही म्हणून तिला माहेरी पाठवून दिलं. आता तुम्ही राह आनंदात. आई तुझ्या हातची पुरणपोळी कर. " सचिन म्हणाला.
" सूनबाई घरी नाही. मला एवढा स्वयंपाक जमणारं नाही. " रमाताई म्हणाल्या.
" नाहीतरी तिला काही येत नाही. प्रिया, प्रीती ताई तुम्ही करा. " सचिनला वाटलं नव्हतं त्या अस करतील.
"नाही घरून फोन येत आहे. आम्हाला जावं लागेल."
दोघी जणी गेल्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा