मनातला पाऊस भाग 4 अंतिम

कथा स्त्री मनाची
मनातला पाऊस भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

दुसर्‍या दिवशी एका ठिकाणी प्रोग्रामला जायच होत. आकाशने निशाला फोन केला. "संध्याकाळी तयार रहा."

"माझ जमणार नाही." तिने स्पष्ट सांगितलं.

" काय झालं? "

" आज थकल्या सारख वाटत आहे. त्यात आई बाबा रोहितचा स्वयंपाक करावा लागेल. आजकाल धावपळ होत नाही माझ्या कडून."

" डॉक्टरांकडे जावू या का?"

"नाही तुम्ही जा." नाहीतरी यांच्या सोबत प्रोग्राम मधे खूप बोर होत. ते त्यांच त्यांच बोलतात. मला उगीच मी कमी आहे अस वाटत. आता हल्ली कुठे जावसं वाटतं नाही.

आकाश प्रोग्रामला गेला नाही. तो तिच्या पुढे मागे होता.

आकाश दुसर्‍या दिवशी ऑफिस मधे विचार करत होता. आमच दोघांच नात पूर्वी सारख राहील नाही. त्याने त्याच्या डॉक्टर मित्राला फोन केला. निशा बद्दल तो सांगत होता. "तिला आता हल्ली निशात अजिबात उत्साह नाही. काॅन्फीडन्स तर अजिबात नाही. ती माझ्याशी बोलत नाही. लांब रहाते. काय कारण असेल?"

डॉक्टर विचारात होते एकंदरीत दिनक्रम. कोण काय करत?
"या वयात होत अस. वहिनीला तुझ्या आधाराची प्रेमाची गरज आहे. समजून घे थोड. प्रेमाने वाग."

काहीतरी कराव लागेल. त्याने आज निशाला दुपारी फोन केला." जेवण झाल का? "

तिला आश्चर्य वाटल. "हो झाल. बोला काही काम होत का?"

" नाही सहज तुझ्याशी बोलायला फोन केला. " दोघांना काही सुचत नव्हत.

होईल ठीक. प्रयत्न करायला हवा. रोज तो थोड तरी निशा सोबत वेळ घालवत होता. घरात थोडी मदत करत होता.

त्याने शनिवारी आई बाबांना हॉस्पिटल मधे नेल. आल्यावर सगळे गप्प होते.

"काय झालं आई? डॉक्टर काय म्हटले?" निशाने विचारल.

" तूच चलत जा निशा आमच्या सोबत. हा आकाश तिकडे चिडचिड करतो." त्या हळूच बोलल्या.

"निशाला माहिती असत आपल्या बद्दल सगळ. " बाबा बोलले.

तिला बर वाटल होत. आई बाबा आत गेले.

"निशा अग आई बाबांकडे बघण कस जमत तुला? हे काम कठिण आहे. तू कस करतेस? " आकाश तिची तारीफ करत होते. ती खुश होती.

" काही नाही त्यांच्या कलाने घ्यायचं. " तिने सांगितल.

"आई बेस्ट आहे . " रोहित गळ्यात पडला.

रोहितची बारावी झाली. रोहितला चांगल्या इंजिनिअरिंग काॅलेजमधे अ‍ॅडमिशन मिळाल. तो होस्टेलला शिफ्ट होणार होता. निशाची अवस्था बिकट होती. चेहर्‍यावर हसू होत. आत रडत होती. हा कसा राहील माझ्या शिवाय? हा विचार होता. त्या सोबत प्रगती होते आनंद ही होता. आता काय करणार मी? आकाश बिझी असतात.

रोहितला होस्टेल सोडल. इतक्या वेळ थांबवलेले आसू तिच्या गालावरून ओघळत होते. ते तिने पटकन पुसले. ती बाहेर बघत होती. कार वेगाने घराकडे निघाली होती. आकाश बाजूला बसले होते मोबाईल मधे बघत. त्यांनी तिचा हात हातात घेतला. मी आहे. ति एकदम त्याच्या जवळ सरकली. त्याच्या खांद्यावर डोक टेकवून बसली. पूर्ण प्रवास आकाश तिला सांभाळत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी अगदी रीत वाटत होत. रोज रोहितची किती गडबड असायची.

"निशा चल आपण वॉकला जावू." ते दोघ निघाले. खूप छान वाटत होत.

"चहा घ्यायचा का टपरीवर?"

ती हो बोलली. ते भाजी घेवून वापस आले. तिला आकाश बरोबर घालवलेले क्षण दिवसभर पुरले. ती खुश होती. उत्साहात घरकाम केल. रोहितची रूम साफ केली. रोहितचा फोन आला. आई ठीक आहे बघून तो खुश होता.

तीच आणि आकाशच नात छान बहरत होत. अगदी आधी सारख नाही पण ते लक्ष देवून होते. दोघ सोबत ही होते एकमेकांना स्पेस ही देत होते. त्यांच्या एवढ्या सहवासाने निशाला बर वाटत होत.

"अहो थँक्यू तुम्ही चांगले आहात."

"निशा माझ लक्ष होत तुझ्या कडे. पण कधी कधी ते दाखवता येत नाही. काळजी करायची नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आनंदी रहायचं." ते समजावत होते.

दोघांनी मिळून योगा क्लास लावला होता. तिथे आता तीच मन रमत होत.

आज पाऊस सुंदर बरसला होता. बगीचा अगदी हिरवा गार झाला होता. पान आणि पान हसत होत. सुंदर फुल डोलत होते. निशाच्या मनाची ही तीच अस्वस्थ होती. कोणी तरी आहे माझी काळजी घ्यायला. ती खुश होती. आकाशची वाट बघत होती. त्याच्या आवडीचा स्वयंपाक तिने केला होता.


🎭 Series Post

View all