Login

मिशन मुंबई (भाग-१)

Efforts of police to save mumbai...

मिशन मुंबई (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

"हि दृश्य आहेत सदाबहार मॉल ची... काल पर्यंत खरंच गर्दीने सदाबहार असलेला हा मॉल आज सामसूम आहे... तुम्ही पाहू शकताय मॉल ची हालत! पोलीस इथे आलेले आहेत... आता लवकरच चौकशी सुरु होईल.... तोपर्यंत ताज्या अपडेट्स साठी पाहत रहा तुफान न्यूज चॅनेल!"
 
सर्व न्यूज चॅनेल वर आज सदाबहार मॉल ची न्युज गाजत होती.... आज सकाळी ९.३० च्या सुमारास मॉल मध्ये एका चालत्या फिरत्या माणसाच्या अचानक चिंधड्या उडाल्या... सुदैवाने सकाळची वेळ होती म्हणून जास्त गर्दी नव्हती... त्यामुळे जास्त खळबळ उडाली नाही... त्या माणसाच्या बाजूनेच जो दुसरा माणूस चालला होता त्याला दुखापत झाली होती, त्याला जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते आणि त्यांची चौकशी सुरु झाली होती.... संपूर्ण मॉल सील केला होता.... सिनिअर इन्स्पेक्टर विक्रम तिथे हजर असणाऱ्या सगळ्यांची चौकशी करत होते.... हवालदार गणेश ना त्या इजा झालेल्या इसमाची चौकशी करायला पाठवले, सब इन्स्पेक्टर सोनाली सी.सी.टीव्ही. चे फुटेज काढायला गेली... अभिषेक आणि निनाद बॉडी च्या आसपास काही सापडते का बघत होते... पाच च मिनिटात अँबुलन्स आली आणि बॉडी चे सगळे तुकडे फॉरेन्सिक लॅब ला पाठवण्यात आले..... 

तिथे उपस्थित सगळ्यांचं म्हणणं हेच होत की, अचानकच या माणसाच्या शरीराने पेट घेतला आणि स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे झाले... कोणालाही नक्की कसं आणि काय घडलं हे माहित नव्हतं! 

"सर! सी.सी.टीव्ही. च फुटेज तयार आहे..." सोनाली म्हणाली.... 
सगळे पोलीस फुटेज पाहू लागले.... लोकांनी जसे सांगितले अगदी तसेच घडले होते... अचानकच त्या माणसाच्या शरीराने पेट घेतला आणि काही कळायच्या आतच त्याच्या चिंधड्या उडाल्या.... हि केस सुसाईड बाँम्बर ची वाटत होती.... पण, मॉल ची एवढी कडक सिक्युरिटी असताना हा माणूस बॉम्ब सोबत आत आलाच कसा हा प्रश्न पोलिसांना पडला होता..... पोलिसांनी बाकी कॅमेरांचे फुटेज मागवले...... 

इतक्यात सगळ्या न्युज रिपोर्ट्स नी पोलिसांभोवती घोळका केला.... 
"सर! काय वाटतंय तुम्हाला? हा कोणाचा डाव असेल?" रिपोर्टर कुणाल प्रश्न विचारायला सुरुवात करतो!
"एक मिनीट! थांबा सगळे.... अजून ठाम पणे काही सांगता येणार नाही... प्लिझ आम्हाला आमचं काम करू दे...." विक्रम सर सगळ्या पत्रकारांना उद्देशून म्हणाले...
अभिषेक आणि निनाद ने सगळ्यांना बाजूला केलं! 

"सर! घोळ झालाय.... मॅडम ना जे कॅमेराचं फुटेज दिलं ते सोडून बाकी कोणत्याच कॅमेरांचे फुटेज रेकॉर्ड झाले नाहीयेत..." मॉल मॅनेजर मनोज कंट्रोल रूम मधून धावत येऊन बोलला... 

"काय? हे कसं शक्य आहे? तुमच्या कंट्रोल रूम च्या स्टाफ ला बोलवा...." सोनाली म्हणाली... 
सगळ्या स्टाफ ची कसून चौकशी झाली.... पण, कोणालाही काही माहित नव्हतं.... आणि कोण खोटं बोलतंय असंही काही वाटत नव्हतं! पोलीस सगळ्यांचं स्टेटमेंट घेऊन पोलीस स्टेशन ला येतात.... 

"जय हिंद सर! मी हॉस्पिटल मध्ये गेलेलो पण, त्या इसमाची चौकशी करायला मिळाली नाही! तो कोमात गेलाय. शिवाय त्याचा चेहरा पूर्ण पणे खराब झालाय.... त्याला शुद्ध आली की डॉक्टर आपल्याला लगेच कळवतील!" हवालदार गणेश म्हणाला... 

"त्याची काही आयडेंटिटी? काही सामान मिळालं का तिथे?" सोनाली ने विचारलं...

"नाही मॅडम! त्याच्याकडे काहीच नव्हतं! इथेच मोठी गोम आहे... तो माणूस मॉल मध्ये फिरत होता आणि त्याच्याकडे साधे पैसे सुद्धा नव्हते!" गणेश ने सांगितलं.

इतक्यात ए.सी.पी. सुयश ने सगळ्यांना आत बोलावलं...
"जय हिंद सर!" सगळ्यांनी सॅल्यूट केला... 
"विक्रम! २ वाजता प्रेस कॉन्फरन्स बोलवा! हि काही साधी सुधी केस नाहीये.... आपल्याला जनतेला विश्वासात घेऊन शहरात रेड अलर्ट जारी करावा लागणार आहे! हे रेकॉर्डिंग ऐका.." असं म्हणून सुयश सरांनी एक रोकॉर्डिंग सुरु केलं... 

"एsss ए.सी.पी. तुला काय वाटलं, आज जे मॉल मध्ये झालं तेवढ्यावरच सगळं थांबणार आहे का? अरे आत्ता कुठे हा फक्त ट्रेलर होता... पुढच्या ४८ तासात बघा काय काय होतंय... जर वाचवू शकलात तर वाचवून दाखवा मुंबई शहराला... आणि हो... हे रोकॉर्डिंग कोणाच्या नंबर वरून पाठवलं आहे, कुठून पाठवलं आहे यात तर मुळीच वेळ घालवू नका.... तुम्ही ऐके पर्यंत सिम फेकूनही दिलेले असेल..... फक्त ४८ तास.... तुमची वेळ सुरु होतेय आत्ता.... हा हा हा हा" 

"हा तर उघड उघड धमकी देतोय...." अभिषेक म्हणाला.... 

"हो! मी वर कळवलं आहे... वरूनच आदेश आलेत प्रेस कॉन्फरन्स चे! आता लवकरात लवकर मीडिया ला कळवा... जनतेत विनाकारण दुसरीच दहशद निर्माण होण्याआधी आपण सावध करूया.... मुव्ह फास्ट..." सुयश सरांनी आदेश दिले! 

विक्रम ने मीडिया ला कळवलं.... गणेश आणि निनाद ने प्रेस कॉन्फरन्स ची तयारी केली आणि अभिषेक, सोनाली जे सी.सी.टीव्ही. फुटेज हाती लागलं होतं त्यात काही सापडतंय का पाहत होते.... पण, काहीही हाती लागत नव्हतं! शिवाय आता ४८ तासांची टांगती तलवार डोक्यावर होती..... 

२ वाजले.... सगळे रिपोर्ट्स आले... ए.सी.पी. सुयश आणि त्यांची पूर्ण टीम सुद्धा आली.... 
"सर! अचानक अशी प्रेस कॉन्फरन्स का बोलावली आहे?" रिपोर्टर कुणाल ने सुरुवात केली.... 

"हो! हो! सगळं काळजी पूर्वक ऐका.... पुढचे ४८ तास आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत! सकाळचा मॉल चा प्रकार सगळ्यांनीच पाहिला आहे... म्हणून सुरक्षेच्या हेतूने प्रत्येकाला काळजी घ्यायची आहे.... कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, काही संशयास्पद आढळले तर लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा, कोणत्याही बेवारस वस्तुंना हात लावू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, विनाकारण गर्दी करू नका.... बाकी आम्ही आहोत तुमच्या रक्षणासाठी! आमच्यावर विश्वास ठेवा आणि कृपया कोणत्याही अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वास हि ठेवू नका. थँक्यू!" सुयश सरांचं बोलून झालं.... सगळ्या चॅनेल वर हे लाईव्ह रेपोर्टींग गेलं! 

एक एक पत्रकार बाहेर पडत होते.... शेवटी आता पोलीस आणि कुणाल राहिला होता.... ते बाहेर पडणार इतक्यात घड्याळाच्या टिक टिक सारखा आवाज आला..... पोलिसांना हा बॉम्ब असणार याची शंका आलीच! सगळे मिळून शोधू लागले.... कुणाल ला  टेबलाखाली टाइम बॉम्ब होता तो दिसला..... शेवटचं एक मिनीट होतं बॉम्ब फुटायला..... 

"सर! तुम्ही सगळे इथून जा... तुमची समाजाला गरज आहे! मी ट्राय करतो बॉम्ब डिफ्युज करायला वाचलो तर वाचलो... पण, तुम्ही निघा लवकर..." कुणाल म्हणाला.... 

"कोणीही कुठे जात नाहीये.... तू ट्राय कर..." विक्रमने सांगितलं! 

त्या बॉम्ब ला लाल, निळी आणि पिवळी अशा तीन वायरी होत्या.... चुकीची वायर कापली तर सगळ्यांचा खात्मा निश्चित! कुणाल संभ्रमात होता..... शेवटी त्याच्या हातात सगळ्यांचा जीव होता.... शेवटची वीस सेकंदं राहिली होती.... सगळे प्रार्थना करत होते..... वेळ खूपच लवकर निघून चालली होती.... शेवटचे १० सेकंद राहिले.... 

"कुणाल! लवकर काप!" अभिषेक म्हणाला... 
सगळ्यांनी घट्ट डोळे मिटून घेतले होते.... कुणालने पिवळी वायर कापली..... आणि....
*************************
(पुढे काय झालं पाहूया पुढच्या भागात..... कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा.... आणि हा भाग कसा वाटला हे सांगायला सुद्धा विसरू नका....)

🎭 Series Post

View all