भाग १७
पूर्वार्ध:
पार्टी मध्ये बरेच पिल्यामुळे कमल दुसऱ्या दिवशी बरीच सुस्त असते. हँगओव्हरमुळे तिचं डोकं सुद्धा बरंच दुखत असते. ती तिथेच डायनिंग टेबलवर आराम करत बसते. तेवढयात वेदचा मित्र रजत तिथे येतो. कमल त्याच्या गालात चांगलेच हाणून देते.
आता पुढे …
"भैय्या तुझा मित्र रजत आला आहे." वेमिकाने वेदला आवाज दिला.
"बस. येईलच तो. माझं कॉलेज आहे. मी निघते. जया फराळ पाण्याचे बघ." म्हणत वेमिका बाहेर निघून गेली.
"सोनी, हे घे ट्रे, पकड आणि बाहेर बसलेल्या साहेबांना नेऊन दे. मी नाश्त्याचे बघते." म्हणत जयाने एका १५-१६ वर्षाच्या मुलीच्या हातात पाण्याचा ट्रे बाहेर नेऊन द्यायला दिला.
रजत इकडे तिकडे बघत बसला होता. त्याला घरात कोणीच दिसले नाही. तेवढयात सोनी त्याच्या पुढे पाण्याचा ट्रे घेऊन उभी राहिली. तिने त्याला पाण्याचा ग्लास दिला तेव्हा तो घेतांना त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. सोनीला ते आवडले नाही. ती परत स्वयंपाक खोलीकडे जायला निघाली तेव्हा त्याने तिच्या मागे कंबरेवर त्याच्या हाताने थोडे अश्लील हावभाव करत मारले. तिने थोडे रागाने त्याच्याकडे वळून बघितले. तिला त्याला मारावे अशी इच्छा झाली होती पण ती चूप बसली.
"सटाssssक!" कमलने जोरदारपणे वेदच्या मित्र रजतच्या कानाखाली वाजवली.
वेद पायऱ्या उतरत खाली येत होता, तर आवाजाने एकदम तो जागीच थबकला.
तो गालावर हात ठेवत तिच्याकडे रागाने बघत होता.
"कोणाला विचारून तिला हात लावला?" त्याला रागाने बघत कमल त्याच्यापुढे उभी होती.
"हे यू? एका कामवालीसाठी , त्या दोन पैशाच्या मुलीसाठी माझ्यावर हात उचलतेस? तुला माहिती नाही मी कोण आहे? " रजत रागाने कमलकडे बघत होता.
"तू असशील कोणी मंत्री संत्री अथवा अजून कोणी, मला फरक पडत नाही. पण एक लक्षात ठेवायचं, हे माझं घर आहे. आणि माझ्या घरात मुलींसोबत अशी जबरदस्ती केलेली अजिबात चालत नाही." कमल.
"युज अँड थ्रो.." रजत सोनीकडे बघत, समोर असलेल्या टेबलवर काही पैसे फेकत कमलला म्हणाला.
"सटाकssss.." परत कमलने त्याचा गालावर ठेऊन दिली.
"तुझ्या बापाची जहागीर नाही. माझ्या घरातून बाहेर पडायचं. नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नाही." कमल रागाने त्याच्याकडे बघत बोलत होती.
"आणि तू ग, वाट कोणाची बघत होती? एक ठेऊन द्यायची असती." कमल सोनीला म्हणाली.
"आणि तू ग, वाट कोणाची बघत होती? एक ठेऊन द्यायची असती." कमल सोनीला म्हणाली.
"ते मी.. " सोनी कधी कमल तर कधी रजतकडे बघत होती. तेवढयात तिथे जया आली. पण सर्वांना बघून थोडीशी मागेच थांबली.
"आपल्या मर्जी शिवाय आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही. कळलं का?" कमल.
तिने होकारार्थी मान हलवली.
"आणि मी बघितले होते, याने स्पर्श केला तेव्हा तुला आवडले नव्हते. आपल्यासोबत वाईट करण्याचा कोणालाही काही अधिकार नाही. सरळ उत्तर द्यायचं. हाणून द्यायची." कमल.
सोनीने होकारार्थी डोकं हलवले.
"तू अजून इथेच? ते पैसे उचलायचे आणि निघायचं." कमल रजतकडे बघत म्हणाली.
"मी वेदचा मित्र आहे. हे तुला महागात पडेल." रजत.
"निघायचं.." ती त्याला बाहेरचा रस्ता दाखवत म्हणाली.
वेद दुरून हे बघत होता. तो त्या दोघांजवळ आला. त्याचे पूर्ण लक्ष कमलकडे होते.
"वेद, ही.."
"सांगितले ना, निघायचं म्हणुन, तर निघायचं. माझ्या घरातील लोकांना , मग ते कोणीही असो, नजर वर करून सुद्धा बघायचे नाही. आता सरळ बाहेर व्हायचं." रजतचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच कमल म्हणाली.
"वेद.." रजत वेदकडे बघत होता.
वेदने त्याला जा म्हणून इशारा केला.
"वेद तू हे ठीक करत नाही आहे.." रजत.
"ओके. जा आता." वेद.
रजत चिडतच घराबाहेर पडला.
वेदने कमलचा हात पकडला आणि तिला तो वरती नेऊ लागला.
"जया काकी, तिला बघा." तेवढयात पण मागे वळून कमलने आवाज दिला आणि पुढे पुढे वेद नेत होता तिकडे जात होती.
वेदने तिला आपल्या खोलीत नेत तिला पुढे भिरकावले तशी ती खिडकीवर जाऊन आदळनार तोच परत त्याने त्याचा हात पुढे धरला. आणि तिचे कपाळ त्यावर आपटले. पण त्याचा हात असल्यामुळे तिला काही लागले नाही. त्याचा हात पुढे आणि तो तिच्या मागे उभा होता, पण बराच जवळ होता. ती त्याला पाठमोरी उभी होती.
"ज्याला तू मारले, तो कोण होता, माहिती आहे?" वेद.
ती काहीच बोलली नाही.
"लूक एट हिअर." तो थोड्या मोठ्याने बोलला.
ती मागे फिरली. मान खाली घालून उभी होती.
"तो कोण होता, माहिती का तुला?"
तरी ती चूप.
"स्पिक अप."
त्याचा हात खिडकीवर असल्यामुळे , तिला मानेला, गालाला त्याच्या हाताचा स्पर्श होत होता. त्यामुळे ती तिचे अंग चोरुन घेत होती. त्याच्या लक्षात आले तसे त्याने त्याचा हात बाजूला केला.
"त्याला का मारले?" त्याने थोडे शांततेने विचारले.
"तो तिला नको तसा, नको तिथे स्पर्श करत होता. " कमल मान खाली घालूनच म्हणाली.
"तो कोण आहे माहिती आहे का?" वेद.
" असू देत कोणी पण. तो तिला तिच्या परवानगी शिवाय तिला हात लावत होता. घाणपणे हात लावत होता. आणि तिला ते आवडले नव्हते. " कमलने मान वर करत, वेदच्या नजरेला नजर मिळवत, थोड्या जोराने चिडून म्हणाली.
"ती तुझी कोण आहे, जे तू तिला मदत करायला गेली?" वेद तिच्यावर नजर रोखत म्हणाला.
"ती एक स्त्री आहे , मी एक स्त्री आहे.. एवढे नाते पुरेसे नाही का?" कमल सुद्धा अगदी त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवत उत्तर देत होती.
"तिने तुला मदत मागितली होती?"
"डोळ्यांपुढे वाईट घडतांना बघून सुद्धा चूप बसायला हवे का? तुम्हाला चूप बसता येत असेल, मला नाही.."
"इतकं सगळं समजते ना? मग जेव्हा तुझ्या सोबत वाईट घडत होते, तेव्हा तुला असाच हात उचलता आला नाही का?" वेद.
आता मात्र तिला त्याच्या आधीच्या सगळ्या प्रश्नांचे अर्थ कळत होते.
"दोन्ही गोष्टींची तुलना होऊ शकत नाही.साहेब माझे पती आहेत. " म्हणत ती तिथून थोडी बाजूला सरकत बाहेर जाऊ लागली.
"पती असा नसतो कमल." तिला जातांना बघून त्याने तिच्या हाताला पकडत परत तिला आपल्या पुढ्यात ओढले. आणि तिच्याकडे रागाने बघत होता. त्याचे रागावलेले डोळे बघून आता मात्र तिच्या हृदयात पण धडकी भरली होती.
"हे जे काही तुझ्यासोबत रोज रात्री घडते, त्याला बलात्कार म्हणतात. तुला समजत आहे की नाही?" तो खूप चिडून बोलत होता. चिडत त्याने रागाने एक हात तिच्या बाजूने असलेल्या खिडकीच्या भिंतीवर मारत, तो आणखीच तिच्या जवळ गेला होता. आता मात्र तिला त्याच्याकडे बघणे होत नव्हते. तिने आपली नजर खाली केली.
तो बऱ्याच वेळ तिच्याकडे बघत होता. तिची चुप्पी त्याला सहन होत नव्हती.
"बोल.." तो ओरडला.
"मी घर सोडून जाणार नाही. मी माईला वचन दिले आहे." कमल घाबरत म्हणाली.
"त्यांना माहिती इथे तुझ्या सोबत काय घडत आहे ते?"
तिने होकारार्थी मान हलवली.
"वाह!" टाळ्या वाजवत तो विचित्रपणे हसू लागला. अचानकपणे त्याचे बदलले रूप बघून, कमल त्याच्याकडे बघत होती.
"इथे मला तुझी काळजी वाटते. तुला त्रास होतो, तो मला जाणवतो. तुझ्या किंकळ्यांच्या मला वेदना होतात.
हा हा हा.. पण मीच मूर्ख निघालो. पैसे कमावण्याचा तुमचा तर फूल प्लॅन दिसतोय. मी तुला त्रासातून वाचवण्यासाठी खटाटोप करत असतो. पण तुला तर हेच हवय." तो कुत्सीतपणे हसत बोलत होता.
हा हा हा.. पण मीच मूर्ख निघालो. पैसे कमावण्याचा तुमचा तर फूल प्लॅन दिसतोय. मी तुला त्रासातून वाचवण्यासाठी खटाटोप करत असतो. पण तुला तर हेच हवय." तो कुत्सीतपणे हसत बोलत होता.
ती तरीही चुपचाप उभी होती.
"स्त्री स्त्रीची वैरीण, पण इथे तर माताच वैरीण निघाली. अरे तुमच्यापेक्षा तर तो रजत बरा म्हणावं.."
"चूप, एकदम चूप!" कमल एकदम रागाने त्याच्या कपड्यांची कॉलर पडत म्हणाली.
"त्या नीच व्यक्तीची माझ्या माई सोबत तुलना करायची नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट नाही." कमल अगदी त्याच्याच आवाजात, त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली.
आताची रागावलेली कमल , मघाशी रजतला मारलेल्या कमलपेक्षा पण जास्त तापलेली दिसत होती.
"मी तुमच्या आई मुलाच्या नात्यात काही बोलत नाही. तुम्हाला सुद्धा माझ्या माईला काही म्हणण्याचा अधिकार नाही. मी हे लग्न माझ्या मर्जीने केलंय. आणि हो पैश्यासाठी म्हणत आहात, तर तेच समजा."
"कमल अशी मुलगी नाही, जी पैशासाठी लग्न करेल. की मीच तिला जास्त चांगले समजलो होतो? " तिच्या बोलण्यावरून आता मात्र त्याला त्याचे विचार चुकीचे वाटू लागले होते. त्याला तिचा भयंकर राग आला होता. पण तरीही तिची काळजी का वाटतेय, त्याला कळत नव्हते. तो तिच्यापुढे नरम पडतोय त्याला जाणवत होते.
"तुला जितके पैसे पाहिजेत, तितके देतो. हवे तर माझ्या जवळ असलेली माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो. पण इथून जा." एका हाताने मागून तिच्या केसांना पकडत तिची मान वर करत, तिच्याकडे बघत तो म्हणाला.
ती आज पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात बघत होती. त्याला इतक्या जवळून बघत होती. त्याच्या डोळ्यात तिला खूप राग दिसत होता. पण त्या रागामागे ती तिच्या बद्दल त्याच्या डोळ्यात असणारी काळजी वाचू शकत होती. त्याची तिला सोडवण्याची कळकळ तिला दिसत होती. त्याच्याकडे बघतांना तिच्या हृदयात काहीतरी होतंय, तिला जाणवू लागले. आणि एकदमच त्याच्या कॉलर वरील तिचे हात सैल पडले.
"मी नाही जाऊ शकत. मी साहेबांना सोडून जाणार नाही असे माझ्या माईला वचन दिले आहे. मी ते तोडू शकत नाही. " कमल.
"कमल.." तो ओरडला. पण त्याच्या आवाजात तिला असहायता जाणवत होती.
"आम्ही खूप गरीब, दोन वेळचे जेवण मिळणे कठीण, त्यात वडील दारुडे. माई एकटीच काम करते. एकदिवस माई येऊन म्हणाली की माझी सोयरिक पक्की झाली आहे. मला म्हणाली, पोरी नशीब काढले, खूप श्रीमंत घरून मागणी आली आहे. खूप आनंदात राहशील. मी पण खूप खुश झाली. तसेही मला सीरियल बघून , असे लग्नाचे वेड होतेच. मला वाटले सीरियलमध्ये दाखवतात तसे प्रेम होईल. त्याची ती पहिली नजर, आणि मी लाजून गुलाबी होईल. हृदयात संगीत वाजेल. त्याची प्रेमळ नजर, त्याचा पहिला स्पर्श मनाला घायाळ करून जाईल, जसे टीव्ही मध्ये होते, तसे. मेहंदी, हळद, लग्न, लाल शालू, हिरवा चुडा… मोगऱ्याच्या फुलांचे गजरे…मोकळ्या आकाशाखाली पांढऱ्या झिरझिरीत पडद्याच्या मध्ये, लुकलुकणाऱ्या चांदण्यांच्या साक्षीने झालेला मधुचंद्र…." बोलता बोलता तिचे डोळे पाणावले..
तिच्या डोळ्यात पाणी जमू लागले आणि आपोआप तिच्या केसांना पकडलेला त्याचा हात थोडा सैल झाला. पण अजूनही त्याने तिला पूर्णपणे सोडले नव्हते.
"तारुण्यात नुकतेच झालेले पदार्पण, मला पण असे हळूवारपणे कोणाच्या प्रेमात पडायचे होते. प्रेम करायचं होतं मला.. तो प्रेमाचा स्पर्श अनुभवायचा होता.. मला पण कोणी इथे माझ्या कपाळाला कीस करावं, माझ्या ओठांना त्याने आपल्या ओठात घ्यावे वाटते. त्याने मला आपल्या उबदार मिठीत सामावून घ्यावे. श्वास इतके एकत्र व्हावेत की दोन जीव एक वाटायला हवे. मला त्याच्या प्रेमात न्हाऊन निघायचं होतं. मला माझ्या रोमारोमात, प्रत्येक श्वासात त्याला बसवायचं होतं. मी सुद्धा कुणाचा श्वास, जीव होऊन जावे, कुणीतरी आपल्यावर पण अतोनात, त्याचा जिवापलिकडे प्रेम करावे, आपल्याला अगदी फुलाच्या पाकळी प्रमाणे जपावे असे वाटत होते. खूप खूप स्वप्न बघितलेली होती.." बोलता बोलता ती एकदम शांत झाली. तो मात्र तिच्याकडे एकटक बघत होता.
"टीव्ही वाले, आपल्या भावनांशी खूप खेळतात. खूप मोठी मोठी स्वप्न दाखवतात. तसे स्वप्न बघायचे ठरवले नाही तरी आपोआपच त्यांच्या प्रेमात पडतात. पण खऱ्या आयुष्यात असे होत नाही. लग्न ठरल्याची माहिती दिली, त्याच्या चार दिवसांनी साहेब आमच्या घरी आले. माई म्हणाली हेच पती आहे. मी घाबरली. पण बापू समोर नकार देता येत नव्हता. बापू चामडी फाटेपर्यंत मारत होता. माई म्हणाली, वयाने मोठे आहे, पण सुखी राहशील. तिने हातात साडी दिली. ती नेसून आले. साहेबांनी काही दागिने आणि मंगळसूत्र दिले. ते माईने घालून दिले. मला सजवून साहेबांच्या गाडीत आणून बसवले. आमची सगळी वस्ती माझ्याकडे अन् साहेबांच्या मोठ्या गाडीकडे बघत होती. पोरीने नशीब काढले म्हणून आयाबायांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. मला तसे नवरीच्या वेशात बघून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मी वाचला होता. ना मंत्र वाचले, ना मंगळसूत्र घातले, ना सप्तपदी चालले, पण माई म्हणाली लग्न झाले. मी पण मुकाट्याने इथे आले. " कमल बोलत होती.
"तुम्हाला काय वाटते, पहिल्या रात्री जे झाले, त्या नंतर मी चूप बसले होते. मला इथून पळून जायचे होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी जाणार पण होती. पण.."
तो फक्त तिच्याकडे बघत होता. अजूनही त्याने तिची मान पकडून ठेवली होती.
"पण बहुतेक माईला माहीत होते, मी असेच काय करणार आहे.. मी घराबाहेर पडायच्या आताच तिचा फोन आला. "
*******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा