Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४५

कमल वेद
मिळावे तुझे तुला आस ही ओठी 45

पूर्वार्ध:

“मिस्टर राजीव, आय गेस तुम्ही ही डील नाकारून लॉसमध्ये जात आहात. तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीसाठी वारसदार नको का? मुलगा नको का? नाही म्हणजे तुम्हाला मुलगा नसला तर माझ्यासाठी ते उत्तमच असणार आहे. पुढे जाऊन हे सगळं मलाच बघायचं आहे, आपोआप मीच वारसदार होणार आणि मग हे सगळं माझं होणार.. वॉव!” वेद थोडासा अजिबपणे हसत म्हणाला.

आजी आणि वेमिका खूप अजीब नजरेने त्याला बघत होत्या.
पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यमागे हे सगळे बोलताना त्याच्या हृदयावर किती घाव होत होते, हे त्यालाच काळात होते.

पुढे….

“तुला हवे आहे म्हणून मी परवानगी देतोय पण माझ्या रूटीनमध्ये काहीही चेंजेस व्हायला नकोत.” राजीव कमलला म्हणाला. कुठेतरी वेद चे बोलणे त्याला पटले होते, पिहू होतीच पण त्याला मुलगा वारसदार हवाच होता. त्याची मालमत्ता तो नक्कीच दुसऱ्या कोणाला देणार नव्हता. त्याचे त्याच्या प्रॉपर्टीवर खूप प्रेम होते आणि म्हणून त्याने कमलला परवानगी दिली.

ते ऐकून कमल खूप आनंदली. तिच्या आनंदी चेहऱ्यावरून वेदची नजर हटत नव्हती पण समोर राजीव बसला होता. त्याने तिचे ते आनंदी रूप डोळ्यात भरून घेतले आणि चुपचाप आपला नाश्ता करू लागला.

“पिहू, चल बॅग घेऊन ये, शाळेत जायचे आहे..” म्हणत कमल पिहू सोबत आतमध्ये निघून गेली. इकडे राजीव सुद्धा आपला नाश्ता आटोपून ऑफिससाठी निघून गेला.

“कधी नाही ते मला त्या राक्षसाचे बोलणे यावेळी पटले होते, तू का मध्येच त्या कमलची बाजू घेऊन बोलला? रमा आजी तू पण, तिला समजावयाचे सोडून टी राजीवला कसली गूड न्यूज सांगत होती..” वेमिका बोलत होती पण वेदचे सगळे लक्ष समोरून पिहुच्या मागून पळत येणाऱ्या कमलकडे होते.

“ ती तर एक मूर्ख आहेच, तुम्ही बाकीचे पण तिच्यासोबत मूर्ख का बनत चाललात? कोणीच प्रॅक्टिक नाहीये इथे, सगळेच भावनेत वाहून चाललात..”

“कमल sss..” अगदी क्षणातच वेद कमल जवळ पोहचला होता आणि त्याने तिला तिच्या कंबरेत पकडत तिला स्वतःकडे ओढले. तिने घाबरून त्याच्या शर्टच्या कॉलर घट्ट पकडून ठेवले होते. घाबरल्यामुळे तिने डोळे गच्च मिटले होते अन् तिचे जोरजोराने श्वास सुरू होते जे वेदच्या मानेवर आदळत होते. भीतीने तिच्या हृदयाची वाढलेली स्पंदने त्याला जाणवत होती. तिच्या भोवती असलेले त्याचे हात आणखी घट्ट झाले आणि तिला आपल्या छातीशी पकडून ठेवले. तो तिच्या गच्च मिटलेल्या डोळ्यांकडेच बघत होता.

पिहुच्या मागे येत असताना कमलचा पाय खाली असलेल्या कार्पेटमध्ये अडकला होता आणि ती तोल जाऊन खाली पडणारच होती की तेवढयात वेदने तिला पकडले होते.

“घाबरु नकोस, तू ठीक आहे. आता डोळे उघड बघू.” आजी म्हणाली. तसे तिने डोळे उघडले. बघितले तर ती वेदच्या मिठीत होती. तिने त्याच्याकडे बघितले तर त्याच्या डोळ्यात तिला भीतीयुक्त काळजी दिसत होती.

“कमल, तू ठीक आहे?” वेमिकाच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याने त्याची नजर तिच्यावरून हटवली पण तिच्या भोवती असलेली त्याची पकड मात्र त्याने तशीच ठेवली होती.

“हो..” कमल म्हणाली. तसे त्याने त्याची मिठी सैल करत तो तिच्या थोडे दूर जाऊन उभा राहिला आणि थोडे मोठ्याने श्वास घेऊ लागला. ती पडेल या भीतीनेच त्याचे हार्टबिट्स स्कीप झाले होते. त्याला थोडे रेस्टलेस झाल्यासारखे वाटत होते.

“कमल, भैय्या वेळेत नसता आला तर पडली असतीस ना? तुला कळते की नाही काही?” वेमिका तिला रागावत होती.

“कमल, आता हा अल्लडपणा कमी करावा लागेल. सुरुवातीचे महिने खूप नाजूक असतात बाळा, खूप काळजी घ्यावी लागते. आता अजिबात असे धावायचे, पळायचे नाही. अगदी हळूहळू, जपुन एक एक पाऊल टाकायचे.” आजी तिला मायेने समजावत होती.

तिने होकारार्थी मान हलवली.

“काही नाही आजी, ही आता हो म्हणतेय, उद्या परत विसरेल आणि आपल्या मूळ पदावर येईल.” वेमिका चिडत म्हणाली.

“ती लक्षात ठेवेल.. हो ना कमल?” आजी म्हणाली तसे तिने परत मान हलवली.

“ती ठीक आहे.” आजी वेद जवळ जात त्याच्या पाठीवरून हात फिरवत, त्याला शांत करत म्हणाली. त्याने होकारार्थी मान हलवली.

“कमल चल ना, शाळेला उशीर होत आहे..” पिहुचा आवाज आला तसे वेद तिच्याजवळ गेला.

“आजपासून भैय्या पिहुला शाळेत सोडेल.” तो म्हणाला.

“मला कमल पाहिजे.” पिहू हट्ट करत होती.

“पण तुला भैय्या सोबत सुद्धा जायला आवडते ना..” वेद .

“पण आता कमलकडे बेबी आहे, तुझ्याकडे नाही.” पिहु ओठ बाहेर काढत म्हणाली.

त्यावर त्याला किंचित हसू आले.

“मग आपल्याला आता बेबीची काळजी घ्यायला हवी.” वेद.

“पण तो तर अजून तिच्या पोटात आहे, त्याची कशी काळजी घेणार?”

“म्हणून कमलची काळजी घ्यायची आता. तिला त्रास झाला तर बेबीला पण त्रास होतो. म्हणून आपण आता तिला आराम करू द्यायचा आणि आता रोज भैय्या नाहीतर वेमिका दीदी सोबत शाळेत जायचे, चालेल ना?” वेद.

पिहुने काहीतरी समजल्यासारखे मान हलवली. ते बघून वेद ने सुस्कारा सोडला.

“सविताताई, घरातील सगळी कार्पेट उचलून टाका.. घरात चालण्याच्या रस्त्यात येणाऱ्या सगळ्या जड वस्तू, शोपिस दूर करा..” तो आतमध्ये जात काम करणाऱ्या सविताला मोठी सूचनांची लिस्ट देत होता.

वेमिका तर आवासून त्याच्याकडे बघत होती तर आजीला त्याच्या बद्दल वाईट वाटत होते, पण त्याला अशी जबाबदारी घेतलेली बघून समाधान पण वाटत होते.

******


“कमल तुझं काय सुरू आहे? आत ये..” बाल्कनीच्या दाराजवळ बऱ्याच वेळ पासून कमल घुटमळत होती. वेद त्याच्या खोलीत त्याच्या ऑफिसचे काम करत बसला होता. त्याचे लक्ष बऱ्याच वेळ पासून बाहेर गडबड करणाऱ्या कमलकडे जात होते आणि शेवटी त्याने तिला हाक मारलीच.

त्याच्या आवाजाने ती आतमध्ये गेली.

“काय हवे आहे?” त्याने सरळसरळ विचारले.

“अ ss…”

“काय लपवते आहे? काय आहे हातात, दाखव.” ती आपले हात पाठीमागे बांधून उभी बघून त्याने विचारले.

“ते.. ते.. म्हणजे.. तुम्हाला नाही आवडणार..” तिची चुळबूळ सुरू होती.

“दाखव.” त्याने आपल्या हातातील लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला.

“ते.. बाळ.. “ तिने तिच्या हातातील फोटो उघडत त्याच्या पुढे धरले. त्यात कृष्णाच्या बालरूपाचे आणि छोट्या छोट्या बाळांचे फोटो होते. तो एक एक करत ते बघत होता.

“मला ते इथे बाहेर म्हणजे तुमच्या बाल्कनीच्या त्या भिंतीला , म्हणजे ते रमा आजी म्हणाल्या की आता तीन महिने पूर्ण झाले ना, तर आता बाळाला रूप यायला सुरुवात होते म्हणजे ते मोठे व्हायला सुरू होते तर छान छान फोटो डोळ्यांसमोर लाव. ते मी रूममध्ये लावले होते तर ते साहेब रागावले आणि त्यांनी इकडे तिकडे कुठे लावायचे नाही म्हणून सांगितले. ते घराचे इंटेरियर खराब दिसते म्हणून..” बोलतांना तिचा चेहरा कधी खूप उत्साही तर कधी अगदीच पडत होता.
त्या तेवढया संभाषणात पण कितीतरी भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. तो तेच भाव टिपण्यात हरवला होता.

“तुम्हाला देव म्हणजे ते म्हणजे आवडत नाहीत, तर मी हे..”

“तुला हवे तिथे , हवे ते फोटो लाव. इथे आतमध्ये पण तू तुझ्या आवडीचे फोटो लावू शकते.” तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला.

त्याचे बोलणे ऐकून पडलेला तिचा चेहरा एकदम उजळून निघाला होता. तिच्या ओठांवर हसू उमलले होते.

“खरंच? म्हणजे मी हे कृष्णाचे पण..”

“हो आणि तू कोणाचे फोटो लाव अथवा नको लावू, तुझे बाळ खूप सुंदरच असणार आहे, कारण तू सुंदर आहेस.” तो किंचित हसत म्हणाला. त्याचे ते बोलणे ऐकून तिचा चेहरा अगदी खुलला होता. ती गोरोमोरी झाली होती. तिला आजकाल उलट्यांचा खूप त्रास होत होता, त्यामुळे अगदीच निस्तेज आणि आधीपेक्षा थोडीशी रोडावली सुद्धा होती. पण तो आजूबाजूला असला की तिच्याही नकळत ती आनंदी असायची.

“एक मिनिट..” बोलून त्याने आपले कपाट उघडले आणि कॅमेरा बाहेर काढला.

“स्माईल..” म्हणत त्याने पटकन तिचा एक फोटो क्लिक केला. ती अगदी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. त्याने तिचे तेच भाव त्यात टिपले होते.

“ह्याचे प्रिंटआऊट काढून देतो, ते पण लाव.” तो हसत म्हणाला. त्यावर ती खुदकन हसली.

“मला पण फोटो काढायला शिकवणार का?”

“हो हो, ये इकडे, खूप सोपी आहे.” म्हणत तोच तिच्या पाठीमागे जावून उभा राहिला आणि तिला कॅमेरा कसे पकडायचा, फोकस कसे करायचे, कुठली बटन दाबायची सांगू लागला. त्यामुळे त्याच्या हातांचा स्पर्श तिला होत होता ज्यामुळे तिला पोटात काहीतरी होतेय, जाणवत होते.

“बघ, सोपी आहे..” त्याने पुढे असलेल्या एका गुलाबाच्या झाडाचा फोटो काढून दाखवला. तिने होकारार्थी मान हलवली.

“कोणाचा काढायचा आहे?” त्याने सहज विचारले.

“तुमचा..” ती पटकन बोलून गेली. तसे त्याच्या भुवया उंचावल्या.

“ते सीरियलमध्ये ते जे हिरो असतात ना, त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या बेड मागे त्यांचा असा मोठ्ठा फोटो लावलेला असतो. तुमच्या रूममध्ये तुमचा फोटोच नाही, म्हणून काढायचा आहे आणि..”

“आणि काय?” त्याला तिच्या बोलण्याचे हसू येत होते पण त्याने अडवून ठेवले होते.

“आणि म्हणे तुम्हाला आवडला तर तुम्ही लावा, म्हणजे लावाल ना?” ती अगदी छोटासा चेहरा करत म्हणाली.

“चांगला काढून देशील तर लावेल..”

“चांगलाच निघेल, तुम्ही कसले भारी दिसतात माहिती? ते ते सगळे हिरो फिके पडतात तुमच्या पुढे.” ती अगदी उत्साहात येऊन बोलत होती. त्याच्याबद्दल बोलतांना ती अगदी गुलाबी झाली होती, तिचे तिलाच कळले नव्हते.

“बरं मग बाहेर येता काय? इथे छान फुले आहेत, इकडे काढुयात..”

तो सुद्धा होकारार्थी मान हलवत तिच्या पाठोपाठ बाहेर गेला आणि ती सांगेल तसे उभे राहत होता. ती पण त्याला सीरियल मधले हिरो कसे एटित्युड दाखवतात, तसे दाखव करत त्याचे एक एक पोज क्लिक करत होती. तिच्या स्पर्शाने मात्र त्याचे अंततरंग मोहरुन येत होते. तिचा सहवास त्याला खूप गोड वाटत होता.

“इथे काय सुरू आहे?” बऱ्याच वेळ दुरून बघणारी वेमिका त्यांच्या जवळ येत म्हणाली.

“फोटो काढतेय.” कमल हसून म्हणाली.

“हो, पण का? आणि भैय्या हा तुझा कॅमेरा आहे ना?” ती आश्चर्याने वेदकडे बघत म्हणाली. त्याने होकारार्थी मान हलवली.

“भैय्या, किती वर्ष झालेत, तू कॅमेरा काढलाच नव्हता. फोटोग्राफी तर तुझा आवडता छंद होता. कमल तुला याने त्याच्या कॅमेराला हात लावू दिला? कमाल आहे. मी एकदा लावला होता तर माझ्यावर खूप चिडला होता. बाबांनी घेऊन दिला म्हणून तो कोणाला हात लावू देत नव्हता. त्याला तो खूप प्रिय आहे.” ती कमलला सांगत होती आणि त्याच्याकडे संशयित नजरेने बघत होती.

“तेव्हा मी लहान होतो, समजत नव्हते. या आज आपण घरात सगळ्यांचे फोटो काढुया.” म्हणत त्याने विषय बदलावला आणि त्या दोघींचे फोटो काढू लागला.

“आता तुमच्या दोघांचा बहिणभावांचा. वेमिकाचे लग्न झाल्यावर हीच आपली आठवण असणार..” म्हणत कमलने त्याच्या हातून कॅमेरा घेतला आणि त्या दोघांचे फोटो काढू लागली.

“मी कुठेच जाणार नाहीये. मी लग्नच करणार नाहीये.” वेमिका.

“कोणाला कोणी कधीही आवडू शकते, मग स्वतःच रडशील, भैय्या माझं लग्न करून दे म्हणून..” कमल हसत हसत तिला चिडवत होती.

“तूच रडशील..” वेमिका.

“मी कशाला रडेल? आम्ही तर सगळे इथेच राहणार आहोत. तूच इथून जाणार. हो ना भार्गव?” कमल.

तो तर तिच्या तोंडून इतक्या गोडपणे भार्गव ऐकूनच भारावून गेला होता.

“बरं बघू, कोण सगळ्यात जास्त रडते ते.” वेमिका तिला वेडावत म्हणाली.

“इकडे ये ग, फोटो काढू आधी.” त्या दोघींचे गोड वाद पुढे भलतेच वळण घेऊ नये म्हणून त्याने वेमिकाला जवळ घेतले. कमल त्या दोघांचे फोटो काढत होती.

“आता तुमच्या दोघांचे..” वेमिकाने कमलच्या हातून कॅमेरा घेतला.

“लग्न झाल्यावर हा पण शहीद होणार आहे, तेव्हा त्याच्याकडूनतू पण आताच सगळे लाड पुरवून घे.” म्हणत ती हसत त्यांचे फोटो काढत होती. त्यावर तो कसेनुसे हसला.

वेमिका प्रमाणे हे पण आपल्याला सोडून जातील, त्या विचारानेच तिला अस्वस्थ झाले. ती त्याच्याकडेच बघत होती.

“काय झाले?” त्याने नजरेनेच खुणावत विचारले. तिने काही नाही आविर्भावात मान हलवली.

“स्माईल then...” त्याने हाताने इशारा केला. तिने होकारार्थी मान हलवली. वेमिका फोटो काढणार तोच ती तोंडावर हात ठेवत आतमध्ये पळाली.

“भैय्या तिला खूप त्रास होतोय. बघितलेस ना, अर्धी झालीय. ओह गॉड, ही प्रेग्नेंसी!” काळजीने वेमिका तिच्या पाठीमागे गेली. तो पण तिच्या खोलीच्या बाल्कनी जवळ येऊन थांबला. थोड्या वेळाने कमल आपला चेहरा पुसत बाहेर आली.

“किती उलट्या होतात आहेत कमल, आम्हाला बाहेर ऐकूनच जीव घशात अडकतो. डॉक्टरांना औषध माग ना.” वेमिका काळजीने म्हणाली.

“ठीक आहे मी. उलट्या होणे नॉर्मल आहे म्हणाले डॉक्टर. बाळ हेल्थी आहे. आणि ४-५ महिने थोडा त्रास राहतो, मग कमी होतो, म्हणाले डॉक्टर.” ती हसत म्हणाली.

“हो, पण आमचा जीव निघतो त्याचे काय? हो ना रे भैय्या?” ती बाहेर बाल्कनीकडे बघत म्हणाली, पण तो तिथे नव्हता. ती ठीक आहे बघून तो त्याच्या खोलीत निघून गेला होता.

******