Login

मन हे बावरे (भाग 9)

ही एक कथामालिका आहे जी प्रेमकथा आहे आणि पुर्णपणे काल्पनिक आहे ...
मघाशी जे काही झालं होतं त्यामुळे आता नंदिनी ची पुन्हा पृथ्वी कडे पाहण्याची हिंमत नव्हती त्यामुळे ती बाहेरच बघत होती पण पृथ्वी मात्र तिच्या कडेच बघत होता , आणि सध्या त्याला समजलं होतं की आता ती काही आपल्याकडे बघत नसते म्हणून त्याने गाण लावलं ....

मस्ताना मौसम है, रंगीं नज़ारा
धड़कन क्या कहती है, समझो इशारा
आज से, जान-ए-मन, दिल है तुम्हारा
आज से, जान-ए-मन, दिल है तुम्हारा
मस्ताना मौसम है, रंगीं नज़ारा
धड़कन क्या कहती है, समझो इशारा
आज से, जान-ए-मन, दिल है तुम्हारा
आज से, जान-ए-मन, दिल है तुम्हारा

पृथ्वी ने गाण लावलं तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं , आणि आता पुन्हा दोघांची नजरानजर झाली आणि आता ती ओशाळली तिने झटकन मान फिरवली आणि पुन्हा बाहेर बघू लागली ...

आयला हा सर्किट आपल्यालाच बघतोय की काय , पण आज याला झालंय काय इतका का बघतोय चेहऱ्यावर काही लागलं आहे क माझ्या , तिला विचार पडला आणि तिने त्याला डाऊट येणार नाही अशा आविर्भावात पुढे पाहील आणि तिला तिचा चेहरा दिसला ....

पण आपल्या चेहऱ्यावर काहीच नाही मग हा असं का बघतोय नंदिनी विचारात पडली तोच तिच्या कानावर गाण्याचा आवाज आला ....

चोरी-चोरी मैंने तुमसे प्यार किया है, मानो, ओ, जानाँ
तुमने मुझको कितना बेक़रारी किया है, मुश्किल बताना
कोई भी तो ना जाने, हम कैसे दीवाने हुए
दुनिया में ना कोई तुमसे है प्यारा
धड़कन क्या कहती है, समझो इशारा
आज से, जान-ए-मन, दिल है तुम्हारा
आज से, जान-ए-मन, दिल है तुम्हारा

आणि आता तिला काय बोलावं सुचेना कारण गाण्याच्या त्या ओळी आणि त्याची ती नजर तिला वेड लागायचं बाकी राहिलं होतं तिने डायरेक्ट मागे सिट वर डोकं ठेवून डोळे बंद केले ....

आणि आता मात्र पृथ्वी ला आपलं हसु कंट्रोल होत नव्हत पण तरीही तो ते कंट्रोल करुन बसला होता ....

पण आता तिने मात्र डोळे उघडलेच नाहीत , आणि आता तो तिला निहाळत होता किती सुंदर होती ती देवाने वेळात वेळ काढून तिची ही कांती बनवली असणार इतकी सुंदर त्यात आज तिला झोपलेली बघत होता तो त्यात तर ती खुपचं क्युट दिसत होती ....

नंदिनी मी तुला प्राॅमिस करतो तु फक्त या पृथ्वीराज इनामदार ची बायको होणार , मिसेस नंदिनी पृथ्वीराज इनामदार ..... तो मनातच म्हणाला आणि स्वतःशिच हसला आणि केसातून हात फिरवला ...

थोड्या वेळाने त्याने कार एका ढाब्यावर थांबवली आणि तिच्याकडे पाहिलं ती शांत झोपली होती ...

त्याने हळुच दरवाजा उघडला आणि बाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा आत आला आणि सिट बेल्ट लावून कार चालू केली ती अजुनही झोपली होती ....

थोड्या वेळाने त्याने एका सुनसान रस्त्यावर कार थांबवली आणि आता नंदिनी ने डोळे उघडले तिने त्याच्या कडे पाहीले आणि आता त्याने तिला एक स्मित दिलं ....

तसं तिने ही एक गोड स्माईल दिली त्याला , त्याने त्याचा दरवाजा उघडला आणि बाहेर आला आणि तिच्या बाजूला आला आणि तिचा दरवाजा उघडला आणि तिला हात दिला तसं तिने अविश्र्वासाने त्याच्याकडे पाहिलं तो तिलाच बघत होता ...

तिनं हळुच हात त्याच्या हातात दिला आणि खाली उतरली ...

सर आपण कुठे आलोय नंदिनी ने विचारल ....

Wait for sometime ..... पृथ्वी म्हणाला आणि तिचा हात तसाच पकडुन तिला घेऊन आला समोर एक टेकडी होती आजुबाजुला कोणीही नव्हतं साधा एखाद्या कुत्रा ही नाही ...

तो तिला घेऊन आला आणि तिला बसण्याचा इशारा केला तसं ती पुढे गेली आणि बसणार तोच ती मागे झाली ....

What happened .... पृथ्वी ने विचारल

स....र खाली समुद्र आहे ती म्हणाली ....

Yeah I know it's view is very beautiful you sit .... तो म्हणाला

स‌.....र ..... मी....म... मला भिती वाटते नंदिनी अडखळत म्हणाली ....

Wait ..... तो म्हणाला आणि खाली झुकला आणि तिला डायरेक्ट दोन्ही हातावर उचलून घेतल आणि आता अचानक झालेल्या त्या कृतीमुळे दचकली , त्याने तिच्या डोळ्यात बघतच तिला टेकडीवर बसवल आणि स्वत ही बसला ....

पण आता ती घाबरली होती तसं त्याने तिला हात दिला तसं तिने त्याच्या हातात हात दिला तसं त्याने तिला स्वत:कडे ओढलं तशी ती त्याच्या एकदमच जवळ जाऊन बसली आणि आता त्याचा हात तिच्या कमरेवर होता आणि त्यामुळे तिच्या शरिरात चारशे चाळीस वाॅल्ट चा करंट पास झाला ....

बघ समोर किती सुंदर आहे हे सगळं मला जेव्हा एकटं वाटतं मी इथेच येतो आज मला तुला इथे आणायची इच्छा झाली म्हणून तुला आणलं .... पृथ्वी म्हणाला ‌

तुम्ही कोणासोबत येता इथे ..... तिने हळुच विचारल

आज पहिल्यांदा तुझ्या सोबत आलोय नाहीतर अजुनपर्यंत एक ही मुलगी माझ्या आयुष्यात नाही तु पहिली आणि शेवटची आहेस पृथ्वी म्हणाला ...

आणि आता ती शांत बसली होती भिती थोडीफार गेली होती पण थंड हवा खुप होती तिथे जी अंगाला झोंबत होती तिने स्वत: चे हात एकमेकांवर घट्ट केले ....

पृथ्वी ने त्याच जॅकेट काढल आणि तिच्या अंगावर घातल आणि आज हा अजुन एक शाॅक होता तिच्या साठी .....

ती फक्त बघत बसली होती हा खुपचं वेगळा वागत होता आज , पण झालंय काय याला .... नंदिनी विचारात पडली

पण तिला ही हे सगळं नकळत आवडून गेलं होतं कारण इतकं अजुनपर्यंत तिच्या साठी कोणीही केलं नव्हतं हा पहिलाच पृथ्वी होता जो इतकं सगळं करत होता म्हणून ती मनापासून खुश होती ...