मितवा
भाग -2
आज तब्बल 25 वर्षांनी तो दिवस उगवला होता.... श्रेया ची खुप गडबड चालू होती, ह्या एका दिवसा चे नियोजन ती गेले 2 महिने झाले करत होती... आणि आता ही ती खास ह्या साठी आणि आई च्या निवृत्ती सोहळ्या साठी तिने चक्क 1 महिना सुट्टी घेऊन ती आली मुंबई हून.... तिला खास सर प्राईस म्हणुन तिचा नवरा सुनिल आणि मुलगा सकाळी 7 वाजता हजर झाले होते
ती मात्र सकाळ पासुन शाळेत रांगोळी, स्वागत तयारी, खुर्ची लावणे पासुन सर्व पहात होती....तिचा नवरा ही तिला योग्य ती मदत करत होता....आणि 10 वाजता सर्व येणार असे ठरले होते....
अखेर सकाळचे 9.30 वाजून गेले होते...हळू हळू सर्व विद्यार्थी जमा होत होते....शाळेचा स्टाफ ही तिला योग्य ती मदत पुरवत होता...
अखेर 10 वाजे पर्यंत जवळ जवळ सर्व विद्यार्थी जमा झाले होते...
विमल बाई आणि इतर शिक्षक वर्ग ही आता सभागृह मधे जमले होते....
सर्वांचे स्वागत, दीप प्रज्वलन करून करुन सोहळा चालू झाला होता....
हळू हळू सर्वांची ओळख, गप्पा टप्पा करत करत कार्यक्रमात रंग चढत होता... सर्व मुले- मुली बाहेरच जग विसरुन फक्त आपले शालेय जिवन जगत होते, कोण कुठून आलाय, काय करते हे सर आता क़ मागे पडले होते, सर्व फक्त आपले बालपण मनसोक्त जगत होते
पण स्टेज वर बसलेल्या विमल बाईंची नजर मात्र सैरभैर होत होती, श्रेया ने नजरे ने विचारले काय झाले पण बाई नी काही नाही असे सांगितले ....
मग 12 वाजता नाश्ता साठी जेव्हा सर्व विद्यार्थी बाहेर पडले तेव्हा बाई नी न राहवून श्रेया ला विचारले...अग सर्व विद्यार्थी आलेत का???तेव्हा ती बोलली नाही 4 विद्यार्थी कमी आहेत त्यातले 3 मुले बाहेर देशात जे आपल्या वीडियो कॉल ने जॉईन होतिल थोड्या वेळातच.... अग पण माझी एक विद्यार्थी होती कुसुम तिच काय झाले ग???
श्रेया थोडा विचार करत कोण कुसुम पटिल ना अग तिला निरोप दिला होता पण तिच्या घरुन ती येऊ शकत नाही इतकेच सांगण्यात आले...
विमल बाईंची मात्र अस्वस्थता वाढत चालली होती...पण बोलून दाखवता येत नव्हती, कुसुम काही खुप हुशार नव्हती पण साधारण, पण शांत आणि लाघवी अशी मुलगी होती एकदा आई वर ची कविता शिकवने चालू असताना ती मात्र खुप उदास झाली होती हे विमल बाई ने हरले होते.... मग त्यानी तास संपल्यावर तिला वेगळे घेऊन विचारले होते काय झाले तेव्हा त्याना बिलगून खुप रडलि होती ती...तिची आई बालपणीच गेली होती
ती आणि तिचे वडिल असेच राहत होते...तेव्हा पासून ती बाई मधे आई शोधत होती.. विमल बाईनी ही तिला छान मायेने सांभाळले होते, पण 10 वी नंतर तिच्या वडिलांची बदली मुंबईत झाली आणि मग तिचे काही समजलच नाही...
हळू हळू सर्व विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करत होते, कोण सध्या काय करते, वैगरे असे माहिती देवाण घेवाण चालू होते...मधेच गमती जमती करत कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व लोक त्याचा मनमुराद आनंद घेत होते ....
जेवणच कार्यक्रम आटोपला होता एव्हाना...सर्व मुलान साठी आठवण म्हणून विमल बाईंनी आणि श्रेया ने छोटी शी भेट वस्तू आणली होती ते देणे चालू होते.
वर्गातला अतिशय हुशार आणि चुणचुणीत मुलगा केतन स्टेज वर आला आणि माईक हातात घेऊन बोलू लागला तेव्हा त्याने विमल बाई काही अस्वथ असण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी कुसुम नसल्यची हुरहुर बोलून दाखवली...सर्व मुल आली पण ती नाही हे काही पटले नाही मला तुम्ही भेटल्या चा आनंद शब्दात सांगता येणार नाही पण ती असती तर बरे झाले असते....
पुढे अंताक्षरी खेळ, आणि इतर अनेक गमतीजमती करत कार्यक्रमाची यथासांग सांगता झाली...
जाताना केतन बाई च्या पाया पडायला आला तेव्हा बोलला...बाई कुसुम ला तूम्हाला भेटायला नक्की 3 दिवच्या आत घेऊन येतो... असे सांगतो...बाई त्याला नक्की आण असे सांगतात आणि स्नेह संमेलन खूप अविस्मरणीय अनुभव आणि आठवणी चा ठेवा घेऊन संपून जाते.......
बघुया 3 दिवसात काय होतय ते....
पुढच्या भागात..... लवकरच...
©® हेमांगी सुर्यवंशी ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा