Login

मनातले कोणाशी बोलू नका

Mnatle Bolu Nka
मनातले कोणाशी बोलू नका

सुमती एक गृहिणी असते, ती दिवस भर आपल्या घरातील कामात खूप व्यस्थ असते. घर आणि काम हेच तीच विश्व ठरलेले असते. खूपदा ह्या busy कामामुळे ती स्वतःला वेळ देता येत नाही. कधी दिवस जातो हे ही कळत नाही. सगळे आप आपल्याला कामात बाहेर निघून जातात. मग सकाळची काम झाली की ती दिवसभर एकटीच, मग मुद्दाम इकडची काम कर, ती साफ सफाई कर, डब्बे काढ ,बेडशीट बदल ह्या ती मन रमवत असते.-----
ह्यात ती आपल्याला ही मन आहे याचा विसरून जाते. पण मनात काही तरी सांगावं कोणाला सांगावे ,कोणाला वेळ असेल का आपलं काही ऐकून घ्यायला हा विचार करून ती कोणाकडेच काही बोलती होणे शक्य तो टाळत असते, जाऊदे आज नको उद्या बोलू ,यांना आता वेळ नाही, थकून आले असतील. आल्या आल्या सांगितलं तर चिडतील मग आजच उद्यावर, आणि उद्याच अजून उद्यावर असे करत करता सगळेच लांबनी वर घाल्यावची सवयच लागली.......
मग काही दिवसांनी त्यांच्या घरी तिच्या नात्यातली बाई आली ,ती खूप साडी वाटली ,सुमतीला मग हळूहळू त्यांची बट्टी जमत गेली,पण जितके दिवस ती होती सुमितीने तिच्या मनातल्या भावना, कोणाबद्दल राग ,सासू बद्दल कुठे असलेल्या रागाची कहाणी तिला सांगत, पण तिची काय चूक म्हणा तिला या आधी कोणी ऐकणारच नाही मिळालं ,क्षणी मैत्रीण नाही की कोणी बहीण नाही, टाळता टाळता नवरा ही कधीच नाही.
तिला ह्या मावशी अगदीच जवल्या वाटल्या.
अचानक मग एक दिवस सासूला सुमतीने ह्या मावशीला सांगितलेल्या गोष्टी कळल्या, आणि त्यांनी सुमतीला ह्याचा जाब विचारला, मग त्यांच्या वाद सुरू होऊ लागले, ते वाद तिच्या नवऱ्या पर्यंत पोहचले आणि त्यांच्यात ही वाद सुरू झाले, इतके की हे खरं खोट करण्यासाठी मावशीला बोलवावं लागले ,आणि मावशीने ही सासूचीच बाजू घेतली .
घरात सासू सुनेच्या रोज होत असलेल्या वादामुळे सासू ने आणि नवरयाने काही दिवस सुमतीसोबत अबोला धरला.
मनातल्या भावना व्यक्त केल्या म्हणून नाही तर ,त्या चुकीच्या व्यक्ती कडे केल्या म्हणून सुमती एकटी पडली होती, तिने सांगितले प्रत्येक बोल ती मावशी वाढून चालून सासूला सांगत असेल याचा जराही अंदाज सुमतीला आला नाही, यात सुमिती कधी मन मोकळं न करणारी सुमती कायमच गप्प गप्प राहू लागली ,पण नवऱ्याला तिची आवस्था समजली आणि तो तिला आणि तिच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी वेळ देऊ लागला होता.

©®Anuradha Andhale Palve