Login

मिळावे तुझे तिला आस ही ओठी ३०

कमल
मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग 30


(आता ही दिव्या कोण, असा प्रश्न पडला असेल ना? तर पहिल्यांदा कमल आणि राजीव एका पार्टीत जातात, तिथे कमलला ते लोकं खूप दारू पाजतात. तिथे वेदला मदत करणारी दिव्याच होती आणि नंतर त्याच्याकडून तिने डिनरसाठी प्रॉमिस मागितले होते.)

"वेमिका, या दिव्या, बिझनेस सांभाळतात आणि माझ्या कॉलेजच्या क्लासमेट. दिव्या ही वेमिका माझी लहान सिस्टर आणि ही क…क.."

"कमल.. राईट?" वेदचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत दिव्या म्हणाली.

"हो.." त्याने होकारार्थी मान हलवली.

"हॅलो गर्ल्स.." दिव्याने हॅण्डशेकसाठी हात पुढे केला. कमल तर तशीच उभी होती, वेमिकाने मात्र तिच्यासोबत हात मिळविला.

"हे स्वीटहार्ट, यू आर लूकिंग वेरी प्रेटी इन धीस ड्रेस.." दिव्या कमलला उद्देशून म्हणाली. कमल मात्र कधी वेद तर कधी वेमिकाकडे बघत होती.

"जानेमन, तू या ड्रेस मधे खूप सुंदर दिसत आहे, असे म्हणाल्या त्या." वेमिकाने हळूच कमलच्या कानात सांगीतले.

"पण मला त्या स्वीटहार्ट का म्हणाल्या? मी त्यांची स्वीटहार्ट थोडी आहे?" कमल वेमिकाची खुसुरपुसुर सुरू होती.

"तू खूप आवडली, म्हणून स्वीटहार्ट म्हणाले." दिव्या वेदकडे बघत म्हणाली.

"काय?" वेद.

"शी इज सो क्यूट.." वेद जवळ जात दिव्या हळूच म्हणाली. वेदला तर त्यावर काय बोलावे कळले नाही. तो तसाच चूप उभा होता.

"तुम्ही पण सुंदर दिसत आहात." कमल कसेनुसे हसत म्हणाली. त्यावर दिव्या थोडे हसली.

"आपण आधी पण भेटलोय, तू ओळखतेस मला." दिव्या.

"हा? मी तुम्हाला नाही ओळखत." कमल अचंभित झाल्यासारखे बघत होती.

"त्या दिवशी तू खूप ड्रंक होती.." दिव्या.

"हा?" कमलला काही कळले नव्हते.

"ड्रंक.. टल्ली.." दिव्या हसत म्हणाली.

"ते तू त्याच्यासोबत पहिल्यांदा पार्टीला आली होती तेव्हा, तेव्हा भेटली आहे. तेव्हा तू शुद्धीत नव्हती, म्हणून तुला काही आठवत नाही आहे." वेद.
ते ऐकून कमलला ओशाळली.

"त्या दिवशी त्या कपड्यांमध्ये पण एकदम स्टंनिंग दिसत होती, पण आज जास्त गोड दिसतेय, कुठल्या पण मुलाला आवडेल अशीच.." दिव्या थोडे हसत म्हणाली.

"मी.. ते… दारू.. मुद्दाम.. म्हणजे मी ते.. ते.. तशी.. दारुडी.. ते.. कपडे.. " कमल अडखळत बोलत होती.

" येह, आय नो.. तू दारुडी नाहीयेस, इन्फॅक्ट तुला दारू पिणारे लोकं आवडत नाही.." दिव्या हसत वेदकडे बघत म्हणाली.

"अँड डोन्ट वरी, तू दारू प्यायली, छोटे कपडे घातले वगैरे म्हणून मी काय तुला जज नाही करणार.. आणि जे आवडते ते बिनधास्तपणे कर ग, बिनधास्तपणे सांग.." म्हणत दिव्या कमलजवळ गेली आणि तिच्या गालावर एक छोटेसे कीस केले आणि पुढे म्हणाली, " बेबी, हे आपलं आयुष्य आहे, आपल्याच आवडीने जगायचं असतं.."

ते बघून वेद, वेमिका, कमल सगळेच आश्चर्यचकित झाले.

वेमिकाला तर काय बोलणं सुरू आहे, काहीच कळत नव्हते. ती फक्त त्यांचे बोलणे ऐकत होती.

"यू गाईज कॅरी ऑन. आम्ही निघतो." दिव्या.

"जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आणि आता मी इथेच आहो तर या दोघींचे जेवण आटोपले की यांना घरी घेऊन जातो." वेद.

"हे, या या.. शूअर.. गूड नाईट गर्ल्स.." दिव्याने त्यांचा निरोप घेतला.

"वेमिका, तुम्ही जेवण करा, मी दिव्याला कार पर्यंत सोडून येतो." वेद.

"हो भैय्या, आरामात. काही घाई नाही." वेमिका हसत म्हणाली.

"आलोच.." वेद.
वेद आणि दिव्या बाहेर जाऊ लागले.

"किती गोड आहे ना दिव्या, मला तर खूप आवडली." वेमिका.

कमल मात्र त्या दोघांना पाठमोरे चालतांना बघत होती.

"दोघांचा जोड पण भारी दिसतोय.." वेमिका.

"हम्म.." कमल.

"अगं, हम्म हम्म काय करतेय? तुला कशी वाटली सांग.." वेमिका.

"आपण आधी जेवण करूया का? खूप थकल्यामुळे डोकं जड वाटतेय." कमल.

"हो. ऑर्डर देते.." वेमिका.

"तुम्ही कीस करता करता का थांबल्या? मी परत भेटायला येणार नाही." चालता चालता वेद दिव्याला म्हणाला.

"करणार होतेच, पण तू कमल म्हणाला तेव्हा.. मग तुझ्या ओठांवर कमल असताना, दिव्याने कसे बरे यायचे?" बोलतांना ती खळखळून हसू लागली.

"मी, कमल म्हणालो? काही पण. आणि तुम्ही बोलतांना वारंवार तिच्याकडे मग नंतर माझ्याकडे का बघत होत्या?"

"तिच्यावर प्रेम आहे, ते स्वीकारत नाहीस म्हणून असे हृदयात, डोळ्यांपुढे तीच येतेय.. आणि तुला कळत पण नाही." दिव्या.

"उगाच कुठलेही कनेक्शन कुठेही लावू नका." वेद.

"जगासमोर लपवता येईलही, पण स्वतःपासून कसे लपवणार? स्वतःही कसे खोटं बोलणार?" ती हसत म्हणाली.

"तुम्हाला कीस करायचे होते, राईट? मग ते का नाही केले?" वेद.

"केले ना."

तो भुवई उंचावत तिच्याकडे बघत होता.

"कमलला केले.. तिला केले म्हणजे तुझ्यापर्यंत पोहचले."

ते ऐकून वेदने डोळे फिरवले. ते बघून ती हसू लागली.

"मी किस कधीच करणार नव्हते. मी फक्त तुझी मस्करी करत होते. हा मी म्यारीड नसते तर कदाचित केले असते, कदाचित काय, केलेच असते. गळाला लागलेल्या मास्याला कोण सोडणार."

त्यावर तो किंचितसा हसला.

"त्या दिवशी पार्टीत सुद्धा तू डिनरसाठी नसतेही मानले तरी मी मदत केलीच असती. कारण ती त्यांच्यामध्ये खूप अन्कंफर्टेबल होती, वरतून ते तिला जबरदस्ती ड्रिंक करायला लावत होते. मी एक मुलगी असून दुसऱ्या मुलीवर सुरू असलेली जबरदस्ती कशी खपवून घेईल?"

"हो.." त्याला आता दिव्याचा खूप गर्व वाटत होता.

"बाकी प्रेमात तर तू तेव्हाच पडला होता.."

"तुम्ही परत त्यावरच आलात?" वेद.

