मिशन मुंबई (भाग-५)

Hard work of police to save our Mumbai.

मिशन मुंबई (भाग-५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, तुफान न्यूज चॅनेल चा रिपोर्टर आता पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात आहे..... विक्रम ने त्या मॉल मध्ये जखमी झालेल्या माणसाला सुद्धा ट्रेसिंग वर ठेवलं आहे.... आता पुढे...)
***********************
सुयश सरांनी कुणाल ला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतलं! 

"सर काय झालं? असं अचानक का बोलावलं?" कुणाल ने विचारलं. 

"कुणाल! आम्हाला तुझी मदत हवी आहे..... ते तुफान न्यूज चॅनेल आहे त्या बद्दल जरा माहिती हवी होती." विक्रम ने सांगितलं.

"ते! सर, खरं सांगायचं तर मला सुद्धा एवढं माहित नाहीये.... ते आत्ता आत्ता महिनाभरा पूर्वी निघालेलं चॅनेल आहे.... आणि हो! त्यांचं ब्रॉडकास्टिंग टीव्ही वर नाही होत! ते लोक सोशल मीडिया वर त्यांचं चॅनेल चालवतायत.... नाहीतरी आजकाल लोकं सोशल मीडिया जास्त वापरतात... त्यामुळे त्यांनी दिलेली कुठलीही बातमी पटकन प्रसारित होते...." कुणाल ने सांगितलं. 

"सर! म्हणजे आपला संशय खरा ठरू शकतो." निनाद म्हणाला.

"कोणता संशय?" कुणाल ने काहीही न समजल्यामुळे विचारलं.

"आम्हाला असं वाटतंय या सगळ्या प्रकरणामध्ये त्या चॅनेल चा रिपोर्टर सामील असणार!" सुयश सर म्हणाले.

"मला पण असं वाटलं होतं पण, मी काही बोललो नव्हतो!" कुणाल म्हणाला.

"एक एक मिनीट! तुला असं काही वाटायचं काय कारण? काही घडलं आहे का?" सोनाली ने विचारलं. 

"हो! म्हणजे मी दर वेळी बघितलं आहे, जेव्हा जेव्हा कोणत्या घटना घडल्या आहेत तो रिपोर्टर तिथे सगळ्यात आधी पोहोचलेला असतो! आता बघा ना, त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर जे काही झालं तेव्हा फक्त आपणच तिथे होतो.... सगळे पत्रकार निघून गेले होते.... इतर कोणाला बातमी लागायच्या आधी हा तिथे पोहोचला आणि बातमी लगेच देऊन मोकळा पण झाला हे कसं शक्य आहे?" कुणाल स्पष्टीकरण देत म्हणाला.

"सर, कुणाल म्हणतोय त्यात तथ्य आहे.... म्हणजे बघा ना तो व्हिडिओ शूट करून अपलोड करून वायरल होई पर्यंत थोडा वेळ तर जाणारच ना! पण, आपण पोलीस स्टेशन ला पोहोचे पर्यंत हि बातमी एवढी कशी वायरल झाली होती?" विक्रम कुणाल ला साथ देत म्हणाला. 

"हम्म! कुणाल, तू आमची एक मदत करशील? म्हणजे मी सांगतो ती बातमी तू प्रकाशित करायची.... जमेल?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर, नक्कीच!" कुणाल म्हणाला. 

"तू आमच्या बरोबर फोर्ट ला चल, तिथे गेल्यावर आमचा इशारा मिळाला की, तू बातमी द्यायला सुरुवात कर... त्यामध्ये तू असं सांगायचं, पोलिसांना याचा सूत्रधार कोण हे समजलं आहे आणि एका संशयित व्यक्तीला त्यांनी अटक केली आहे... आता आपली मुंबई सुरक्षित आहे... काळजी करण्यासारखं काही नाही." सुयश सर म्हणाले.

"सर, याचा काही उलट परिणाम झाला तर?" कुणाल ने विचारलं.

"नाही! हि बातमी ऐकून ते लोक काही ना काही चूक करतीलच..... शेवटी चोराच्या मनात चांदणं असतंच!" विक्रम म्हणाला. 

एक प्रॉपर प्लॅन आखून सगळे फोर्ट कडे निघाले.... कुणाल पोलिसांच्या थोडं मागाहून आला.... बॉम्ब स्कॉट ला कल्पना देऊन ठेवली होती आणि ते लोक सुद्धा अंतर ठेवून पोलिसांच्या फोन ची वाट पाहत होते...... कारण सगळे वेष बदलून तिथे गेले होते.... 

सोनाली आणि निनाद एका जोडप्याच्या वेशात होते, जे तिथे फिरायला आलेले, अभिषेक तिथे सामान विकणाऱ्या एका विक्रेत्याच्या वेशात होता, गणेश आंधळ्याचा वेष घेऊन कुठे संशयास्पद बॅग दिसतेय का पाहत होता, विक्रम आणि सुयश सर सगळी कडे नजर ठेवून होते... गर्दी चा फायदा घेत कुणाल सुद्धा लपलेला होता आणि तुफान चॅनेल चा रिपोर्टर दिसतोय का पाहत होता.... सगळे एकमेकांसोबत कॉन्फरन्स कॉल वर कनेक्टेड होते....

"सर! मी इथे गिफ्ट शॉप च्या जवळ आहे.... इथे एक बॅग आहे... मला संशय आहे यात बॉम्ब असणार.... कारण बराच वेळ झाला कोणी त्या बॅगेकडे फिरकलं नाहीये..." गणेश ने कॉल वर सांगितलं. 

"ओके... बॉम्ब स्कॉटची टीम येईल तिथे.... कुणाल, तू आता नीट लक्ष ठेव तो रिपोर्टर आजूबाजूला असेल.... कारण रिमोट नी आधी बॉम्ब ऍक्टिव्ह करावा लागेल..." सुयश सर म्हणाले.

"सर! तो ट्रेसिंग वर होता तो माणूस सुद्धा इथेच येतोय.... हे बघा त्याचं लोकेशन इथे येतानाच दिसतंय...." विक्रम सुयश सरांना टॅब दाखवत म्हणाला. 

"म्हणजे त्या बॅगेत नक्की काहीतरी खास असणार म्हणून तो ती बॅग घेऊन फिरतोय...." सुयश सर म्हणाले. 

"सर, तुम्ही फक्त ऑर्डर द्या... मी लगेच त्याला पकडून आणतो.... आपल्याला कळलंय तो कुठे आहे..." विक्रम म्हणाला.

"नाही! तो जर बॅग घेऊन इथे आला आहे म्हणजे ती बॅग त्याला कोणाला तरी द्यायची असेल.... तू जर त्याला आत्ता पकडलं तर दुसरा व्यक्ती सावध होईल.... अभिषेक, तुला विक्रम एक लोकेशन पाठवतोय त्यावरून त्या माणसाचा पाठलाग कर आणि तो कोणाला भेटतोय सांग!" सुयश सर म्हणाले.

"ओके सर!" म्हणून अभिषेक त्याच्या कामाला लागला...

थोड्याच वेळात अभिषेक ला तो माणूस दिसला.... तो ती बॅग घेऊन कोणाची तरी वाट बघत होता.... इतक्यात तुफान चॅनेल चा रिपोर्टर तिथे आला आणि या माणसाने त्याला बॅग दिली... अभिषेक ने सगळं सुयश सरांना कळवलं.... 

तोवर तिथे बॉम्ब स्कॉट चा बॉम्ब डिफ्युज करून सुद्धा झालेला असतो! पूर्ण एरियाला आता पोलिसांनी वेढा घातलेला असतो.... तो रिपोर्टर रिमोट च बटन दाबत असतो पण, काहीही होत नाही पाहून त्याला संशय येतो.... ते दोघं पळायला लागतात.... पण, सगळे मिळून त्या दोघांना पकडतात आणि पोलीस स्टेशन ला घेऊन येतात.... पोलिसांच्या सांगण्यावरून कुणाल सगळा धोका टळला असल्याची बातमी प्रसारित करतो! 
***********************
पोलीस स्टेशन मध्ये दोघांची कसून चौकशी होत असते..... दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी साठी बसवलेलं असतं! त्या खोट्या पेशंट ची (मॉन्टी ची) चौकशी अभिषेक आणि गणेश करत असतात तर त्या रिपोर्टर (सिड) ची चौकशी विक्रम आणि निनाद करत असतात.... दोन्ही खोल्यांमध्ये स्पीकर आणि कॅमेरा लावलेला असतो.... सुयश सर आणि सोनाली बाहेरूनच सगळं बघत असतात.... सुरुवात होते ती मॉन्टी च्या चौकशी पासून.... 

"काय रे! तू तर कोमात होतास ना... तिथून हलवल्यावर लगेच कसा शुद्धीत आलास? आणि तुझा चेहरा पण खराब झाला होता ना..." गणेश विचारतो.

मॉन्टी एकदम कुत्सित हसतो... त्याच्या चेहऱ्यावर असे भाव असतात जसं कि, तुम्ही कितीही काहीही केलं तरी मी सांगणार नाही... पण, पोलीस बरोब्बर पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून काढून घेतात....

"मी कोमात गेलोच नव्हतो! ते तर मी नाटक केलं होतं आणि चेहऱ्याचं म्हणलं तर तो खरंच खराब झालाय...." असं म्हणत खोट्या चेहऱ्याचा मास्क तो काढतो... गणेश ने सांगितल्या प्रमाणे खरंच त्याचा चेहरा ओळखू येणार नाही एवढा विद्रुप असतो... शिवाय त्यावर अजूनही पट्टी केलेली असते... 
तो पुढे बोलू लागतो... "काय आहे ना, अश्या मोठ मोठ्या लढायांमध्ये थोडं काहीतरी गमवावं लागतचं! मी चेहरा गमावला त्यात काय एवढं..." असं म्हणून हसायला लागतो....

"ए गप!" अभिषेक संतापून म्हणतो. 

"त्या मॉल मध्ये मी रिमोट च बटन दाबायला गेलो होतो.... खरंतर मला माहित नव्हतं नक्की सुसाईड बॉम्बर कोण आहे.... नेमकं त्याच्या शेजारीच जाऊन मी बटन दाबल्यामुळे मला इजा झाली.... पण, ठीक आहे.... आम्ही आता आमच्या मिशन च्या जवळ आहोत.... हा हा हा...." असं म्हणत तो पुन्हा हसायला लागला.

"तुमचा मास्टरमाइंड कोण आहे बोल लवकर..." गणेश विचारतो.

"ते मी जिवंत असे पर्यंत तुम्हाला कळू देणार नाही.... मग अगदी माझा जीव गेला तरी चालेल..." मॉन्टी एकदम आत्मविश्वासाने बोलत असतो! 

गणेश आणि अभिषेक खूप प्रयत्न करतात त्याच्याकडून काढून घेण्याचं पण, तो काहीही बोलत नसतो.... सगळं टॉचर तो सहन करतो तरीही तोंडातून एकही शब्द काढत नाही...... 
हे बघून सुयश सर त्याला तिथेच बांधून ठेवून दोघांना बाहेर यायला सांगतात.... आणि आता सिड ची चौकशी सुरु होते.... 
क्रमशः.....
*************************
आता पुढील भागात पाहूया सिड ची चौकशी.... तुम्हाला काय वाटतंय कोण असेल या मागे? सिड ची चौकशी केल्यावर पोलिसांना काही हाती लागेल का? आणि ती तिसरी बॅग कुठे ठेवली असेल? पोलिसांकडे आता फक्त २४ तास उरले आहेत.... यात काय होतंय ते कसे या दहशदवाद्यांना पकडतायत हे पाहूया पुढच्या भागात... तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all