Login

मोड ही प्रथा भाग 1

Mod Prtha
मोड ही प्रथा

भाग 1

विसापूर त्यांचे गाव...गावात मोठे नाव..दोन्ही कुटुंबातील श्रीमंती म्हणजे वडिलोपार्जित.. स्वतःचे असे काही नाही..


सगळ्या गोष्टींचा हिशोब लागत नव्हता... कुठे कोणता माल विकला गेला आहे हे मूळ मालकलाच माहीत नव्हते..


वाटेकरी, नौकर चाकर सगळे जमा झाले होते...


मालक ओसरीत झुल्यावर बसून झुलत होते..

" श्याम कुठे गेला आहे..?"

"श्याम भाऊ गेलेत शेतात.."

त्यांचा पारा चढला..."श्याम घरी नाही.." पंडितराव रागात बोलले


"हो श्याम सकाळीच पळायला गेला आहे..."निर्मला श्याम ची आई बाहेर येऊन बोलल्या..

"पदर डोक्यावर घ्या मालकीण बाई..आणि आवरा पोराला तुमच्या.." पंडित राव बोलले

"नाही तो रोजच नाही जात ,पण आज गेला सकाळीच उठून..त्या पंकज सोबत.."

"त्या पंकजला सोड म्हणावं..कामाला लागा..ऊस कारखान्यावर पाठवायची वेळ झाली आहे... सगळ्या शेतातून ऊस गोळा करून ट्रक भरून भरून पाठवायचे आहेत फॅक्टरी ला.." पंडितराव म्हणाले


"सांगते त्याला, सकाळी पळून झालं की लगोलग शेतात जात जा म्हणून.." आई खाली मान घालून आत गेली

इकडे पंडितराव पुन्हा हिशोब जुळत नाही म्हणून आणि शेतातला ऊस उचलायला उशीर होत आहे म्हणून त्रागा करत होते..

"दादासाहेब ,त्या ऊसासाठी आजूबाजूच्या गावातल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली बोलावून घ्या..एकाच वेळेस सगळा ऊस शेतातून घेऊन जायचा आहे..."

"माहीत आहे पंडितराव साहेब..पुन्हा ह्या वर्षी नुकसान नको...हातात वेळ नाही आता तसा.." दादासाहेब जे पंडित रावांचा सगळा कारभार सांभाळत..

"मला आज ट्रॅक्टर ट्रॉली दारात पाहिजे..." पंडितराव

"मिळतील आपल्यालाच देतील सगळे गावकरी.." दादा

"लागतील तितके नाहीतर दहा जास्त मागून घ्या.." पंडितराव

पंडितराव यांची शेती जवळपास 300 ऐकर होती...सगळ्या शेतात ऊस लागवड करत..त्यांचा पसारा मोठा होता...त्यांच्या वडिलांनी आणि आजोबा पणजोबा ह्यांनी हळूहळू करून इतकी शेती विकत घेतली होती...

ते एकटेच...शेतीचा खर्च भरमसाठ...शेती परवडत नसत तरी बाप दादाने मेहनतीने कमावली आहे, मग आपण विकणारे कोण..म्हणून पुढच्या पिढीपर्यंत तरी आपण तिची राखण करायची..मग पुढे पुढे..

इकडे त्यांच्या पत्नी निर्मला बाई ,साध्य सरळ सातवी शिकलेल्या...पण घरात पूर्ण लक्ष असत..संसार नेटाने करत...पंडित राव यांच्या सारखा अहंम भाव अहंकार असलेला माणूस सांभाळून घेणे सोपे नव्हते.. तरी त्यांनी नेटाने ,गोडीत संसार केला होता.. त्यांच्या पदरात एक मुलगा एकी मुलगी पडले होते..

मुलगा श्याम आणि छोटी मुलगी श्रावणी...


श्याम दिसायला देखणा ,उंच ,राजबिंडा, सावळा रंग...शरीर बळकट..आवाज ही खडा...मदतीला नेहमी तयार...शेतात खूप जीव...गावाची खूप ओढ..नाती जपण्यात पुढे...दोस्ती मैत्री म्हणजे सर्व काही...स्त्रियांचा आदर करणे हा त्याचा स्वभाव...आई वडील बहीण हे म्हणजे जीव...


वडिलांना आपले दैवत समजणारा...त्यांचा हुकूम काही असो न टाळणारा... फक्त एक गोष्ट जी त्यांच्याबद्दल खटकायची ती म्हणजे ते आईचा आणि स्त्रियांना दुय्यम स्थान देत असत...


श्याम आणि त्याची लाडाची बहीण श्रावणी...म्हणजे जणू खास ...कधी भांडण झाले नाहीत पण झाले तर एकमेकांशिवाय ते राहू शकले नाही... तिला प्रवरानगरला मेडिकल शिक्षण घेता यावे आणि तिने तिचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून तो वडिलांसोबत भांडला होता..

त्याचे परिणाम म्हणजे वडील त्याच्या सोबत गेले दोन वर्षे बोलत नव्हते..

त्यांच्या मनाविरुद्ध कोणी तरी पहिल्यांदा निर्णय घेतला होता..

ह्याचे परिणाम बऱ्याच ठिकाणी त्यांना भोगावे लागले होते..

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मुलगा आपला विरोध पत्कारुन आपल्याच घरातील मुलीला उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे उभा राहून विरोधात बोलत होता..

त्यात बायकोने ही साथ द्यावी हे जास्त खटकले होते..

पंडितराव ह्यांचा बाणा आता कमकुवत झाला होता...

म्हणून बापाने मुलासोबत आणि मुलीसोबत बोलणे सोडले होते..

इकडे तुमची मुलगी म्हणून घेण्याची आता, लाज वाटते.. हे फक्त तुम्हाला समजावे की तुम्ही कोणत्या ही मुलीला तिच्या शिक्षणाच्या आणि स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही बाबा..श्रावणी म्हणाली होती..

तेव्हाच ह्या बापाला कोणी तोंडात मारले असते तर बरे झाले असते पण लेकीने असे बोलून गाडून टाकला माझा अभिमान..

एक भल्या धनाड्या आमदाराच्या मुलाचे स्थळ स्वतःहून चालून आले होते..आणि मेडिकल ला दाखला घेतला आता माघार नाही म्हणून सरळ नाकारले... श्रावणीत इतकी हिम्मत आली कुठून..

तेव्हा तिच्या मुखातून आपलाच हिरा बोलत आहे हे दिसले ,तेव्हा कळले तिच्या मागे बळ देणारा ,खंबीरपणे उभा तिचा मोठा भाऊ आहे..

तो ही आळ घेत होता...तुम्हीच माझे स्वप्न धुळीत मिळवले आहे बाबा...ठीक आहे मी सहन केले पण श्रावणीच्या बाबतीत हे होऊ देणार नाही..मी तिची पाठ राखण करणे सोडून देणार नाही..

इकडे निर्मला आधी नवऱ्याच्या बाजूने बोलत होती, मुलीला माघार घ्यायला सांगत होती..माघार घे...जाऊ नकोस..बापाला असे तोडून बोलू नकोस...पण झाले वेगळेच..


बघू पुढे ,मुलगा,मुलगी किती विरोधात जातील आपल्याच बापाच्या..

मुलीच्या अहंकाराला खत पाणी दिले जात आहे की खरच स्वप्नांना बळ दिले जात होते..

पुढील भाग लिहिणे सुरू आहे... लवकरच आपणास उपलब्ध करून देण्यात येतील..

अष्टपैलू 2025 महासंग्राम