"स्वीकार कर की तुझे तिच्यावर प्रेम आहे, तुलाच जगणं सोपी होईल.." बोलता बोलता दिव्याने मागे वळून कमाळकडे बघितले. तर कमल या दोघांकडे बघते आहे, तिला जाणवले.

"ती जेलस फील करतेय.." दिव्या वेदला म्हणाली.

"कोण?" वेद.

"तुझी ती.. " दिव्या बोलतच होती की वेद मधेच म्हणाला, "कमल?"

त्यावर दिव्या हसली.

"काहीही. ती का जेलस होईल?" वेद.

"मी तुझ्या सोबत आहे म्हणून.." दिव्या.

"मग त्याने काय फरक पडतो? ती जेलस नाही.." वेद.

"शी लाईक्स यू.. म्हणून.." दिव्या.

"काही पण.. ती म्यारीड आहे." वेद.

"मग? तिच्याकडे प्रेम करण्याचा अधिकार नाही? लग्न झालेय म्हणून आपल्या आवडीच्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा अधिकार नाही? प्रेम हे प्रेम असतं, कोणावरही होऊ शकतं. त्याला कशाचीच बंधनं नसतात." दिव्या.

"ओके एक किसची शर्त.." दिव्या हसली. ते ऐकून वेदने डोक्यावर हात मारला.

"मला नाही, मी जिंकले तर तू तिला किस करायचे.. कधीही.. मी तुला प्रूव्ह करून दाखवते." म्हणत ती वेदचा हात पकडत त्याच्या बाजूला, एकदम त्याला चीपकली. मधेच त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत, त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"कमलच्या डोळ्यात पाणी आले असेल, तर ती जेलस आहे.. बघ.." दिव्या.

वेदने मागे वळून बघितले.

"तिच्या डोळ्यात अश्रू आहेत का?" दिव्याने परत विचारले.

"नाही. तुम्ही हरलात. ती आपल्याकडे बघत पण नाहीये, ती आपल्याला पाठमोरी आहे.." वेद.

"असं होऊच नाही शकत. माझे ऑब्झरवेशन चुकू शकत नाही. एकदा बघून ये.." दिव्या.

"नाही, नको.." वेद.

"मी अशी हार मानत नसते. चल.." म्हणत त्याचा हात पकडत दिव्या परत त्या दोघींच्या टेबल जवळ आली.

"ते गाडीची किल्ली.." म्हणत दिव्या कमल पुढे थोडी झुकली.

"अगं काय झाले? तू रडत का आहेस? ऑलराईट ना?" कमलच्या डोळ्यात पाणी बघून दिव्या म्हणाली.

"ह? हो.. ते काही नाही डोळ्यात कचरा गेला बहुतेक.." कमल आपले डोळे पुसत म्हणाली. वेद मात्र एकटक तिच्याकडे बघत होता.

"कमाल आहे, दोन्ही डोळ्यात एकदमच गेला कचरा.. बरं येते. काळजी घ्या डोळ्यांची.." म्हणत, गालातच हसत दिव्या परत जायला निघाली. वेद पण तिच्यासोबत जाणार तोच तिने त्याला नकार दिला.

"तुम्ही शर्तचं तेवढे लक्षात ठेवा वेद बाबू.. भेटुयाच परत.." त्याला एक डोळा मारत दिव्या हॉटेलच्या बाहेर पडली.

जेवण आटोपून तिघेही घरी यायला निघाले. वेद कार चालवत होता. वेमिका वेदच्या शेजारी तर कमल मागच्या सीट वर बसली होती. दिव्या वरून वेमिका खूप गप्पा मारत होती, पण कमल मात्र शांत बसली होती. वेद कार चालवता चालवता अधून मधून रियर व्ह्यू मिरर मधुन कमलला बघत होता. पण ती मात्र खिडकीतून बाहेर बघत बसली होती. तिने एकदा पण वळून पुढे बघितले नव्हते.

