Login

मी तुमच्यासाठी परकी भाग 5 अंतिम

कितीही प्रयत्न केले तरी मी तुमच्यासाठी परकी आहे
मी तुमच्यासाठी परकी भाग 5 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

सासूबाईंना आता काम होत नव्हतं. घरात करमत नव्हतं. सचिनने श्रुतीला फोन करायचा प्रयत्न केला. तिने फोन उचलला नाही. त्याने सासुरवाडीला फोन लावला.
"श्रुतीला घ्यायला येतो."

तिने नाही सांगून दिलं. "माझं अजून इकडचं ट्रेनिंग झालं नाही. मला काहीच येत नव्हतं. आई मला काम शिकवते आहे. कस वागायचं ते ही ट्रेनिंग सुरू आहे. क्लास लावला आहे." श्रुती म्हणाली.

त्याला समजल तिला राग आला आहे. येणारच या सगळया एका बाजूला झाल्या असतिल. त्यांनी श्रुतीला ठरवून त्रास दिला धाक दाखवला. मी पण त्यांच ऐकून तिला माहेरी पाठवलं.

श्रुती...

"माझ्याशी काही बोलू नका. मला एवढ्यात तिकडे यायला जमणार नाही."

"तुला माहिती ना याचे परिणाम काय होतील." त्याने रागाने बोलून बघितलं.

" काय करायच ते करा. मी घाबरत नाही. मला सारखी धमकी देणं बंद करा." श्रुती रागात म्हणाली. सचिनने फोन ठेवला.

पंधरा दिवसांनी हिम्मत करून तो तिला घ्यायला आला. श्रुती छान दिसत होती. पटापट आटपत होती. आई बाबांनी सांगितल्यावर तिने पोहे केले. घर छान आवरलेलं होत. नाश्ता झाला. सचिन श्रुतीशी बोलायला आत आला.

" श्रुती घरी चल. "

" मी येणार नाही. माझी चूक नसतांना मला अर्धा रात्री बाहेर काढलं. मला तिकडे सेफ वाटत नाही. " ती रागाने म्हणाली.

" माझी चूक झाली. "सचिन म्हणाला.

" दरवर्षी पाहुणे येतील. कशावरून अस परत होणार नाही. कोणाच किती हि करा कमीच असत. आता मला समजल ते लोक कसे आहेत." श्रुती म्हणाली.

" अस होणार नाही. मी नीट वागेन. घरी मदत करेन. तुला समजून घेईल. " सचिन म्हणाला.

" कोणी कस ही माझ्याशी वागू शकत नाही. मी नीट वागत होते. तरी तुम्ही माझ ऐकून घेतल नाही. काहीही झाल की मीच दोषी हे योग्य आहे का? "तिने विचारल.

" हो ते मला समजल. यापुढे मी घाईने निर्णय घेणार नाही."

"हिला दोन गोष्टी शिकवा म्हणजे काय? सासुबाई नेहमी अस बोलतात. मला काही येत नाही का? " श्रुती चिडली होती.

" मी आईला सांगतो. "

" तुम्ही माझ्या समोर वेगळं इतर वेळी वेगळं वागतात. तुमच्या घरचे समोर असले की परत तेच सुरू होत. "

" अस होणार नाही मी म्हणालो ना. " सचिन म्हणाला.

" मी जॉब शोधते. मी माझी बिझी राहील. "

" घरच कस होईल?"

" ज्याने त्याने आपआपले काम करा. नाहीतरी तिकडे घरी सगळे माझ्यापेक्षा हुशार आहेत. नुसते शिकवत असतात. एवढ येत तर तुमच तुम्ही करा. तुम्हाला खर्चायला पैसे मागितले की देत नाही. तेच फालतु खर्च हजारोने होतो. " श्रुती डायरेक्ट म्हणाली.

त्याला आठवलं ती काही मागत असली की मी नाही सांगायचो. तेच बाकीच्या घरच्यांसाठी खूप खर्च होत होता. " हो तुला हव ते कर. "

घरच्यांशी बोलून ती आत तयारीला गेली. "नीता ताई हे घ्यायला आले. "

" जा मग पण लक्षात ठेव जशास तसे. "

ती सासरी आली. आल्यावर तिने मनात काही ठेवल नाही. ती रमाताई सोबत मोकळ बोलत होती. सचिन बघत होता त्याला बर वाटलं.

सकाळी तिने सचिनसाठी डबा केला. सासुबाई, सासरे चहा नाश्ता नीट केला. सचिन ऑफिसला गेला.

रमा ताई आवाज देत होत्या. " झाल का काम?"

