Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ३९

कमल वेद
मिळावे तुझे तुला आस ही ओठी 39

पूर्वार्ध:

“मला नकोय कुणाचे काही…ना मैत्री ना काळजी ना प्रेम..” वेद चिडत म्हणाला आणि आपल्या रूमकडे जायला निघाला.

त्याचे बोलणे ऐकून कमलचे अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यातून पाणी गालांवर ओघळू लागले.

“त्याचे बोलणे मनाला लावून घेऊ नको, काहीतरी कामाचा ताण असेल..” आजी तिला समजावत म्हणाल्या. एका हाताने डोळे पुसत तिने होकारार्थी मान हलवली. डोळे पुसायला तिने हात थोडा वरती केला तर हातातील बांगड्या खाली सरकल्या होत्या.

आता पुढे…

“कमल, हे हाताला काय झालेय? हे निशाण कसले?” वेमिकाला तिच्या मनगटा भोवती काळपट लाल असे बोटांचे निशाण दिसले.

पायऱ्या चढणाऱ्या वेदच्या कानावर वेमिकाचे शब्द पडले आणि त्याचे पाय तिथेच रेंगाळले.

“अ काही नाही, ते असेच. पिहू, चल आपण तुझी बॅग घेऊन येऊ. नाहीतर शाळेला जायला उशीर व्हायचा..” पिहूचा हात पकडत ती पिहूच्या खोलीत गेली.

“वेमिका, आज पिहुला शाळेत सोडायला जा.” वेद मागे वळत वेमिकाला म्हणाला.

“पण रोज कमल तिला सोडायला जाते.” वेमिका.

“शी इज टायर्ड, लेट टेक हर रेस्ट..” वेद.

“हे बरंय भैय्या तुझं, आधी आपणच रागवायचे, रडवायचे आणि मग काळजी घ्यायचे.. किती हर्ट केलंस तू तिला.. त्या राजीवचा राग तिच्यावर नको काढू.” वेमिका.

“मघाशी डोक्यावर पडणार होती ती.. “ वेद.

“त्या नवरा बायकोमध्ये आपण काय बोलायचे?” वेमिका.

“तिच्या डोक्याला लागले असते..” वेद.

“आपण काही बोललेले तो राजीव खपवून घेतो काय?”

“ तिला जखम झाली असती, कदाचित जास्ती पण लागले असते. तिच्या जिवावर बेतले असते.” वेदचा आवाज जड झाला होता. कंठ दाटून आला होता.

“ अरे पण तिला काही लागले नाही ना..”

“मग लागायची वाट बघायची का? तिला काही झाले असते तर मी…” तो बऱ्यापैकी स्वतःच्या भावना कंट्रोल करत बोलत होता.

“भैय्या..” वेमिका अजब नजरेने त्याला बघत होती.

“मला तो राजीव अजिबात आवडत नाही..” आपण काय बोलायला जात होतो, हे त्याला एकदम लक्षात आले आणि त्याने गोष्ट फिरवली.

“आय नो, तुला राजीव आवडत नाही.. पण म्हणून त्याचा राग कमालवर काढणे, योग्य नाही.”

त्याने एकदा तिच्याकडे अन् आजीकडे बघितले आणि वरती आपल्या खोलीत गेला.

“रमाआजी, हा भैय्या आजकाल थोडा विचित्र नाही वागत?” वेदच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असलेल्या आजींना ती म्हणाली.

“हम्म.. मोठा झालाय.. जबाबदारी घ्यायला लागलाय..” आजी.

“काय माहिती.. कधी कधी गोड तर कधी सनकी.. कमल घरात यायच्या आधी तरी तो कायम एका मूडमध्ये असायचा, एकदम रागिष्ट. आता तर त्याचे फारच मूड स्विंग्ज व्हायला लागलेत, प्रेग्नंट मुलीचे पण होणार नाहीत इतके..” वेमिका हसत होती.

“चल जा, पिहुला शाळेत सोड.” आजी हसत म्हणाली.

“हो मी बाहेर आहे.. बॅग घेऊन येतेय ती..” म्हणत वेमिका बाहेर गेली.

“ पिहू, डब्बा पूर्ण संपवायचा आणि पाणी पण.. तुझी वॉटरबॉटल अर्धी पण रिकामी होत नाही.” कमल पिहूला तिची बॅग देत काही सूचना देत होती.

“पण पाणी खूप पिले तर खूपदा सुसू येते..”