घरी आल्यावर वेमिका आजीला केलेली सगळी शॉपिंग दाखवत होती. दोघींनी मिळून केलेली धमाल सांगत होती. आजी पण सगळं खूप उत्साहाने ऐकत होती. वेद सोफ्या वर बसला हे सगळं बघत होता.

"रमा आजी, आम्ही आज तिला भेटलो.." वेमिका.

"तिला कोणाला?" आजी.

"ती.. ती.. तिला.." वेमिका भुवया उडवत वेदकडे बघत आजीला सांगत होती. वेमिका काय बोलत आहे, हे कमलला मात्र कळले होते.

"मी थकली, झोपू काय?" कमल मधेच बोलली.

"हिचे तर तिथे जेवतांनाच डोकं दुखत होते." वेमिका मस्करी करत म्हणाली.

"खरंच थकली. मी झोपायला जाते." म्हणत कमल पिहुच्या खोलीत निघून गेली.

"कोणाला भेटली?" आजी.

"ती.. भैय्याची गर्लफ्रेंड, दिव्या." वेमिका म्हणाली.

"व्हॉट?" ते ऐकून वेद एकदम शॉक झाला.

"ती माझी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे. माझी क्लासमेट आहे फक्त. आणि महत्वाचे म्हणजे ती मॅरीड आहे." वेद एका झटक्यात सगळे बोलून गेला.

"काय? मग ते…" बोलता बोलता वेमिकाचे लक्ष आजीकडे गेले तशी ती चूप झाली.

"मग ती कमलला कसे ओळखते?" वेमिका.

"ती राजीव सोबत पार्टीला गेली होती, तिथे दिव्या पण होती." वेद.

"तुला कसे माहिती?" वेमिका.

"मला पण त्या पार्टीचे इंविटेशन होते, मी पण गेलो होतो." वेद.

"तुला कधीपासून पार्टीज आवडतात?" वेमिका.

"काम होते म्हणून जाणे भाग होते.." वेद.

"अरे काय झाले सांगाल काय?" आजी.

"रमा आजी, अगं मला वाटले ती दिव्या भैय्याची गर्लफ्रेंड आहे. हे दोघे आज डिनर डेटला गेले होते, सो.." वेमिका.

"काहीही असते तुमचे, मुलीसोबत बघितले नाही की लगेच गर्लफ्रेंड केले." वेद चिडत म्हणाला.

"अरे चिडतोस कशाला? रमाआजी, ती इतकी नटून थटून आली होती की कोणाला पण तसेच वाटले असते. आणि ती दिसायला पण खूप सुंदर होती. आणि हा असा डिनर डेटला जातो का कोणासोबत? मग असेच वाटणार ना?" वेमिका.

"तू पण ना.. उगाच माझी आशा वाढवली. चला झोपा आता." आजी तिला एक टप्पी देत आपल्या खोलीत निघून गेली.

"भैय्या, मी आजी होती म्हणून चूप बसले, पण तुमच्यामध्ये नक्कीच मैत्री पेक्षा जास्त होते. एक्स्ट्रा मॅरीटीअल अफेअर?"

"ये, असे काही नाही." वेद.

"मग? फिजिकल नीड? तुम्ही कीस करणार होते. मी माझ्या या डोळ्यांनी बघितले आहे."

"ये पागल, असे काही नाही. ती कीस करण्याचे नाटक करत होती, मला असेच घाबरवायला.."

"काहीही.. कीस चे नाटक कोण करते?"

"तिला मी डिनर डेट आणि ती जे म्हणेल ते, असे प्रॉमिस केले होते.."

"का?"

"तिने ते कमलला…" तो बोलतच होता की वेमिका सांशिक नजरेने त्याला बघत आहे जाणवले.

"मी का सांगू, ती माझी गोष्ट आहे. दिव्या माझी गर्लफ्रेंड नाही अन् काही अफेअर पण नाही. जा झोप आता. उगीच मेंदूला त्रास देऊ नको." म्हणत वेद आपल्या खोलीत निघून गेला.

*******

"असे वाटतेय, एकटे पडले.. कुणीच नाही माझं…