नंदिनी पळतच मिटींग रुमच्या बाहेर आली आणि गाडीला ब्रेक मारावा तसा लगेच स्वतःला ब्रेक मारला आणि दिर्घ श्वास घेऊन मोठा श्वास घेतला आणि स्वतःला निट केलं आणि समोर असलेल्या दरवाजा वर नाॅक केलं ....
May I .... तिने मधाहुन गोड असा हळु आवाज काढला
तोच पुर्ण मिटींग रुममध्ये त्याचा मॅगनेटिक आवाज घुमला....
Yes come..... पृथ्वीराज इनामदार म्हणजेच नंदिनी चा खडुस सडका बाॅस जो इनामदार ग्रुप ॲन्ड कंपनी चा CEO आहे ....
त्याचा आवाज आला आणि नंदिनी ने देवाचा धावा करत हळुच दरवाजा उघडला आणि आत आली तर समोर सगळे एम्लाॅइस तो तिचा खडुस बाॅस आणि त्याचा PA वैगेरे सगळे होते ....
ती हळुवार चालत त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि मान खाली घातली , त्याने रागिट नजर तिच्यावर टाकली आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं तो हलकेच गालात हसला.....
समोर नंदिनी ने देवाचा धावा करत डोळे गच्च मिटून घेतले होते आणि तिची ती क्युट रिॲक्शन पाहुन आतापर्यंत आलेला त्याचा सगळा राग क्षणात नाहीसा झाला होता ....
Miss Nandini now you sit i will meet you later in my cabin .... पृथ्वी रागिट आवाजात म्हणाला
आणि आता आपण काय ऐकलं हे तिला कळेनासं झालं कारण हा सर्किट आपल्याला नक्की बसायला सांगतोय का हा तिला प्रश्नच पडला आणि तिने डोळे उघडून त्याच्या कडे पाहिलं....
आणि हे काय तिने डोळे उघडले तर तो ही तिच्याकडेच बघत होता क्षणात दोघांची नजरानजर झाली....
क...काय सर तुम्ही काय म्हणालात .... नंदिनी ने हळुच विचारल
I said now sit then I will talk to you letter.... पृथ्वी म्हणाला
आयला हा खडुस मला बसायला बोलला म्हणजे सगळ्यांसमोर होणारा माझा इंसल्ट वाचला म्हणजे आता इंसल्ट इथे नाही होणार नंदिनी मनातच स्वतःशीच म्हणाली आणि खुश झाली.....
हे देवा थॅंक्यु थॅंक्यु सो मच तु मला वाचवलंस ....ती मनापासून देवाला म्हणाली आणि तिथल्या खुर्चीवर जाऊन बसली....
So guys we will already discussed that Dubai's project..... पृथ्वी म्हणाला
आणि आता सगळे त्याच्याकडे त्याच काय या आविर्भावात बघु लागले .....
गाईज जो आपला दुबई चा प्रोजेक्ट आहे त्याच काम आता करायला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी प्रोजेक्ट टिम मधुन दोन तीन जण उद्या दुबईला आपल्या ब्राण्च वर जातील...
आणि अगदी चार पाच दिवसात मी आणि काही माणसं माझ्यासोबत येतील आणि ते कोण असतील ते मी आता या मिटींग मध्ये सांगणार आहे .....
सो आता दुबईला जाणारे तीन जण म्हणजेच प्रोजेक्ट हेड आणि मिस रिना आणि मिस्टर आदित्य तुम्ही उद्या संध्याकाळच्या फ्लाईट ने दुबईला जात आहात ..... पृथ्वी म्हणाला
आणि हे ऐकून रिना आदित्य शाॅक झाले पण थोडा वेळच नंतर ते नाॅरमल झाले आणि होकार दर्शवला....
सो चार दिवसांनी माझ्यासोबत दुबई ला मिस सोनिया , मिस्टर तुषार आणि मिस नंदिनी येणार आहेत ..... पृथ्वी म्हणाला
आणि हे ऐकून तर नंदिनी साठी हा दुसरा शाॅक होता कारण ती प्रोजेक्ट डिपार्टमेंट मध्ये नव्हती , आयला मी ह्या डिपार्टमेंट मध्ये नाही मग माझं काय काम तिकडे नंदिनी मनातच म्हणाली
जाऊदे नंतर बोलू या सर्किट शी ..... नंदिनी स्वतःशीच म्हणाली
पण बाकी सगळे दुबई ला जायचं म्हणून प्रचंड खुश होते ..
क्रमशः
°°°°°°°°°°°
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा