अश्याच एका संध्याकाळी...
स्वप्नांचा हिंदोळा थांबवून क्षणभर विसावले मी...
तेव्हा फसवं वाटलं सगळंच!..
रंगांनी भरलेलं क्षितिज.... लांब होत जाणाऱ्या सावल्या...
निसटून जाणारी वाळू... आणि परतून जाणाऱ्या लाटा...
इतके दिवस यावर भाळून मी झुलत राहिले... माझ्याच नादात!..
आजूबाजूला... सोबत... असं कधी कुणी नव्हतंच का??..
जेव्हा भाणाणणाऱ्या परतीच्या वाऱ्यासारखे...
प्रश्नावर प्रश्न उठत राहिले डोक्यात....
तेव्हा भरून आलं मन... अन्... झरू लागले डोळे...
आता एकटेपणाचा अंधार दाटून येणार... तोच जाणवलं...
शेजारच्या झुल्यावर नकळत विसावला होतास \"तू \"!!...
माझा \" सोबती \".... माझा \" मित्र \" बनून!!
तुलाही माझ्यासारखंच वाटलं असेल का रे!!!....
© आदिती भिडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा