मिळावे तुझे तुला आस ही होती 38
दुसऱ्या दिवशी राजीव घरी परतला होता.
राजीवची रूम….
“हे कानातले?” हातात एक दारूचा ग्लास पकडत बेडवर बसल्या बसल्या राजीवने कमलला बघत विचारले.
“अ ते.. ते…” ती अडखळत होती. वेदचे नाव घेतले तर राजीव चिडणार, हे तिला माहिती होते. काय बोलावे तिला समजत नव्हते.
“अ ते.. ते…” ती अडखळत होती. वेदचे नाव घेतले तर राजीव चिडणार, हे तिला माहिती होते. काय बोलावे तिला समजत नव्हते.
“बोल..” राजीव हातातील ग्लास मधील एक एक सीप घेत बोलत होता.
“ते.. ते आजींनी.. म्हणजे मी घेणार नव्हती पण काल माझा वाढदिवस होता, म्हणून आजींनी दिले.” तिने जे डोक्यात आले ते सांगितले.
“वाह, मग तर रात्र स्पेशल करायला हवी.” राजीव तो तिच्या शरीरावरून नजर फिरवत म्हणाला.
तिला त्याची नजर x-ray पेक्षा पण जास्त तीक्ष्ण वाटत होती. जणूकाही कपड्यांच्या आतील पण त्याला दिसत असावे.
तिला त्याची नजर x-ray पेक्षा पण जास्त तीक्ष्ण वाटत होती. जणूकाही कपड्यांच्या आतील पण त्याला दिसत असावे.
ते ऐकून तिच्या मनात धडकी भारी.
“नो नो.. डोन्ट वरी.. आज तुझा स्पेशल डे आहे, सगळं जेंटली.. आवडेल तुला..” तो डोळे मिचकावत म्हणाला. ती मात्र त्याला नजर न देता इकडे तिकडे बघत होती.
“ओह एस, गिफ्ट.. गिफ्ट शोधते काय?” “ ते तिथे बॉक्स आहे, घे..” तो म्हणाला. तरी ती एका जागेवरच उभी होती.
“घे आणि घालून ये..” तो नेहमीच्या खड्या आवाजात म्हणाला.
त्याच्यासमोर काही बोलून काहीच फायदा नाही, तिला माहिती होते. जर नकार दिला तर तो चिडून जास्त त्रास देणार, म्हणून तिने गुपचूप तो बॉक्स घेतला आणि आतमध्ये गेली. कदाचित तिला माहिती होते त्यात काय आहे, म्हणून तिने तिथे उघडून बघण्याचे कष्ट सुद्धा घेतले नव्हते. त्यात एक आंतरवस्त्र सारखा झिरझिरीत ड्रेस होत, घातला की नाही घातला, काहीच फरक पडणार नाही असा. पण आता तिला तिच्या शरीरावर असे फार काही प्रेम उरले नव्हते. तो जे सांगेल, जसे सांगेल ती ते करत होती. त्याने सांगितल्याप्रमाणे ती तो ड्रेस घालून त्याच्या पुढे आली. त्याने तिचा हात पकडत तिला आपल्या मांडीवर बसवले. आधीच तो नशेत होता, त्यात तिच्या सौंदर्याची नशा त्याच्यावर जास्तच चढू लागली होती. जशी जशी रात्र चढत होती, त्याचा जोश वाढत चालला होता. मध्येच त्याच्या ड्रिंकची बॉटल संपली आणि त्याची नशा कमी होऊ लागली.
“कमल, पेग घेऊन ये..” त्याने ऑर्डर सोडली.
तिने होकारार्थी मान हलवली आणि दुसरी बॉटल आणण्यासाठी तिथेच बाहेर असणाऱ्या बार एरिया मध्ये गेली. पण राजीवला कमल दूर गेल्यामुळे आणि ड्रिंक संपल्यामुळे अगदी अस्वस्थ होत होते. त्या दोन्ही शिवाय त्याला रहावले जात नव्हते. आणि तो उठून सरळ बाहेर येत बार एरिया, जिथे कमल होती तिथे गेला. कमल बॉटल घेतच होती की त्याने मागूनच तिच्या कंबरेत हात घालत, तिच्या खांद्यावर हनुवटी ऋतवत, तिला करकचून मीठी मारली.
“इथेच ड्रिंक बनव..” म्हणत त्याने तिच्या मानेवर, गळ्यावर त्याच्या ओठांचे स्पर्श करण्यात सुरुवात केली.
