Login

मला कधी सपोर्ट कराल... भाग 3

सकाळी मुली शाळेत जायला तयार होत्या, त्या काकांकडे जायला उशीर होऊ नये म्हणून आज कधी नव्हे तर श्रीकांत मुलींना बस स्टॉप वर सोडून आला


मला कधी सपोर्ट कराल... भाग 3

तुम्ही माझी बाजू का समजून घेत नाही
©️®️शिल्पा सुतार
.........

श्रीकांतचा फोन वाजत होता, तो बराच वेळ फोनवर बोलत होता, श्रीकांतच्या चुलत काकांकडे पूजा होती, म्हणजे आता मदत करावी लागेल ,.. " मदतीला पाठव अश्विनीला" ,.. त्यांनी ऑर्डर सोडली.

"हो येईल ती सकाळ पासून तिकडे ",..श्रीकांत.

श्रीकांतने लगेच सांगितल,.. "रात्री आवरून घे तुझे सगळे काम, मी उद्या तुला सकाळी लवकर सोडून देतो तिकडे, मदत कर त्या लोकांना , मी येईन संध्याकाळी घ्यायला" ,

"अहो पण मुलींची शाळा आहे ना, त्यात परीक्षा जवळ आली आहे, त्यांच्या दोन सूना त्या असतील ना घरी, मी जायला हव का ",.. अश्विनी.

"एखाद दिवशी नको पाठवू मुलींना शाळेत , नाहीतर इकडे चार वाजता येऊन घेऊन जा मुलींना तिकडे",.. श्रीकांत.

"मी संध्याकाळी तुमच्या सोबत तिकडे जाईल, सकाळ पासून नको",.. अश्विनी.

"एकदा मी सांगितल ना ते करायच अश्विनी, काही झिजणार नाही तू थोड काम केल तर",.. श्रीकांत.

अहो पण.

" यावर चर्चा नको ",.. श्रीकांत.

काय अडल आहे पण एवढ आपली गैरसोय करून यांच्या मदतीला जायची, त्यांच्या पैकी कोणी येत का आपल्या कामाला, कधी समजणार यांना, मला काही महत्त्व आहे की नाही, ज्याने बोलवलं तिथे मी कामाला जाते, इतके कसे लोक धार्जिणे हे काही समजत नाही, बायको मुलींची सोडून पूर्ण जगाची काळजी आहे यांना.

आपल्या कडे काही कार्यक्रम असला की ते लोक अगदी जेवायच्या वेळी येतात, काही करत नाही, नुसत बोलत बसतात,

तेव्हा श्रीकांत म्हणतो आपल्याकडचा कार्यक्रम आहे तूच कर सगळं, कोणाला काम देऊ नकोस, कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही,

आपण मात्र त्यांच्या कडे मर मर काम करायच, मागच आवरायच, आपल्या घरचे आपल्या बाजूने नाहीत काय बोलणार दुसर्‍याला, यांनाच माझी किंमत नाही, बर तिथे जावून मान तो काहीच मिळत नाही, आपल्याला मुलीना ते कशात सामील करून घेत नाही, उलट त्या एवढ्याश्या मुलीना काम देतात, झाडूनच घे, पाणी आण, काहीच कस वाटत नाही त्यांना अस वागतांना.

बाकी नातेवाईक ही सारखे दोघी मुलीच का अस विचारात असतात, मुलगा हवाच, मुली आधार देतील का, असे जुनाट विचार त्यांचे, मुली पण एवढस तोंड करून ऐकतात, काय प्रॉब्लेम आहे पण लोकांना मला दोघी मुली आहे तर, किती समजूतदार हुशार आहेत त्या शांत समंजस अगदी, पण मला आणि मुलीना बोलायचा एकही चान्स लोक सोडत नाही.

कारण माझे मिस्टर माझ्या बाजूने नाहीत, हे ठाम पणे माझी बाजू घेत नाही, लोकांना चांगलं समजलं आहे हे हिला काहीही बोला ऐकुन घेते ही, अस आहे, कुठल्या प्रकारे समजून सांगावं यांना काही समजत नाही.

सकाळी मुली शाळेत जायला तयार होत्या, त्या काकांकडे जायला उशीर होऊ नये म्हणून आज कधी नव्हे तर श्रीकांत मुलींना बस स्टॉप वर सोडून आला.

अस आपण इतर वेळी किती जरी म्हटलं की मुलींना सोडून या बस स्टॉप वर तरी ते तयार नसतात. पण आज त्यांच्या नातेवाईकांकडे कार्यक्रम होता, तिथे मला जायला उशीर होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः हे काम अंगावर घेतलं.

खूपच राग येत होता अश्विनीला

"आटोपलं का तुझं चल मी सोडून देतो तुला ",.. श्रीकांत.

"मी जाईल माझी मागून रिक्षाने तुम्ही निघा",.. अश्विनी.

तरीही श्रीकांतने तीचे काही ऐकलं नाही, तिला स्वतःबरोबर सोडून दिलं तिथे आणि मगच ते ऑफिसला गेले,

नेहमीप्रमाणे व्हायचं ते झालं अश्विनी तिथे एकटीच किचनमध्ये राबत होती, बाकीचे सगळे पूजेत बिझी होते किंवा पुढे गप्पा मारत होते, जेवतानाही बाकीच्या सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर अश्विनीला जेवायला मिळालं, जसं काही ती काम करायला आली होती तिथे.