“काही होत नाही, आली तर येऊ द्यायचे. पण नाही पिले तर गोल गोल फिरल्यासारखे होते ना? म्हणून पूर्ण पाणी संपवायचे आणि बाकीच्यांना पण सांग.”

“पण कमल..”

“पिहू, दीदी वाट बघत आहे, जा लवकर..” पिहू बोलतच होती की वेदचा आवाज आला. दोघींनी बघितले तर तो दारात उभा होता.

“चल कमल..” पिहू तिचा हात पकडत म्हणाली.

“आज वेमिका तुला शाळेत पोहोचवायला येतेय.. जा उशीर होईल.” वेद.

“Yipiii..” आनंदी होत तिने कमलला इशाऱ्याने खाली वाकायला सांगितले. तशी ती गुडघ्यांवर खाली बसली.

“भैय्याला नाश्ता खायचा नसेल, म्हणून तो नाटकं करत असेल.. तू मला कसे खाऊ घालते, तसे त्याला खाऊ घाल, मग खाईल तो.. आणि अजिबात रडू नको हा. तो जर रागावला ना तर मला सांग, मी त्याला रागवेल..” पिहू कमलच्या कानात खुसुरपुसुर करत होती.

कमलने होकारार्थी मान हलवली. पिहुने तिच्या गळ्यात हात टाकत तिच्या गालावर छोटेसे किस केले.

“टाटा..” पिहू हसत म्हणाली आणि आपली बॅग घेऊन तिरप्या नजरेने बघत बघत वेद जवळ जात होती. वेद पण तिच्याकडे एक भूवई उंचावत तिच्याकडे बघत होता. ती आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवत, डोळे बारीक करत वेदकडे बघत होती.

“व्हॉट?” वेद पण बारीक डोळे करत तिच्याकडे बघत म्हणाला.

“भैय्या, जर तू परत कमलला रागावला आणि तिला रडवले तर बघ गाठ माझ्याशी आहे.” ती ठसक्यात म्हणाली.

पिहुचे बोलणे ऐकून कमलच्या ओठांवर स्मित पसरले.

“अच्छा… काय करणार तू?” तो तिला कडेवर उचलून घेत म्हणाला.

“मी.. मी.. मी कट्टी करेल तुझ्यासोबत.. आणि आजीला पण कट्टी घ्यायला सांगेल आणि दिदीला पण आणि कमलला पण...“ ती आपल्या गोड आवाजात त्याला दटावत म्हणाली.
त्याची एक भुवई उंच गेली.

“आणि मी बोलणारच नाही तुझ्यासोबत आणि कमल, याच्याशी अजिबात बोलू नको हा..” पिहू तिच्याकडे बघत म्हणाली.

“अरे बापरे, एवढी मोठी पनिशमेंट?” वेद.

“हो मग तू शारखा शारखा रागावतो ना.” ती ओठ बाहेर काढत म्हणाली.

“माझे ऐकले तर मी का रागावणार?” तो तिच्या गालावर किस करत म्हणाला.

“कमल, भैय्याचे ऐक, मग तो रागावत नाही, फक्त लव करतो जसे आता मला केले.. हो ना भैय्या?” पिहू.
ते ऐकून त्याच्या ओठांवर हसू उमलले. कमलला मात्र थोडे अवघडल्या सारखे झाले होते. पण दिवसेंदिवस बहरू लागणारे वेद आणि पिहुचे नाते बघून ती मनातून खुप खुश होती.

“ चल पळ आता, नाहीतर वेमिकाचा मुड चेंज होईल..” तो तिला खाली उतरवत म्हणाला.

“बाय..” म्हणत पिहू बाहेर पळाली सुद्धा.

पिहू गेली तसे तिथे खोलीत एकदम शांतता पसरली. वेद एकटक तिच्याकडे बघत होता. ती बऱ्याच वेळ मान खाली घालून उभी होती. कोणीच काही बोलत नाहीये बघून ती खाली बघतच बाहेर जाऊ लागली. तेवढयात त्याने तिचा हात पकडला. झालं, परत तो चिडतोय का म्हणून तिच्या हृदयाची धडधड दुप्पट गतीने वाढली होती.

“दोन दिवसच झालेत, माझे मित्र बनलेत नी आता परत आधीसारखे चिडायला लागले. काबरे माझ्यावर रागावले, मी काय केले? मला खरंच यांना त्रास नाही द्यायचा..” ती त्याच्याकडे बघत होती पण मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. त्यात तो तिच्या इतक्या जवळ आला होता की तिला काहीच सुचानासे होत होते.