मिशन मुंबई (भाग-३)

Hard work of police to save our Mumbai.

मिशन मुंबई (भाग-३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागच्या भागात आपण पाहिलं, प्रेस कॉन्फरन्स मध्ये जो बॉम्ब लावला होता तो फक्त पोलिसांचा वेळ जायला आणि जनतेत अजून दहशद पसरवायला ठेवला गेला होता, सगळे जण जी माहिती मिळाली आहे ती घेऊन पोलीस स्टेशन ला यायला निघाले. आता पुढे...)

      सगळे आता पोलीस स्टेशन ला येतात.... टीव्ही वर प्रेस कॉन्फरन्स मध्ये ठेवलेल्या बॉम्ब ची बातमी येत असते.... तुफान न्युज चॅनेल वर हि एक्सक्लुझिव बातमी म्हणून दाखवत असतात... या बातमीमुळे आता अजून खळबळ उडणार हे जाणून ए.सी.पी. सुयश कुणाल ला सांगून त्याच्या न्युज चॅनेल वर जनतेला शांत राहण्याचं आव्हाहन करण्याची बातमी प्रसारित करायला सांगतात.... हे प्रकरण मार्गी लावून आता सगळ्या पोलिसांची मीटिंग ठरते.... प्रत्येकाला जे काही हाती लागलं आहे त्यावरून सगळ्या कड्या जोडायच्या असतात... सगळे सुयश सरांच्या केबिन मध्ये जातात.... 

"जय हिंद सर!" सगळे सॅल्यूट करतात.

विक्रम बोलायला सुरुवात करतो; हॉस्पिटल मधला सगळा प्रकार तो सगळ्यांना सांगतो... 

"मग तुला त्या अँबुलन्स चे काही डिटेल्स मिळाले? कोणत्या हॉस्पिटल ची होती?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर! मी माहिती काढली पण, ती खोटी अँबुलन्स होती... म्हणजे ती सिनेमा आणि सिरिअल मध्ये वापरतात तशी.... मी खबऱ्याला कामाला लावलं आहे अजूनही काही डिटेल्स लवकरच मिळतील. त्या खोट्या पोलिसांचे पण थोडे थोडे चेहरे दिसत होते ती प्रिंट सुद्धा मी इतर ठिकाणी पाठवली आहे... त्या दोघांबद्दल सुद्धा लवकरच कळेल." विक्रम म्हणाला. 

"सर! मी आणि निनाद सर हॉल मॅनेजर ला भेटलो... त्याच्या सांगण्या वरून मी बाईक शोधल्या आहेत! त्याने ज्या प्रमाणे वर्णन केलं होतं त्या नुसार दहा बाईक मिळाल्या... त्यातल्या चार तर बेवारस म्हणून कित्येक महिने नगरपालिकेत पडून आहेत.... राहिलेल्या सहा बाईक मधल्या तीन बाईक कधीही त्या हॉल च्या इथे फिरकल्याच नाहीयेत.... म्हणजे मी स्वतः चौकशी करून आलोय... राहिलेल्या तीन बायकर्स ना इथे बोलावलं आहे... येतीलच ते अर्ध्या तासात." गणेश ने सगळं सांगितलं. 

"ओके गुड! सोनाली, अभिषेक तुम्हला काय माहिती मिळाली आहे?" सुयश सरांनी विचारलं. 

सोनाली ने फॉरेन्सिक लॅब मध्ये जे काही घडलं ते सगळं सांगितलं.... 

"ओके.. आता आपण सगळ्या कड्या जोडू... आधीच आपले तीन तास गेले आहेत.... तोवर गणेश तू ते बाईक मालक कुठपर्यंत आलेत बघ आणि नसतील आले तर त्यांच्या घरी जाऊन उचल त्यांना!" सुयश सर म्हणाले.
****************************
गणेश त्या माणसांना कॉल करायला गेला... थोड्याच वेळात दोन जण आले... त्यांची कसून चौकशी झाली.... पण, दोघेही तिथे त्या हॉल जवळ फिरकले नव्हते... आता फक्त एक माणूस यायचा राहिला होता... त्याचा फोन सुद्धा आता बंद येत होता... आर.टी. ओ. मधून मिळवलेल्या पत्त्यावर निनाद आणि गणेश गेले.... त्याच्या घराला बाहेरून कुलूप होतं! आजूबाजूला चौकशी केल्या नंतर त्याचं नाव बबन असल्याचं आणि तो गावाला जायला बस स्टॉप वर गेला असल्याचं समजलं.... लगेचच दोघं बस स्टॉप वर गेले आणि त्याला पकडून पोलीस स्टेशन ला आणलं.....
*************************
"सॉरी सॉरी सर! मी काही नाही केलं.... मला का इथे पकडून आणलं आहे..." बबन म्हणाला. 

"मग पळाला का? हॉल च्या बाहेर जो खोटा अक्सीडेंट झाला त्यात पण तू सामील होतास ना बोल पटकन..." निनाद ने दरडावून विचारलं.

"हो! हो! सर.... पण, मला या कामासाठी पैसे मिळाले होते.... मी एक छोटासा कलाकार आहे... सध्या काहीही काम नव्हतं आणि समोरून हे काम येत होतं म्हणून मी केलं! एका शॉर्ट फिल्म साठी शूटिंग करायचं आहे असं मला सांगितलं होतं.... मला त्यांनी या साठी वीस हजार रुपये दिले होते.... पण, जेव्हा मला समजलं त्या तिथल्या हॉल मध्ये बॉम्ब होता आणि पोलीस आता माझ्या मागावर आहेत तेव्हा मी गावाला जायचं ठरवलं..." बबन ने घाबरत घाबरत सगळं सांगितलं. 

"कोणी दिले होते पैसे? त्याला ओळखू शकशील का?" गणेश ने विचारलं.

"हो सर!" बबन म्हणाला. 

"ठीक आहे तू आता आम्हाला त्याचं स्केच काढायला मदत कर...." निनाद ने सांगितलं. 

स्केच आर्टिस्ट ला बोलवून त्या व्यक्तीच स्केच काढण्यात आलं... स्केच तयार झाल्यावर बबन ला शहर सोडून कुठेही जाता येणार नाही आणि आम्ही बोलवू तेव्हा यावं लागेल या अटीवर सोडलं. तो तिथून गेल्यावर ते स्केच गणेश नि इतर सहकार्यांना दाखवलं.... 

"सर! या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय... पण, नक्की कुठे आठवत नाहीये..." अभिषेक म्हणाला. 

"आठवायचा प्रयत्न कर... आपल्यासाठी या केस मध्ये एक एक धागा महत्वाचा आहे! एक जरी कबुतर हाती लागलं ना तरी सगळी गँग मिळेल." सोनाली म्हणाली. 

"एक एक मिनीट सोनाली! तू आत्ता काय म्हणालीस?" विक्रम ने विचारलं.

"एक एक धागा महत्वाचा आहे आणि एक जरी कबुतर हाती लागलं तरी....." सोनाली पुन्हा म्हणाली. 

"येस! कबुतर! सर, मगाशी सांगायचं च राहिलं; डॉ. रवी म्हणाले होते, त्यातल्या एका माणसाला फोन आलेला तेव्हा तो कबुतर म्हणाला होता!" विक्रम ने घाई घाईत सांगितलं. 

"हो! पण, नक्की कोणत्या अर्थाने त्याने कबुतर असं म्हणलं होतं हे कसं समजणार?" निनाद म्हणाला. 

"माणूस कि कबुतर खाना? एक काम करा कबुतर खान्याच्या इथे काही संशयास्पद आढळतंय का बघा... आणि आपापल्या खबर्यांना कामाला लावून या स्केच मधल्या माणसाबद्दल काही कळतंय का बघा... आजूबाजूच्या पोलीस स्टेशन ला सुद्धा हे स्केच पाठवून द्या." सुयश सर म्हणाले. 

निनाद आणि सोनाली कबुतर खान्याजवळ गेले.... तिथे त्यांना एक बेवारस पडलेली बॅग दिसली.... सोनाली ने बॉम्ब स्कॉट ला फोन करून तिथे बोलावून घेतलं आणि निनाद ने  तिथला थोडा फार एरिया रिकामा केला... थोड्याच वेळात तिथे बॉम्ब स्कॉट ची टीम आली... बॅगेची चेकिंग केली तर त्यात बॉम्ब असल्याचं समजलं..... बॉम्ब स्कॉट वाल्यांनी काळजी पूर्वक बॅग उघडली आणि बॉम्ब पाहिला तर तो खोटा बॉम्ब होता... सगळ्यांच्या जीवात जीव आला.... त्या बॅगेत एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं; "हा बॉम्ब तर खोटा होता पण, पुढचा खरा असेल... शहरात खूप ठिकाणी बॉम्ब पुरून ठेवलेले आहेत... ४८ तास पूर्ण झाले की ते फुटातीलच!" 
         निनाद आणि सोनाली पोलीस स्टेशन ला आले ती चिठ्ठी सुयश सरांना दाखवली आणि बॅग फॉरेन्सिक टेस्ट साठी लॅब ला पाठवली.

"सर! त्या अँबुलन्स बद्दल कळलंय.... एका आड रस्त्याला झाडीत लपवून ठेवलेली सापडली. जाळायचा प्रयत्न केला होता पण, पूर्णपणे ती जळाली नाही म्हणून ओळख पटू शकली." विक्रम म्हणाला. 

एवढ्यात फोन वाजला.... 
"हॅलो! मुंबई पो..." सुयश सर बोलत होते..

दहशदवादी सुयश सरांना तोडत म्हणाला; "काय ए.सी.पी. कशी वाटली खोट्या बॉम्ब ची गंमत? काहीही हाती लागत नाहीये ना... कीव येतेय मला.... चुचुचु.... आता तुम्ही फक्त बघत राहायचं... शहरात आता दिवाळी होईल दिवाळी.... हा हा हा हा...." आणि फोन ठेवला. 

"सर! तुम्ही बरोबर ओळखलं पुन्हा याचा फोन येणार! बरं झालं आपण रेकॉर्ड करून घेतलं आहे.... पण, सर कॉल काही ट्रेस नाही झाला... त्याने त्याने तेवढी काळजी घेतली... अजून फक्त एक सेकेंद जरी फोन चालू राहिला असता तरी लोकेशन समजलं असतं!" निनाद म्हणाला... 

"माहित होतं मला... पण, आता आपल्या हातात जे रेकॉर्डिंग आलं आहे त्यावरून काही माहिती मिळते का बघूया." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक ने मिळालेलं रेकॉर्डिंग नीट क्लीअर करायचा प्रयत्न केला... बॅकग्राऊंड ला कोणते आवाज येतायत ते जास्तीत जास्त वाढवले.... मागून फक्त खूप गोंधळ ऐकू येत होता.... 

"नक्कीच हि जागा खूप गर्दीची आहे.... सगळ्यांचा खूप गोंधळ ऐकू येतोय... पण, आता नक्की कोणती तेवढं मिळतंय का बघूया... अजून आवाज क्लिअर होतायत का बघ." सुयश सर मिळालेल्या चिठ्ठीकडे नीट पाहत बोलत होते. 

"सर! तुम्ही एवढी निरखून का पाहताय चिठ्ठी?" गणेश ने विचारलं.

"हा कागद बघ अगदी पातळ आहे... म्हणजे टिशू पेपर वाटतोय मला..." सुयश सर तो कागद थोडा लांब उजेडात धरत म्हणाले.

"सर! यावर अजून काहीतरी दिसतंय..." सोनाली म्हणाली.

"हम्म! हे घे पेन्सिल ने रब करून बघ हे काय आहे.... याच कागदावर ठेऊन लिहिलं असणार म्हणून त्याचा छाप उमटला आहे...." सुयश सर ती चिठ्ठी सोनाली कडे देत म्हणाले.

एवढ्यात विक्रम चा फोन वाजला.... तो बाजूला जाऊन फोनवर बोलून आला... 
"सर! माझ्या खबऱ्याचा फोन होता... त्या खोट्या पोलिसांपैकी एकाला त्याने बघितलंय आणि आता त्याची खबर द्यायलाच फोन आला होता... मी उचलून आणतो त्याला..." विक्रम म्हणाला.

"नाही! एकदम असा अटॅक करू नकोस! ते लोक सावध होतील... आधी त्या माणसाची पूर्ण माहिती काढ.... तो कुठे कुठे जातो, कोणाला भेटतो सगळं आणि मग पुढे काय करायचं ते ठरवू...." सुयश सर म्हणाले. 

विक्रम सॅल्यूट करून त्या माणसाची माहिती काढायला गेला... 
क्रमशः......
*****************************
आता त्या चिठ्ठीवरून कोणता धागा मिळतोय, विक्रम ला काय माहिती मिळेल आणि अभिषेक ला तो ओळखीचा वाटणारा माणूस आठवेल का? पाहूया पुढच्या भागात... तो पर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.... आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका...

🎭 Series Post

View all