भाग 8
मोड ही प्रथा
मागील भागात आपण पाहिले ,लेकीने आपल्या आईच्या वचनाची लाज राखली...जे दादासाहेब नेहमी आईसाठी भाऊ म्हणून उभे असते, मदत करत त्यांना दुःख झाले म्हणून स्वतः वडिलांच्या विरुद्ध उभी राहिली होती...धीटपणा अंगात होताच पण अन्याय सहन करणे पटत नव्हते ,ते ही विनाकारण..तो ही गरीब प्रामाणिक व्यक्तीसोबत होणारा अन्याय..
"आई बघ दादासाहेब.." श्रावणी
"आधी उतरून घेऊ ,गाडी बाजूला लावून घेऊ.." आई
"विनोद , तुम्ही गाडी लावून या आत.." श्रावणी
"तुझी पर्स घेतलीस ना तू..! " आई
"हो घेतली ग.." श्रावणी
"श्याम चा फोन येऊ शकतो..म्हणून असू दे जवळ.." आई
"श्याम चा फोन नाही तोच येईल ,आणि काम पूर्ण करूनच येईल.." श्रावणी
"तो पंकज ही यायला हवा ग..! खूप दगदग झाली त्याची अभ्यास सोडून तो गेला आहे मदतीला..." आई
"येणार तो ही, घेऊनच येईल दादा त्याला.." श्रावणी
दोघी आता आत गेल्या होत्या ,दादासाहेब आणि त्यांच्या घरातील सगळे तयारी करत होते..संजना काकू आणि यश दोघे ही पुढे आले होते श्रावणी आणि तिच्या आईचे स्वागत करायला.
"काका आणि काकू खूप अभिनंदन तुमचे दोघांचे.." श्रावणी
"खूप अभिनंदन दादासाहेब आणि वहिनी आज आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी !! " श्रावणीच्या आई
"आमची लाडकी ही लेक आली म्हणजे आता खरी मजा येईल.." दादासाहेब हसत म्हणाले
त्यांच्या कडे बघतच होत्या निर्मलाताई ,श्रावणीची आई...आणि श्रावणीच्या आईकडे संजना बघत होत्या
"काय झाले आई तुला ? "श्रावणी
"सकाळची गोष्ट आठवली ग मला !!" निर्मला बाई
"सोडा ताईसाहेब तुम्ही आता ते सगळे विसरून फक्त आंनद घ्या ,घ्याल ना ??" दादासाहेब म्हणाले
"मग त्यासाठी तर आलो आहोत आम्ही सगळे..' निर्मला हसून
"आम्ही सगळे म्हणजे ?" दादासाहेब
"दादासाहेब अहो श्याम मी आणि श्रावणी..! "
"मला थोडावेळ सगळेच म्हंटल्यावर ,पंडितराव साहेब ही आले असतील..! "
"तुम्ही मन छोटे करू नका ,आज फक्त आंनद घ्या.." निर्मला त्यांचा पडलेला चेहरा पाहून
म्हणाल्या
"आम्ही तर बाबा आज हळद लावणार ,हळद खेळणार आणि आंनद घेणार.." श्रावणी
इतक्यात श्रावणीला तिच्या मैत्रिणी हात दाखवून बोलवत होत्या
कीर्ती जवळ येऊन हात धरून घेऊन गेली श्रावणीला
एकदम खासमखास सजून धजून आलेल्या मुलींचा एकच दणका होता ,dj लावा..अरे dj लावा... होऊन जाऊद्या सैराट...
"अग कीर्ती आपली मेघा ,कुठे दिसत का नाही.." श्रावणी
"बरं तिचा श्याम कुठे दिसत नाही.." कीर्ती
"सवाल पे सवाल वा क्या बात है.." श्रावणी
"अग माहीत आहे ना तुला ,ती श्यासाठी अभ्यास सोडून आली आहे ग..! "कीर्ती डोळे मिचकवत
"ओके ,श्याम साठी शयाम को मिळणे श्याम की वो हलदी में पधारी है तो.." श्रावणी
"नको ग तिला एकदम ऑकवर्ड होईल..असे जर तिला मुद्दाम श्यामच्या नावाने चिडवले तर" कीर्ती
"म्हणजे खरंच काही आहे तर तिच्या मनात श्यासाठी...हम्मम्म.." श्रावणी
"तू ही कशी मस्करी करतेस..!! आहे म्हणूनच तर धूर धूर आहे सगळीकडे.." कीर्ती ही आता श्रावणीच्या भाषेत मेघाची गंमत करणार होती
"हम्मम,पण आज नूर काही वेगळाच असेल नाही का मेघाचा मॅडमचा.." श्रिया म्हणाली
"आम्ही काय कमी होतो तिला चिडवायला की तू ही सामील झालीस.." कीर्ती
"दिसत नाही ग ती ,कुठे आहे जाने मन..." श्रावणी
"किती ही घाई तुमची, तिला तो चांद दिसला नाही तर ती हळदीला येणार नाही म्हणते..तशीच निघून जाणार आहे ती...श्यामसाठीच तर आली आहे ती.." श्रिया
"असे असेल तर मग आज चांद दिसणार नाही सांग तिला.." श्रावणी हात झटूकन म्हणाली
"असे काय यार,आपण तिला साथ देतोय की तिची परीक्षा घेतोय.." कीर्ती
"साथ देणार जर स्वतःच्या कामाला प्राधान्य देत असेल तर...त्याला काम महत्वाचे असेल तर मग आपण काय करणार.." श्रावणी
सगळ्या श्रावणीकडे रागात बघत होत्या,कीर्ती श्रिया ,श्रीजा..हिला काय जणू गम्मत सुचत आहे.. जरा तरी मेघाच्या मनाचा विचार करावा म्हणतं होत्या...
इकडे सगळ्या स्पर्धा रंगल्या होत्या ,प्रत्येक मुलगी छान साडी मध्ये आणि बेस्ट लुक मध्ये येऊन हळदीची रंगत वाढवली होती..नुसत्या तारखा दिसत होत्या...सगळ्या मोठया घरच्या होत्या..त्यात मेघा जमीनदारांच्या घरण्यातली होती.. दिसायला जणू नक्षत्र होती..गोरी, तरतरीत डोळे, सरळ नाक..लांब केस...ओठ नाजूक...
उंच...बोलायला वागायला सुसंकृत... जिद्दी..आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी...जग रीत आणि नव युगा सोबत चालणारी..
उंच...बोलायला वागायला सुसंकृत... जिद्दी..आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी...जग रीत आणि नव युगा सोबत चालणारी..
तिकडे ती तडपड करती उभी होती ,हातातील फोन अजून ही वाजला नाही..अजून कसा त्याचा फोन आला नाही...त्याची वाट बघत उभी होती. त्यात त्याची थार गाडी ही दिसत नव्हती..त्याला सोबत करणारा पंकज ही दिसत नव्हता..पंकज असला म्हणजे समजून जात की श्याम जवळपास आहे...
डोळ्यात प्राण आणून आज फक्त श्यामला भेटायचे म्हणून आली होती ,नाहीतर इतर वेळी ती तिचा अभ्यास सोडून येत नसत..
श्याम आणि ती भेटतात हे आता सगळ्यांना माहीत झाले होते ,पण फक्त बालपणीचे मित्र म्हणून...पण त्यापलीकडे काही आहे हे त्यांना आत्ताच कोणालाही सांगायचे नव्हते..
खूप खास मैत्री आता खूप खास नात्यात बदलणार होती...तिला त्याची साथ अगदी कायम होती..तू मोठी अधिकारी हो..मी ही मागून येईल..तो आणि ती कधी तरी महिन्यातून एकदा भेटत...फक्त तिला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून तो कधीच भेटत नव्हता..प्रेम आता कुठे रुजत चालले होते..पण अंतर होते आणि भेटीची आतुरता जाणवू लागली हे जेव्हा समजले तेव्हा कळले ,मी गुंतत चालले आहे त्याच्यात आणि हे असे फक्त प्रेमात होते.. आणि प्रेम आहे हे समजले होते..आता फक्त त्याला ही जाणीव करून द्यायची होती..थोडा तो ही जवळपास रंगला होताच तिच्या प्रेमात...
बघू आता काय आडवे येते ह्यांच्या प्रेमात
क्रमशः
©®अनुराधा आंधळे पालवे