Login

मी तुमच्यासाठी परकी भाग 2

कितीही प्रयत्न केले तरी मी तुमच्यासाठी परकी आहे
मी तुमच्यासाठी परकी भाग 2

©️®️शिल्पा सुतार

स्वयंपाक झाल्यावर तिला वाटलं सगळ्यांमध्ये बसू म्हणून ती पुढच्या खोलीत गेली. रमाताई, अण्णा, प्रीती, प्रिया बोलत होते. मुलं खाली बसून खेळत होते. श्रुती गेल्यानंतर ते वेगळेच गप्प झाले. जसं काही खूप सीक्रेट बोलत होते आणि ते तिला काही समजू नये.

ती खुर्ची पुढे सरकवून बसली. प्रीती, प्रिया एकमेकींकडे बघत होत्या.

"तुझं किचनच काम झालं का?" रमाताई विचारत होत्या.

"हो फक्त पाव शेकायचे आहेत."

"मग ते कधी करायचं? आटोप. मुलांना भूक लागली."

"हे आले की जेवायला बसू. पाच मिनिट लागतील." श्रुती म्हणाली.

" तोपर्यंत मुलांना जेवायला दे. हिला ना अजिबात कामाचा उरक नाही. कस वागता हे ही समजत नाही." रमाताई बडबड करत होत्या.

श्रुतीची आता दोघी ताईंशी बोलायची उत्सुकता कमी झाली होती. सकाळपासून कामात असलेली ती आता खूप थकली होती. त्यात तिला सासुबाई त्यांच्यात येवू देत नव्हत्या. ती उठली परत किचनमध्ये गेली .मुलांचे ताट वाढून आणले. आता ती समोर बसली नाही तिच्या रूममध्ये निघून गेली.

थोड्यावेळाने सचिन आला. पुढच्या खोलीत सगळ्यांना बोलतांना बघितलं. तिथे श्रुती नव्हती. तो आत मध्ये आला. "श्रुती तू इथे काय करते आहेस? हे अस वागतेस का? सगळे पुढे बसले आहेत तर तिथे बसून बोलायचं ना. सगळ्यांमधे मिक्स व्हायचं. आई सांगत होती तू आज गप्प गप्प होती. पाहुणे आलेले तुला आवडले नाही का?"

" अस काही नाही." ती पटकन उठून उभी राहिली. आज पहिल्यांदा सचिन तिला अस ओरडून बोलला होता. ती नाराज होती.

श्रुतीने विचार केला यांना सांगू का की त्या लोकांना मी तिकडे बसलेली नको आहे. आई नुसत्या मला ओरडता आहेत. आता सचिन ही ओरडले. अस का झाल? त्या दोघी आल्यामुळे का? आईंनी खोट का सांगितल की मी बोलत नाही. खरतर मी किती जुळवून घ्यायचा प्रयत्न करते आहे. त्यांना मी नको आहे.

नवीनच लग्न झाल होतं. या लोकांबद्दल सांगितलं तरी सचिनला समजणार नाही. ते विश्वास ठेवणार नाही. काय करू?

ति लगेच किचनमध्ये गेली. जेवणाची तयारी केली. जेवण भांडे होईपर्यंत तर पुढचे दोन तास गेले.

सचिन तोपर्यंत बहिणीं जवळ बसून बोलत होता. श्रुतीच आवरून झालं. ती रूममध्ये आली. हातपाय धुतले. ड्रेस बदलला. थोड्यावेळाने सचिन आत आला.

"मला तुझं वागणं समजत नाही श्रुती. चल बाहेर. सगळ्यांमधे बस."

" हो आली. कामामुळे माझा ड्रेस ओला झाला होता आवरत होते." तिने सांगितल.

ती बाहेर आली. तो पर्यंत प्रिया, प्रीती झोपायला गेल्या होत्या.

दोघ आत आले. सचिन चिडला होता. "माझ्या बहिणी वर्षातून दोनदा येतात. मे महिन्यात आणि दिवाळीत. त्यांच्याशी नीट वागायचं. बिना तक्रार सगळं करायचं. यात चूक झाली तर बघ. "

" अहो मी करते आहे. सकाळ पासून एक मिनिट ही मी बसली नाही. त्यांच्याशी गप्पा मारायला ही मी गेली होती. मी आले की सगळे गप्प बसतात. आई आत पाठवतात त्यामुळे मला वाटलं तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळायला हवी. " श्रुती म्हणाली.

"असं काही दिसल नाही. तू बाहेर आलीच नाही. आम्ही सगळे तुझी वाट बघत होतो. त्या दोघी किती वेळा विचारत होत्या की श्रुतीच झालं का? ती बोलतच नाही." सचिन म्हणाला.

श्रुतीला असं झालं होतं कसं वागावं? या दोघी बहिणी यांच्यासमोर वेगळं आणि माझ्यासमोर वेगळं वागतात. अरे बापरे वाटलं नव्हतं एवढ्या हुशार असतिल. मला भीती वाटते काहीतरी होईल.

सचिन तिकडे तोंड करून झोपला. ती त्याच्याकडे बघत होती. ती नाराज होती. कठिण आहे. घरचे लोक यांच्या नजरेत मला दोषी ठरवता आहेत.

🎭 Series Post

View all