हो.

" ये इकडे बस. माझ्याशी बोल."

" मी नोकरी शोधते आहे. मला वेळ नाही. " ती आत बसली.

रमाताईंनी टीव्ही बघितला. पेपर वाचला.
" मला करमत नाही. श्रुती ही बोलत नाही. "

" तुमच्या मुलींशी फोनवर बोला. " तिने आतून सांगितलं.

संध्याकाळी सचिन आला. तिचं आवरलं होत. ती अभ्यास करत होती. एक दोन ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू होता.

" श्रुती बोलत नाही." रमा ताई म्हणाल्या.

" आई काय अस. शांत हो. तिला तूच तो मार्ग तिला दाखवला ना. सुरुवातीला ती तुझ्यात आधार प्रेम शोधत होती. तेव्हा तु तिला झिडकारले. आता ती बिझी आहे. करू दे तीच तिला." सचिन म्हणाला.

" श्रुतीला नोकरी लागली तर कस करू या."

" आई तू आधी सगळं करत होती ना. आता नुसत लक्ष द्यायचं. आपण कामाला बाई लावून घेवू."

श्रुतीला नोकरी लागली. ती आता सकाळी स्वयंपाक करून जात होती. संध्याकाळी सात वाजता येत होती. रात्रीसाठी बाई लावली होती. ती बर्‍यापैकी अलिप्त झाली होती. तेवढ्या पुरती प्रेमाने बोलत होती. कर्तव्य करत होती.

सुट्टीत परत दोघी नणंद आल्या. यावेळी तिने इंट्रेस्ट दाखवला नाही. कश्या आहेत विचारलं ही नाही. यांच्याशी जास्त बोललं तर या नुकसान करतात तिला माहिती होतं. तिने बाईला काम सांगून दिलं. ती ऑफिस मधे आली.

"सचिन अरे श्रुती आमच्याशी विशेष बोलत नाही."

"पुरे ना प्रिया, प्रीती ताई. मागच्या वेळी ती नीट वागत होती. तुम्ही माझे कान भरले. ती इकडे सासरी परत येत नव्हती. कसतरी हे नीट झालं. आता तुम्ही आठ दिवस आल्या तर नीट रहा तुमच्या घरी जा. आम्हाला त्रास देवू नका. मला श्रुती बद्दल काही सांगू नका. " सचिन म्हणाला.

दोघी गप्प झाल्या.

रमाताई बाहेर बसल्या होत्या. बाजूच्या मावशी घरात डोकावत होत्या." जेवण झालं का? "

" हो पोरी आल्या आहेत. "

" श्रुती आवरते वाटत. "

रमाताईंनी तोंड वाकड केल." चालू असत तीच रडत कडत ती ना मोकळ बोलते, ना आम्हाला विचारते. "

" बापरे अस बर चालत?"

"काय करणार सचिन ही तिला काही बोलत नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची. तिला नोकरी लागली. तीच तीच रहाते. भारी भरते. "

"आई आत ये. त्या मावशींना काय सांगते आहेस." सचिन ओरडला.

"मी बरोबर बोलते आहे." रमाताई म्हणाल्या.

" कोणामुळे झाल हे? आपल्यामुळे ना. श्रुतीने आधी प्रेम द्यायचा प्रयत्न केला होता. तेव्हा तुम्हाला हक्क गाजवायचा होता. आता घ्या. जे आहे ते ठीक आहे. " सचिन ओरडला.

"अहो आत या. उद्या ऑफिस आहे झोपा आता." श्रुतीने आवाज दिला. सचिन आत गेला. दोघ झोपले.

बाहेर रमाताई, प्रिया, प्रीती एकमेकांकडे बघत होत्या.

" हे अस सुरू आहे. सून काही चांगली मिळाली नाही. तिने सचिनला तिच्या बाजूने वळवलं. " रमाताई डोळे पुसत होत्या.

" छान सुरु आहे. हिचा नवरा बरा एका हाकेत आत गेला. आपले नवरे ऐकत नाहीत." प्रीती म्हणाली. प्रिया ही सचिन गेला तिकडे बघत होती.

" मुलींनो झोपा आता. रमा तू पण आराम कर. " अण्णा म्हणाले.

" पूर्वी आपण यायचो तर सचिन रात्र रात्र भर आपल्याशी बोलायचा. किती मजा यायची. लग्नानंतर तो बदलला. " प्रीती म्हणाली.

" हो ना. " प्रिया, प्रीती हळूहळू गप्पा मारत होत्या.

🎭 Series Post

View all