मिसटेकन आयडेंटिटी
भाग २ चाळीसगाव.
आणखी एक म्हणजे या मुली मुंबई पुणे सोडून इतक्या दूर नाशिकला कशाला येतील? जर कोणाला भेटायला आल्या असतील, तर कोणीतरी मिसिंग ची तक्रार केलीच असती. यांचा अर्थ या मुलीचं इथे येण्याचं कारण वेगळच असावं. आणि ते घरच्या लोकांना माहीत नसावं.” – चव्हाण.
सर्वांनी थोडा विचार केला आणि त्यांनी चव्हाण साहेबांचं म्हणण मान्य केलं.
“करपे तुमचं काय विश्लेषण आहे?” – शेंडे.
“माझ्या मते,” आता करपे बोलले, “विदर्भातल्या मुलींचा चेहरा साधारण गोल किंवा चौकोनी असतो. नाक जरा जाडसरच असतं, ओठ पण थोडे जाड असतात भुवया बाकदार असतात आणि जाड असतात. त्यामुळे विदर्भ पण बाद झाला आहे.” – करपे.
“माराठवाड्यातल्या मुलींचा चेहरा थोडा लांबट असतो पण कोरडा असतो, त्वचा जरा खरखरीतच असते. नाक लांबट असलं तरी मधे थोडा उंचवटा असतो. हाताचा ढोपरा पासूनचा भाग थोडा वेगळा असतो. एका कोनांतून हलका वळलेला असतो. तरी पण मला असं वाटतं की ही मुलगी माराठवाड्यातली असू शकते. आंबेजोगाई किंवा बीड किंवा केज भागातली असावी. नक्की काही सांगता येणार नाही.” – पाटील.
“आता राहिला खानदेश भाग. त्या भागातलं कोणी आहे का? डिपार्टमेंट मध्ये तर नाही पण कोणाच्या ओळखीत आहे का?” – शेंडे.
जेंव्हा कोणीच काही बोललं नाही, तेंव्हा शेंडे साहेब म्हणाले,
“करपे असं करा, हा फोटो आणि मी नोंदलेली निरीक्षणं घेऊन तुम्ही उद्या जळगाव ला जा. तिथून धुळे आणि चाळीसगावला जा. तिथल्या लोकांशी बोला, मग आपण शोध नेमका कुठे करायचं ते फायनल करू.” – शेंडे.
दुसऱ्या दिवशी करपे जळगावला आणि चाळीसगावला गेले. तिथे चर्चा झाल्यावर त्यांनी शेंडे साहेबांना फोन केला,
“साहेब, हे वर्णन खानदेशातल्या मुलींना बरंचसं लागू पडतंय. आता पुढची अॅक्शन काय घ्यायची?” – करपे.
“फोटो आणि वर्णन तिथल्या लोकल पेपर मध्ये द्या. हे जळगाव, धुळे, पांचोरा नंदुरबार, चाळीसगाव, सगळीकडे द्या. पोलिसांना आपापले खबरी कामाला लावा म्हणून विनंती करा. बघूया काही उत्तर येते का?” – शेंडे.,
दोन दिवस सगळीकडे फिरून पेपर मध्ये बातमी देऊन करपे नाशिकला परतले. आता कुठून फीडबॅक ये पर्यन्त काहीच करता येणार नव्हतं म्हणून शेंडे साहेबांनी आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं.
दोन तीन दिवस काही न घडतं निघून गेले. एक दिवस संध्याकाळी चाळीसगाव पोलिस स्टेशन मध्ये इंस्पेक्टर शीतोळे ड्यूटि वर असतांना एक जोडपं त्यांच्यासमोर येऊन बसलं. चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. सारखी चुळबुळ चालली होती.
“बोला साहेब, काय प्रॉब्लेम आहे?” – शीतोळे.
“साहेब, मी रघुराम पाटील. सकाळ पासून काही तरी विचित्र घडतंय आम्हाला काही समजत नाहीये म्हणून शेवटी आम्ही इथे आलो.” – पाटील.
“असं काय घडलं की तुम्हाला चिंता वाटते आहे?” – शीतोळे
“साहेब, काल सकाळी साधारण १२ वाजता कोणी तरी आमच्या मुलीचा फोटो दाखवून चौकशी करत होतं. त्या मुली जवळच राहतात, त्यांनी त्या माणसाला काहीच सांगितलं नाही, पण आम्हाला येऊन सांगितलं. त्यानंतर आम्ही दिवसभर मुलीच्या मोबाइल वर संपर्क करायचं प्रयत्न करतो आहोत पण स्विचऑफ येत होता. आम्हाला वाटलं की बॅटरी संपली असेल म्हणून काल आम्ही थांबलो पण आज दिवसभर सुद्धा स्विच ऑफ येतो आहे. आता चिंता वाटायला लागली आहे.” – पाटील.
“तुमची मुलगी दुसऱ्या गावात राहते का? कोणचं गाव?” - शीतोळे
“नाही साहेब. आमच्याच बरोबर राहते. पण तिचा आत्ताच रिजल्ट लागला. ती इंजीनियर झाली आहे. ती म्हणाली की नाशिक भागात बरेच कारखाने आहेत तर तिकडे जाऊन काही नोकरी मिळू शकते का ते बघते. म्हणून ती सध्या नाशिकला गेली आहे.”–पाटील.
“एकटीच गेली आहे की कोणी बरोबर आहे?” – शीतोळे
“एकटीच गेली आहे. तिला सवय आहे साहेब. औरंगाबादला चार वर्ष इंजीनीरिंग ला एकटीच तर होती. खूप हुशार आहे. कोणाच्याही अध्यायात मध्यात नसते. पण आता काळजी वाटते आहे.” – पाटील.
नाशिकला कोणी नात्यातलं किंवा ओळखीचं आहे का? जिथे तुमची मुलगी चार दिवस राहिली आहे?” – शीतोळे
“नाही साहेब नाशिकला कोणीच नाहीये. एखाद्या हॉटेल मध्ये राहीन म्हणाली.” -पाटील
“हॉटेलचं नाव कळवळण आहे का?” – शीतोळे
“नाही साहेब.” – पाटील.
“ओके. मी नाशिक पोलिसांशी संपर्क करतो. तुम्ही मुलीचं नाव, वर्णन म्हणजे ऊंची, बांधा वगैरे द्या. आणि एखादा सर्वात अलिकडचा फोटो द्या. आम्ही पूर्ण प्रयत्न करूच, पण तुम्हाला काही कळलं तर आम्हाला लगेच कळवा.” – शीतोळे
पाटलांनी मग त्यांच्या मुलीचा फूल साइज फोटो दिला आणि म्हणाले,
“नाव निर्मला,ऊंची साडे पांच फुट. वर्ण निमगोरा. बांधा सडसडीत. लांब केस आणि पेहराव पंजाबी ड्रेस.” – पाटील.
शीतोळे फोटो बघत होते. चेहरा गंभीर झाला होता. त्यांनी ड्रॅावर उघडून करपे साहेबांनी दिलेला फोटो बघितलं, ताडून पाहिला आणि गंभीर चेहरा करून पाटलांना म्हणाले,
“पाटील. साहेब, मन घट्ट करा. हा आमच्या जवळ नाशिक हुन आत्ताच आलेला फोटो बघा.” – आणि शीतोळे साहेबांनी त्यांच्याजवळ असलेला फोटो टेबल वर ठेवला.
फोटो पाहिल्यावर पाटील पती पत्नी दोघेही दचकले.
“ही निर्मालाच आहे साहेब. पण हिच्या चेहऱ्यावर रक्त लागलेलं दिसत आहे. काय झालं? आमची मुलगी सुखरूप आहे ना? अपघात झाला आहे का?” – पाटील.
शीतोळे साहेबांना एकदम सुटल्यां सारखं झालं. त्यांना मुलीचा खून झाला आहे हे कसं सांगायचं याचाच विचार ते करत होते.
“हो तिला जबर अपघात झाला आहे आणि मन घट्ट करा तुमची मुलगी आता या जगात नाहीये. ऑन द स्पॉट तिचा मृत्यू झाला. तुम्ही आता ताबडतोब नाशिकला निघा. मी आमचा एक शिपाई आणि गाडी देतो तो तुम्हाला नाशिकला घेऊन जाईल. जितक्या लवकर तुम्ही निघाल तितकं चांगलं.” – शीतोळे.
त्यानंतर १५-२० मिनिटं पोलिस स्टेशन मधलं वातावरण ढवळून निघालं. शेवटी सर्वांनी पाटील दम्पतीला शांत केल्यावर अर्ध्या तासाने ते एका शिपायाबरोबर नाशिकला निघाले.
त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ आणि मेहुणा पण निघाला.
नाशिकला शेंडे साहेबांना फोन करून शीतोळे साहेबांनी पूर्ण कल्पना दिली आणि पाटील पती पत्नी नाशिकच्या वाटेवर आहेत हे सांगितलं.
नाशिकला पोचल्यावर खरी गोष्ट कळल्यावर पाटलांच्या डोक्यावर आकाशच कोसळलं.
“साहेब, इतक्या संध्या आणि सरळ स्वभावाच्या मुलीचा कोणी का खून करावा?”–पाटील
“तेच विचारतो आहे. तुमच्या मुलीचं कोनाबरोबर भांडण झालं होतं का? तिचे कोनाबरोबर प्रेमसंबंध होते का? पाटील साहेब, जे काही असेल ते अगदी न लपवता सांगा. मारेकऱ्या पर्यन्त पोचण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.” – शेंडे
बराच वेळ वेगवेगळ्या प्रकाराने विचारून सुद्धा निष्पन्न काहीच निघालं नाही. त्यांची मुलगी अतिशय संधि आणि सोज्वळ होती यावर पाटील कुटुंबीय ठाम होते. मग सर्व सोपस्कार करून बॉडी पाटील कुटुंबियांच्या कडे सुपूर्त करण्यात आली. आणि ते चाळीसगाव च्या वाटेला लागले.
चाळीसगाव पोलिसांनी निर्मालाच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली, टीच्या शाळे मधे सुद्धा चौकशी केली. सर्वांनीच नि:संदिग्ध निर्वाळा दिला. चाळीसगांव पोलिसांनी नाशिकला रीपोर्ट पाठवून दिला. आता खरी मुश्किल झाली होती. पुढे तपास सारकण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. करपे औरंगाबादला तिच्या कॉलेज मध्ये पण जाऊन आले तिथेही काही विपरीत रीपोर्ट मिळाला नाही.
सहा महीने शेंडे आणि चाळीसगावचे शीतोळे प्रयत्न करत होते, पण काहीही सुगावा लागला नाही. हळू हळू केस मागे पडत गेली आणि एक दिवस शेंडे साहेबांनी ती केस रीतसर परवानगी घेऊन ‘शोध न लागलेल्या केसेस’ या गठ्यात टाकली.
पाहाता पाहता वर्ष उलटलं. सुरवातीला पाटील चौकशी करत होते पण त्यांनीही आता येणं बंद केलं होतं. अशीच दोन तीन पाच आणि १० वर्ष उलटली. दर वेळेस नविन्न इंस्पेक्टर साहेब आले, की पेंडिंग केसेस चा गातथा उघडायचे आणि हाती काही लागलं नाही की परत ठेवून द्यायचे.
१० वर्षा नंतर अशी एक घटना घडली की ज्यामुळे केस पुन्हा ओपन झाली. घटना तशी सामान्यच होती पण तिने चौकशीला चालना दिली.
क्रमश:-----

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा