Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४१

कमल वेद
मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४१

पूर्वार्ध:

वेद कमलला तिने तिचे शिक्षण पूर्ण करावे म्हणून तयार करतो आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतो.

पुढे….


कमल पुढे शिकण्यासाठी तयार झाली म्हणून वेद मनोमन खूप खुश होता. त्याचे तिच्यावर प्रेम तर होतेच, ते तो मिळवणारच होता पण तिने तिच्या आयुष्यात स्वावलंबी बनावे हे त्याला ती घरात आल्यापासून वाटत होते. तिला तिच्या हक्काचे आयुष्य मिळावे, तिला तिच्या आवडीने तिचे आयुष्य जगता यावे, हीच त्याची इच्छा होती आणि त्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे असते, हे त्याला माहिती होते. त्यामुळे कमलने शिक्षणासाठी होकार दिला, तिच्या आयुष्याच्या सुखाची एक पायरी ती चढली होती आणि ते बघूनच तो खूप खुश होता. त्याच्या मनावरील मरगळ बरीच कमी झाली होती. सगळं सहज घडणार नाही, हे त्याला माहिती होते आणि त्यासाठी तो सगळे परिश्रम घेणार होता.

सकाळी उठून प्रसन्न मनाने वेदने ऑफिसला जाण्याची तयारी केली आणि नाश्त्यासाठी तो खाली आला. सगळे नाश्त्यासाठी बसले होते. राजीव सुद्धा होता. आजी पिहूला खाण्यासाठी मदत करत होती. वेमिका अधून मधून राजीवकडे बघत, तोंड वाकडं करत खात होती. ते बघून वेदला गालातच हसू आले. त्याची नजर किचनकडे भिरभिरत होती. पण खूप वेळ झाला तरी कमल त्याला दिसली नव्हती. नाश्ता, चहा देताना रोज पुढे पुढे करणारी कमल आज दिसत नव्हती, त्याला थोडे वेगळे वाटले.

“वेद, ऑफीसला जाता जाता पिहूला शाळेत सोड.” आजी म्हणाल्या.

“कमल?” तो विचारातच होता की राजीव नजर वर करत त्याच्याकडे बघू लागला.

“पिहूला रोज कमल शाळेत पोहचवते..” वेद राजीवकडे दुर्लक्ष करत, आपल्या प्लेट मधले खात म्हणाला.

“तिला थोडे बरे वाटत नाहीये. मीच म्हणाले थोडा आराम कर.” आजी.

“का, काय झाले?” वेद.

“बोललेच साहेब. आमच्या लाईफमध्ये नाक खुपसायची सवयच झाली आहे. याने आमचे पर्सनल मोमेंट सुद्धा पर्सनल राहू दिले नाहीत.” राजीव वेदकडे बघत तिरकसपणे म्हणाला.

तसे आजी आणि वेमिका वेदकडे बघू लागल्या.

“सज्जन माणसांना काही गोष्टी रुमच्या आतमध्ये शोभतात, बाहेर नाही. हा पण सज्जन शब्दाचा आणि आपला काय संबंध म्हणा..” वेदने सुद्धा तसेच तिरकसपणे उत्तर दिले. ते ऐकून राजीवला चांगलाच राग आला होता.

“ घर माझं आहे, मी कुठे काय करायचे कोणी मला शिकवायची हिम्मत करू नका.” राजीव.

“ बरोबर आहे. आपल्याला लहान मुलगी आहे, हे सुद्धा लक्षात असू नये.. करा कुठेही काही करा. मर्यादा नावाची गोष्ट आपल्यासाठी बनलीच नाहीये. (कमलला आठवत) कोणीतरी आहे जे या घराला मंदिर बनवू पाहताय आणि तुम्ही….” बोलताबोलता त्याचे लक्ष पिहुकडे गेले आणि वेद चूप झाला.

आजींनी सविताला डोळ्यांनीच खुणावले, तसे ती पिहूला आतमध्ये घेऊन गेली.

