मनातला पाऊस भाग 2

कथा स्त्री मनाची
मनातला पाऊस भाग 2

©️®️शिल्पा सुतार

निशाला आता सवय झाली होती. मी एकटी आहे हे तिच्या मनाने मान्य केलं होतं. मनात कुठेतरी खूप खोल दुःख होतं या गोष्टीच. तिच्या वयात हे होतच. बाकीच्यांना ते समजत नाही.

यां घरच्यांसाठी आपण नोकरी सोडून घरी बसलो आणि थोड्या दिवसांनी यांनीच आपल्याला आउट डेटेड लेबर लावलं. ठीक आहे जगाचा नियमच आहे हा. तिने ते मान्य केलं होत.

तीच आणि रोहितच खूप पटत होत. एकुलता एक मुलगा. तो त्याच्या शाळा कॉलेजमध्ये बिझी असायचा . रोहित छान होता .जमेल तेव्हा आईची काळजी घ्यायचा. तिला आवडेल ते बोलायचा. बागेत फेरफटका मारायचा.

सासू सासरे एकमेकांसोबत राहायचे. सोबत सगळीकडे जायचे. त्रासदायक नव्हते. पण तरी जनरेशन गॅप होता.

निशा विचार करत होती काय करू? मला पुढाकार घ्यायला हवा. तिने आकाश सोबत एकदा दोनदा बोलून बघितल. "अहो आपण थोड बाहेर फिरायला जावू या का?"

" मी दिवस भर थकतो निशा नको मला थोड काम आहे."

"मी कंटाळली आहे घरात राहून."

"मग तू जावून ये बाहेर."

"एकटी?"

"हो या एरियात धोका नाही. "

" तस नाही." मला तुम्ही सोबत हव आहात. मला बोलायच आहे तुमच्याशी. खूप गोष्टी सांगायच्या आहेत. प्लिज मला वेळ द्या. पण ती गप्प बसली. अस म्हटलं तर म्हणतात बोल मग. प्रेमळ साथ. समजून घेण मुळी नाहीच.

त्यांना समजल नव्हतं की आता हल्ली तिला वेगळच वाटत होतं. ती गप्प बसली. यांची दुनिया वेगळी आहे. काय करणार कोणाला सांगणार? थोडं काही बोलायला गेलं की काय कमी आहे तुला घरात? सगळं चांगल आहे. अशी उदास राहू नकोस. सुख टोचतं तुला. बाकीच्यांकडे जाऊन बघा काय परिस्थिती आहे. दोन वेळचा स्वयंपाक कसा करायचा याची काळजी असते. तुम्हाला लोकांना चांगलं चुकलं खाऊन भरलेल्या घरात तोंड उतरून बसायला काय होतं?

हे सगळं ऐकण्यापेक्षा गप्प राहिलेल बर.

बाकीच्या लोकांना तिची मानसिक ओढाताण लक्षातच येत नव्हती. ती पण वयाच्या अशा टप्प्यावर होती तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. आता हल्ली तिला खूप रडू यायच. इथे माझ कोणी नाही अस वाटायच. काय करणार? तसच मनाला समजवून ती कामाला लागायची. तिची अपेक्षा जास्त नव्हती फक्त आकाशने तिला समजून घ्याव. थोडा वेळ द्यावा. प्रेमाने बोलाव.

दर दोन दिवसा आड ती आईला फोन करत होती. तिच्याशी पण किती आणि काय बोलणार. मैत्रिणींमध्ये जाव तर ते आकाशला आवडत नव्हतं. एकदाच तिने विचारल. "कॉलनीत एक ग्रुप आहे. त्यांच्यात मी जावू का?"

" मला भिशी लावलेली आवडत नाही. उगीच आपलं हा हा ही ही करायचं. त्यापेक्षा घरात वाचन करायचं. आपल्याला भरपूर काम आहेत." आकाश अस बोलल्यावर तिने नंतर विषय वाढवला नाही.

हे कधी घरी राहिले नाही. एकटे राहिले नाही. त्यांना काय कळणार आहे कंटाळा येतो.


🎭 Series Post

View all