मिळावे तुझे तुला आस ही ओठी ३१
भाग ३१
पूर्वार्ध:
वेद त्याची कॉलेज मैत्रीण दिव्या सोबत डिनर डेट वर जातो. वेमिका आणि कमल शॉपिंग साठी बाहेर जातात. शॉपिंग आटोपून दोघीही जेवायला हॉटेल मध्ये जातात तर तिथेच त्यांना वेद आणि दिव्या भेटतात. दिव्याला बघून ती वेद ची ग्रिल्फ्रेंड आहे , अशी त्या दोघींची समज होते. जेवण आटोपून सगळे घरी येतात, मात्र कमल खूप शांत शांत वाटत असते.
आता पुढे…
"भैय्या, मी आजी होती म्हणून चूप बसले, पण तुमच्यामध्ये नक्कीच मैत्री पेक्षा जास्त होते. एक्स्ट्रा मॅरीटीअल अफेअर?"
"ये, असे काही नाही." वेद.
"मग? फिजिकल नीड? तुम्ही कीस करणार होते, मी माझ्या या डोळ्यांनी बघितले आहे."
"ये पागल, असे काही नाही. ती कीस करण्याचे नाटक करत होती, मला असेच घाबरवायला.."
"काहीही.. कीस चे नाटक कोण करते?"
"तिला मी डिनर डेट आणि ती जे म्हणेल ते, असे प्रॉमिस केले होते.."
"का?"
"तिने ते कमलला…" तो बोलतच होता की वेमिका सांशिक नजरेने त्याला बघत आहे जाणवले.
"मी का सांगू, ती माझी गोष्ट आहे. दिव्या माझी गर्लफ्रेंड नाही अन् काही अफेअर पण नाही. जा झोप आता. उगीच मेंदूला त्रास देऊ नको." म्हणत वेद आपल्या खोलीत निघून गेला.
"दिव्या सुंदर आहे. भार्गवला खूप शोभते. पण त्या दोघांना जवळ बघून मला का वाईट वाटत आहे? भार्गवच्या आयुष्यात त्यांची काळजी घेणारे कोणीतरी आहे, मला तर खुश व्हायला पाहिजे, पण मी तरीही का खुश नाहीये?" बेडवर पडल्या पडल्या, वरती पंख्याकडे एकटक बघत, तिच्या डोक्यात सतत हेच विचार येत होते.
कमल खाली पिहू सोबत तिच्या खोलीत झोपली होती. पण तिला झोप येत नव्हती. ती रात्रभर कुस बदलत होती. अचानक तिला घरात खूप परके परके वाटत होते. काहीतरी हरवत आहे, कुणीतरी आपल्या दूर जात आहे, असे तिला वाटत होते. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार दिव्या आणि वेद कीस करणार होते, तेच येत होते. ते आठवून आपोआप तिचे डोळे पाणावले होते.
"असे वाटतेय एकटी पडली.. कुणीच नाही माझं.. इथे कुठेच, कुणीच माझं नाही.. श्वास का कोंडतोय माझा?" तिच्या डोळ्यांच्या कोनातून अश्रूंची थेंब ओघळत खाली उशीला भिजवू लागले.
तिच्याच विचारांनी तिला असह्य झाले आणि तिथून उठून बाहेर मागच्या अंगणात आली.
त्याच वेळी इकडे वेद आपल्या खोलीत सोफ्यावर पडला विचार करत होता.
"दिव्या म्हणाली तसे खरंच कमलचे माझ्यावर प्रेम असेल का?" तिचे तेव्हाचे डोळ्यातील अश्रू बघून त्याला वाईट पण वाटले होते कारण कुठल्याही परिस्थितीत त्याला तिच्या डोळ्यात अश्रू बघणे आवडत नव्हते.
"पण म्हणजे तिला मी खरंच आवडतो काय? पण तिला मी आवडतो, या विचाराने मला का आनंद होत आहे? एम आय इन लव्ह? मी कमल वर प्रेम करतोय? खरंच प्रेम करतोय का? की फक्त अट्ट्रॅक्शन आहे? नाही पण दिव्या म्हणाली होती की कमलवर माझं प्रेम आहे. मी डोळे बंद केले होते तेव्हा तिचेच नाव घेतले होते.. मला तर आठवत पण नाही.. परत एकदा करून बघू?" स्वतःच्याच विचारांती त्याने आपले डोळे बंद केले. त्याला कळायला लागले तेव्हापासून त्याच्या आयुष्यात आलेल्या मुलींना आठवू लागला. एकही चेहरा त्याच्या डोळ्यांपुढे स्पष्ट येत नव्हता. आणि मग हळूच राजीव सोबत घराच्या दारात उभी असलेली कमल त्याला दिसू लागली. पण यात मात्र राजीवचा चेहरा अंधुक झाला होता, त्याला फक्त कमल दिसत होती; घाबरली, बावरली, डोळ्यात खूप गोड स्वप्ने पण त्याला दुःखाची किनार असलेली तिची ती निरागस नजर, ज्यात तो तेव्हाच कैद झाला होता. त्याला स्वतःला ती आवडली नव्हती, तरी तिच्या डोळ्यात बघितले आणि तो हरवला होता. तिच्या डोळ्यात काहीतरी होते, जे त्याला त्याच्यासारखे वाटत होते, त्या भावना त्याच्यात सुद्धा आहे असे त्याला वाटले होते. आणि म्हणूनच त्याला तिचा खूप खुप राग आलेला असतांनाही हृदयाचा एक कोपरा मात्र तिच्यासाठी दुखत सुद्धा होता. त्याने डोळ्यांसमोर खूप मुली आठवून बघितल्या, पण कमल शिवाय दुसरा कुठलाच चेहरा त्याच्या बंद डोळ्यांपुढे येत नव्हता. दुसऱ्या दिवशी राजीवच्या भीतीने त्याच्या खोलीच्या भिंतीजवळ लपलेली ती साध्याश्या शिफॉन साडीतील कमल, त्याच्या हाताच्या जखमेवर साडीची पट्टी फाडून त्यावर बांधणारी कमल.. टीव्ही सीरियलची दिवानी कमल.. बघितलेले स्वप्न तुटले तरीही दुःखी न होता परत छोटे छोटे स्वप्न बघणारी कमल.. हॉस्पिटल मध्ये त्याची काळजी घेणारी कमल.. त्याच्यासाठी नर्सला रागावणारी कमल.. छोट्या छोट्या गोष्टींवर खळखळून हसणारी कमल.. त्याच्या बंद डोळ्यांपुढे आता फक्त कमल येत होती, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी येत होत्या.
"तिच्या डोळ्यात अश्रूचा एक पण थेंब मला सहन होत नाही.. तिला होणारा प्रत्येक त्रास मला होतो.. तिच्या ओठांवरील हसू आपोआप माझ्या ओठांवर येते.. इट मीन्स.. इट मीन्स.. " त्याच्या डोक्यात खूप गोष्टी भरभर येत होत्या…
" आय एम इन लव्ह…. येस.. आय एम इन लव्ह…." ओरडतच तो बेडवर जागीच उठून बसला. या आताच्या क्षणाला तो खूपच आनंदी होता. त्याला अगदी हवेत तरंगत असल्यासारखे वाटत होते. शेवटी त्याच्या हृदयाने कमलवरचे त्याचे प्रेम कबूल केले होते.
"वेद, तू प्रेमात पडला आहेस.. तुला प्रेम झाले आहे.. आणि तिला पण तू आवडतोय.. येस.. कमलला मी आवडतो.. मी तिला आवडतो.. मी तिला आवडतो..” दिव्या त्याच्या सोबत असतानाची कमल, तिच्या डोळ्यांत असलेले पाणी, त्याला सगळे आठवत होते.
