मिसटेकन आयडेंटिटी
भाग ५ टर्निग पॉइंट
त्यानंतर राघव किंवा आत्माराम तुम्हाला केंव्हा भेटला होता?” – शेंडे.
“हां आठवलं. स्वाती आली त्याच दिवशी दुपारी राघव आला होता. मी आनंदात होतो, त्याला पण ही बातमी दिली आणि गुलाब जाम पण खिलवला. बस.” – राजा.
परत पोलिस स्टेशन वर जातांना विसपुते म्हणाले,
“साहेब, हे तर अनपेक्षितच घडतंय. आता पुढे काय? त्या बार मधल्या दोघा जणांना चौकशीला बोलवायचं का? जो कोणी बोलला असेल त्यालाच आपल्या पद्धतीने विचारू. कदाचित तो बोलेल.” – विसपुते.
“करेक्ट भोसल्यांनी दोघांचा फोटो आणि भाईंदरचा पत्ता दिलाच आहे. तुम्ही कोणाला तरी भाईंदरला पाठवा आणि त्या आत्मारामला भेटून राघवचा पत्ता फोन नंबर घ्या. ही क्लिप खरी असल्याची खात्री पण करून घ्या.” – शेंडे.
दुसऱ्या दिवशी विसपुते साहेबांनी हवालदार परब यांच्यावर भाईंदरची ड्यूटि सोपवली. परब सकाळीच निघाले आणि दुपारी भाईंदरला पोचले. तिथल्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तिथल्या इंस्पेक्टर साहेबांना विसपुते साहेबांचं पत्र देतात आणि एका शिपायाला बरोबर घेऊन आत्मारामच्या घरी पोचतात. आत्माराम घरीच असतो. तो बिचआराआ संध्या माणूस पोलिसांना आपल्या घरी बघून गर्भगळितच होतो. त्याला कळतंच नाही की पोलिस कशाची चौकशी करायला आले आहेत ते.
“आम्हाला आत्मारामला भेटायचं आहे.” – परब.
“मीच आत्माराम. काय झालं साहेब? मी तर काहीच केलं नाही.” – आत्माराम.
“तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही घाबरू नका. निश्चिंत रहा. आम्ही एका माहिती साठी आलो आहोत आणि ती कदाचित तुम्ही देऊ शकाल.” – परब.
आत्माराम गोंधळला पण त्याचा काही दोष नाही हे ऐकल्यावर जरा रीलॅक्स झाला.
“कोणची माहिती साहेब?” – आत्माराम
“मागच्या महिन्यात तुम्ही आणि राघव एका बार मध्ये गेला होता?” – परब.
“हो. पण मित्र मित्र बार मध्ये गेले तर त्यात काय विशेष?” – आत्माराम.
“त्याचं काही नाही. पण मला हे सांगा की त्या दिवशी राघवने तुम्हाला राजा कोसले बद्दल काय सांगितलं?” – परब.
“त्याला दारू चढली होती साहेब. तो बरळत होता. राजा अत्यंत सज्जन माणूस आहे तो असलं काही करणारच नाही.” – आत्माराम
“ओके पण त्याने एका सज्जन माणसावर खुना सारखा गंभीर आरोप केला तो का? काय कारण आहे? त्याचं आणि राजाचं भयंकर भांडण आहे का?” – परब.
‘नाही, म्हणजे असलं तर माझ्या माहितीत नाही. पण तुम्हाला माझं नाव आणि ही माहिती कोणी दिली?” – आत्माराम
“आमचा एक माणूस त्यावेळेस तुमच्या शेजारीच बसला होता. त्याने तुमचं संभाषण रेकॉर्ड केलं. बाब गंभीर होती, म्हणून चौकशी सुरू झाली आहे.” – परब.
आत्माराम विचारात पडला.
“या राघवचं क्यारेक्टर कसं आहे?” – परब.
“वरवरची दोस्ती होती साहेब. शाळेत आमच्याबरोबर होता इतकंच.” – आत्माराम.
“त्याचा पत्ता आणि फोन नंबर देऊ शकाल का?” – परब.
“पत्ता तर त्याने सांगीतला नाही, पण फोन नंबर आहे.” – आत्माराम
आणखी थोडं बोलून परब परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी विसपुते साहेबांना त्यांनी अपडेट दिलं.
“हा आत्माराम कसा आहे?” – विसपुते.
“साधा गरीब माणूस आहे. आर्थिक परिस्थिती पण अगदीच बेतासबात आहे.” – परब.
“ठीक आहे राघवला फोन केला का?” – विसपुते.
“नाही, तो सावध होईल म्हणून नाही केला. लोकेशन मागवु का?” - परब.
“करेक्ट. आणि आल्यावर सांगा.” – विसपुते.
संध्याकाळी परब कॉल शीट घेऊन आले. म्हणाले.
“साहेब कॉल शीट तर आली आहे पण १५ दिवसांपूर्वी फोन स्विच ऑफ झाला आहे. मी IMEA नंबर ट्रॅक वर टाकायला सांगितलं आहे. फोन चालू झाल्यावर आपल्याला कळेल.” – परब.
“तो पर्यन्त आपल्याला थांबता येणार नाही. कॉल शीट वरुन सकाळी आणि संध्याकाळचे लोकेशन शोधा. कदाचित घरचा आणि ऑफिस चा पत्ता मिळेल.” – विसपुते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परब विसपुते साहेबांकडे आले आणि म्हणाले,
“साहेब सकाळची लोकेशन सीताराम मिल्स कंपाऊंड आहे आणि रात्रीची वर्सोवा आहे. काय करायचं?” – परब.
