Login

मितवा -1

मितवा

♦️ मितवा ♦️

भाग -1

आज तब्बल 25 वर्षांनी ते सर्व एकमेकांना भेटणार होते???? ते सर्व म्हणजे आपले हेच इयत्ता 10(फ) चे सर्व विद्यार्थी...नुतन मराठा विद्यालय, जळगाव.

श्रेया च्या आणि प्राचार्य विमल भोसले बाई ह्याच्या अथक प्रयत्न ना नंतर हे गेट टू गेदर जमून आल होते....कारण विमल बाई ह्याची प्राचार्य म्हणून पास झालेली ती पहिली बैच होती...त्या मुळे त्यांच्या निवृत्ती आधी त्याना एकदा पुन्हा त्या सर्वाना भेटावे असे वाटत होते....पण काळ जलद गतीने पुढे गेला होता...पण त्याची मुलगी आणि विद्यार्थिनी श्रेया हिने खुप मेहनत घेऊन ते जमवून आणले होते....

तिने 25 वर्ष मागे जाऊन सर्व मुला मुलींचे पत्ते, फोन , फेसबूक अनेक मार्ग अवलंबूनसर्वांना कॉन्टैक्ट केले होते....जवळ 45 विद्यार्थी ची ती 1995 ची बैच होती...सर्वाना तिने छानसे ग्रीटिंग कार्ड प्रिंट करुन स्नेह समेलंन चे आमत्रंण पाठवले होते....

सर्व काम ती आणि तिच्या वर्गात असणारे दुसरे 3 मुल आणी एक तिची जिवलग मैत्रिण असे 5 जण मिळुन करत होते....

व्हट्स ऐप्प ग्रुप तयार केला. कार्यक्रमात काय कसे कधि सर्व पुर्व नियोजित होते....

आणी उद्या वर तो दिवस येउन ठेपला होता....श्रेया ची गेले 2 आठवडे ह्या साठी धावपळ चालू होती...त्या मुळे आज तिला झोप येणे शक्य नव्हते...ती सर्व गोष्ट 10 वेळा चेक करत होती, कसे करायचे काय, जेवण, नाश्ता, पासुन शेवटी आभार प्रदर्शन पर्यंत सर्व तिच्या डोक्यात चालू होते....

बघुया उद्या काय होतय ते....पुढच्या भागात..... लवकरच...

©® हेमांगी सुर्यवंशी ©®

0

🎭 Series Post

View all