“येस, तिला जाऊन सांगायला हवे.. हो.. “ विचार करत तो अतिउत्साहात जागेवरून उठला आणि कमलकडे खाली पिहूच्या खोलीत जायला म्हणून त्याने आपल्या खोलीचे दार उघडले आणि बाहेरील आंधार बघून त्याच्या लक्षात आले की आता रात्र झाली आहे. तो स्वतःशीच ओशाळला की त्याला रात्र आणि दिवसाचे सुद्धा भान राहिले नाही. केसांतुन हात फिरवत तो परत आपल्या सोफ्यावर येऊन पडला. पण आपण प्रेमात पडलोय, आपल्याला एक सुंदर संगिनी भेटली, या विचारांनीच त्याला झोप येत नव्हती. तो बऱ्याच वेळ कुस बदलत होता. शेवटी झोप येत नाहीये बघून तो जागेवरून उठला आणि बाहेर टेरेस वर चकरा मारत होता. फिरता फिरता त्याचे लक्ष राजीवच्या खोलीकडे गेले आणि कमल राजीवची बायको आहे, हे त्याला आठवले आणि एकदम कोणीतरी त्याच्या हृदयावर सपासप घाव करत आहे असे वाटू लागले. आतापर्यंत आनंदाने भरलेले हृदय एकदम दुखत आहे, ठणकत आहे, असे त्याला जाणवू लागले. त्याचे मन सैरभैर व्हायला लागले. प्रेमात पडल्या पडल्या ब्रेकअप वाली फिलिंग त्याला येऊ लागली. कधी नव्हे त्याला कोणीतरी मुलगी आवडली होती, तो ज्यापासून दूर पळत होता, त्यातच म्हणजे प्रेमात तो पडला होता. त्याला आता स्वतःच्याच नशिबावर हसू येत होते. नशिबाने पण त्याची खूप मोठी थट्टा केली, असे त्याला वाटून गेले.
“वेद, नको रंगवू ही प्रेमाची गुलाबी स्वप्न…तुलाच खूप त्रास होईल..” विचार करत डोळ्यांच्या कोनातून काही अश्रूंची थेंब त्याच्या गालांवर ओघळलीच..
“जे मला आवडते, जे माझे असते त्यावर तू हक्क मात्र दुसऱ्यांना देतो.. “ तो वरती आकाशाकडे बघत स्वतःच्या नशिबाला कोसत होता.
“आय हेट यू मॉम…आय हेट यू..” त्याचं मन खूप रडत होते.
झोप तर तशीच उडाली होती. त्याचे कुठेच मन लागत नव्हते. टेरेस वर उभा तो ती शांत झालेली, निजलेली सृष्टी बघत होता. बघता बघता त्याचे लक्ष खाली गेले तर त्याला तिथे पारिजातकाच्या झाडाजवळ पाठमोरी उभी कमल दिसली.
“कमल.. ही अजून जागीच.. “ त्याने हातातली घडी बघितली तर जवळपास रात्रीचा एक वाजत आला होता. तो पळतच खाली आला. घरा मागील अंगणात गेला.
कमल पारिजातकाच्या झाडाजवळ उभी खाली पडलेली फुलं बघत होती.
“असे कसे नशीब घडवलेरे देवा माझे.. कुणीच माझ्यावर प्रेम करणारे बनवले नाहीस तू… कुणीच नाही माझे आपले.. एकटीच राहिले…” खाली पडलेल्या फुलांकडे बघता बघता तिच्या डोळ्यांतून अश्रूंचे मोती टपटप करत खाली पडत होते.
तिला स्वतःला समजत नव्हते, तिला काय होतेय पण हृदयात खूप दुखतेय, एवढे जाणवत होते; इतके की कदाचित राजीव देत असलेल्या शारीरिक त्रासापेक्षा पण खूप जास्त तिला आज हृदय दुखत आहे, गळा दाटून येत आहे, असे होत होते.
तिला स्वतःला समजत नव्हते, तिला काय होतेय पण हृदयात खूप दुखतेय, एवढे जाणवत होते; इतके की कदाचित राजीव देत असलेल्या शारीरिक त्रासापेक्षा पण खूप जास्त तिला आज हृदय दुखत आहे, गळा दाटून येत आहे, असे होत होते.
“कमल..” वेदने आवाज दिला.
“ह?” आवाजाने ती एकदम दचकली आणि मागे वळली.
“काय झाले? तू रडत आहेस?” वेदला तिचे डोळे अश्रूंनी भरलेले दिसत होते.
“हा? नाही नाही.. ते कचरा गेला.. इथे हवा खूप आहे ना, माती उडतेय..” तिने आपल्या दोन्ही हातांनी भराभर आपले डोळे कोरडे केले.
तिच्या उत्तरावर वेदचे मात्र काही समाधान झाले नव्हते; ती रडतच होती त्याला पूर्ण खात्री वाटत होती.
“तुम्ही इथे? झोपले नाही?” कमल.
“ते काम करून थकलो तर पाय मोकळे करायला बाहेर आलो तर खाली तू दिसली..” वेद.
“इतकी रात्र झाली, इथे काय करतेय?” वेद तिच्या जवळ येत म्हणाला.
“ते झोप नव्हती येत म्हणून इथे आली होती. प्राजक्ताची फुलं खूप आवडतात मला, आकाशीचा तारकांचा सडा जणू इथे जमिनीवर उतरला. यांना बघितले की खूप फ्रेश वाटते.” ती खाली अंगणभर पसरलेली फुलं बघत म्हणाली आणि आपल्या हातांच्या ओंजळीत फुले वेचू लागली.
“उद्या सुकून जातील ती..” वेद.
“हो.. फार छोटं आयुष्य आहे त्यांचे… पण त्या तेवाढया कमी वेळात पण ते दुसऱ्यांना किती आनंद देऊन जातात. माहिती आहे मला, हे कायम आपल्या जवळ नाही राहतील, पण तरीही मला हे आवडतातच. त्यांचे ते इवलेसे देखणे पण गोड असे रूप, चहूबाजूंनी पसरलेला सुगंध, प्रेम जडलेय माझे यांच्यावर. क्षणभरचीच सोबत का असेना, पण प्रेम आहे माझे यांच्यावर, खूप आवडतात मला हे.. ते निघून गेले तरी प्रेम तर आयुष्यभर सोबत असतेच.” ती ओंजळीतील फुलांना आपल्या ओठांचा स्पर्श करत, त्याचा सुवास घेत म्हणाली.
तो तिच्याकडे बघत तिच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
“हे एवढेच क्षण जगून घेतेय यांच्या सोबत…
तसेही आपले म्हणण्यासारखे माझे दुसरे कोण आहे?
हेच माझे, मी यांचे.. निस्वार्थ प्रेम.. हसवतात ती मला.. माझे मित्र झालेत .” बोलता बोलता तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेत.
तसेही आपले म्हणण्यासारखे माझे दुसरे कोण आहे?
हेच माझे, मी यांचे.. निस्वार्थ प्रेम.. हसवतात ती मला.. माझे मित्र झालेत .” बोलता बोलता तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेत.
“प्रेम हे प्रेम असते, ते कायम आपल्या सोबतच असावे, हे गरजेचे नसते.. ते आनंदी तर आपण आनंदी.. हो ना?” कमल वेदकडे बघत म्हणाली.
“कुठल्या सीरियलचा डायलॉग हा? सुजल, प्रेरणा, तुलसी, कामिनी, दामिनी..?” वेद.
त्यावर ती खुदकन हसली.
“झोप का येत नव्हती?” वेदचा पुढला प्रश्न तयारच होता.
“ते असच.. असच आठवण येत होती..” ती त्याच्यापासून नजर चोरत म्हणाली.
“कुणाची आठवण? घरची?” वेद.
“ह? माझं तर कुठेच कुणी नाही.. कुणाची आठवण येणार मला? माझी कोण आठवण काढणार…” तिलाच कळत नव्हते ती काय बोलत आहे. जे मनात येईल ते ती बोलत होती. वेद कडे बघतांना तिला दिव्या त्याला कीस करणार होती, तोच प्रसंग वारंवार तिच्या डोळ्यांपुढे येत होता.
“कमsssssssल हॅपी बर्थडेsssssss..” उत्साहाने ओरडतच वेमिका कमलला शोधत बाहेर अंगणात आली.
“भैय्या तू इथे? आणि तू.. तू रडत का आहेस?” मध्यरात्री दोघांना तिथे बघून ती थोडी दचकली, त्यात कमलच्या डोळ्यात पाणी बघून तिला थोडे विचित्र वाटले.
“अ? नाही नाही.. काही नाही..” कमल आपले डोळे पुसत म्हणाली.
“भैय्या, तू तर हिला काही बोलला नाही ना?” वेमिका संशयित नजरेने वेदकडे बघत होती.
“मी कशाला काही बोलेल? मी काय मूर्ख वाटतोय का की उगाच तिला काही बोलेल?” तो बारीक डोळे करत वेमिकाकडे बघत होता.
“मग ही रडत का आहे, ते पण एवढया रात्री? आणि तू इथे काय करतोय?” वेमिका.
“इतक्या रात्री मला ही इथे एकटी दिसली. काही प्रोब्लेम झाला काय म्हणून बघायला आलो होतो. एक मिनिट तू आता काय ओरडत होती, हॅपी बर्थडे…” वेद.
“अरे हा.. आज कमलचा वाढदिवस आहे. सॉरी कमल, मला बारा वाजताच तुला विश करायचे होते, पण जागच नाही आली.. हॅपी बर्थडे कमल..” म्हणत वेमिकाने कमलला मीठी मारली, तशी कमल थोडी हसली.
“हम्म म्हणूनच ती रडत होती बहुतेक..” वेद.
“म्हणजे?” वेमिका.
“तिला बहुतेक आठवण येतेय.. आज तिचा वाढदिवस.. तिला झोप येत नव्हती.. म्हणून ती इथे एकटी…”
“ए वेडाबाई.. एकटी कशी काय? आम्ही आहोत ना सगळे. चल, मी तुझ्यासाठी किती म्हणजे किती गिफ्ट आणलेत बघ. मला उठायला थोडा उशीर झाला, मग त्यात घरभर तुला शोधत होते तर तू इथे सापडली.. आज शॉपिंगमुळे थकले होते ना.. झोप लागून गेली..” वेमिका.
“मला माहिती आहे, तू असताना मी एकटी कधीच असणार नाही..” कमल ओठांवर हसू आणण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
“मग रडत का होती?” वेमिका.
“माहिती नाही, असेच.. नाही कळत आहे मला काहीच.. पण आता तू आली ना, आता खूप छान वाटतेय..” कमल.
वेद मात्र कमलकडेच बघत उभा होता. तिच्या भावनांना समजण्याचा प्रयत्न करत होता.
“ये कमल, तू किती वर्षाची झाली ग?” वेमिका.
“अठरा..” कमल.
“पण मग ते तुझ्या लग्नाच्या वेळ तू इथे आली तेव्हा तो राजीव तर…”
“अरे वाह! म्हणजे तू आता बालिक झालीस तर.. “ वेद वेमिकाचे बोलणे मध्येच तोडत म्हणाला. आज कमलचा वाढदिवस, तिचा स्पेशल दिवस तर त्याला आज राजीवचे नाव पण ऐकायला नको वाटत होते आणि म्हणूनच तो मधात बोलला.
“म्हणजे?” कमल.
“म्हणजे तू आता मोठी झालीस.. कायद्याने..” वेमिका हसत म्हणाली.
“तू तुझ्या आयुष्याचे निर्णय तुझ्या हक्काने घेऊ शकते.. जे नाही आवडत, जे नको त्याला नकार देऊ शकते. तू तुझ्या हक्कासाठी लढू शकते.” वेद तिच्यावर नजर रोखत बोलत होता.
“म्हणजे?” कमलला तो कोणत्या अधिकाराबाबत बोलतोय, कळत नव्हते. वेमिकाला मात्र त्याचा बोलण्याचा पूर्ण अर्थ कळत होता.
“भैय्या सोड ना ते, आज तिचा वाढदिवस आहे.. कमल मी तुझ्यासाठी काय गिफ्ट घेतलेय, बघायला चल तरी..” वेमिका तिचा हात ओढत होती.
“हो चल.. तुला माहिती मला पहिल्यांदा वाढदिवसाला कोणीतरी काही गिफ्ट देतेय..” कमल पण तिला खूप उत्साह दाखवत म्हणाली आणि दोघी आतमध्ये जाऊ लागल्या.
“कमल…” वेदने पुढे जाणाऱ्या कमलला आवाज दिला.
“हा?” ती मागे वळत म्हणाली.
“हॅपी बर्थडे!” आपले दोन्ही हात मागे बांधून उभा तो कमलकडे बघत, चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणत म्हणाला.
त्याच्या त्या दोन शब्दांनी जसे काय तिला आयुष्यातील सर्वात सुंदर मौल्यवान शुभेच्छा मिळाल्या होत्या, असे तिच्या डोळ्यातील भाव होते. त्याच्या शुभेच्छांनी तिचे मन खूप आनंदले होते.
“थँक्यू!” कमल.
“पण माझ्याकडे वेमिका सारखे तुला द्यायला काहीच गिफ्ट नाही; हा पण तुला काही हवे असेल तर तू मला मागू शकते, मी ते आणून देईल..” वेद आश्र्वासकपणे म्हणाला.
“माझ्यासाठी तुमच्या शुभेच्छाच खूप आहेत, बाकी मला काही नकोय.” ती आनंदाने हसत म्हणाली.
“ओह एकता कपूरची हिरोईन, अगं अगं थांब..” वेमिका.
“काय झाले?” कमल.
“भैय्या अशी ऑफर कधीच देत नाही, म्हणजे आजपर्यंत त्याने कुणालाच काय हवे आहे, विचारले नाहीये. आता तो काही द्यायला तयार आहे, तर मागून घे..” वेमिका.
“पण खरंच, मला नको काहीच..” कमल.
“माग ग.. अशा गोष्टी नेहमी नेहमी घडत नसतात.. मागून घे जे हवय ते.. “ वेमिका.
“काही पण मागू?” कमल वेमिकाच्या कानात खुस्पुसली.
“हो हो.. घे मस्त क्रेडिट कार्ड मागून.. मस्त वर्षभर शॉपिंग करू..” वेमिका. त्यावर कमल हसली.
वेदला त्या दोघींना असे खुसपुस करतांना बघून खूप गम्मत वाटत होती. आणि आज तर तो कमलला काही पण द्यायला तयार होता, अगदी त्याचा जीव सुद्धा.. पोरगं तिच्या प्रेमात जे होतं.
“जे मागेल, ते देतील? पण मग दिव्या मॅडम?” कमल प्रश्नार्थक नजरेने दोघांना बघत होती.
“तिचे काय मध्येच आता?” वेमिका.
“त्या भार्गवच्या गर्लफ्रेंड आहे तर…तर त्यांना काय प्रोब्लेम झाला तर? यांचे कार्ड आपल्याकडे असेल तर त्या चिडणार ना?” कमल. वेदने ते ऐकून मनातच डोक्यावर हात मारला.
“ही ही ही.. कमल आपल्याला भलतेच वाटले होते, पण ते तसे नाहीये.. ती भैय्याची गर्लफ्रेंड नाही. तिचे तर लग्न झालेले आहे.” वेमिका हसत होती.
“पण मग ते… ते…” कमल आता बोलतांना अडखळत होती.
“कीस?” वेमिका.
“ह?” कमल.
कीस शब्द ऐकून वेदला आता फारच अवघडल्यासारखे झाले होते. कुठे आपला चेहरा लपवू, असे होत होते.
“भैय्याने आजपर्यंत कधीच कुठल्याही मुलीला आपल्या जवळ सुद्धा फिरकू दिले नाही तर ती त्याची गंमत करत होती, त्याला घाबरवत होती..” वेमिका.
ते ऐकून अचानक कुणीतरी कमलच्या हृदयावरील दगड उचलून फेकली, असे तिला वाटू लागले. आता परत तिच्या डोळ्यात पाणी जमू लागले होते, पण यावेळी ते आनंदाश्रू होते.
“ मी जे मागेल ते द्याल?” कमल वेदकडे बघत म्हणाली.
वेदने होकारार्थी मान हलवली.
“म्हणजे मी अशी ही गरीब, गावंढळ.. मी कोणाला आवडत पण नाही खास करून साहेबांसोबत असलेल्या माझ्या नात्यामुळे..”
“दिले….” तो तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच आपला हात पुढे करत म्हणाला.
“अरे पण तिने अजून काय हवे ते सांगितलेच नाही..” वेमिका त्याचा ‘दिले ‘ शब्द ऐकून मधात बोलली. तिला त्याचे वागणे थोडे विचित्र वाटत होते.
कमल बोलत असलेले प्रत्येक शब्द त्याच्या मनाला घायाळ करत होते. त्याला पुढे काहीच ऐकायचे नव्हते.. आणि तसे पण तो तिच्यासाठी काहीपण करू शकत होता, त्यामुळे त्याला आता कशानेच काही फरक पडणार नव्हता.
“मला कोणीच मित्र मैत्रीण नाहीत..” बोलतांना कमलचा आवाज थोडा कातर झाला होता.
“फ्रेंड्स..” म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.
“धत्तीच्या.. मागितले तर काय मागितले… तू बेवकुफच आहेस.. “ वेमिका हसत होती.
“वन्स अगेन हॅपी बर्थडे..” तो कमलच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला. त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आपोआप तिचे डोळे मिटल्या गेले आणि त्या मिटल्या डोळ्यांतून एक मोती तिच्या गालांवर ओघळत खाली आला.
दोघीही आतमध्ये जात होत्या. वेद तिथेच उभा त्याच्या हृदयातील त्या त्याच्या छोट्याश्या पिल्लूला आनंदाने जातांना बघत होता. त्याला आता ती त्याच्याच एक हिस्सा वाटत होती. तो तिला स्वतः मध्ये अनुभवत होता.
तिने त्याला त्याची मैत्री मागितली होती, त्यामुळे तो आता खूप खुश होता. थोड्या वेळ पूर्वी जे त्याला ब्रेकप झाल्यासारखे वाटत होते, ते कुठल्या कुठे पळून गेले होते. आता परत त्याला एक नवीन मार्ग दिसू लागला होता. प्रेमाची पहिली पायरी म्हणजे मैत्री.. आता मैत्री झाल्यामुळे त्याला तिला तिच्या भविष्याबद्दल, चांगल्या आयुष्याबद्दल समजावून सांगणे सोपी होईल, असे वाटत होते. आता परत तो आनंदाच्या रंगतरांगत उडू लागला होता.. एक नवी आशा प्रफुल्लित झाली होती.
******
क्रमशः
****