“पिहू वगळता इथे बाकी सर्वांनाच समजते की लग्नानंतर कपल काय करत असतात.” बोलता बोलता राजीवचे लक्ष वेमिकाकडे गेले, “ ओह! येस येस, हाऊ आय कॅन फॉर्गेट, लग्नानंतरच काही करायचे असते, असे कुठे असते? आधी सुद्धा बॉयफ्रेंड सोबत पाहिजे ते करूच शकतो.. मग एक बॉयफ्रेंडने सोडले की दुसरा बॉयफ्रेंड, मग तिसरा.. हो ना वेमिका?” राजीव कुत्सितपणे हसत होता. ते ऐकून वेमिकाचे डोळे रागाने लाल झाले.

“यूssss.. माईंड युअर लँग्वेज.. माझ्या बहिणी विरुद्ध, रादर या घरातील कुणाही विरुद्ध मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. सो स्टे इन युवर लिमिट्स.” वेद रागाने म्हणाला.

“अँड यू, तुझ्या या मंदिर सारख्या घराचा तमाशा करण्यात मला दोन क्षण सुद्धा लागणार नाही. सो डोन्ट क्रॉस युवर लिमिट्स. पिहू आणि घरातील सर्व महिला खाली राहतात. तूच एक वर आहेस, तुला एवढाच त्रास होत असेल तर तू खाली शिफ्ट होऊ शकतोस.” राजीवने कोट उचलला आणि जायला लागला आणि वेद जवळ येऊन थांबला.

“ बाय द वे, तुला कळते का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत असताना काय करतात ते? नाही म्हणजे तुला गर्लफ्रेंड नाही आणि आधीही नव्हती, म्हणून विचारतोय? की मग त्या तसल्या व्हिडिओज मधुन भागवून घेतो? मी तर म्हणतो आमचा रोमान्स बघ आणि शिक काही. तू ते तसले व्हिडिओ तर बघतच असशील.. लाईव्ह दाखवतोय मी, एन्जॉय कर..” तो एक डोळा मारत, हळूच वेदला म्हणाला आणि बाहेर निघून गेला.

वेदच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या, डोळे रागाने लाल झाले होते.

“वेद, बाळा, सोड त्याला, लक्ष देऊ नकोस..” आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या.

“भैय्या, इग्नोर हीम.. मूर्ख आहे तो.” वेमिका.

“वेमिका, राजीवने लिमिट सोडली म्हणून आपण आपली लिमिट सोडायची काय? तुझा बाप आहे तो..” आजीने खडसावले.

“बाप? माय फूट.. आपल्या मुलीसोबत बाप असा बोलतो का? मी त्याला बाप वगैरे मनात नाही. आणि रमाआजी, तुम पण याची कधी आठवण करून देऊ नको.” राजीवच्या बोलण्याने ती सुद्धा रागावली होतीच.

“कितीही नाकारलं तरी नातं बदलत नसते वेमिका.. तुम्ही मानत नसलात, तरी या समाजासाठी, दूनियेसाठी तो तुमचा बापच आहे. बरं असू दे, पण नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या मर्यादा कधीच सोडायच्या नाहीत.” आजी.

“व्हॉटएवर.. भैय्या सोड त्याला, तू त्याच्यासोबत बोलावे, एवढी त्याची लायकी नाही. मी काय म्हणते, तू खालीच शिफ्ट हो ना.. खालच्या रूम्स पण छान आणि मोठ्या आहेत.” वेमिका.

“नाही. मी ठीक आहे.” वेद.

“अरे पण तो उगीच काही काही बोलतो..”

“वेमिका असू दे.” आजी.

“अगं पण..”

“त्या खोलीत त्याचे बालपण गेलेय, त्याचे आई बाबा सोबत.. त्यांची खोली आहे ती.. असू दे. तसेही माझा वेद एवढा कमजोर नाही, एवढया तेवढयाने खोली अन् घर सोडणारा. जा पिहूला घेऊन ये.” आजी.

