Login

मला आई व्हायचे आहे

आई ही आईच असते.
मला आई व्हायचे आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

सुनीता आणि रमेश छान जोडपं होतं. लग्नाला आठ वर्षं होऊन गेली होती. मुलं नव्हती. त्यांनी खूप डॉक्टर पण केले. तरी त्यांना बाळ झालं नव्हते..

सुनीताची नणंद घरी आली होती. तिला दोन मुलं – एक मुलगी, एक मुलगा पण घरी आले होते. सुनीता त्यांच्या जवळ गेली. त्यांना हात लावला. “कसे आहे?” विचारले. तिच्या सासूने त्यांना जवळ घेतले आणि सुनीताला किचनमध्ये पाठवून दिलं. सुनीताला रडायला येत होतं. तरी तिने लगेच अश्रू पुसले. मुलांना खायला, नणंदसाठी पाणी घेऊन गेली आणि दिलं. लगेच तिथून निघून गेली.

“आई, भावासाठी आपण दुसरी मुलगी बघू. किती वर्ष झाली, वहिनीला एक मूल झालं नाही. आता किती वर्षं झाली? आता कधी होईल? किती पैसे खर्च केले, तरी काही झालं नाही. एक देवीच्या तिथे घेऊन जाऊ, तिला ओटी भरून हातावर कपूर जाळावं लागेल.”

रमेश आल्यावर त्याला सांगते, “तू आहेस. तू पण चल. उद्याच जाऊ. मला पण नातवाचं तोंड बघायचं आहे. माझ्या रमेशला पण मुलं पाहिजे ना. त्याला पण बाप व्हायचं असेल. सुनीताला खूप जीव लावतो ना.”

रमेश घरी आला. बहिण आणि तिची मुलं आलेली बघून त्याला खूप आनंद झाला. सुनीता आली, त्यांच्या हातची पिशवी घेतली आणि किचनमध्ये ठेवून दिली. त्याला पाणी घेऊन आली. चहा ठेवायला किचनमध्ये निघून गेली.

रमेश रूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला. ताईसोबत आणि भाच्यांसोबत बोलत होता. सुनीता सगळ्यांना चहा घेऊन आली. मुलांना दूध घेऊन आली.

सुनीता रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी निघून गेली.
“रमेश, मी काय म्हणते... देवीचं मंदिर आहे, आपण तिथे जायचं का?” रमेशची आई म्हणाली.

“आई, माझा यावर काही विश्वास नाही गं. जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईल” रमेश म्हणाला.
त्यांची आई काही बोलली नाही.

सुनीता किचनमधून सगळं ऐकत होती. तिला जायचं होतं. “तिथे जाऊन काही होईल? खरंच बाळ झालं तर?” ती विचार करत होती. आणि कामाला लागली.

रमेश मुलांना घेऊन खाऊ आणायला गेला होता. रात्री सगळं आवरल्यावर सुनीता रूममध्ये गेली.
“अहो, आपण ताई सांगत आहेत, त्या देवीजवळ जाऊ ना...” सुनीताने हट्टच धरला. मग ते मंदिरात जाऊन आले.

सुनीताचे हात खूप भाजले होते. रमेश तिला रागावला होता.
“आता मी तुझं काहीच ऐकणार नाही” रमेशने सांगितलं होतं.त्यांच्या आईलाही तो बोलला होता.

सुनीता काही बोलत नव्हती. रमेश घरी नसला की त्यांची आई सुनीताला खूप बोलत होती. सुनीताला ते आता सहन होत नव्हतं. ती एकटीच रडत बसायची.

नंतर तिने व्रत–उपवास केले, तरी काहीच बदल झाला नाही. समाजाचे, नातेवाईकांचे टोमणे ऐकून ती खचत गेली.
“तुमच्या घरात अजून पाळणा हालला नाही का?”
“संगीतेला मूल होत नाही का?”
असे प्रश्न तिच्या कानावर सतत आदळायचे. रमेश कितीही समजवायचा, तरी आई होण्याची हुरहूर तिच्या मनातून जात नव्हती.

एका रात्री संगीता रमेशजवळ बसून म्हणाली,
“तुम्ही दुसरं लग्न करा. मला माहिती आहे तुम्हाला खूप मूल हवंय. मी जर देऊ शकत नसेन तर दुसरी कुणी देईल...”
तिच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी रमेशचं हृदय पिळून निघालं.

“संगीता, असं कधीच बोलू नकोस. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना पण करू शकत नाही मी. मूल हवं आहे, पण त्यासाठी तुला गमावण्याची तयारी नाही. आपल्या आयुष्याचं सुख मूलावरच अवलंबून नसतं” रमेशनं ठाम आवाजात सांगितलं.

त्याच्या शब्दांनी संगीता थोडी शांत झाली, पण तिच्या मनातली पोकळी काही कमी झाली नाही. आई व्हायचं स्वप्न तिच्या डोळ्यांसमोर सतत उभं रहायचं. कधी रस्त्यावर एखादं बाळ दिसलं की तिचे हात त्याला घेण्यासाठी व्याकुळ व्हायचे. कधी एखादी मुलगी “आई” म्हणून हाक मारताना दिसली की ती आतून कोसळून जायची.

हळूहळू रमेशनं तिच्या मनातला वेदनेचा प्रवाह ओळखला. त्यानं संगीतेसमोर एक विचार मांडला,
“आपण दत्तक मूल का नाही घेऊ शकत? कितीतरी मुलं आहेत ज्यांना आई-बाबांचं प्रेम नाही मिळत. आपण त्यांना आपलं नाव, आपलं घर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं प्रेम देऊ शकतो.”

संगीता थोडी दचकली. “दत्तक? पण लोक काय म्हणतील?”

रमेश हसून म्हणाला,
“लोक काहीही बोलोत. आपल्याला आपलं सुख महत्त्वाचं आहे. आता पण तुला बोलतच आहेत ना? तुला त्रास होतो, मला समजतंय. आई फक्त जन्म देण्यात नाही, तर प्रेम देण्यात आहे. तू तयार आहेस का?”

त्या क्षणी संगीतेच्या डोळ्यांत आशेची किरणं चमकली. तिनं रमेशचा हात घट्ट धरला.
“मुलं मिळतील का?” त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाहिलं. काही दिवसांतच त्यांनी दत्तक संस्थेशी संपर्क साधला. तिथे असंख्य निराधार मुलं पाहून संगीतेच्या डोळ्यांतून अश्रू थांबेना. प्रत्येक चेहरा जणू तिच्याशी बोलत होता,
“आई, घेऊन चल मला...”

आणि मग ती भेटली – गोजिरवाणी, फुलासारखी नाजूक, सहा महिन्यांची बाळ. तिच्या निरागस डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं. संगीतेनं तिला उचललं आणि बाळानं तिच्या गळ्यात घट्ट हात गुंफले. त्या क्षणी संगीतेच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे वेदनेचे नव्हते, तर आयुष्यात पहिल्यांदाच आईपणाच्या आनंदाचे होते.

तिला घरी आणलं. तिचे खूप लाड चालू होते. रमेशची आई पण बाळासोबत खेळत होती, तिच्यासोबत बोलत होती. सुनीता काही बोलत नव्हती. बाळासोबत छान वेळ जात होता.

काही महिन्यांनंतर घरात खऱ्या अर्थानं पाळणा हलू लागला. हसू–खेळ सुरू झाले. शेजारच्या मुलांच्या चिवचिवाटात आता तिच्या बाळाचा आवाजही मिसळला.

एक दिवस ती स्वयंपाकघरात काम करत असताना बाळानं प्रथमच “आई...” अशी हाक मारली. संगीतेचे हात थांबले. ती धावत बाळाकडे गेली आणि तिला मिठीत घेत अश्रूंमध्येच हसली.

त्या दिवशी संगीता रमेशकडे वळून म्हणाली,
“मला वाटायचं मी अपूर्ण आहे पण खरं तर आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नव्हे. हे बघा, आज माझ्या हृदयानं अनुभवला की आई ही आई असते – ती जन्म देणारी असो किंवा सांभाळ करणारी. मायेनं प्रेम कमी होत नाही.”

रमेशनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघंही आपल्या लाडक्या लेकराकडे पाहत आनंदात हरवून गेले.