I am sorry Nandini..... पृथ्वी नंदिनी कडे पाहत म्हणाला तसं नंदिनी ने त्याच्याकडे पाहिलं....
It's okay sir .... नंदिनी म्हणाली पण आता झालेला तो सिन ती विसरली नव्हती इतका जास्त मोहक होता तो ....
मुळातच तो इतका जवळ होता हेच तिला पुर्ण शरीरभर गुजबंप देऊन गेल ..... ती एका उच्च शिखरावर तरंगत होती पण जेव्हा तो बाजुला झाला तेव्हा ती धापकन खाली कोसळली होती आणि वास्तवाच भान आलं होतं तिला....
Nandini let's go ..... ती शांत आहे पाहून पृथ्वी म्हणाला तसं तिने होकारार्थी मान हलवली आणि खाली उतरली समोरचं भला मोठा बंग्लो होता तिचा पण बंग्लो मोठा होता पण यात काही तरी वेगळं जाणवलं तिला पण काय हे कळलं नाही.....
पुर्ण बंगला लाईट च्या रोषणाईत लखलखुन निघाला होता आणि बाजुलाच नाव होतं....
"नक्षत्र" ती आजुबाजुला बघत होती तितक्यात तो आला आणि खिशात हात घालून बघत होता....
जायचं.... त्याने विचारलं......
हुं....हा .... नंदिनी म्हणाली....
तसं पृथ्वी सोबत ती आत जाऊ लागली जसं जसं ती आत जात होती ती बघतच होती सगळीकडे इतकं सुंदर इंटिरिअर होतं बंगल्याच.....
सगळीकडे काचेच्या भल्या मोठ्या फुलदाण्या लावल्या होत्या त्याच्या बाजुला काही रोपटे...
हाॅल मध्ये सर्वात मोठं ते झुंमर हाय क्लास फर्निचर आणि इतका मोठा तो बंग्लो ती पाहून पाहून वेडी व्हायची बाकी होती ....
ते आले तसं हाॅल मध्ये एक सत्तर च्या आसपास असणारी एक आज्जी होती .... नंदिनी ने तिच्याकडे पाहिलं ती त्यांच्या जवळच येत होती ....
पृथ्वी कोण आहेत या .... त्यांनी विचारले....
माई she's Nandini ऑफिस मध्ये काम करते उद्या दुबईला जायचं आहे प्रोजेक्ट साठी तर काम अजुनही पेंडींग आहे म्हणून आणली आहे ..... पृथ्वी म्हणाला
अच्छा.... बाळा घरी कळवल आहेस ना .... त्या माईंनी विचारल ...
हो मॅम ..... नंदिनी तिच्या नाजुक आवाजात म्हणाली....
खुप सुंदर आवाज आहे आणि तु ही .... त्या माई स्माईल करत म्हणाल्या तसं पृथ्वी गालातच हसला .....
बरं तु वरती जा पृथ्वी तुला तुझी रुम दाखवेल मी तुझ्या साठी ड्रेस पाठवते फ्रेश होऊन दोघंही डिनर ला या ..... माई म्हणाल्या....
तसं दोघांनीही मान हलवली आणि पृथ्वी जाऊ लागला तसं नंदिनी ने त्या माईंच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घेतला ....
खुश रहा ..... माई म्हणाल्या तसं पृथ्वी ने पाहिलं तर आज तर अजुनच तो तिच्या प्रेमात पडला .....
नंदिनी पृथ्वी सोबत वर आली ... बरं तु फ्रेश हो माई ड्रेस पाठवेल तुझ्या साठी.... मी पण फ्रेश होऊन येतो एकत्रच जाऊ.... पृथ्वी म्हणाला.... तसं तिने होकारार्थी मान हलवली...
पृथ्वी गेला तसं तिने पुर्ण रुममध्ये नजर फिरवली तिच्या साठी हे काही नवीन नव्हतं पण तिला तिथलं इंटिरिअर खुप आवडलं होतं ..
ती तिथेच बसली तितक्यात एक बाई आली नंदिनी ने पाहिलं आणि स्मित केलं....
मॅडम हे माईंनी पाठवले आहेत.... ती बाई म्हणाली
ठिक आहे .... Thankyou.... नंदिनी म्हणाली तसं ती बाई गेली ....
नंदिनी तो ड्रेस घेऊन बाथरुममध्ये गेली फ्रेश झाली आणि तो ड्रेस घालून बाहेर आली ....
फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस त्यावर मॅचिंग दुप्पटा तिला फार आवडला ती केस वैगरे मोकळे सोडुन तिथेच बेडवर बसली .....
तितक्यात दरवाजा वाजला आणि पृथ्वी आत आला त्याने तिच्या कडे पाहीले आणि पुन्हा तो हरवून गेला .....
एक तो वो दुसरा तो वो शरमाते हैं ,
क्या बताऊॅं मेरे यार वो
कितनी खामोशी से दिल दे जाते हैं .....
क्या बताऊॅं मेरे यार वो
कितनी खामोशी से दिल दे जाते हैं .....
पृथ्वी तिला पाहून मनातच म्हणाला त्याच्या त्या नजरेने ती लाजुन चुर झाली होती तोच खालून आवाज आला तसं तो भानावर आला ....
चल .... पृथ्वी इतकंच म्हणाला तशी ती त्याच्या सोबत चालू लागली..... खरंतर तिच हे रुप पाहून तिला मिठीत घ्यायची तीव्र इच्छा त्याने मारली होती ....
दोघंही खाली आले तसं आता सगळे दोघांनाही एकटक पाहत होते काही तर भान हरपून नंदिनी ला बघत होते कोणी इतकं सुंदर कसं असु शकत हे काही जणांना कळत नव्हतं.....
********
सर्वांना एक कळकळीची विनंती जे वाचक कथा वाचतायत त्यांनी फाॅलो करा .... आणि कमेंट्स ही करा .... ही विनंती आहे ....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा