नंदिनी ने हळुच त्याचा हात पकडुन पाणी पित होती तर दुसरीकडे माई आणि पृथ्वी चे फॅमिली मेंबर गालात हसत होते .....
Thankyou sir .... नंदिनी च पाणी झाल्यावर ती म्हणाली तसं पृथ्वी ने तिला स्मित दिलं....
नंदिनी बेटा सावकाश....मेघना म्हणाल्या .... तसं नंदिनी ने त्यांना ही स्मित दिलं .....
आणि आता सगळे जेवू लागले.... नंदिनी बाळा तुझ्या आई बाबांच्या मेहनतीने कमावलेल्या इतक्या महत्त्वाच्या कंपनीला तु त्यांच्या हातात कसं देऊ शकतेस बाळा तो त्यांचा आशिर्वाद आहे तुझ्या साठी कमावलेला त्यांच्या आयुष्य भराची कमाई.... रंजित म्हणाले तसं नंदिनी ने त्यांच्या कडे पाहीले....
काका मी करुही काय शकते आत्या मामांनी मला सांभाळल आहे मी असं त्यांच्या कडे मागणं मला योग्य नाही वाटत.... नंदिनी म्हणाली....
बाळा ते तुझं आहे आणि मला विचारलस तर ते तुला नाही सांभाळत तु त्यांना सांभाळत आहेस ते घर बिझनेस याच्या मुळे ते न मेहनतीने कमावता फुकट खातायत आणि तुझ्या बाबांनी जो मेहनतीने बिझनेस सेट अप केला होता तो दिवसेंदिवस लाॅस होतोय... रंजित म्हणाले
काका तुम्हाला बाबांबद्दल इतकं कसं माहित.... नंदिनी ने विचारल...
तसं रंजित यांनी माई आणि सगळ्यांकडे पाहून स्मित केलं आणि नंदिनी कडे पाहीले.....
बेटा आमचा हा फॅमिली बिझनेस आहे आणि तो सेट मी केला आणि माझ्या भावाने आणि आत रिटायरमेंट घेऊन तो बिझनेस पृथ्वी सांभाळत आहे ....
मी जेव्हा बिझनेस सांभाळत होतो तेव्हा खुप वर्षांपुर्वी तुझ्या बाबांची म्हणजेच देशमुख ग्रुप चा ओनर मोहन देशमुख याची आणि माझी ओळख झाली होती मी इन्वेस्टर आहे तुमच्या कंपनीतला पण आता नाही जेव्हा समजलं मोहन या जगात नाही आणि आता कंपनी दुसर कोणीच चालवत तेव्हा मी माझी इन्वेस्टमेंट कॅन्सल केली ....
आणि त्या नंतर तर हा बिझनेस पृथ्वी सांभाळत आहे.... आणि तुला खरं सांगु तर मोहन आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली होती की खुप चांगले संबंध होते तेव्हा तु खुप लहान होतीस तुला कदाचित आठवत नसेल.... रंजित म्हणाले
हो काका मला इतकं काही आठवत नाही पण जेव्हा बाबा मला सोडून गेले तेव्हा मी अवघ्या पंधरा वर्षांची होते .....पण काका तुम्ही म्हणालात ते योग्य आहे मला पटतंय.... माझ्या बाबांनी खुप मेहनतीने बिझनेस इंटरनॅशनल लेव्हल ला घेऊन गेले होते त्यांनी बंगला माझ्या नावाने घेतला होता म्हणून त्याला नंदिनी मेन्शन नाव आहे .... पण आता तिथे फक्त आत्या आणि मामांच चालत... नंदिनी म्हणाली....
Nandini if you want I will help you मी तुला तुझा बिझनेस परत मिळवून देऊ शकतो आणि तु तो घ्यायला हवा कारण तुझ्या आईबाबांचा बिझनेस तु कोणाच्या ही हाती देऊ नये असं मला ही वाटतं.... पृथ्वी खात खात म्हणाला....
हो सर मी ही तोच विचार करत आहे खुप दिवस पण कसं करु कळत नव्हतं पण आता तुमची साथ असेल तर मी नक्कीच बाबांचा बिझनेस पुढे चालवण्यात इंटरेस्टेड आहे .... नंदिनी म्हणाली
ओके मग आपण आता एक महिना तर उद्या दुबईला जात आहोत पण तु तुमच्या वकीलांचा नंबर मला दे आपण त्यांच्या शी काॅन्टॅक्ट करु आणि मग बघूया.... पृथ्वी म्हणाला....
ओके सर .... ती म्हणाली आणि मग सगळे आनंदाने जेवू लागले....
********
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा