Login

मोड ही प्रथा भाग 2

Mod Hi Prtha
मोड ही प्रथा

भाग 2

मागील भागात आपण पाहिले...पंडितराव साळुंखे विसापूर ग्राम चे मोठे श्रीमंत व्यक्ती ...

विसापूर ही मोठे गाव..गावात आठ दहा हजार लोकसंख्या...60 सत्तर घरे...त्यात सगळ्यात श्रीमंत घर ,नावाजलेले घराणे म्हणजे पंडितराव ह्यांचे होत..

दोन भाऊ...दोघे ही वेगळे निघून बरीच वर्षे झाली होती..जो तो आपआपला स्वतंत्र कारभार बघत होता...आता भाऊ नसून त्यांच्या मध्ये भाऊबंदकी सुरू झाली होती..

पंडितराव ह्यांना अहंकार होता ,त्यात ते दिखाऊपणा ह्यात जास्त रस घेत होते... मोठ्या भावापेक्षा मी किती हुशार माझे मुलं किती समजदार ,समंजस...सरळ..माझ्या निर्णयाचा बाहेर नाही...मुलगी संस्कारी..बायको धाकात..आणि सुगरण...गावात मोठा नामधारी असा मी..

माझे शेत माझी मिळकत..त्यात भर टाकून जमीन काळी कसदार बनवणारा मी पहिला..चार मजली घर ,दोन एकर मध्ये मोठी बाग...समोर मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या आहेत...एक शाळा ...बायकोच्या गळ्यात सतत अर्धा किलो सोने ..माझ्या घरात खाय प्यायची कमी नाही... नुसते हाक मारायचा अवकाश...गाव लगेच जी हुजूर करत येते... आमची शान निराळी...पन्नास गावात आपला दरारा..लौकिक...अजून काय नसेल ते घेण्याची ऐपत आहे..


खूप गर्व होता माझ्या कडे 300 एकर बागायती जमीन आहे...हे मोठे मोठे तलाव आहेत...आमचे तालेवार घराणे आहे..आमची ही घराणे शाही..आणि त्याचा रुतबा अख्ख्या पंचक्रोशीत ओळखला जातो... आमच्या दहा पिढ्या घरी बसून राहिल्या तरी मागे हटणार नाही ही गडगंज श्रीमंती...किती ही खर्च केला तरी संपता संपणार नाही इतके पैसे..

असे काही से विचार ह्या पंडितराव यांचे होते..मुलगा मुलगी ह्या विचारात गेली कित्येक वर्षे वाढत होती.. लहान होते तेव्हा कळत नसत की आपले वडील असे का करत असतील..!! पण मोठे झाल्यावर आणि इतर मित्र मैत्रिणींचे वडील पाहिल्यावर कळत गेले.. अहंकार काय असतो ते...आणि स्वाभिमान ,गर्व ,अहंकार माज ह्यातील फरक काय आहे तो..

आपल्या बाबाला नेमका अहंकार होता आणि त्याचे रूपांतर माज ह्यात झाले..

दुसरी खूप मोठी बाब म्हणजे...मुली ,स्त्री ह्या गोष्टी घरातच बसून घर सांभाळतात... त्यांना तेच योग्य जमते...त्यांनी तिथेच काम करावे..चूल मूल.. चूल मूल करण्यात आपल्या जीवनाचे सार्थक करावे.. आपल्या आयुष्याचा वेगळा असा अर्थ शोधू नये... त्या गोष्टी पुरुषाला शोभतात त्या बाईच्या जातीने करू नये... त्यांनी हद्द सांभाळावी...तिच्या बाहेर काय जग आहे ते डोकावून पाहू नये..पुरुषाला सुख देणे हेच तिचे कर्तव्य...

श्रावणीच्या आयुष्यात ग्रहण लागणार, जसे आईच्या आजीच्या आयुष्याला लागले होते तसेच..तसेच संस्कार आणि विचार तिच्या डोक्यात भरवणे चालू होते...मनाशी गाठ बांधायची...आपले आयुष्य सासरचे घर आणि अंगण...चूल आणि मूल... नवरा ठेवेल तसे रहायचे.. देईल ते खायचे... मटण आवडत नसेल तिला तरी तो जर म्हंटला खा तर त्याचे मन नाही मोडायचे.. झोप म्हटला की झोपायचे.. उठ म्हटला की उठायचे... काही त्रास झाला तरी आम्हाला कळू द्यायचा नाही...

"तुम्ही मात्र लई उशीर केला पोरीच्या लग्नाला.." पंडित राव

"पंडितराव मुलगी शिकत होती मग कसं लग्न करायचे.!! " दादासाहेब

"डोक्यावर बसवायचे नसते अति, पायाची वहान असतात मुली ,त्यांना लायकी नसते.." पंडितराव तिरकस हसून म्हणाले..

"नाही माझी मुलगी शिकून मोठी झाल्याचे पहायचे होते ,तिच्या आईची इच्छा होती..मी ही शिक्षित आहे म्हटल्यावर मी असा वंगाळ विचार नाही करू शकत..."

"तुम्ही डोक्यावर घ्या वहान मग..पण पचतावा होईल बघत रहा दादा.."

"नाही नाही पचतावणार कधी मी.."

"चला उठा निघा मग आता तुम्ही ,बहिष्कार घालतो मी तुमच्या लग्नावर.."पंडितराव खेकसून बोलले

दादासाहेब आल्या पाऊली निघून गेले ,त्यांना माहीत होते ,जो स्वतःच्या मुलीचा मान नाही राखत तो आपल्या मुलीचा काय राखणार.. स्त्री आदर नसलेल्या माणसाने माझ्या मुलीच्या लग्नात न आलेच उत्तम..

दादासाहेब घरा बाहेर पडले होते..समोरून निर्मला ताईसाहेब आल्या होत्या.. त्यांनी दादासाहेबांना बघताच पदर सावरला..

"दादासाहेब तुम्ही इथे ,काही खास काम काढले का..? आता सगळी कामे बाजूला ठेवा लेकीच्या लग्नाची तयारी करा..मी शामला ही सांगून ठेवले आहे ,तो लग्नात मदतीला येईलच पण आर्थिक मदत लागली तर तसे ही करेन.."

"बाईसाहेब ,पत्रिका दिली होती पंडितसाहेब यांना..पण त्यांनी नाकारली आहे.. पण तुम्हाला दिली तर त्यांना अपमान वाटायचा..तरी भाऊ समजून या ,आशीर्वाद द्या मुलीला.."

"तुम्हाला भाऊ मानते मी, मग नाही कशी येणार..माझे आशीर्वाद असतीलच पण यांनी नाकारली म्हणजे आता माझे ही येणे शक्य नाही वाटत,पण श्याम नाही मानणार कोणाला ही ,तो येईल.."

बाईसाहेब यांनी लग्नाला जायला हवे का ?? की नवऱ्याचा मान जपायला हवा... की त्यांचा धाक समजून गप्प घरी बसावे..

अष्टपैलू महासंग्राम 2025

क्रमशः ...

🎭 Series Post

View all