तिला लेट झालं होतं त्या दिवशी. माहित नाही का, पण काहीतरी बिनसलं होतं.... सगळंच गणित गंडलं होतं... सगळ्या कामाला उशीर.... उशीर.....
शेवटी कसं बसं आवरून ती निघाली, तर अर्ध्या रस्त्यात चप्पल तुटली. ती शिवून घ्यायला थांबली तर ट्रेन सुटेल म्हणून तशीच चालत राहिली.... वाटलं उतरल्यावर शिवता येईल... त्यात काय एवढं....
तेवढ्यात लांबूनच ट्रेन स्टेशन मध्ये शिरताना दिसली. अशा ट्रेन धावत जाऊन पकडणं ही मुंबईकरांची खास गुणशैली! तिनेही पकडलीच होती की किती तरी वेळा.... पण त्या दिवशी! नाही जमलं तिला... त्या दिवशी काही वेगळं होतं.... तो दिवसच वेगळा होता....
ती पळायला लागली.... चप्पलने पळता येईना म्हणून ती काढून हातात घेतली, आणि अनवानी पळत सुटली... काहीतरी हातातून सुटत असल्यासारखं....पण पण पण.... नेहमीची ट्रेन चुकली.....
तशीच धापा टाकत बाकड्यावर जाऊन बसली.... सरळ ट्रॅक असल्यानं अगदी अर्धा रस्ता जाईपर्यंत ट्रेन नजरेला दिसायची. ती एकटक बघत राहिली... अचानक कानात वाजणारी गाणी आता नकोशी झाली होती... पण वाजतच होती.... काहीतरी चुकलं होतं.... पण काय?
ट्रेनच चुकली होती.... विशेष काही नाही.... पण तिचं अंतर्मन काही वेगळंच सांगत होतं.... काहीतरी जवळचं, दुर खुप दुर चाललं होतं.... कायमचं.... जपून ठेवेलेलं..... कितीतरी माणसं होती त्या नेहमीच्या गाडीत..... कुणात जीव जडला होता.... तर कुणी तिला जीवापाड जपणारं होतं.... आतून काहीतरी हललं.... हाताची मूठ घट्ट करत मनाला घट्ट करायचा प्रयत्न केला तिने..... जणू त्या घट्ट धरलेल्या मुठीत, जाणारा क्षण धरला होता.... जपला होता....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा