मला कधी सपोर्ट कराल... भाग 4 अंतिम
तुम्ही माझी बाजू का समजून घेत नाही
©️®️शिल्पा सुतार
.........
©️®️शिल्पा सुतार
.........
चार वाजता ती जाऊन सोना आणि मोनाला घेऊन आली, रस्त्यातच त्यांचा समोसे खाऊ घातले, तिला माहिती होतं इथे घरी येऊन काही मिळणार नाही, तसेच झालं इकडे कोणीच विचारलं नाही मुलींना, शाळेतुन आल्या तर जेवायला वाढ त्यांना, मुली नुसत्या बसलेल्या होत्या,.. "आई घरी चल ना" ,
पण अश्विनीची हिम्मत झाली नाही, उगीच आम्ही घरी जावू, नंतर हे येतील, आम्ही इथे नाही बघून खूप चिडतील, दिवस भर केलेल काम दिसणार नाही यांना, थांबू थोड ,.. "हो जावू तुमचे पप्पा आले की निघू",
संध्याकाळी श्रीकांत आला तो बराच वेळ सगळ्यांशी बोलत बसला होता, परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी अश्विनीवरच आली, मुलींचा अभ्यास राहिला तो वेगळा, जेवण करून ते घरी आले,
अति झाल आता मला मुलीना घेवून माहेरी जाव लागल तरी चालेल पण मी या वेळी बोलणार आहे यांना ,
अश्विनी जरा रागातच होती, न बोलताच तिने झोपून घेतलं, दोन-तीनदा श्रीकांतने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी पण ती चिडलेलीच होती मला अगदीच कंटाळा आला आहे या गोष्टीचा, काहीही झाल तरी मी विरोध करणार, सकाळी तिने स्वयंपाक केला न बोलता चहा नाश्ता दिला, अश्विनी.. श्रीकांत हाक मारत होता, ती रूम मध्ये निघून गेली, श्रीकांत ऑफिसला गेला, संध्याकाळी घरात शांत वातावरण होत.
"काय झाल अश्विनी बोलणार आहेस का तू माझ्याशी",... श्रीकांतने रात्री जेवताना विचारात होते,.. "कोणी काही बोलल का तुला तिकडे" ,
"कोणी जरी आम्हाला काही बोलल तर काय फरक पडतो तुम्हाला, कशाला काळजी केल्या सारख दाखवताय",.. अश्विनी.
काय झाल?
"मला बोलायच आहे तुमच्याशी थोड, या नंतर तुम्हाला माझ म्हणण नाही पटल तर मी मुलींना घेवून माझ्या आई कडे निघून जाईल",.. अश्विनी.
"काय झालं एवढ? काही त्रास आहे का",.. श्रीकांत.
" हो मला तुमचा कुठल्याच गोष्टीत आधार वाटत नाही, तुम्ही माझी बाजू कधी सांभाळून घेत नाही, सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट त्यामुळे बाकीचे नातेवाईक ही आमच्याशी नीट वागत नाहीत, तुम्ही आमच्या कुठल्याच गोष्टीला पहिले महत्त्व देत नाही, नेहमी बाकीचे महत्त्वाचे, त्यांचंच मी आधी सगळं करायचं",.. अश्विनी.
श्रीकांत ऐकत होते.
" मी माझ्या मुली माझं माहेरचे लोकं माझा आनंद त्याला काहीही महत्व नाही का ",.. अश्विनी.
" आहे महत्व, काय बोलते आहेस तू अश्विनी, कोणी सांगितलं तुला हे , माझ्या साठी आहात तुम्ही तिघी महत्वाच्या, एवढच आहे की मला काही सांगता येत नाही",.. श्रीकांत.
"मला नाही वाटत, तुमच्या वागण्या वरून काही प्रेम सपोर्ट दिसत नाही आमच्या बद्दल , आता तुम्ही उगीच तोंडावर मला अस म्हणता आहात, आपला बरेच वर्षे संसार झाला ना, तरी अजून समजल नाही तुम्हाला मला काय हव ते.
मी विचार केला आता समजेल तेव्हा समजेल तुम्हाला, पण तुम्ही समजूनच घेत नाही, आता मलाच माझं स्टॅन्ड घ्यावा लागेल, यापुढे मी तुमच्यासोबत तुम्ही म्हणाल तिथे लगेच येणार नाही, मला जर यायचं असेल तर येईल, मला मुलींना कोणी काही बोलाल तर तिथे उत्तर देईन मी त्या लोकांना, तुमचा सपोर्ट नाही तर आता आम्ही आमच बघु
नेहमी तुम्ही जे म्हणतात ते मी करते आणि मी म्हणते ते तुम्ही ऐकतच नाही असं चालेल का ",.. अश्विनी.
" कोणी काही म्हटलं का तुला तिकडे, किती चिडली आहेस, नको जावू या पुढे कोणाकडे, आता शांत हो",.. श्रीकांत .
" तो एकच प्रसंग नाही नेहमीच असं होतं, आता मी म्हटलं मला दादाकडे जायचं आहे तेव्हा तुम्ही नाही म्हटले आणि लगेच तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडे जायचं आहे, त्यांना सुद्धा आपण आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी भेटलो ना ",.. अश्विनी.
" अच्छा हे झालं आहे का माहेरी जायच का ",.. श्रीकांत.
" नाही हेच समजत नाही तुम्हाला मी काय म्हणते ते ",.. आता अश्विनी श्रीकांत जवळ येऊन बसली,.." मला तुमच्या आधाराची गरज आहे, मुलींना तुमची गरज आहे, तुम्ही आमच्या बाजूने असले तर कुठल्याही गोष्टीची काळजी नाही, कोणाची काही हिंमत नाही आम्हाला काही बोलायची, प्लीज समजून घ्या थोडं तरी, आमच्या बाजूने बोलत जा वागत जा, थोडा सपोर्ट करा, लोकांनाही कळू द्या की आमच्यासाठी कोणीतरी आहे ",
श्रीकांत शांत बसून ऐकत होता, यापुढे माझी चूक होणार नाही, मी प्रयत्न करेन तुझ्या मनाप्रमाणे वागेल.
सुरुवातीला विशेष फरक पडला नव्हता श्रीकांत मध्ये, पण आता तो अश्विनीला कुठे जायची जबरदस्ती करत नव्हता, थोडी तरी तिची बाजू घेत होता, अजूनही त्याचा ओढा त्याच्या घरच्यांकडे जास्तच होता, पण ठीक आहे हे, थोडा तरी माझा विचार केला हेच खूप आहे पडेल फरक हळूहळू,
सकाळी नेहमी प्रमाणे शाळेची घाई होती, डबा चहा नाश्ता करून मुली शाळेत गेल्या, मग मिळाला तिला तिचा हक्काचा वेळ, बर्याच वेळा ती आणि श्रीकांत या वेळात बोलत बसायचे एकमेकांसोबत वेळ घालवायचे, श्रीकांत किचन मधे आले, अश्विनी आवरत होती, त्यांनी तिला जवळ घेतल,.. "काय झाल आज गप्प आहेस",
"तू काही नाही रोजचे काम सुरू आहेत",.. अश्विनी.
"पुढच्या आठवड्यात आपण आधी गावी जावू, तिकडून येतांना तुला मुलींना सोडतो तुझ्या दादा कडे, येतांना तुझ्या दादाला सोडायला सांग घरी ",.. श्रीकांत.
"चालेल",.. ती खुश होती,.. "मी दादा कडून थोडे दिवस आईकडे जाऊ का?",
" हो जाऊन ये. तुझ्या साठी मुलीं साठी खरेदी करून घे जाण्या आधी",.. श्रीकांत.
" हो.. आहो आज माझ्या मैत्रिणी कडे जायच मला थोड्या वेळ दुपारी, जावू का ",.. अश्विनी.
" हो जावून ये, चार वाजेच्या आत ये, मुली येतील, परीक्षा जवळ आली, आज सायन्सचा अभ्यास घे त्यांचा ",.. श्रीकांत.
हो... ती खुश होती, अस हक्काने बोलाल तर तिला काही प्रॉब्लेम नव्हता, ती पण त्याचा मान जपत होती, तो पण तिची थोडी बाजू घेत होता,
होईल हळू हळू ठीक ती खुश होती,
आपल्या माणसांची थोडी तरी बाजू घ्यायला हवी , घरच्यांशी प्रेमाने वागायला हव , एकमेकांना सांभाळून घ्यायला हव, प्रेमाच आधाराच नात दोघी बाजूने हव .
........
........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा