Login

मन हे बावरे Mind Is Crezy

ही एक काल्पनिक कथा आहे .....
नंदीनी आपल काम करु लागली तोच तिथुन बुटांचा आवाज घुमला तिने बाजुला पाहिलं तर कोणीही नव्हतं आणि सध्या आलं ही नव्हतं कोणी मग कोण असेल ती विचारात पडली आणि तिकडे बघत होतीच की तिचे डोळे मोठे झाले ...

आयला हा बोकड तर दहा किंवा साडे नऊ  वाजता येतो मग आज इतक्या लवकर कसा काय आता तर सात वाजले ... नंदिनी मनातच बोलत होती इतक्यात तो आला तशी ती उभी राहिली आणि मान खाली घातली ....

तो आला त्याने तिला बघितली सुध्दा पण तसाच आपल्या केबिनमध्ये गेला तशी ती बसली आणि पुन्हा काम करु लागली तोच तिचा फोन वाजला तिने डेस्क वरुन स्वतःचा फोन उचलला तर नाव झळकत होत .....

पृथ्वीराज सर ..... Calling .....

तिनं लगेच फोन उचलला आणि कानाला लावला .....

Hello ... Nandini

Come to my cabin fast .... पृथ्वी म्हणाला आणि फोन ठेवला सुध्दा ....

तसं नंदीनी आपल्या हातात असलेल्या फोन कडे बघत बसली ...

काय सर्किट माणूस आहे हा आता आत गेला मग आतमध्ये जायच्या आधी काय काम होत ते बोलून घ्यायचं ना आणि मग जायचं पण नाही सवय झालीय सतवायची ते केल्या शिवाय दिवस कसा जाईल साहेबांचा .... नंदिनी मनातच म्हणाली आणि उठून त्याच्या केबिनबाहेर उभी राहिली ....

May I sir ..... नंदिनी अदबीने विचारल ....

Come .... आतुन त्याचा आवाज आला ....

तशी नंदीनी आत आली .... आणि त्याच्या समोर उभी राहिली पण तो मात्र आपलं काम करत होता ....

शी बाबा काय विचित्र माणूस आहे आमची ही काम खोळंबली आहेत असा काम करतोय बोलवून जस आम्ही काय रिकाम टेकडे आहोत .... नंदिनी मनातच राग काढत होती ....

तितक्यात त्याने तिच्याकडे पाहिलं तसं ती गोंधळून गेली ..... Seriously .... तो भुवया किंचीत वर करुन म्हणाला ....

क... काय सर तिनं हळुच विचारलं .... First of all tell me  तु माझ्या शी बोलताना इतकी तत... पप... का करतेस ...
पृथ्वी ने विचारल ...

आणि आता ती गोंधळून गेली .... नी बाबा हा काय प्रश्न विचारतो एकतर ‌राक्षसा सारखं ओरडायच आणि मग माणूस घाबरल की असं विचारायचं बावळट कुठला ..... नंदिनी मनातच म्हणाली .....

मी इथे तुला या साठी बोलवलं आहे की उद्या आपल्याला निघायचं आहे तर आज रात्री तु माझ्या घरी रहायला चल कारण तिथे जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल खुप काम करायचं आहे आणि ते शक्य नाहीय .... पृथ्वी म्हणाला

हा काय डोक्यावर पडला आहे का ... असं एका मुलीला ते ही घरी बोलावून घेण किती चुकीचे आहे .... खरंच हा वेडाच आहे .... नंदिनी मनातच म्हणाली ....

Don't worry and don't be scared ..... माझ्या घरी माझे मा आणि पपा आहेत आणि बहिण सुध्दा आहे .... सो रिलॅक्स आणि आज तु येतेय माझ्या सोबत .... घरी सांग .... पृथ्वी म्हणाला .....

अरे देवा आता काय करु आत्या ला कसं सांगू ती तर आख्खी गिळुन खाईल मला आधीच आज लवकर यायला बोलली होती .... असो करु काहीतरी आतापर्यंत काय कमी चुने लावले आहेत जे आता लावू शकत नाही .... नंदीनी मनातच म्हणाली आणि तिने पृथ्वी ला होकार कळवला .....


ती बाहेर आली आणि पुन्हा फोन घेतला आणि आत्या ला फोन केला ... आणि सांगितल तसं आत्या ने थोडी बडबड केली आणि होकार कळवला .....

तस नंदीनी ने मनातच सुटकेचा निःश्वास सोडला आणि आता टेबलवर ठेवलेली पाण्याची बाटली उचलून ओठांना लावली ‌आणि घटाघटा पाणी पिऊन संपवलं ....

आणि आपलं काम करु लागली .... पण आज संध्याकाळी त्याच्या सोबत त्याच्या घरी जायचं म्हणून टेन्शन मात्र आलं होतं .......