Login

मोड ही प्रथा भाग 4

Mod Hi Prtha
मोड ही प्रथा

भाग 4

श्राप म्हणजे कोणी तरी मनापासून झालेल्या दुःखातून दिलेली तळतळाट.

तेव्हाच लागतात जेव्हा तुम्ही गरीब ,साध्या माणसाला त्रास देतात ,फसवतात..

कर्ज द्यायचे आणि ते फेडले जाणारच नाही हे बघायचे आणि त्यांच्या जमिनी लाटायच्या हे सर्रास त्या काळी होत, म्हणून तर आज काही लोक इतके मोठे जमीनदार आहेत..

त्यांच्या मेहनतीची कमाई काहीच नाही ,ही तर त्यांच्या हुशारीची कमाई असते...

पण त्यांच्याच घरातील चांगल्या लोकांना हे श्रीमंत जमीनदार होने मान्य नसतेच ,लुबाडलेले टिकत नसते..


आजीला तो शाप आठवला होता...मनात खूप वर्षांपासून साठवलेले गुपित नातवाला सांगायच होत...

घरात जो अहंकाराने जागा घेतली होती त्याचे रूपांतर...हळूहळू माजात बदलत होते... जो माज माणसाला माणसात बसायच्या लायकीचा ठेवणार नव्हता..

हीच गत आता पंडितराव यांची होणार होती..


ते हळूहळू ह्याचा अहंकारा पायी आपली विश्वासाची प्रेमाची माणसे तोडून टाकत होता..


आज तर त्यांनी दादासाहेब ह्यांनाच तोडले होते..

त्यांचा उजवा हात...होते दादासाहेब

श्याम लगेच खाली आला... शर्टची बाही मागे घेत पुन्हा आईला हाक मारली..

"आई !!! आईसाहेब !! माते..! मातोश्री..! कुठे आहात तुम्ही...या ना जरा बाहेर...दर्शन घेऊ द्या तुमचे...."


त्याने मोबाईल उचलला ,आणि सगळे मेसेज पाहिले... आज मिराची हळद आहे... विसरलोच मी...!


"आई !! आई लवकरात लवक खाली प्रस्थान करा आता तरी...!! " तो

श्रावणी तिकडून आलीच होती...

"दादा काय ओरड चालू केलीस तू ,आणि हे काय कोणीच अजून तयार नाही...? "


"मी होत होतो तयार पण तू असली की टेन्शन नसते ,कोणता ड्रेस घालू..कोणता नको घालू !! हे तुला कळते ..! तू आली आहेस तर ये सांग मला...चॉईस भारी असते तुझी !! " तो

"म्हणजे लक्षात राहिले तर ,नाहीतर लग्नात फक्त जेवायला गेलो असतो आपण.." श्रावणी

"नाही नाही without फेल जायचे हे ठरवल्यावर मी विसरून जाऊ कसा...हे तर माझ्या बहिणीचे लग्न आहे ग...दादाकाका वाट बघत असतील..आपण लगेच निघू..." तो

"आपण जाऊ ,पण बाबा त्यांना कसे म्हणायचे तयार व्हा म्हणून...ते तर टाळण्यासाठी कारण शोधत असतात...निदान ह्या लग्नासाठी तरी नको कारण द्यायला "श्रावणी दादाला म्हणाली

"दिले कारण तुझ्या बाबांनी, लग्नाला न जाण्याचे..." आई म्हणाली

"म्हणजे काय आता नवीन.." श्याम

"ह्यांना जे काही थोडी माणस मानतात ते ही आता मानणार नाही...दूर होतील दादा साहेब काका अश्याने..." श्रावणी

" वाटले तर हे नक्कीच होईल.." आई

"दादाकाका एकमेव होते जे आपल्यासोबत राहून आपले होऊन काम करत, प्रामाणिकपणे. " श्याम

"झालंय काय पण नेमके..? " श्रावणी

"दादासाहेब घरी पत्रिका घेऊन आले होते, आणि बाबांच्या बोलण्यात आले की तुझी मुलगी इतकी शिकवायची काय गरज होती ,लावले असते लवकर लग्न तर काय बिघडले असते ,ठेवायची होती तिला लायकी नुसार...तर दादा काका त्यांना म्हणून गेले की मी तिला शिकवणार हे ठरले होते ,तिच्या आईची इच्छा होती...माझे विचार इतक्या खालच्या पातळीचे नाही की मी मुलीला लायकीत ठेवेन..."

"मग बरोबर तर बोलले ना दादा काका ,चूक काय.."

"माझ्या विरोधात तो बोलला कसा ,माझा नौकर हा ,मला शिकवतो काय अक्कल म्हणून मी बहिष्कार करतो ,येणार नाही मी लग्नाला म्हणून हाकलून दिले काकाला.. " आई

सगळ्यांचे डोके सुन्न झाले ,आता अहंकाराने सीमा ओलांडावी ती ही अश्या प्रकारे


श्रावणीच्या तर डोळ्यातून पाणीच आले...आता दादा काका ही दुरावतील अश्याने ही भीती वाटत होती..

"नाही नाही ,हे असे करायला नको होते बाबांनी."

"हेच सहज करू शकतात बाबा आपले ,नवे आहे का हे वागणे त्यांचे.." श्याम

"मी तर म्हणते,आता ह्या घरातील वाईट काळ सुरू झाला असे नकारात्मक फीलिंग येत आहेत मला..." श्रावणी

"श्रावू तू आता तुझ्या अभ्यासाला सिरियसली घे, निघून जा इथून..मी ही तेच करणार आहे.."

"सगळे ठीक आहे पण आई आजीला इथे मरणा दारी टाकून आपण आपला स्वार्थ बघायचा का रे..? " श्रावणी

"मी थांबतो इथेच ,शेती ही करतो आणि शेतीची वाट ही लावतो बघच तू.." तो

"वाट !! वाट लावतो म्हणालास का तू !! " श्रावणी

"वाट म्हणजे ,ती जोपासतो म्हणायचे होते मला..."

"मला तर तुझे काहीच कळत नाही..काय तर वाट लावतो...ही भाषा आहे का बोलण्याची..?"
ती

"बेहना ये तो गम्मत का भाग था रे.." तो

श्रावणीला शेतीच्या सत्याबाबत आत्ता काही सांगायला नकोच..तिला ह्या कैदेतून काढून तिच्या स्वप्नपूर्तीसाठी बाहेर पाठवणे ही महत्त्वाची जबाबदारी घ्यायची आहे..एक लढाई बाबांसोबत लढायची आहे..

पुढील भागांचे लिखाण चालू आहे ,लिखाण पूर्ण होताच भाग तुम्हाला वाचण्यास उपलब्ध होतील