आज ऑफिसमध्ये वेदला खूप काम होते, त्यामुळे त्याला घरी यायला मध्यरात्रच झाली होती. तो खूप थकला होता, अंग अकडले होते. थकल्यामुळे डोळे कधीही बंद होणार होते. सरळ जाऊन तो झोपणार होता. झपझप पावले टाकत तो वरती आपल्या रूमकडे निघाला होता. सगळीकडे अंधार असला तरी सगळीकडे डिम लाईटचा मंद असा प्रकाश पसरला होता, त्यामुळे बऱ्यापैकी आजूबाजूच्या आकृत्या दिसत होत्या.
“मम्म कमल… वन मोअर हिअर..”
वेद आपल्या रुमकडे जात होतच की त्याच्या कानावर ‘कमल” शब्द पडला आणि नकळतपणे त्याची पाऊले त्यादिशेने वळली. तो बार एरियाकडे जाऊ लागला. तो आतमध्ये जाणार होताच की समोरचे दृश्य बघून त्याचे पाय जागीच थांबले.
राजीवने बर्फ पकडायच्या चीमट्यात बर्फ पकडला होता आणि तो बर्फ तिच्या गळ्यावरून फिरवत होता.
“स्स…” कमलच्या गळ्याला लागलेल्या जखमेला त्या चिमट्याच्या स्पर्शाने थोडी वेदना झाली आणि वेदनादायी सुस्कारा तिच्या तोंडून बाहेर पडला. डोळयात पाणी तरळले. तिच्या आवाजाने तो आणखीच उत्तेजीत झाला होता. त्याचा आवेग आणखी वाढला होता.
ते बघून वेदच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळ्यात राग उतरला होता. रागाने अंग थरथरत होते. त्याचा स्वतः वरील संयम सुटत चालला होता. तिला त्या अवस्थेत बघून त्याच्या हृदयात सुया टोचत होत्या.. दुःख, राग, वेदना, हतबलता सगळं एका वेळी तो अनुभवत होता.
आता राजीवने बाजूला ठेवलेला ग्लास हातात घेतला आणि त्यातील रम तिच्या गळ्यावर ओतली. तिला ती दारू तिच्या अंगावरुन खाली ओघळू लागली. तो हळूहळू तिचे रसपान करु लागला..तिला त्याचा खूप किळस येत होता. ती त्याच्यापासून स्वतःची मान वळवत, मागे झुकत, दूर होण्याचा प्रयत्न करत होती.
“खच…..” काच फुटण्याचा आवाज झाला तसे राजीव कमलच्या दूर होत आवाज जिथून आला तिकडे बघू लागला. कमलचे लक्ष दाराकडे गेले तर वेद उभा होता. त्याच्या डोळ्यात राग उफाळून आला होता..
जेव्हा राजीव कमलच्या जवळ गेला होता, तेव्हा वेदच्या मनावरचा, शरीरावरचा ताबा सुटला होता. बाजूला असलेली फुलदाणी त्याच्या हाताला लागली होती. ती गच्च पकडत त्याने ती बारच्या बॉटल्सवर फेकून मारली होती.
“व्हॉटस् धिस नॉनसेन्स?” राजीव चिडून वेदकडे बघत म्हणाला.
“घरात बेडरूम आहे ना..” वेद आपले दात घट्ट आवळत म्हणाला.
“देन व्हॉट?” राजीव.
“लाज शरम तर तुम्ही विकून खाल्ली..पण घरात तुमचीच लहान मुलगी आहे, याचे भान असू द्या..” वेद
“माझा बाप बनायचा प्रयत्न करू नको. माझं घर आहे, मला जिथे जे वाटेल तिथे ते करेल. आवडत नसेल तर डोळे मिटून घे. ऑर व्हॉट, मी तर म्हणतो तू पण एन्जॉय कर.. गर्लफ्रेंड, कॉल गर्ल.. बोलाव, मस्त एन्जॉय कर… इथे घरात बोलावली तरी I won't mind.. “
वेद खूप रागाने त्याच्याकडे बघत होता.
“ओह, डील अवडळी नाही? माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे.. एक्सचेंज ऑफर आहे.. तुझे झाले की त्यांना माझ्याकडे पाठवून दे.. I will pay double.. आणि माझे झाले की मी कमलला तुझ्याकडे पाठवून देतो.. मिळून मजा मारू..” राजीव.
ते ऐकून कमल तर अवाक् झाली होती. डोळे फाडून राजीवकडे बघत होती. नवरा म्हणून तिने कसेतरी त्याचा स्वीकार केला होता. पण आता, आता तर तो चक्क तिच्यात आणि एखाद्या वैश्येत काही फरक समजत नव्हता.
“यू बास्टर्ड…” रागाने त्याच्या कपाळाच्या नसा फुटतात की काय, एवढया फुगल्या होत्या. त्याच्या तोंडून कमल बद्दल निघालेले शब्दांनी त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. त्याला राजीवचा जीव घ्यावा वाटत होता.
“होपलेस.. सगळा मुड खराब केला. कमल ड्रिंक्स घेऊन ये..” म्हणत राजीव तिथून रूमकडे जायला निघाला.
“मी काय, कुठे करायचे, मला शिकवायचे नाही. गेट लॉस्ट..” वेद जवळ येऊन तो म्हणाला आणि आपल्या रूम मध्ये गेला.
आता तिथे फक्त वेद आणि कमल होते. तो तिच्याकडे खूप रागाने बघत होता. कमलला त्याची तो नजर सहन होत नव्हती. ती मागे वळून राजीव साठी बॉटल शोधू लागली. बेड सरळ तिच्या जवळ गेला आणि त्याने तिचा हात पकडत, तो मुरगळला आणि तिला स्वतःकडे वळवले.
“हा तुझा सो कॉल्ड नवरा..ज्याला स्वतःच्या बायकोचा काहीच मानसन्मान नाही, जो आपल्या बायको आणि कॉल गर्ल मध्ये काही फरक करत नाही.. दुसऱ्या पुरुषाकडे पाठवायच्या गोष्टी करतो.. त्याच्यासोबत राहायचे तुला.. “ दातावर दात घासत, तिचा हात आणखी जास्त आवळत तो तिच्या डोळ्यात बघत बोलत होता.
त्याने तिचा हात इतका आवळला होता की तिला आता दुखायला लागले होते. पण त्यापेक्षा ही जास्त ती त्याच्या जवळ आल्याने अस्वस्थ झाली होती. आपल्या एका हाताने तिने तिचे तिकडे कपडे, तिचे उघडे अंग त्याच्यापासून लपविण्याचा प्रयत्न करत होती.
“तुला स्वतःचा मानसन्मान काही आहे की नाही?” तो परत तिच्यावर ओरडला. पण तरी ती तिच्या खांद्यावरून खाली येणारा तिचा ड्रेस सावरण्याचा प्रयत्न करत होती.
“स्टॉप इट.. “ तो जोराने ओरडला. त्याच्या आवाजाने ती एकदम घाबरली होती. अंग थरथर कापत होते. भेदरलेल्या नजरेने त्याला बघत होती.
“मी तुझे शरीर बघत नाही.. मला ते बघायची गरज सुद्धा वाटत नाही.. मला ते दिसतही नाही..” तो चिडून म्हणाला. ती मात्र चुपचाप आवंढा गिटकत होती.
“हे असे उघडे अंग नाही आवडत ना? मग सांगता येत नाही त्याला? काल त्या वेमिकाने थोडेसे फॅशनेबल ड्रेस काय गिफ्ट दिले, तर तिला सरळ नकार दिला. त्या राजीवला नकार नाही देता आला? शरीराचा बाजार करून झालाय आणि आता माझ्या पुढे लपवून काय मिळणार आहे?”
तरीसुद्धा ती काहीच बोलत नव्हती. त्याचे सगळे प्रश्न, बोलणे तर बरोबरच होते. काय बोलणार होती ती त्याच्यापुढे? राजीव समोर तर खरंच तिच्या आयुष्याचा बाजार झाला होता, पण ती आपल्या मित्रापुढे आपली थोडीशी इज्जत वाचवू बघत होती.
“बोल…” वेद चिडत होता. पण ती काहीच बोलत नव्हती. त्याच्या सहनशक्तीचा अंत होत होता.
“बोल ड्यामेट… स्वतःसाठी तरी बोल..” दुसऱ्या हाताने तिचा जबडा घट्ट पकडत तो म्हणाला.
“माझा.. माझा हात..” ती कसेबसे म्हणाली. तसे त्याने तिचा हात सोडला.
ती पुढे काहीच न बोलता, एक बॉटल घेऊन, डोळ्यातील आपले अश्रू पुसत तिथून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता.
त्याच्या डोळ्यांसमोर कमलला, तिच्या मानेला, गळ्याला, तिच्या ओठांना स्पर्श काय अक्षरशः तिला खाणारा राजीव येत होता. त्याला आता सगळंच असह्य व्हायला लागले होते. श्वास घ्यायला जड जात होते.
“आ sssss….” बार असल्या नसल्या सगळ्या बाटलांवर हात मारत सगळ्या बाटला फोडल्या. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, हृदय रडायला लागले होते.
*****
क्रमशः