परत वेदचे मन कमलकडे धावू लागले.

“कमलला काय झाले?” न राहवून त्याने परत विचारले.

“भैय्या, मे बी सम गर्ल्स काईंड ऑफ प्रोब्लेम नाहीतर राजीवने तिला काहीतरी जास्त त्रास दिला असेल. आराम करत असेल. डोन्ट वरी.” वेमिकाने आपला अंदाज वर्तवला.

“हम्म..” वेद आपल्या विचारात हरवला.

“पिहू, चल आवर पटकन, आज भैय्या तुला शाळेत सोडतोय..” आजी तिला येताना बघून म्हणाली.

“हो, मी आलोच..” म्हणत तो वरती आपल्या खोलीकडे जायला निघाला. तिला बघितल्या शिवाय त्याचे पाय पुढे जात नव्हते. तिला सुखरूप एक नजर बघून घ्यावे म्हणून तो उगीच काहीतरी काम काढून वरती गेला होता. त्याने राजीवच्या खोलीत डोकावून बघितले, तर ती तिथे नव्हती.

राजीव ऑफीसला गेला की ती त्या खोलीत थांबत नसे, पलीकडे असलेल्या गेस्टरूम किंवा खाली पिहूच्या खोलीत बहुतेक वेळ घालवायची. कमल खाली नाहीये म्हणजे वरती गेस्टरूम मध्ये असेल, असा अंदाज लावत तो पुढे गेस्टरूम मध्ये गेला. तर खरंच कमल तिथे बेडवर झोपलेली दिसत होती. चेहऱ्यावरून थकलेली वाटत होती. ताप वगैरे काही आहे की काय, उगाच त्याच्या मनात आले आणि त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. ताप नव्हता, तसे त्याला बरे वाटले. वेमिका म्हणाली, तसेच काहीतरी मुलींचा प्रॉब्लेम असेल, असे त्याला वाटले. तो परत जात होताच की त्याच्या डोक्यात वेमिकाचे शब्द आले, “राजीवनेच तिला काही त्रास दिला असेल.” ‘राजीवच काही अनैसर्गिक असे वागला तर नाही’, त्याच्या डोक्यात आले. तो परत फिरला आणि तिच्याजवळ येऊन उभा राहिला. त्याची नजर जाईल, असे तिच्या शरीराचे सगळे भाग तो बघत होता. कुठे काही लागलेले, जखम वगैरे आहे का, तो ते तपासत होता. वरतून तर ती तशी ठीक दिसत होती, झाकलेल्या अंगावर काही असेल का?असे वाटून गेले. त्याला सुरुवातीचे काही दिवस आठवले, जेव्हा तिच्या कंबरेजवळ भाजल्यांचे निशाण होते. तिचे कपडे वर करून बघावे का? असेही त्याच्या डोक्यात आले होते, पण त्याने ते टाळले. कारण ती उठली तर तिला तिच्या परवानगीशिवाय तिच्या शरीराला हात लावलेले आवडणार नाही, असे वाटून गेले. मागे त्याने तिला मलम लावून दिला होता तेव्हा ती तापाच्या ग्लानीत होती. त्यामुळे तेव्हा तिला काहीही कळले नव्हते, पण आता तसे नव्हते, ती फक्त झोपली होती. म्हणून मग त्याने त्याच्या मनावर आवर घातला. एक नजर तिला बघून, तो बाहेर निघून गेला.

क्रमशः


वेदच्या नात्यांचा खुलासा...

वेदचे आईवडील.. आई मरते म्हणून वेदचे वडील हेमंत, राधिका सोबत दुसरे लग्न करतात. तेव्हा त्यांना वेमिका ही मुलगी होते जी वेद ची सावत्र बहीण आहे.

हेमंत एका accident मध्ये मरतात.. राधिका राजीव सोबत लग्न करते. त्यांना पिहू हे अपत्य होते.