विसपुते साहेबांनी इंस्पेक्टर भोसले साहेबांना फोन लावला. सर्व अपडेट दिलं. भोसल्यांनी त्यांना आश्वासन दिलं की ते पूर्ण चौकशी करतील. आता त्यांचा रीपोर्ट येपर्यन्त काहीच करता येणं शक्य नव्हतं म्हणून विसपुते दुसऱ्या बाबींकडे वळले.
दोन दिवसांनी भोसल्यांचा विसपुते साहेबांना फोन आला.
“साहेब, तुम्ही सांगितल्या प्रमाणे चौकशी केली.. तो एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. हे ऑफिस सीताराम मिल्स कंपाऊंड मध्येच आहे. या कंपनीचा कारखाना भोसरीला आहे. तिथून काही महत्वाची पत्र किंवा कागद पत्र ने आण करण्या साठी एक कोरियर आहे. १५ दिवसांपूर्वी काही अर्जंट कामासाठी ३ लाखांची कॅश भोसरीला पोचवायची होती. नेहमीचा कोरियर त्या दिवशी नव्हता म्हणून त्या कामावर कंपनीने राघवला पाठवलं. पण तो भोसरीला गेलाच नाही आणि नंतर ऑफिस मधे पण आला नाही. कंपनीने त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवली आहे. N. M. JOSHI मार्ग पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा राघव वरसोवाला रहात होता. त्यांच्या घराचा पत्ता पण मिळाला. पण कॅश हातात आल्यावर त्याच दिवशी खोली सोडून गेला. कुठे गेला ते कोणालाच माहिती नाही. FIR ची कॉपी आणि डीटेल रीपोर्ट तुम्हाला पाठवला आहे.”
“झालं म्हणजे एवढी धडपड करून शेवटी हातात काहीच पडलं नाही. पहिले पाढे पंचावन्न.” – विसपुते.
“खरं आहे.” – भोसले.
“विसपुते,” शेंडे साहेबांनी विसपुते साहेबांनी अपडेट दिल्या नंतर म्हणाले, “ या राघवचं घर देवळालीला आहे तिथे जाऊन बघा. जर कोणी तिथे त्यांचे वडील, काका रहात असतील तर काही कळेल.” – शेंडे
“आधीच बघितलं आहे साहेब. काही उपयोग नाही. राघवचा बाप ५ वर्षा पूर्वी मेला. तेंव्हाच राघवने घर विकून टांकलं. आता तिथे त्याचं कोणीही नातेवाईक नाहीयेत. शेजारी, आजू बाजूला चौकशी केली पण कोणीच काही सांगू शकलं नाही. त्याचं आधार पण चेक केलं त्यावर देवळालीच्या घराचा पत्ता आहे.” – विसपुते.
“साहेब, हा राघवच खूनी असेल का? की यानेच सुपारी दिली असेल? की हा भुरटा भामटा असेल आणि बढाई मारण्यासाठी आत्मारामला खोटी गोष्ट रचून सांगितली असेल?” – विसपुते.
“हूं, काहीही असू शकतं पण राघव मिळाल्या शिवाय केस पुढे सरकू शकत नाही. आणि मारेकरी कोण ते ही कळणार नाही. त्यांच्यावर मुंबईत FIR झाली आहे म्हणजे हा माणूस साधा सरळ नक्कीच नाही.” – शेंडे.
त्यानंतर पुढे काहीच लिड मिळत नव्हती. शेवटी चार महिन्या नंतर केस पुन्हा डब्यात गेली. त्या नंतर दोन महीने तसेच गेले. नाशिकच्या पोलिसांनी त्या केस वर विचार करणं सोडून दिलं होतं. पण एक दिवस कोल्हापूरच्या पोलिस स्टेशन मधले इंस्पेक्टर बखले यांचा मोबाइल वाजला. त्यांनी पाहिलं तर कॉंस्टेबल रघुराम चा फोन होता.
“हूं बोल रघुराम” – बखले.
“साहेब, ते नाशिकहुन एक फोटो पाठवला होता खुनच्या संदर्भात तो माणूस इथे मला भाजी बाजारात दिसला आहे मी मोबाइल वर बघून खात्री केली. तोच आहे. काय करू.?”
“तुझी नक्की खात्री आहे?” – बखले.
“हो साहेब. १०० टक्के.” – रघुराम.
तू भाजीचा विचार सोडून दे. आणि त्याच्या मागावर रहा. त्याला नजरे आड होऊ देऊ नकोस. मी १० मिनिटांत तुला फोन करतो.” – बखले.
“हो साहेब.” – रघुराम
बखल्यांनी विसपुते साहेबांना फोन लावून बातमी दिली.
“साहेब त्याला ताबडतोब उचला” – विसपुते.
“साहेब, असं कसं उचलणार? त्यांच्यावर आरोप नाही FIR सुद्धा नाही पण त्यांच्या मागावर राहू शकतो. पण शेवटी पुढे काय?” – बखले.
“त्यांच्यावर ३ लाखांची चोरी करून पळाल्याची FIR मुंबईच्या एका पोलिस स्टेशन मध्ये झालेली आहे. मी तुम्हाला FIR ची कॉपी पाठवतो. या ग्राउंड वर तुम्ही नक्कीच त्याला अटक करू शकता. मी उद्या दुपार पर्यन्त तिथे पोचतो. त्याला सोडू नका.” – विसपुते.
“ठीक आहे साहेब. या तुम्ही उद्या . मी वाट पाहतो.” – बखले.
क्रमश:-----
दिलीप भिडे.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा