Login

मला कधी सपोर्ट कराल... भाग 1

अरे बापरे का सांगितल मुलींनी यांना, काही खर नाही आता, यांचा इगो आड येईल, मला विचारल नाही म्हणून जावू देणार नाही ते मला


मला कधी सपोर्ट कराल... भाग 1

तुम्ही माझी बाजू का समजून घेत नाही
©️®️शिल्पा सुतार
.........

अश्विनीच्या दोन छोट्या मुली सोना मोना गार्डन मधे खेळत होत्या, बाजूला बाकावर बसुन अश्विनी फोन वर बोलत होती, हो दादा... येईल मी ... हो सांगते ना... हो विचारते मी यांना... नक्की करते उद्या फोन... हो नक्की...

मुली पळत आल्या, अश्विनी खुश होती, तिने मुलींना जवळ घेतलं,.. "झाल खेळून? जायच का घरी?, परीक्षा आली ना जवळ",

"आई पाच मिनिट, कोणाचा फोन होता",.. सोना.

मामाचा.

"आपल्याला जायच आहे का आई सुट्टीत मामा कडे? ",.. मोना.

"हो पण अजून नक्की नाही, उगीच खुश होवू नका " ,.. अश्विनी.

" जाऊ ना आपण तिकडे मामाकडे प्लीज, आजी कडे पण जावू ",.. सोना.

" हो आज बोलते मी तुमच्या पप्पांशी, मग ठरवू, जा खेळा, पटकन या, उशीर होतो आहे ",.. अश्विनी.

तिची मैत्रीण प्रिया बाजूला बसलेली होती,.." काय झाल अश्विनी का नक्की नाही तुझ गावाला जायच, तुझा दादा घ्यायला येणार आहे ना घ्यायला , जा की छान थोडे दिवस",..

"अजून श्रीकांतला विचारल नाही मी, त्या शिवाय कस ठरवणार ",.. अश्विनी.

" कठिण आहे, कोणत्या काळात जगते आहेस तू, अजूनही तुमच्या कडे चालू आहे का ते विचारण वगैरे",.. प्रिया.

" हो, दिवसभरातही कुठे जायचं असेल तर, सुट्टीत कुठे जायच असेल तर विचाराव लागत मला यांना , तू नाही विचारात का घरी ",.. अश्विनी.

" नाही मी सांगते जाणार आहे",.. प्रिया.

" लकी आहेस तू पण माझ्या सारख्या बर्‍याच बायका आहेत अजून ज्याना मनात असलं तरी त्या स्वतः ठरवू शकत नाही, कुठे जायच काय करायच ",.. अश्विनी.

" मला अस वाटत तूच डिसिजन घेत नाही आधीपासून, नवऱ्याला सवय लावून ठेवली आहे, त्यामुळे आता तुला सगळ विचाराव लागत ",.. प्रिया.

" तुला माहिती आहे का प्रिया माझ्याबद्दल काही , उगीच आपल मत मांडते आहेस तू, विचार करून बोलत जा , तुला माहिती नाही आमच्याकडची परिस्थिती किती कठीण आहे ते, मी जरी काही ठरवल तरी श्रीकांत ते बदलून टाकतात, त्यांच्यासमोर कोणाचं काही चालत नाही, अगदी आधी फिरून येवु मग येतांना भाजी घेवू अस जरी मी म्हटल तरी आम्ही आधी भाजी घेतो एवढी जड पिशवी घेऊन फिरून येतो, काय सांगू आता , त्यांना मला समजून घ्यायचा नाही तर काय करू मी ",... अश्विनी.

" कशी रहाते तु अशी? बदल हे ",.. प्रिया.

" तुला काय वाटत मी प्रयत्न केला नसेल का, पण शक्य नाही झाल, पडेल फरक नंतर याचा आशेवर आहे मी, नाहीतरी मग त्यांना सोडून माहेरी निघून जाव लागेल मला, एवढ दुसर टोक गाठायच नाही मला ",.. अश्विनी.

अश्विनी सोना मोना सोबत घरी आल्या , मुली अभ्यासाला बसल्या तिने घर आवरल, ती मुलीं जवळ बसली होती ,आज बोलून बघु यांच्याशी, जरा वेळाने श्रीकांत आला,

" पप्पा आम्ही सुट्टीत मामा कडे जाणार आहोत, आज फोन आला होता मामाचा",... मुली आनंदात होत्या.

श्रीकांत अश्विनी कडे बघत होता, काही विचारल नाही त्याने.

" अरे बापरे का सांगितल मुलींनी यांना, काही खर नाही आता, यांचा इगो आड येईल, मला विचारल नाही म्हणून जावू देणार नाही ते मला, मी विचारलं असतं यांना सावकाश, काय करू आता",.. अश्विनी

चहा पाणी झाल, तिने बघितल श्रीकांतचा मूड कसा आहे ते, हळूच विचारल,.. "अहो मी काय म्हणते मुली म्हणता तस , सुट्टीत एक आठवडा जावू का दादा कडे मुलींना घेऊन, दादा खुप आठवण काढतो आहे, वहिनी पण खूप बोलवते आहे, आई बोलली मला तू नेहमी इकडे येते, एखादेवेळी तिकडे पण जाऊन येत जा दादाकडे, तुमची पण आठवण काढत होता दादा, तुम्ही पण चला थोडे दिवस ",

"ठरल ना तुझ आधीच सगळं, मग मला का विचारते आहेस",... श्रीकांत.

"अहो काही नाही ठरलं, मुलीना काही माहिती नाही, मी सांगितल दादाला तुम्हाला विचारून सांगते, आपला काय प्लॅन आहे सुट्ट्या कधी आहे तुम्हाला हे माहिती नव्हत मला ",.. अश्विनी.

🎭 Series Post

View all